"आमच्या संसार"

सई आणि आदित्य च्या गोड संसार


           सई आणि आदित्य नवीन नवीन लग्न झालं जोडपं.आई बाबा चा आवडीने केलेलं लग्न म्हणजे typical arranged marriage हो. पण दोघांनाही मान्य असलेलं लग्न दोघांनाही एकमेकांना पसंत केला नंतर लग्नाची गाठ पडली.एका महिना मध्येच लग्न झाल.काय झालं की सई मावशी कडे लग्नाला गेली म्हणजे मावस बहिणीच लग्न होत. तिकडे गेला नंतर आदित्य चा बाबानी सईला पहिलं आई बाबा ला सई पाहता क्षणी पसंत पडली. मग काही दिवसांनी पाहुणे पाहाचा कार्यक्रम झाला आदित्य पण आला होता दोन्ही बाजूंनी पसंती पडली.आणि एक महिन्यातच लग्न झालं. या काळात दोघाना एकमेकांन सोबत जास्त बोलता नाही आलं कारण दोघीही लग्नाच्या कामामुळे वेस्त होते. पण दिवसातून एक वेळ आदित्य फोन करायचा.त्यामुळे सई ला पण छान वाटायच आपली काळजी करणार आई बाबा नंतर आता आपल्या हक्काच कोणी तरी आहे.
        लग्न झालं सर्व कार्यक्रम झाले. आदित्य आणि सई १५ दिवसांनी पुण्याला आले. कारण आदित्य चा जॉब सुरु झाला होता आणि सुट्ट्या पण झाला होत्या. आदित्य ने पहिलेच २BHK चा फ्लॅट घेऊन ठेवला होता. आता या दोघाचा खरा संसार सुरू झाला होता. कारण लग्न आधी जास्त बोलणं नव्हतं झालं आणि लग्न झाला नंतर एकमेकांना हवं तसा वेळ देता येते नव्हता. मग काय इकडे आल्यावर दोघांनाही भरपूर वेळ होता एकमेकांच्या कामा मध्ये मदत करत होते आदित्य ने सई ला घर लावण्यांत पुर्ण मदत केली तस दुपारी थोडं बसून घरामध्ये काय काय अजून वस्तू पाहिजे याची यादी केली आणि संध्याकाळी दोघेही बाजारात जाऊन सर्व समान आणलं एकमेकांच्या आवडीने आणि बाहेरूनच जेवण करून घरी आले.
          दुसऱ्या दिवशी सई लवकर उठून सर्वात पहिले घर स्वच्छ करून झाडून काढलं .नंतर देवा पूजा केली अगरबत्ती सुगंध आणि आरतीचा आवाजाने आदित्य ला जाग आली तो फ्रेश झाला तोपर्यंत सई ने छान इडली संभार केला होता आदित्य साठी चहा करत ठेवला होता आदित्य किचन मध्ये आला सईला मागून मिठी मारली आणि गाला वर किस्स केलं गुड मॉर्निंग म्हंटल सई तशीच लाजली ?. आदित्य चहाचा कप घेऊन हॉल मध्ये आला सई ला अजून पण धडधड होत होत??. किती वेळ पर्यंत ती आदित्य चा समोर नाही गेली आणि आदित्य मुद्दाम तिचा समोर जात होता बोलायचा प्रयन्त करत होता पण या मॅडम लाजून लाजून हेरांन. दुपारच जेवण करून दोघेही TV पाहत बसले.
         आज सकाळ पासूनच आदित्य चा डोक्यामध्ये काही तरी चालू होतं हे सईला समजलं होत. सई इकडे संध्याकाळच जेवणं करत होती तर आदित्य रूममध्ये सईच Surprise paln करत होता. सई ने जेवणं बनवून झाला वर आदित्य ला आवाज दिला. आदित्य ने पटकन आवरुन जेवायला आला. जेवण झाला वर त्याने सई ला मदत केली सर्व आवरुन घेतलं. नंतर त्याने सई चा हातात तिचं गिफ्ट दिल आणि सागितलं की जा छान तयार हो. सई ला दुसऱ्या रूम मध्ये पाठवलं तयार होणासाठी थोडा वेळाने रूम मधून बाहेर आली तर आदित्य सई कडे पाहत बसला सई दिसत इतकी छान होती?सई लाजून लाजून हेरांन मग आदित्य ने सई ला रूममध्ये नेलं पण तिचा डोळावर  हात ठेवून रूममध्ये गेला वर आदित्य ने सई चा डोळावरचा हात काढला आदित्य ने छान फुलांनी अशी रूम सजवली होती. ते पाहून सई ला आनंद पण झाला आणि लाजत तर खूपच होती? आदित्य ने हळूच तिचा कानाजवळ जाऊन विचारलं कस वाटलं गिफ़्ट सई तशीच लाजून आदित्य ला घट्ट मिठी मारली आणि त्याचा छातीवर किस्स केलं आज तिला समजलं होत की या मिठी पेक्षा सुरक्षित जागा कोणतीच नाही आदित्यने सई चा ओठावर त्याचे ओठ टेकवले आणि कितीवेळ किस्स करून एकमेकांन सोबत त्याची रात्र गुंतवली.
