आपल्या लोकांना वेळ हवाय !!!!

या कथेतून एवढीच प्रेरणा घेण्यात यावी की कामामध्ये किती आपण व्यस्त असलो तरी आपल्या लोकांसाठी ?

#प्रेरणादायी कथालेखन....... 

आपल्या लोकांना वेळ हवाय!!!!!


सुहास देशमुख.......खूप शांत मितभाषी....  मूळचे पुण्याचे रहिवासी.. अक्खा बालपण अगदी लहानपणापासून कॉलेज सार काही तिथलच.. त्यांच्या घरची परिस्थिती अगदी उत्तम होती.. त्यांचे वडील व्यवसायाने वकील होते.... आणि आई घरकाम करायची... कॉलेज ला गेल्यानंतर त्यांनी वकीली करावी अस कायम सुहासच्या वडिलांना वाटायचं... पण त्यांच्या आईला त्यांचा मुलगा माहित होता की त्याच्या वडिलांसारखा बोलका न्हवता.... त्यामुळं आणि सुहासला ही अजिबात इचछा न्हवती वकिली वगैरे करायची.. वडिलांपेक्षा काही वेगळ क्षेत्र निवडायच आणि कधितरी परदेशात जायचं त्याच स्वप्न होत... त्यामुळं त्यांनी इंजिनीरिंग करायचं ठरवलं... आणि चार वर्षाचा इंजिनिअरिंग पूर्ण केलं.. इंजिनियरिंग पूर्ण झालं की लगेच त्यानी नोकरी  शोधण्यावर ती जास्त जोर दिला... जेमतेम नोकरी मिळाली आणि लगेच सुहास लग्नाचं पहायचं चालू झाल... खूप छान स्थळ सांगून येत होती पण सुहास प्रत्येक  स्थळामध्ये काही ना काही खोटं काढायचl  कारण त्याला त्याच्या मनासारखी मुलगी हवी होती यानंतर सुहासला एके दिवशी कविता च स्थळ आलं कविता दिसायला अतिशय सुंदर नाजुक मुलगी त्याचबरोबर अतिशय खानदानी आणि ती सुद्धा BA झालेली होती..  लग्न ठरविण्यात आली... .. यानंतर सुहास आणि कविताच्या संसार ला सुरुवात झाली.. कविता दिसायला सुंदर होती...  खूप हुशार आणि बोलण्यात पटाईत होती... तिला खूप बोलायला लागायचं एकीकडे तिला खूप बोलायला लागायचं आणि दुसरीकडे सुहास म्हणजे शांत आपलं काम भलं आणि आपण भलं...... अशा स्वभावाचा होता. सुहासची आई  सुनेला अगदीच जपायची..  दोघी सासु सुना ही बोलक्या असल्यामुळे दोघांचीही चांगलीच सूत जुळले होते.... आणि सासू बाईने सुहास मध्ये थोडासा बदल पाहिला होता तो पूर्वी काहीच बोलायचं नाही पण आता घरात जरा खुलून बोलायला लागला होता त्याची मुद्दे  निश्चिंतपणे मांडायला लागला होता त्यामुळे त्याच्यातला हा बदल  खूप छान वाटत होतं की तो आता मोकळा होत होता... यानंतर एके दिवशी सुहास एकदा लवकर ऑफिस मधून घरी आला आणि सर्वांना गुडन्यूज दिली की लवकरच मला परदेशात जाण्याची संधी मिळाली आहे माझ्या कंपनीने मला परदेशात जाण्यासाठी सांगितले आहे आमच्या कंपनीची दुसरी शाखा परदेशात होणार आहे आणि आता ती पूर्ण मला सांभाळायची आहे त्यामुळे मला तिकडे जावे लागेल.. आई-वडिलांनी हो-नाही हो-नाही करत परवानगी दिली आणि सुहास आणि कविता दोघांनी पासपोर्ट तयार केली सगळ्या प्रोसेस पूर्ण केल्या आणि ते अमेरिकेसाठी रवाना झाले... त्यानंतर  ते सुट्ट्यांसाठी दर वर्षातून एकदा गावी येत असत.. आणि त्यानंतर जेव्हा त्यांना असं वाटलं की आता त्यांच्या आई वडिलांची तब्येत खराब होत