Login

अविश्वास त्याचा (पार्ट17)

अविश्वास त्याचा (पार्ट 17)

नम्रता अरे तिने तर काहीच केलं नव्हतं जे करायचं होतं ते सगळं मी केल होत

आनंद:  म्हणजे मला काही समजलं नाही

नम्रता  :(रागाने )अरे ती राधिका माझ्या आणि स्वप्निलच्या मध्ये आली..... मग मी कसं काय सहन करू शकते मी ज्यावेळेस स्वप्निल ला पहिल्यांदा पाहिलं त्याच वेळेस त्याच्या प्रेमात पडले होते ....पण त्याला बोलायला मला वेळ लागला.... त्याच्या आधीच राधिका त्याच्या प्रेमात पडली तसं बघायला गेलं तर स्वप्निल तिच्या प्रेमात पडला होता आणि त्याने तिला प्रपोज पण केला होता पण तिने त्यावेळेस त्याला नकार दिला होता जर नकार दिलाच होता मग परत काय गरज होती त्याला प्रपोज करायची

राधिकाने स्वप्निल ला नकार दिला म्हणून मी माझ्या मनाची तयारी केली आणि मी स्वतःहून स्वप्निल ला माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल काय भावना आहे ते सांगायचं ठरवलं पण परत तेच घडलं राधिका तिच्या मनातील सगळी गोष्ट त्याला बोलून मोकळी झाली आणि मी राहिली मागें..... ज्या दिवशी मला त्यांला बोलायचं होतं त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता मी सगळी तयारी करुन आली होती पण राधिका ने त्याच्यावर ती संपूर्ण पाणी पसरवल.... माझी पुन्हा एकदा हार झाली ....मग मला ते सहन नाही झालं..... म्हणून मी राधिका चा बदला घ्यायचा ठरवला.... तो प्रयत्नसुद्धा केला ज्यावेळेस स्वप्निल चांगल्या मार्काने पास झाला त्यावेळेस त्याच्या आईने घरी जेवायला बोलावलं होतं.... त्या वेळेस वाटत होतं सगळं काही त्याच्या घरी सांगून टाकावा ज्याने करून घरचे त्यांच्यावर ती रागावतील आणि हे दोघे लांब होतील.... पण झालं उलट सगळे मित्र माझ्यावरती रागावली आणि मग मी त्या वेळेस माझ्या मनामध्ये स्वप्ने बद्दल असलेल्या भावना त्याच दिवशी व्यक्त केल्या तर ह्या लोकांनी मला साथ द्यायचा ऐवजी त्या राधिकाला साथ दिली ....चल बाकीच्यांच सोड पण निदान स्वप्निलने  तरी माझी बाजू घ्यायला पाहिजे होते..... त्याने सुद्धा मला एक मैत्रीण म्हणून ह्या नजरेने बघतो असं सांगितलं तेव्हाच मी मनामध्ये ठरवलं की आमचा ग्रुप सोडून जायचं मी ग्रुप सोडून गेले काही केलं तरी माझ्या मनातून स्वप्नील निघत नव्हता..... कितीही प्रयत्न केला त्याला माझ्यापासून दूर ठेवण्याचा तरीही तो सारखा सारखा आठवायचा

नंतर खूप दिवस असेच निघून गेले स्वप्नील सुद्धा चांगल्या कामाला लागला मी सुद्धा चांगल्या कंपनीत कामाला लागले त्यावेळेस मला तू भेटलास..... तुझ्याबद्दल मला बरच काही माहीत होतं ....तुझी घरची परिस्थिती माझ्यापासून काही लपली नव्हती.... त्या संधीचा फायदा घेतला आणि एका रात्री हा सगळा प्लान बनवला ....मला माहित पडलं की संदीपने एक हॉटेल घेतलेला आहे आणि हे सगळे मित्र तिकडे जाणार होते त्याला काँग्रॅजुलेशन करायला ....ज्या  संधीची वाट बघत होते ती स्वताहून चालत आली

