आईचे सकाळचे स्वप्न....

I like to read ... Thank u ira.

आईचे सकाळचे स्वप्न....

(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)
 

    विलास  ऑफिसला गेल्यावर मीना परत बेडवर आडवी झाली.रितूच ट्युशन नऊ च आहे.  सहा वाजलेत.   एक तास जरा पडते. मग रितूच आवरेपर्यंत  तिची ट्युशन बॅग तयार करेन आणि तीची कॉफ़ी आणि ब्रेड बटर बनवेल.दहावीला गेलीय पण स्वतःची काम नको करायला. विचार करता करता तिचा डोळा लागला . 
अचानक कुकर च्या शेट्टीच्या आवाजाने जाग आली.  बघते तर   रितू किचन मध्ये कॉफी पित होती. तिला पाहताच, पुढे आली "अग आई तु झोपली होतीस सो तुला डिस्टरब नाही केलं.ये बस  रात्रीच टिचर  मेसेज आला होता. आज नो ट्युशन.मी कुकर लावलाय डाळ भात चा. तू  कांदे पोहे बनवशील का. जा ना पटकन आवरून ये, तोपर्यत मी तयारी करते पोह्यांची".  रितून जवळजवळ  मीनाला बाथरूम मध्ये ढकलले आणि दार ओढले.

तितक्यात काहीतरी भांड पडल्याचं आवाज आला.  मीना दचकून उठली. 

 स्वतःशीच हसली, "स्वप्न होते."  सकाळचे, सव्वा सात झाले .आवाजाच्या दिशेने किचन मध्ये गेली तर रितू कढईमध्ये पोहे ढवळत होती.
"  काय ग काय पडलास. ,मीनाने  विचारले 
तसे हसत म्हणाली" काही नाही अग ते कालथा घेत होती तर पळी पडली. जा ना पटकन आवरून ये ,मस्त गरम गरम पोहे बनवलेत.खूप दिवसांनी तुला अस निवांत झोपलेलं पाहिलं म्हणून  नाही उठवलं". 
" ट्युशन नाहीये का.मला उठवायच ना ग".
" अग आहे जरा पंधरा मिनिटं उशिरा आहे".
मीना आवरून बाहेर आली बघते तर दोन पोह्यांच्या प्लेट्स, बाजूला चहा चा कप ,पाण्याचा ग्लास. तीची वाट बघत होते. ती बघतच बसली. 
"आई, ये ना ग माझे पोहे संपत आलेत.   निदान चहा तरी एकत्र पिऊया".रितू
"  तू चहा पिणार." मीना
" हो आज तुला कंपनी . ok  ऐक  ना मी डाळ तांदूळ धुवून ठेवलेत, एकदा पाण्याचं प्रमाण चेक करशील.आणि कुकर गॅस वर ठेवशील प्लिज. म्हणजे तुला  रिलॅक्स मध्ये चहा आणि पोहे खाता येतील".
मीनाने हळूच स्वतःला चिमटा काढला. सकाळचे स्वप्न थोडेसे का होईना खरे  झाले.
_______
----- मधुरा महेश.

छोटीशी कथा कशी वाटली नक्की सांगा.
(Thank u ira.)