आहे तेव्हा  ते  त्या दोघांनाही अमेरिकेत  सोबत रहायला घेऊन गेले..... या सगळ्यांमध्ये कविताला दिवस गेले होते आणि कविताला एक गोड मुलगी झाली होती.... काव्या मुलीचे नाव.. काव्या आईप्रमाणेच बोलकी आणि वडिलांप्रमाणे विचारी मुलगी होती.. जसं कालावधी जात होता तसतसे मुलगी मोठी होत होती... आणि आई-वडील वयोवृद्ध होते याच कालावधीमध्ये वडिलांना हार्ट अटॅक आला आणि त्यात  देहांत वास झाला... वडिलांवर आईची अतोनात प्रेम असल्याकारणाने वडील गेल्यानंतर आई वर्षाच्या आत च देवाघरी निघून केली तिने त्या गोष्टीचा मोठा धसका घेतला होता कारण त्यासाठी तिचा नवरा च सगळ्यात श्रेष्ठ होता...... नवऱ्या शिवाय जगण्याची कल्पनाच तिनी  कधी केले नव्हती... आणि अचानक नवऱ्याला अटॅक  ते गेले त्यामुळे आईला हा धक्का सहन झाला नाही आणि वर्षाच्या आतच गेली ... फक्त काव्या सुहास आणि कविता.....त्यांनी सावरल स्वतःला... दिवस छान चालले  होते..  आता काव्या जवळ इंजिनीरिंग वर्ग मध्ये आली होती.. काव्या  आणि तिच्या आई खूप जवळ होत्या  त्या दोघी एकमेकींच्या सगळ्या गोष्टी शेअर करत असत
.... वडील असायचे  बोलायचे पण जेमतेम...मुलगी त्यांच्यासोबतही  बर्‍याच गोष्टी शेअर करायची.. . एके दिवशी अचानक कविता चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळून पडली यानंतर सुहास आणि काव्या  दोघेही खूप टेन्शनमध्ये आले होते आणि डॉक्टर चा रिपोर्ट मध्ये कळाले की सुहासच्या पत्नीला  कविताला ब्रेन ट्यूमर झालेला होता त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. आणि बर्‍याच ठिकाणी यासाठी प्रयत्न केला अमेरिकेतील सगळ्या टॉपच डॉक्टर आहे त्या  डॉक्टरचा सल्ला घेतला...   काय करता येईल का??? कितीही  पैसे  द्यायला तयार होते पण तरीही तो त्याच्या बायकोला त्याच्या प्रियसीला तो वाचवू शकला नाही.. आता फक्त काव्यl आणि सुहास दोघच... बाप लेक... काव्या सम्पूर्ण तुटली होती... ती तिच्या आईत  तीच  संपूर्ण विश्व पाहायची.. आई नसल्यामुळ तिचा बराच वेळ तिच्या मैत्रिणीसोबत जायचा.... तिला शेवटचं वर्ष अगदी त्याप्रमाणे घालवलं... बाबाही ऑफिस घर ऑफिस घर या कार्याच्या मध्ये बिझी होता... बाबा जेव्हा ऑफिसला जायचा तेव्हा सकाळी लवकर काव्या घरातून बाहेर पडलेली असायची आणि त्यानंतर संध्याकाळी ती बाबा यायच्या आतच घरी झोपून गेलेली असायची आता दोघांचे बोलणे कमी झालेलं होतं.. रविवारी दोघं एकमेकांसाठी नक्कीच वेळ काढायचे आठवडाभर काय झालं कशाप्रकारे झालं कोणाचा फोन आला किंवा नातेवाईकांना  फोन करणं किंवा  आवडणारा ब्रेकफास्ट आवडणारे जेवन दोघं मिळून किचनमध्ये सगळं काही पूर्ण करायचे... रविवार म्हणजे दोघांचा हक्काचा वार होता... तीच शेवटच वर्ष पूर्ण झालं आणि आता तिला बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभा राहयाचं होत ... त्यामुळे तिने जॉब शोधायला  सुरुवात केली आणि आता सुहास च  थोडंसं वय झालं.....कंपनीच्या नियमानुसार आणि त्याच्या वयानुसार रिटायरमेंट घेतली..... आणि आता घरी राहू लागला....त्याचा आसपास मित्र समूह होता... पण ठराविक च... आणि त्यांच्याशी ठराविकच बोलन...सकाळी walk ला काही मित्र...संध्याकाळी काही ठराविक मित्र....पण तरी या कळत मनोमन त्याच्या बायकोला खूप खूप जास्त miss करत होता....