त्यासाठी मी तुला माझा सगळा प्लॅन सांगितला आणि तू सुद्धा तयार झाला..... तू काय फुकट काम केलस माझं नाही ना त्यासाठी मी तुझ्या साठी पैसे मोजले होते.... ज्या दिवशी मी संदीपच्या हॉटेलमध्ये गेले त्या दिवशी सगळे मित्र तिकडे बसून एन्जोय करत होते.... त्या लोकांना जरा सुद्धा वाटलं नाही की नम्रता आपल्या मध्ये नाहीये तर तिला कसं वाटत असेल ... जाऊ दे मी ते सुद्धा इग्नोर केलं ....नंतर मी जाऊन नाटक केलं त्यांच्याबरोबर बोलण्याचा चान्स शोधू लागली मी स्वतः जाऊन त्यांची माफी मागितली मला तुमच्या मध्ये सामील करून घ्या याची भीक मागितली तेव्हा जाऊ कुठेतरी त्यांनी मला माफ केलं आणि त्यांच्या ग्रुपमध्ये परत घेतलं...… मी येताना झोपेच्या गुंगीच्या गोळ्या घेऊन आलेले होते सगळे जण खूप छान एन्जॉय करत होते.... मी मुद्दामूनच संदीप ला म्युझिक लावायला लावली.... स्वप्नील आणि राधिका दोघे एकत्र नाचत होते ते बघून मला अजून त्रास होत होता म्हणून मग मी स्वतः सगळ्यांना ड्रिंक्स सर्व्ह करायचं ठरवलं...... मी मुद्दामून राधिका आणि संदीप च्या ड्रिंक्स मध्ये गोळ्या टाकल्या जेणेकरून त्यांचे डोके जड होऊन त्यांना गुंगी यावी

आणि तसं झालं सुद्धा राधिका एका ठिकाणी डोकं धरून बसलेली  मी पाहिलं..... त्यात संधीचा फायदा घेऊन मी तिला वरच्या रूम मध्ये कोण गेले तिला तर आता चालता येत नव्हते जेव्हा मी तिला रूम मध्ये गेलो त्यावेळेस ती पूर्णपणे विकसित झाली ह्या संधीचा फायदा घेऊन मला जे करायचं होतं ते मी केलं त्यानंतर मी तुला बाकीच काम करायला जे तू केलस

( नम्रता आणि आनंद च संभाषण तृप्ती गुपचूप तिच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ च्या माध्यमातून कॅप्चर करत होती..... स्वप्निल ला जे काही  आता सगळं ऐकतो आहे त्यावर विश्वासच बसत नव्हता त्याने त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं पण त्याला अजून नम्रता पुढे काय बोलते हे सुद्धा ऐकायचं होतं)

नम्रता  : नंतर तूच संदीप ला वरती घेऊन आलास ना.... मी जे काम मी तुला सांगितलं ते तू केलंस.... त्या दोघांची अवस्था अशी करून टाकली जसं कोणाला वाटेल या दोघांमध्ये खरच काहीतरी घडलेल आहे आणि मला ततेच हवं होत कारण मला माहित होतं कोणताही दुसरा नाटक केलं तरी स्वप्निल ह्या वरती विश्वास ठेवणार नाही कारण मी याआधी स्वप्निल ला सांगण्याचा प्रयत्न केला होता तिला की संदीपने तिला  प्रपोज केला पण त्याने त्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही नाही म्हणून मला हे सगळं करावा लागला जेणेकरून आता त्याचा पूर्ण विश्वास हा अविश्वासा होईल.....

