आपण सुशिक्षित आहोत का?

Real story

आपण आपल्या शाळेत काय शिकतो? कोणी म्हणेल मराठी इंग्रजी गणित हे विषय ,तरी कोणी म्हणेल कसे राहायचं , कस बोलायचं ,एकमेकाशी कस वागायचं हे शिकतो,थोडक्यात काय तर आपण ज्ञान मिळवतो .गोष्ट थोडीशी वेगळी आहे ,मी जे लिहीन ahe त्याचा याचाशी काय संबंध अस देखील वाटेल .पण काय करणार सुरुवात तर करावी लागते ना! 

रविवार होता रूमवर बसून खूप कंटाळा आला होता ,मग काय करावं साँग एकली ,घरी कॉल केला पण मन काय रमेना.मग म्हंतल फ्रेन्ड च्या रूम वर जावू आणि तिला surprice देवू.मग काय घेतलं आवरायला आणि निघाली चालायचा चालली होती दुपारची 4 ची वेळ उन ही जास्त लागत न्हवात.समोरून एक कपल आल. दिसायला सुंदर होत ,दोघेही शिकलेले वाटत होते त्यांच्या जवळ एक छान गोंडस मुलगी होती.हातात दोन प्लास्टिक चा बाग होत्या,मला आधी वाटलं की गावी चालले असतील,पण थोडंसं पुढे आल्यावर त्यांनी एक बॅग रस्त्यावर मधेच सोडून दिली,मला समजलेच नाही की त्यांनी अस का केलं.आणि लगेच ते तेथून निघून गेले. मी थोडंसं पुढे गेल्यावर पाहिलं की त्यामधे कचरा होता,मला त्याचा खूप राग आला होता .अस कोणी कचरा रस्त्यावर टाकत का?लोक अस कसे काय वागू शकता?आपण कचरा व्यवस्थापन करायला हवे .त्याविषयी जन जागृती करायला हवी ,यावर तुम्हाला काय वाटतं?