    एके दिवशी दुपारी काव्या हसत हसत अगदी खूष होतं घरी आली आणि तिला एका कंपनीमध्ये नोकरी लागल्याची खुशखबर सुनावली.... सकाळी आठ ते रात्री साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत शेडूल होत... तिने लवकरच ते जॉईन करायचं हे ठरवलं होतं..... तिने कंपनी जॉईन केली.... सुहास आता फक्त घरातून मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉकसाठी जेवढा बाहेर पडत असेल तेवढाच बाकी आता तो दिवसभर घरात एकटाच असे...... काव्या संध्याकाळी घरी आली की तिच्याशी माझा दिवसभर काय काय झालं यावर तो गप्पा मारायचा प्रयत्न करत असेल.. मात्र काव्या कामावरून अतिशय कंटाळून आल्याकारणाने फक्त  हो म्हणायची आणि विषय टाळता कसा येईल या वर ती लक्ष द्याची.... नकळत ती तिच्या तच  गुंतली होती.... हळूहळू रविवारचं ही त्यांचं संभाषण पूर्ण कमी झालं होतं रविवारीही ती फक्त काम आणि कामच करत राहायची.... सुहास मात्र ती आत्ता येईल आत्तl बोलेल याचीच वाट पाहत रहायचा... पण तो तिथे ही चूक असायचा... तो दिवस दिवसभर तिची वाट पाहत हॉलमध्ये बाहेर बसायचा ती मात्र फक्त जेवण आणि ब्रेकफास्ट या गोष्टींसाठीच बाहेर पडायची.. एके दिवशी अशीच तिला यायला संध्याकाळचे साडेसात आठ वाजले आणि बाबांनी आज तिच्या आवडीचं जेवण केलं होतं तिला सांगितले तू हातपाय धू होऊ नये मी जेवायला वाढतो त्यांनी तिच्यासाठी जेवण मांडून ठेवले ती हात-पाय धुऊन आली खूप थकल या कारणाने काही बोलत नव्हती आणि बाबाला मात्र तिच्याशी बोलायचं होत... आज दिवसभर काय झालं हे तिला सांगायचं होतं त्यानंतर बाबांनी सकाळपासून आज काय केलं हे सांगायला सुरवात केली.. काव्या मात्र जोरात वैतागली आणि म्हणाली जेऊ काय मी..???? की ऐकू तुझच बाबl..  आणि हो उद्या पासून रात्री माजी जेवायला वाट पाहू नकोस  बाबा  मला यायला असाच उशीर होणार आहे एक नवीन प्रोजेक्ट वर काम करायचं आहे.. .... सुहास तिथेच शांत झाला... त्याला खूप वाईट वाटलं होतं त्या दिवसापासून सुहास खूप शांत शांत रहायला लागला...  आता तर त्याला त्याच्या बायकोची जास्त आठवण यायला लागली तो तिच्याच आठवणीत जणू हरवायला लागला... तो एकटा एकटा रहायला लागला कधीतरी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला तरी त्याच्या मित्रांसोबत ही त्याचं बोलणं आपोआप नकळतपणे कमी झालं होतं.. पुन्हा मायदेशी परतायचे तर आता मायदेशी मुलगी ला सोडून जाणं शक्य नव्हतं..