पण सर्वात जास्त मला भीती होती ती तृप्तीची आणि उज्वला ची   कारण या दोघीही चांगलेच ओळखत होत्या मला आणि तसं तृप्ती तिने पूर्ण प्रयत्न केला की हे सगळं मीच घडवून आणले पण त्याचा काहीच फायदा झाला नाही कारण जी परिस्थिती तिकडे होती त्याच्यावर  स्वप्निलचा  पूर्णपणे विश्वास होणार याची मला खात्री होती....
आणी बघ मी जिंकली बिचारी राधिका तिची यामध्ये काही चुक नव्हती तिची फक्त एकच चूक होती की ती माझ्या आणि स्वप्नील च्या मध्ये आली मला हे सहन होत नव्हतं मी त्याच्या विना कितीतरी वर्ष एकटी राहिली सगळं सहन केलं मला नेहमी त्याची आठवण यायची..... पण काय करणार तो तिच्या प्रेमामध्ये असा आंधळा होऊन बसला होता की त्याला मागे पुढे कोणीच दिसत नव्हतं म्हणून मी हे सगळं घडवलं आणि आता बघ ती त्याच्या आयुष्यात एक टक्कासुद्धा नाही त्याचं पूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त माझ्या हातात आहे

( नम्रता चं हे वाक्य ऐकून आता मात्र स्वप्निलच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती तो पुढे जाणार तेवढ्यात त्याला बाबू ने मागे खेचलं)

बाबू : हे बघ स्वप्नील ही वेळ ती नाही जे तू आता करायला जाणार आहेस ....थोडा अजून वेळ जाऊदे.... आपल्याला जे करायचे ते सगळं सांभाळून करावे लागेल

स्वप्निल:( रागातच) अरे पण तू बघतोयस ना नम्रता ने काय केलं ते तिने जे केलं ते योग्य आहे  तिने किती मोठा खेळ खेळलाय माझ्या आणि राधिका मध्ये ...तशी सगळीच चूक राधिकाची  नाहीये त्यात माझी पण चूक आहे मी राधिकावर अविश्वास दाखवला ..... एवढी वर्ष झाली मी राधिका लंच कोसळत होतो पण हे सगळं नम्रताने घडवून आणलं हे जरा सुद्धा मला कळलं नाही राधिका रडून-रडून माझ्याकडे विनवणी करत होती आणि संदीप तू सुद्धा ....तरी मी तुझ्यावर विश्वास नाही केला का तर माझ्या डोळ्यासमोर एक आणि माझ्या डोळ्याच्या मागे एक गोष्ट घडली होती

पण आता नाही आता तर मला सगळं कळलं आहे आता जे करायचं ते मी करणार

उज्वला:  मला माहिती ये स्वप्निल तू आता खूप रागात आहे पण एक लक्षात घे तू जे काही करशील त्याचा सगळा इफेक्ट हा राधिका वर सुद्धा होणाऱ्या आणि तुझ्या मुलावर सुद्धा

( उज्वला चे बोलणे ऐकून स्वप्निल जागेवरच स्तब्ध बसतो )

स्वप्निल आश्चर्यचकित होतो :  माझा मुलगा तू काय बोलतेस तुला तरी कळतय ना....???

संदीप  : चल आमच्या बरोबर तुला अजून काही तरी दाखवायचंय

( हे सगळे मित्र स्वप्नील ला घेऊन मागच्या मागे निघून जातात जिकडे मीनाताई राधिका आणि स्वराज हे बसलेले असतात)

( गार्डनच्या दुसऱ्याच ठिकाणी मीनाताई राधिका आणि स्वराज हे बसलेले असतात मीनाताई एका जागी बसून सगळ्या मुलांची वाट बघत असतात तर राधिका ही स्वराज्य बरोबर खेळण्यांमध्ये गुंग असते हे मित्र लांबूनच स्वप्निल ला बोलतात)

रिंकी  : स्वप्निल ते बघ समोर कोणी दिसतय तुला.....????

( स्वप्निल लांबूनच बघण्याचा प्रयत्न करतो तर त्याला राधिका आणि तिच्या बरोबर असलेला मुलगा जो त्याने केक शॉप मध्ये बघितलेला असतो स्वराज हे दोघे खेळताना दिसतात)

सचिन स्वप्निलच्या जवळच जात बोलतो.: स्वप्निल राधिका आणि तो जो मुलगा आहे ना तो तुमच्या दोघांचा आहे स्वराज

सचिनचे बोलणे ऐकून स्वप्नील जागेवरच कोसळतो सगळे मित्र त्याला आधार देतात

बाबू : स्वप्निल ....स्वप्निल तु ठीक आहेस ना इकडे  बघ माझ्याकडे अरे माझ्याकडे बघ .....तू ठीक आहेस ना आम्हाला माहीत होतं तुझं असंच काहीतरी रिएक्शन असणार म्हणून तर तुझी पण काळजी वाटत होती आम्हाला.....

