आणि ती भिकारीन हसली.

माणसाने पैश्याने श्रीमंत असण्यापेक्षा मनाने श्रीमंत असणे आवश्यकता आहे. ह्या लघुकथेत एक म्हणून मुलगी भीक मागत असली तरी मनाने मात्र श्रीमंत ठरली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
#लघुकथा 
आमची अपार्टमेंट रस्त्याला लागून होती. चारही बाजूनी नेहमी रस्त्यावरून गाड्या मोटरी वाहने जातांना दिसायच्या. ते बघण्यासाठी  मी पूर्ण वेळ बाल्कनीच्या खिळकीत बसायची. मला अगदी अभ्यास देखील करायचा असला तरी मी अभ्यासाचे तिकडे घेऊन जायची. आता माझी ती रोजची जागा झाली होती,  आम्हाला त्या अपार्टमेंटमध्ये येऊन दोन वर्ष तरी झाली असावीत.
त्यामुळे तिकडचा परिसरात खूप आवडायच मला . प्रत्येकाची आपली अशी एक खास आवडती जागा असते. घराचा एखादा कोपरा, एखादी खोली, तिथे काय जादू होते, काय माहित नाही. पण जणू सगळ्या गोष्टी तिथे अगदी मनासारख्या जुळून येतात. 
आमच्या अपार्टमेंटमध्ये अशीच एक माझी आवडती जागा होती. आमच्या पुढच्या रूम मधली भलीमोठी खिडकी. त्या खिडकीला लागून आम्ही एक छोटासा सोफा ठेवला होता. का कुणास ठाऊक पण त्या खिडकीचं, त्या सोफ्याचं आणि माझं असं एक वेगळचं नाते झाल होत .पहाटे जिम वगैरे आटपून घरी आल्यावर, वाफाळत्या गरम कॉफीचा कप घेऊन तिथे बसायची मला प्रचंड आवडतं. त्या खिळकीतून बाहेरचा परिसर खूप छान दिसायचा.
जवळच कृष्ण मंदिर होते. त्या मंदिराच्या वळणाच्या रस्त्यावर पुढे काही भटके नेहमी नजरेस पडायचे.गर्दीत त्यांचे अस्तित्व नगण्य असले तरी रोज एकदा तरी त्यांच्याशी दृष्टादृष्ट व्हायचीचं , त्यांचा जणू अधिकारचं होता तो..!
"असो, आजचीचं एक घटना आहे".
चार वाजले होते , मी नेहमी प्रमाणे बाल्कनीच्या त्या खिळकीत येऊन बसली होती. बाहेरचा परिसर निहारत होती. समोरून एक टू व्हिलरवाला पोरगा अगदी वेगाने जवळून निघून गेला. रस्ता अगदी मोकळा होता,तरीही त्याचं जोरात बाईक राइडिंग जाणवलं होत मला .
मी हे सारे वरून, त्या रूमच्या खिलकीतून  बघत होती. काही क्षणांनी एक क्षीण आवाज जाणवला,
"फट्ट...!!!"
काही तरी फुटलं असावं, असं त्यातून जाणवलं कानांना तो आवाज अगदी विचित्र  भासला होता, कसला होता तो आवाज हे मी शोधू लागली.
मला त्या आवाजाने भयंकर अंगावर काटा आणणारा प्रसंग डोळ्यांसमोर दिसला, ऐक टू व्हीलरवाला मुलगा पुढे निघून गेला होता. मागे मात्र रस्त्यावर काही कुत्री गोळा झाली होती, ती भुंकत नव्हती. एका विशिष्ट स्वरात कुळकुळत होती. कुत्र्याचं एक गोजिरवाणं पिल्लू त्याच्या गाडीखाली आलं होतं.
पार लोळागोळा होऊन गेलेलं, बेचूक होत ते बिचार.
त्या रस्त्याने जातांना नेहमी इथे फुटपाथच्या कडेला त्याला त्याच्या भावंडांसोबत बागळतांना मी खूप वेळा पाहिलं होतं.
कधी कधी ते त्याच्या भावंडाणसोबत एकमेकांच्या अंगावर,कांद्यावर लोडतांना मी खिळकीतून बघायची आणि त्यांच्याकडे बघतच रहावं असं वाटतयच,  कधी बाहेर पायी गेली कि ती कुत्र्याची  लहान पिल्लं मागे मागे येत असायची.
आता सगळी पिल्ल आणि त्यांची पांढऱ्या करड्या रंगाची आई तिथे गोळा झाली होती. तरीही आजूबाजूने वाहने वेगात जात येत होतीच. 
एक कुत्र्याचं पिल्लू तर मेलेलं आहे, त्याच्या कुस्करलेल्या छिन्नविछिन्न देहावरून गाडी गेली तरी कुणाला काहीच फरक पडला नव्हता. एरवी असे प्रसंग मी खूप वेळा पाहिलेले, पण आता डोळ्याच्या देखत तो इवलासा जीव तरफडत  मारतांना पाहिलेला. आतून आतडं पिळवटून गेलं होत माझं. मी लगेच खाली धावत आली, खाली तर येऊन गेली हे सर्व बघण्यासाठी.
पण तेवढ्यात काही डोक्यात विचार आला, ऐकदा वरती जाऊन  आपले काम करून परत खाली येऊ.मग त्याच्या देहाची विटंबना वाचवावी या विचाराने मी वेगाने परत घराकडे निघाली.
हा विचार एका क्षणापुरता तरी मनी येऊन गेला. खरे तर त्यावेळी मनात द्वंद्व सुरु होते माझ्या.
खरे तर त्यावेळी मनात द्वंद्व सुरु होते माझ्या.
एक मन म्हणत होते खाली उरून, रुमालावर त्याचा देह उचलून घ्यावा आणि फुटपाथच्या कडेला झुडुपात ठेवावा.
दुसरं मन म्हणत होतं आधी आपलं काम काही मिनिटात निपटून येऊन मग हे काम केलं पाहिजे, पण त्या क्षणी तरी मी ते करू शकली नाही. वेगाने घरी आली सगळं काम सपंवलं. पाच मिनिटात जाऊन आली असं घरात आईला सांगून त्या कुत्र्याच्या पिलाकडे निघाली. मागच्या काही मिनिटांन पासून मी केवळ त्याचाच विचार करत होती.
"रस्त्यावर रहदारी काहीच नव्हती. 
"कसे काय ते पिल्लू त्याच्या बाईकखाली आले असेल कुणास ठाऊक देव जाणे?"
"पण त्या मुलाला किमान ऐकदा मागे वळून देखील बघावेसे वाटले नसेल का....?"
"रस्त्यावरच्या कुत्र्यांपायी अपघातात मरतात माणसं कधी  कधी जखमी होतात, तसे तर आता काही घडले नव्हते. एखादा जीव आपल्या हातून मारला जाण्याची चूक काहीचं नसते का....?"
"एखाद्या कुत्र्यामुळे कुणी जीव गमावलं तर लगेच वर्तमान पत्रात छापून येतें, पण एखाद्यामुळे एक कुत्र्याचे पिल्लू मारले गेले तर ते कधीचं वर्तमानपत्रात बातमी म्हणून छापून येत नाही.असे का...??"
"आता त्या पिलाच्या भावंडांना काय वाटत असावे..? त्याची आई आता कशी बेचेन झाली असेल.
कोण जाणे ? "
अनेक प्रश्नांचे काहोर उठले होते डोक्यात.
काही क्षणातच  ती जागा  डोळ्यापुढे आली, तशीच मी परत धावत खाली आली होती, डोळ्यात पाणी दाटलं होतं माझ्या त्या क्षणी...
अतिसंवेदनशील असणं अनेकदा त्रासदायी ठरतं, लोक जी गोष्ट सहजासहजी करतात ती आपल्याला मुळीच जमत नाही. अश्यावेळी मन व्यथित होत राहतं.

