आधुनिक तरुणी

I like to read

आधुनिक तरुणी

 सुंदर कपडे केले परिधान
पावडर लाली मुखावरी
केस मोकळे उडी वाऱ्यासंगे
ही आधुनिक तरुणी

भाळी नाही कुंकू टिकली
हात मोकळे, वाजे
नाही पैजण छुमछुम पायी
ही आधुनिक तरुणी

लाज डोळ्यांत ठेवणारी
नजरेत शांत भासणारी
प्रसंगी  होऊन रणरागिणी
ही आधुनिक तरुणी

श्रृंगार आत्मविश्वासाचा लेवून
मनात संस्कृती जपणारी
जग  जिंकण्या निघाली
ही आधुनिक तरुणी

कन्या भारताची
विश्र्वसुंदरी जगतसुंदरी.

समाप्त

 मधुरा महेश किजबीले