आई कधी एकटी नसते भाग ४

I like to read.

अष्टपैलू लेखक महासंग्राम



आई कधी एकटी नसते भाग ४

    

दिवस हळूहळू पुढे जात होते. 

दर दोन दिवसांनी गावाला फोन करून खुशाली कळवली जात होती. बंटी सुद्धा सगळ नीट करत होता.दोन्ही मुल पण रोज थोडावेळ तिच्या साठी येत होती.

एक दिवस दुपारी सुमनने कपाट आवरायला घेतलं होत.

"वहिनी येऊ का आता.  "

तीने मान वर करून बघितलं तर शेजारी राहणाऱ्या मिरे वहिनी  होत्या. हातात एक पिशवी होती.

"अहो, वहिनी या ना. काही काम होत का"?

"हो कामच होत.म्हणजे बघा वेळ असेल तर नाही म्हणजे तुमची खूप ओढतान होत असेल ना घरचं ,बाहेरच."

"अहो काम तर होतच राहतील.तुम्ही बोला "

"अहो, या दोन मॅक्सी जरा शिवून हव्या होत्या."

"बस एव्हढच ना.पण मी बरेच दिवस झाले मशीनवर काही शिवल नाहीये.उद्या देऊ का. रात्री जरा तिच्यात तेल टाकते.मग सकाळी शिवून देते.पाच मिनिटाच काम आहे.चालेल."

"हो. चालेल.काही घाई नाही.संध्याकाळपर्यंत द्या."

मिरे वहिनी त्यांच्या घरी गेल्यावर ती कितीतरी वेळ विचार करत होती.   बाहेर जायला लागल्यापासून ती मशिनला विसरूनच गेली होती. तसही अशोकला तीच हे काम आवडत नव्हत. कारण तीची पाठ दुखायची.

तीने पटकन उठून मशीन मध्ये तेल सोडलं.

आणि थोड्यावेळाने राहुल बरोबर दुकानात गेली . त्याला घरात एकट्याला कंटाळा येत असे.तो तिथे जावून एका बाजूला अभ्यास करत करत सगळीकडे लक्ष ठेवत असे.

 ताई, तुमच्याकडे पिशवी आहे का.जरा ही बिस्कीट ठेवायची होती. एका  माणसाने पाच बिस्कीट पुडे घेतले होते . असाच चहा पिता ना आठवण आली तर इथेच घेतले.आणि आता  सुमन कडे पिशवी मागत होता. तीच्याकडची एक मोठी प्लॅस्टिकची पिशवी तीने दिली.

अचानक तिच्या डोक्यात एक विचार  आला.

 रात्री झोपण्यापूर्वी तीने मशीन वर दोन्ही गाऊन शिवून ठेवल्या.

सकाळी लवकर उठून  सगळ आवरून घेतल.

आणि मग तीने तिच्या बरेच दिवस न वापरलेल्या साध्याश्या कॉटनच्या  अश्या दोन साड्या  बाजूला काढून ठेवल्या.

आणि बघत होती.तितक्यात सीमा  तिच्या बाजूला आली.

 आई ,काय करतेस. अग ह्या साड्या का काढल्या आहेस.

"काही  कामाच्या नाहीत तर विचार करत होते.की यांचा काहीतरी उपयोग करूया. ही बघ हीचा पदर दरवाज्यात अडकून फाटला .तर हीचा फॉल च निघालाय.ठेवून तरी काय करणार."

"ह्याच्या पिशव्या शिवल्या तर.वेगवेगळ्या साईजच्या पिशव्या शिवून  विकुया का.?"तिच्या आधी सीमाच बोलली.

"कोणी घेईल का?"

"आपल्याला कुठे दुसरीकडे जायचं आहे आपल्या इथेच तर ठेवायच्या आहेत.तू सुरू कर". सीमा ने तिला प्रोत्साहन दिले.

ठीक आहे .आज दुपारी आले ना की लागते कामाला. तस ही दुपार रिकामीच असते .

सीमा,एक काम कर ह्या गाऊन मिरे काकूंना देऊन ये.

हो.आलेच.

तीने पण तीच आवरलं आणि दुकानात गेली .



क्रमशः

मधुरा महेश किजबीले


🎭 Series Post

View all