अस्तित्व - एक प्रवास भाग 2 अंतिम भाग

कुठे जायचं, काय करायचं काही माहित नव्हतं.. वाट मिळेल तशी ती चालत सुटली होती ती.. चालून चालून ती दमली आणि एका ठिकाणी बसली.. भूकही लागली होती पण पैसे नव्हते..


आपल्या  जगण्याला काही अर्थच नाहीये, असं तिला सारखं वाटत होतं.. काहीही झालं तरी आपल्या आईवडलांना न्याय मिळवून द्यायचा हे तिने ठरवलं..

आणि त्यादिवशी सावकार काही कामानिमित्त दोन दिवसांसाठी परगावी गेला.. हीच संधी साधून हिम्मत करून सरूने तिथून रात्री पळ काढला.. ती धावत ST स्टॅन्ड वर पोचली.. कुठेही जाण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते.. ती एका एसटीत चढली आणि मागच्या सीटखाली जाऊन लपून राहिली..

दुसऱ्या दिवशी सकाळी ती एसटी सुटली.. प्रवाशांची खूप गर्दी झाली.. बऱ्याच वेळानंतर कंडक्टर ओरडला.. पुढचा स्टॉप शेवटचा आहे.. तिथून गाडी डेपोत जाईल.. संपूर्ण गाडी त्या स्टॉपला खाली झाली.. त्या गर्दीत सरूही मिसळली आणि खाली उतरली..

कुठे जायचं, काय करायचं काही माहित नव्हतं.. वाट मिळेल तशी ती चालत सुटली होती ती.. चालून चालून ती दमली आणि एका ठिकाणी बसली.. भूकही लागली होती पण पैसे नव्हते..

बाळा, कोण तू, कुठून आलीस -- एक अज्ञात व्यक्ती
सरूने लगेच वर पाहिलं..
मी..मी..ते.. -- ती काहीशी घाबरली
अग घाबरू नकोस.. मी सुहास शिर्के.. इथेच जवळ राहतो..
तुझ्या कपड्यावरून तू इथली वाटत नाहीस.. वाट चुकलीयेस का.. कोणासोबत आलीस इथे..

ठीक आहे.. नको सांगूस आता काही.. तुला भूक लागली असेल ना..

थांब आलोच मी..

त्याने गरमागरम दोन वडापाव आणले.. एक त्याने घेतला आणि एक सरूला दिला..

पैक नाय माझ्याकडे.. तुमी खावा..

अग मी दिलेत पैसे.. मला नंतर दे तू.. आधी खाऊन घे..

सरूने भुकेबरोबर तो वडापाव खाल्ला.. त्याने त्याच्या बाटलीतल पाणी तिला प्यायला दिल..

आईवडलांनंतर आज कितीतरी महिन्यांनी कोणीतरी मायेने तिच्याशी बोलत होत.. आता तिच्याही मनातली भीती कमी होत होती.. इतक्यात जोरात पाऊस आला..

अग चल माझ्यासोबत.. इथे भिजून आजारी पडशील.. त्याने तिला त्याच्या घरी नेलं.. तिला कपडे दिले.. तिला आराम करायला सांगून तो स्वयंपाकघरात गेला..

सरूला परक्या जागेत झोप येत नव्हती.. ती स्वयंपाकघरात आली..

तुमास्नी जेवण येत.. तिने प्रश्नार्थक नजरेने विचारलं..

अग इथे एकटाच राहतो मी.. आईवडील गावी असतात.. मग सगळं स्वतःच करायची सवय झाली आता..

रात्री जेवण झाल्यावर सरू एकटक आकाशात बघत असते..

झोपली नाहीस का.. आकाशात बघायला आवडत वाटत तुला -- सुहास

न्हाय जी.. मायला शोधतेय आकाशात कुठ दिसतेय का ते..
मानस गेल्यावर आकाशात जातात ना..

शांत हो.. आणि सावर स्वतःला.. काय झालं होत तुझ्या आईसोबत..

आता सरूला राहावल नाही आणि ती सगळं सांगू लागली..

तिच्या एकेक शब्द जीवघेणा होता.. कस झेलल असेल या पोरीने हे -- सुहास मनात म्हणाला..

त्याने सरूला शांत केल.. आणि तुला तुझ्या घरच्यांना न्याय द्यायला हवा, त्यासाठी तुला जगायला हवं..

न्याव.. तो कसा भेटेल जी.. त्यास्नी न्याव मिळवून द्याया म्या कायबी करीन..

शाब्बास.. आता तुला पुढे शिकायला हवं तरच तू त्यांना न्याय मिळवून देशील..

त्याने तिच्या शिक्षणाची सोय केली.. बघता बघता वर्ष - दोन वर्ष सहज निघून गेली..

तिने वकिलीची परीक्षा दिली आणि ती पास झाली..

न्यायालयात त्या सावकाराविरोधात खटला चालू झाला.. पैशांच्या जीवावर सावकाराने वकीलाला विकत घ्यायचा प्रयत्न केला पण देव सरूच्या बाजूने होता..

सरू खटला जिंकली.. तिच्या आईवडलांना आज न्याय मिळाला.. सरूने तिच्या अस्तित्वाची लढाई जिंकली.. 

🎭 Series Post

View all