स्वप्निल..... स्वराज हा तुझाच मुलगा आहे( नंतर बाबू त्याला सगळी हकीकत सांगतो ज्या वेळेस तो राधिकाला सोडून जातो त्याच्या नंतर काय काय घडतं तो त्याला एकूण एक गोष्ट तो स्वप्नीला समजावून सांगतो ....राधिकाने कसे दिवस काढले तिने कसे त्या मुलाचं संगोपन केलं त्यात तिच्या आईने तिला कशी साथ दिली यातली एकूण एक गोष्ट त्याने स्वप्निल ला सांगितली)

स्वप्निल गुडघ्यावर बसून त्याचा हात तोंडावर ठेवून रडायला लागतो

स्वप्निल  : का केलं मी हे सगळं ....का... अरे ज्या वेळेस हा मुलगा मला केक शॉप मध्ये भेटला त्यावेळेस सुद्धा मी राधिका वरती आरोप लावले की हा मुलगा तुझा आणि संदीप चा आहे.... अरे तो तर माझा मुलगा आहे माझा हक्काचा ....माझ्यामुळे कितीतरी गोष्टी राधिकाला सहन कराव्या लागल्या..... तरी  सुद्धा एका शब्दाने तिने मला काहीच नाही सांगितले किती प्रेम करते ती माझ्यावरती.... मी तिच्या वरती आरोप वर आरोप लावत गेलो.... तरीसुद्धा ती एका शब्दाने मला उलट नाही बोलली.... तिला माहित होतं हे सगळं नम्रता च कारस्थान आहे तरी ....ती  आमच्या मधी नाही आली आणि मी काय दिलं तिला त्या बदल्यात या नम्रता वरती विश्वास ठेवून तिच्या बरोबर लग्न केलं का केलं मी अस का केलं..... जीव तोडून तोडून ती मला सांगत होती तरी मी तिच्यावर विश्वास नाही केला एवढं माझा त्याच्यावरती अविश्वास झाला किती प्रेम होत आमच दोघांच एकमेकांवर ती आणि मी काहीच नाही करू शकलो तिच्यासाठी.......

आणि तो बघ माझा मुलगा ज्याला एवढ्या वर्ष त्याच्या वडिलांचा प्रेम सुद्धा मिळाला नाही ....राधिकाने आई आणि वडील या दोघांची भूमिका निभावली ते पण आमच्या मुलांसाठी का तर मी तिच्या बरोबर नव्हतो आणि कसा असेल रे मी त्या लायकीचाच नाहीये ...

माधुरी :  हे बघ  जे झालं ते झालं आता मला माहित नाही याच्यावर ती राधिका कशी रिऍक्ट करेल ....आता नम्रता सुद्धा निघून गेलेली आहे ते बघ ती गेटच्या बाहेर ऑटोमध्ये बसताना मला दिसते..... उठ आता इथून आणि चल राधिका जवळ जा तुझ्या मुलाला मिठी मार...

स्वप्निल : (रडतच )कसा जाऊ मी तिच्या समोर माझी हिम्मत सुद्धा होत नाही तिचा सामना करायची..... जे मी केलं तुला वाटतं त्याच्यावरती मला माफी मिळेल बिलकुल नाही....