         अशेच दिवसा मागून दिवस जात होते दोघेही छान एकमेकांना समजून घेत होते एकमेकांनची आवड निवड लक्षात घेत होते. एक दिवस अचानक सई ला बर वाटत नव्हतं तिला खूप ताप आला होता आणि आदित्य पण ऑफिस ला गेला होता. सई झोपलेली च होती दिवसभर आदित्य संध्याकाळी घरी आला तर सई ने दरवाजा उघडला नाही आदित्य कडे असलेला चाबी ने दरवाजा उघडला आत मध्ये आला घराच्या एक पण light लावलेला नव्हता त्याला वाटलं की सई बाहेर गेली असणार पण मला न सांगता?. मग तो रूममध्ये आला तर त्याला सई झोपलेली दिसली त्याने पटकन जाऊन सई जवळ बसला आणि तिला विचारले की काय झालं तुला त्याने तिच्या कपाळावर हात ठेवला तर तिला खूप ताप? आलेला होता त्याने तिला पटकन तयार करून डॉक्टर कडे नेलं डॉक्टरांनी पहिले तिला सलाईन लावली नंतर ओषधी घेतली आणि घरी आले वर त्याने खिचडी साठी कुकर लावला . खिचडी झाल्यावर त्याने तिला खाऊ घातली आणि ओषधी देऊन झोपून दिल. दुसऱ्या दिवशी आदित्यने ऑफिस मधून सुट्टी घेतली होती.
         सई ला सकाळी ९ वाजता जाग आली तर आदित्य तिचा बाजूने बसलेलाच होता तिला फ्रेश हुन ये इतकं म्हंटल आणि किचनमध्ये गेला सई ला आदित्य जरा रागात दिसला कारण तो एक पण शब्द जास्त बोला नाही आता सई ला पण जरा बर वाटू लागलं होतं पण थकवा जाणवत होता. सई किचन मध्ये गेली तर आदित्यने चहा ठेवला होता आणि पोहे करत होता. सई आली तर त्याने लगेच तिला चहा दिला आणि हॉल मध्ये जायला सांगितल ते पण रागात? तिने कप घेतला हॉल मध्ये गेली थोडा वेळाने आदित्य गरम गरम पोहे घेऊन आला दोघांनी सोबतच पोहे खाल्ले पण आदित्य एक पण शब्द सई सोबत बोलत नव्हता पण सई खूप बोलायचा प्रयत्न करत होती. तो फक्त TV कडे पाहत होता तो बोलतं नव्हता तर सई चा चेहेरा परत उतरला होता☹️?. तिने किती वेळा त्याला sorry म्हटलं पण तो ऐकला तयार नव्हता परत कधीच अस नाही करणार तुम्हाला नेहमी सांगणार माझं साधं डोकं पण दुखलं ते पण तुम्हाला सांगणार पण प्लझ्झ असा अबोला नका ठेऊ काही तरी बोला. मला वाटलं की तुम्हाला त्रास होणार म्हणून मी नाही सागितलं माझा कडे तापी साठी गोळी होती ती घेतली होती पण मला आराम नाही पडला मी तुम्हाला फोन करून सांगणारंच तर तुम्ही घरी आले तरी आदित्य एक पण शब्द नाही बोलला फक्त दुपारी जेवणासाठी काय करू विचारल आणि किचन मध्ये डिश ठेऊन रूममध्ये गेला इकडे सई ला खूप रडायला आलं? आदित्य रूमचा बाहेर आला तर सई खूप रडत होती तो पटकन तिचा कडे गेला आणि विचारल की तुझं काही दुखतं आहे का आपण डॉक्टर कडे जाऊ नाही तर मी फोन करतो सईने सागितलं की नाही मला आता बर वाटत आहे पण तुम्ही माझा सोबत नाही बोलतं आहे म्हणून मला रडायला येत आहे .
           खरच sorry यापुढे कधीच अस नाही करणार ? आदित्यने तिला पहिले शांत केलं तिला पाणी दिल आणि समजून सागितलं की का तो तिचा वर राग भरला आहे "अ ग या पुण्यात आपलं कोणीच नाही आपण जास्त कोणाला ओळखत पण नाही माझे मित्र मंडळ सोडलातर ते पण खूप दूर दूर राहतात त्यादिवशी तुझा ताप जास्त वाढला असता तर मी काय केल असत तुला माहिती आहे डॉक्टर काय म्हणाले मला तुझा ताप इतका वाढला होता की तो डोक्यात जाऊ शकला असता high temperature होता थोडक्यात निभावल आज या पुढे लक्ष देत जा".असे म्हणाले
तुला काय वाटते हा तुझा एकटीच संसार आहे जे काही करायचे आहे ते तू एकटीनेच केलं पाहिजे .माझं काहिच नाही

