आई कधी एकटी नसते भाग ३

I like to read

अष्टपैलू लेखक महासंग्राम

आई कधी एकटी नसते भाग ३



  "नीट पोचलात ना.आई.काळजी घ्या. हो मीही माझी काळजी घेईन.आता ठेवते.उशीर होतोय."

सुमनने फोन ठेवला आणि एक दीर्घ श्वास घेतला.

नुसत घरात बसून चालणार नाही.

तिला तिच्या सासुच सांगितलेल पटल होत.

आजपासून ती चहा च्या दुकानात जायला सुरुवात करणार होती.

तीने घरातलं सगळ आवरलं.सिमाची दुपारची शाळा होती.राहुल सकाळी च शाळेत गेला होता.

"सीमा ,निघताना आठवणीने राहुल साठी चावी शेजारच्या काकूंकडे ठेव.त्याला मी सांगितलं आहे."

आणि ती निघाली.

जवळजवळ महिनाभराने तीने दुकान उघडले होते.आधी तिने सर्व साफ करायला घेतले.तितक्यात सीमा पण आली.

"अग तुला थोडी मदत होइल. इथूनच शाळेत जाईन.नको अशी बघुस."

दोघी मिळून सगळ आवरत होत्या. बिस्कीट  खारी आणि बाकीचे खाण्याचे डब्बे  साफ केले. लादी ,भिंती ,पंखे लाईट सर्व झाडून  पुसून घेतल.

आजूबाजूची माणसं त्यांच्याकडे बघून कुजबुजत होती .

तिला हे सगळ नवीन होत.पण तिला अस होणार याची खात्री होती.सासूने तिला कल्पना दिली होती.तीने मात्र दुर्लक्ष केलं.

शाळेची वेळ झाली तशी सीमा निघून गेली.



एव्हाना दुपार झाली होती. तीने पण सोबत आणलेल थोडंसं खावून घेतल. जरा बसली होती.

तर राहुल  आला . .तसा तो आधीही येत असे.पण आज आईसाठी आला होता.



"अरे ,तू काय करतोयस. जेवलास का.उन्हातून कशाला आलास."

"आई,अग हो जरा थांब किती प्रश्न.मी तुला मदत करायला आलो आहे  . मी जेवलो आहे.ताट घासून ठेवलं आहे . आणि  उन्हातून नाही सावलीमधून आलो आहे. आणि ही बघ टोपी घातली. आहे.अजून काही बाकी विचारायच आहे."

"नाही. शाहणा माझा बाबू. ग तो."

"आता सांग मी काय करू."

"साफ सफाई तर सगळी झालीत.आपण सर्व जागेवर लावू.

आणि नवीन सामानाची लिस्ट बनवू. आणि घेवून येऊ.मग उद्यापासून सुरू करायला होईल."

दोघांनी मिळून उरलेलं काम केलं.

दरवाजा लावून निघतच होती .

"वहिनी कशा आहात.? "

अशोकच्या ओळखीचा मित्र आला. त्याच्याशी थोडीशी ओळख होती.  राग  जास्त होता.कारण कधीच चहाचे पैसे नाही दिले.

"परत सुरू करताय का?"

'हो".

"अरे वा! छान  यायला पाहिजे मग "

"उद्यापासून आधीच्या सारखं सुरू होईल.तुम्ही या चहा प्यायला. पण पैशे घेवून या". तीने आधीच टोकल.

"हो,नक्की तुमच्या हातचा चहा म्हणजे खासच."

" राहुल अभ्यास कसा चालला आहे."

वहिनी ,जरा बोलायचं होत.

हा बोला काही महत्वाचं

हो,म्हणजे बघा

काय बोलायचं पटकन बोला.मला उशीर होतोय.

"तुमचं हे दुकान मला देता का चालवायला.ते दर महिना तुम्हाला भाड देईन की.तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय.चहा बनवण्या इतकं सोप्प नसत.एकटीने सगळ  बघायचं म्हणजे. विचार करा ."

"आई ,चल ना मला भूक लागली."

"ठीक आहे.करेन विचार आता येऊ."

घरी आल्यावर तिने स्वतःच आवरून घेतल.

आणि विचार करायला लागली.तसा तर आज माझा पहिलाच दिवस. लोकांच्या नजरा बदलल्या आहेत. काल जो माणूस बाहेरून बोलत होता, तोच आज समोर उभा राहून बोलत होता.

सकाळी सीमा होती .नंतर राहुल आला. अस वाटलच नाही .की मी एकटी आहे.



दुसऱ्या दिवशी पासून तीने दुकान सुरू केलं.

पाहिले ती चहा बनवायची आणि अशोक बाकी सर्व काम करायचा.आणि बरोबर जोडीला राजू म्हणून एक मुलगा होता.तिचा लोकांशी जास्त संपर्क होत नसे.

पण आता सर्व बदलल होत.राजुला दुसरीकडे काम मिळालं होत. आणि आज तिला एकटीला सर्व करायचं होत.

तीने  पूर्वीसारखा चहा बनवायला सुरू केला.



"राजू,अरे कसा आहेस? तू तर दुसरीकडे जातो.आज इथे कसा काय.आणि हा कोण आहे रे."

"वहिनी,माझा लांबचा भाऊ आहे. बंटी नाव आहे याचं.तुमच्या मदतीसाठी याला घेवून आलोय. आधी पण आणला होता.पण मी  होतो ना.मग दादा नको बोलले. तुम्हाला जर चालत असेल तर ह्याला ठेवा तुमच्याकडे कामाला."

तीने मनात विचार केला.नाहीतरी कोणीतरी हवंच आहे.राजुच्या ओळखीचा म्हणजे विश्वास ठेवण्यासारख असेल.

तीने त्याची नीट चौकशी केली. त्याचा फोन नंबर घेतला.बाकीचं ठरवल.

राजू ने त्याला काम समजावून सांगितलं.

बंटी ने सगळ समजून घेतलं.

हळूहळू गाडी रुळावर येत होती.

महिना होवून गेला होता.वरतून सगळच सुरळीत चालू होत .पण मधूनच कधी मनात आठवणींचा पुर येत असे. अश्यावेळी  ती शांत बसत असे.

आजकाल ती खूपच दमून जात होती.

मुल जमेल तशी तिची मदत करत.

शेवटी दोघांनी मिळून तिला आराम मिळावा म्हणून  घरातल्या कामाची विभागणी केली.

घरातला केर काढणे,कपड्याच्या घड्या घालणे,पसारा आवरणे, झोपताना दार खिडक्या बंद करणे,  भांडी मांडणे,झोपताना अंथरूण घालणे अशी छोटीछोटी कामे राहुल करायला लागला.

सीमा ने पण लादी पुसणे,कपडे वाळत घालणे, भांडी घासणे,कधी कुकर  लावणे,भाजी साफ करून ठेवणे , ओटा साफ करणे,कधी पोळ्यांची कणीक भिजवून ठेवणे अशी काम करायला सुरू केलं होत.

कधीकधी तर दोघं मिळून तिचे पाय ही चेपत असत.

सीमाला तर खूपच गहिवरून आल होत.तिला पुन्हा एकदा पटल.खरच तर आई कधी एकटी नसते.



क्रमशः

मधुरा महेश किजबिले

 


🎭 Series Post

View all