अशक्य वाटतंय आता..

अशक्य वाटतंय आता..



कविता शीर्षक: अशक्य वाटतंय आता.. 

✨✨✨

अशक्य वाटतंय आता तुझ्याशिवाय जगणं.. 

हा दुरावा सहन करणं.. 

अशक्य वाटतंय आता अबोल राहणं.. 

मनातलं प्रेम मनातंच गडप करणं.. 

अशक्य वाटतंय आता आपल्या नात्याला गैरसमजाने शिवणं.. 

गैरसमजुतीतून नातं विखुरणं.. 

अशक्य वाटतंय आता तुझ्यापासून विभक्त राहणं.. 

प्रेमाचा वर्षाव करावासा वाटत असूनही त्या इच्छेला मनातंच डांबणं.. 

अशक्य वाटतंय आता कवितेत तुझा उल्लेख न करणं.. 

प्रेम करत असूनही प्रेम नसल्याचं ढोंग करणं.. 

अशक्य वाटतंय आता तुझ्याविना पाऊलवाटेवर चालणं.. 

तुझ्या मिठीच्या स्पर्शाला नाकारणं.. 

अशक्य वाटतंय आता माझ्या या प्रेमभावनांना झुगारून देणं.. 

मनातल्या मनात तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी झुरणं.. 

अशक्य वाटतंय आता अबोल राहून स्वतःसह तुलाही त्रास देणं.. 

नजरेचा अन् भावभावनांचा हा लपंडाव खेळणं.. 

अशक्य वाटतंय आता सारंच तुझ्याविना.. 

काय करावे नेमके तेच कळेना.. 

✨✨✨


©®

✨❣️ श्रावणी ❣️✨