"अ गं हा संसार आपला आहे दोघांनी मिळून मिसळून सांभाळायचा आहे एक जर चुकत असेल तर दुसऱ्या ने त्या चुका प्रेमाने आणि मायेने समजून घेतला पाहिजे संसार चालवने एकटाच काम नसत दोघानी मिळून चावलने म्हणजे संसार आणि तेव्हाच तो फुलतो संसार काय असतो ग चार भिंतीच घर हेच न पण मला वाटते की घराला घरपण देणार घर म्हणजे संसार असते संसार हा नवरा बायको चा असतो पण त्यामध्ये सर्व नाते येतात ग आता पाहणं आज तू आजारी आहे तुझा साठी जेवणाच केलं  तुझी आई बनवुन तुझा वर रागावलो एक बाबा म्हणून आता तुझा सोबत इतका प्रेमाने बोलत आहे एक नवरा म्हणून तुला समजून सांगत आहे मित्र म्हणून याला म्हणतात एक सुखी संसार राणी सरकार".

आता तरी समजलं मला काय म्हणायचं आहे तर सई ने हो म्हंटल आणि लगेच आदित्य चा मांडी वर डोकं ठेऊन शांत  झोपली तिला आज पुन्हा समजलं होत की माझ्या साठी आणि माझा म्हणजे आमच्या संसार साठी आदित्यच योग्य आहे की जो नेहमी माझी आयुष्यभर साथ देणार. कधीच मला एकट नाही पडू देणार आता माझं पूर्ण आयुष्य त्याचा पायलांवर पाऊल देऊन चालणार आणि हाच आहे माझा सुखी संसार  कोणत्याही परिस्थितीत आदित्य चा साथ नाही सोडणार.

आज माझा सारखी मीच नशिबानं ?