  "तिथलं दृश्य पाहून मी चकित झाली ." 
खजिलही झाली होती. लाज वाटत होती.
स्वतःची माणूस म्हणून जगण्याची.
रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या एका मळकट कळकट भिकारी मुलीने ते पिल्लू पेपरमध्ये उचलून फुटपाथच्या कडेला झुडुपात नेऊन ठेवले होते. ती त्याच्यापाशी केविलवाण्या शून्य चेहऱ्यानं बसून बघत होती.
कसलेही भाव तिच्या चेहऱ्यावर नव्हते. तिने भीक मागून गोळा केलेली बिस्किटे, चपात्यांचे तुकडे,ती त्या पिलांना व कुत्रीला देऊ करत होता.
पण कुणीच खात नव्हतं. 
कपड्यांची लक्तरे झालेल्या त्या भिकारी मुलीला मी अनेकदा कुत्र्यांना खाऊ घालतांना पाहिलं होतं. रात्री फुटपाथवर ती निजून असायची. थोडी वेडीसारखीचं होती ती.
कधी कधी तिच्या मागेपुढे सगळी बेवारस कुत्री अंग चोरून तर काही मोकळ्या अंगाने झोपलेली दिसायची. ह्या क्षणाला देखील ती त्यांना खाऊ घालत होती .त्या क्षणाला ती भटकी, भिकारी मुलगी मला खूप खूप श्रीमंत आणि संतांसारखी उदार वाटली. तिने मला मानवतेचा नवा आरसा दाखवला. जवळ जाऊन मी तिचे आभार मानले. तिचा चेहरा निर्विकार होता. कसलेही भाव नव्हते ना उपकाराचे ना मदतीचे....!!

मला फक्त लाज वाटत होती.
त्या माझ्या श्रीमंतीची. खरी श्रीमंत तर ती भिकारीन मुलगी होती. भीक मागून आपले पोट नाही तर कुत्र्यांचे पोट भरणारी. त्या भिकारीन सोबत बोलतांना,बघून आणखी  कोणी तरी हसल्या सारखे वाटले मला.
बघते तर काय..?
दुसरे तिसरे कोणी नव्हते, माझ्या बाजूने जानारे माझ्यावर हसत होते....!!!
मी तिचे आभार मानले.
तिला समजोना समजो पण तिला हे मात्र नक्कीच समजलं होत. की मला तिच्यात माणुसकीची श्रीमंती दिसली होती. माझ्या हसण्याला ती भिकारीन मुलगी आता हसली होती. तिचे स्मित हास्य बघून मनाला बर वाटलं. 

लेखिका :-सौं रुपाली बोरसे.
कथा :-लघुकथा
विषय :-आणि ती हसली.
कथेच नाव :-आणि ती भिकारीन हसली.
स्पर्धा :राज्यस्थरीय  करंडक स्पर्धा.
टीम :- इरा नाशिक.