                एके दिवशी असाच तो मार्केटमध्ये गेला होता तेव्हा मार्केटमध्ये तो चक्कर येऊन खाली पडला.. काही लोकांनी त्याला तिथल्या  हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं... मुलीला फोन करून तिथं बोलावून घेतलं त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना शुगरचा त्रास आहे त्यांची शुगर वाढलेली आहे... यापूर्वीही त्यांना अशी चक्कर आली होती तेव्हा  ते माझ्याचकडे आले होते... बहुधा त्यांनी सांगितलं नसावं तुम्हाला...काय योगायोग आहे पहा... आज माझ्याचकडे लोक घेऊन आले...  मला म्हणाले होते ते माझी मुलगी खूप कामात असते.... लहान वयात खूप कमी वेळात खूप अचिएव्हमेन्ट केली आहे तिने...... पण अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो किंवा मला तुम्हाला त्यांच्या अवस्थेवरून सांगावीशी वाटत आहे कि प्लीज तुम्ही त्यांच्याकडे थोडे लक्ष द्या कारण जेव्हा ते माझ्याशी बोलत होते तेव्हा एक एकटेपणा मला जाणवला... एक  तर परदेशात इथे तुमच्याशिवाय त्यांच किनीच नाही... तेव्हा plz लक्ष दया...  त्यांना सांगितलं होतं की तुमच्या मुलीला माझ्याकडे घेऊन या मी तिच्याशी बोलतो... ..... आता तुम्ही म्हणाल  की मी इतक कस बोलतोय... तर मला त्यादिवशी बोलता बोलता हे कळलं की माझे dr मित्र यांच्या कंपनीचे dr होते... त्यामुळे काही पार्टी मध्ये मी पहिलय यांना...  काव्यlला हे सगळं ऐकून अतिशय वाईट वाटलं होतं की ती लांब गेली होती ती तिच्या बाबांपासून.... ज्यांनी तिला जन्म दिला होता त्यांचं दुःख त्यांच मन ती  त्यावेळी ओळखू शकले नाही पण बाहेरचे जे लोक आहेत त्यांनी ओळखल....
    यानंतर काव्या ला तिची चूक लक्षlत आली... तिच्याकडे सार काही होत... पण वेळ न्हवता.... तिच्या वडिलांना द्यायला वेळ न्हवता... ते कोणाशी काही बोलताना खूप विचार करत... मात्र मुलीसोबत बोलताना मात्र पूर्ण मनापासून बोलत असत..... पण हल्ली नकळत एकटे पडल्यासारख वाटत होत त्यांना.... एकटे वाटत होत... बाहेर जण येन बंद होत... हे तिला walk च्या त्यानच्या मित्रांकडून कळलं.... तिला या साऱ्या गोष्टी चा खूप त्रास झालl....... त्यानंतर मात्र जास्तीत जास्त तिचा वेळ तीन त्यांच्यासाठी काढायचा ठरवलं.... आणि या समस्यइतुन त्यांना बाहेर काढायचा ठरवल.......
         हि आहे सुहास यांची कथा... पण अगदी आमच्या घराच्या शेजारीच एक जोडपे राहत... मुलं परदेशात असतात.. आणि वर्षातून एकदा येतात.... या दोघांच सगळ्यांशी मिळून मिसळून वागण असता... खूप छान अगदी... पण यांचे खरे फुललेलं चेहरे मात्र त्यांची मुलं आणि नातवंड जेव्हा यांचयाकडे येतात तेव्हाच.......
          कधी कधी आपल्या माणसांना काही नको असतं....फक्त आपलेपणा आणि वेळ हवा असतो.... त्यांना प्रेम हव असतं... नाहीतर विनाकारण ते निराशेत हरवतात...नाही जमलं प्रत्येक वेळी बोलायला तरी ऐकून तर आपण या लोकांचं नक्कीच घेऊ शकतो............

काय म्हणता पटतंय का?????

कल्याणी राजगे शिंदे.......

आवडल्यास नावासहित share  करा......