आपले मिलन

आपले मिलन ही कविता काल्पनिक व स्वंयलिखित आहे.


कविता लेखन : सौ.शगुफ्ता ईनामदार - मुल्ला
ईरा राज्य स्तरीय करंडक स्पर्धा ( कविता लेखन )
विषय : दोन ध्रुवावर दोघे आपण
उपविषय : आपले मिलन

टीम : सोलापूर जिल्हा 
------------------------------------------



दोन ध्रुवावर दोघे आपण
तरी होईल आपले मिलन,
मी पुन्हा भेटेन त्याच वाटेवर तुला
जिथे सोडलेस तू मला ॥ १ ॥

तू चालशील जेव्हा त्या पाऊलवाटांवर
मी तुझ्या पावलांची चाहूल होऊन ,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
तुझी सारथी होऊन,
मी पुन्हा भेटेन त्याच वाटेवर तुला
जिथे सोडलेस तू मला ॥२॥

तुझ्या विचारांत भेटेन मी
एक आठवण होऊनी,
तुझ्या नजरेत असेन मी
प्रकाश होऊनी,
तुझ्यातच वसेन मी तुझा श्वास होऊनी ॥ ३ ॥

तुझ्या प्रश्नात मी
तुझ्या उत्तरात मी
बाहुपाशात तुझ्या उरेन मी
तुझी धडकन होऊनी
मी पुन्हा भेटेन त्याच वाटेवर तुला
जिथे सोडलेस तू मला
दोन ध्रुवावर दोघे आपण
तरी होईल आपले मिलन ॥ ४ ॥

दोन ध्रुव दूर जरी
सांगितल आहे मी ही घरी
लग्न करेन तुझ्याशीच
मागणी घालते अशीच
स्वप्न पाहू नको दुसऱ्या परीच
लग्नाला येतील थोडेच जण
दोन ध्रुवावर दोघे आपण
तरी होईल आपले मिलन ॥ ५ ॥