तृप्ती :  अरे वेड्या तू राधिका वरती शक घेतो.... ती अजुनही तुझीच राधीका आहे .....ती काही बदलली नाही तू तिच्या जवळ गेलास ना बघ एका क्षणात  ती तुला माफ करेल तू आधी जाऊन तरी भेट तीला आणि आम्ही सुद्धा आहोत ना तुझ्याबरोबर काळजी नको करूस

सगळे मित्र मिळून स्वप्निल ला राधिका व जवळ जाण्यासाठी बोलतात

तरीपण स्वप्नील स्तब्ध एका जागीच बसलेला असतो थोड्याच वेळात त्याला काहीतरी आठवतो आणि तो त्यांच्या मित्रांना बोलतो

स्वप्निल बाबू मी काय बोलतो.... आपण राधिका च्या घरी जाऊन बोलूया का मला इथे तिच्यासमोर जास्त बोलता नाही येणार आजूबाजूची माणसं सुद्धा बघतील मला परत एकदा राधिका चा तमाशा नाही करायचा... मी आधीच तिच्या आयुष्यामध्ये बरच काही दुःख दिले आहे आता मला अजून तिला दुःख नाही द्यायचं मला ती लोक तिच्याबरोबर आत्ताच्या आत्ता बोलायचे पण इकडे नको तिच्या घरी घेऊन चल मला बाबू तुला रिक्वेस्ट करतो..... मला माझ्या मुलाला माझ्या मिठीत घ्यायचे तू चल बाबू मला घेऊन तु चल....

( बाबू स्वप्निलच्या दंडाला धरून त्याला उभा करतो ....स्वप्निल तसंच त्याच्या गळ्यामध्ये पडून खूप रडतो आज त्याने केलेल्या अत्याचाराच्या पश्चाताप त्याला होत असतो .....त्याला  म्हणूनच स्वतःची लाज वाटत होती जिने आपल्यावरती एवढा विश्वास केला तिला आपण किती काय सोसायला लावल ह्या गोष्टीचा गील्ट त्याला होत होतं.... का आपण असं वागलो .....का  तिच्या वरती विश्वास केला नाही जिने जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न केला तरीही आपण आपल्या प्रेमाच्या नात्यावर ती शक घेतला....)

(स्वप्निल तसाच मागे वळून संदीप कडे बघतो संदीप त्याला इशाऱ्याने त्याच्या जवळ बोलावतो आणि त्याला एकदम कळकळून मिठी मारतो)

( स्वप्निल अरे जे झालं ते झालं.... तू पुन्हा नव्याने सुरुवात कर... हे बघ आमच्या मनात तुझ्याबद्दल कोणताच राग नाहीये ....आम्ही तुला तर कधीच माफ केलं तुला जर खरी माफी मागायची असेल तर ती राधिका बरोबर माग आणि तुझ्या मुलाची.... अरे जेवन जेव्हा स्वराज विचारत असतो राधिकाला माझे बाबा कुठे आहेत ती एकच गोष्ट त्याला सांगते ते बाहेरगावी आहेत लवकरच येतील तुझ्या वाढदिवसाला तुझ्यासाठी मोठं गिफ्ट घेऊन.... चल लवकर आपण राधिकाच्या घरी जाऊया आणि आता पहिलं रडणं थांबव आम्हाला सुद्धा आता तुला अस रडताना बघवत नाही)

बाबू एक मिनिट थांबा त्याआधी काकूंना फोन करून कळवतो म्हणजे त्या लगेच घरी जातील आपण त्यांच्या मागून जाऊ या


बाबू मीनाताईंना कॉल करतो  तो त्यांना एवढच बोलतो की तुम्ही आधी घरी जा आणिआम्ही  मागून घरी येतो म्हणून मीनाताई त्याच्या फक्त बोलण्यावर ती  होकार देतात

मीनाताई :  राधिका चला आता आपण आपल्या घरी जाऊ या मला आता थोडं बरं वाटतंय थोडं थकल्यासारखं वाटतंय तो घरी जाऊन आराम केला तर अजून बरं वाटेल राधिका सुद्धा जास्त काही प्रश्न न विचारता होकारार्थी मान हलवून घरी जाण्यासाठी निघते

( काय मग कसा वाटला तुम्हाला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कमेंट द्वारे आता याच्यापुढे स्वप्निल काय डिसिजन घेईल हे लवकरच कळेल)

🎭 Series Post

View all