अविश्वास त्याचा(पार्ट 2)

अविश्वास त्याचा(पार्ट 2)


पार्ट 2


राधिका तशीच तिच्या रूम मध्ये येते........थोड्यावेळ ती तशीच बेड वर तीच डोकं शांत होण्यासाठी पडते........तिच्या रूमच्या खिडकीतुन येणारा थंड वारा तिला खुप आराम देत होता.....तिच्या चेहऱ्यावरील.......चिंता त्या थंड वाऱ्याने कुठच्या कुठे पळुन जात होती.......नाहीतरी तिच्या सोबती ते थंड वारेच असायचे........राधिका थोड्यावेळाने  तशीच उठुन तिच्या कपाटा कडे वळते......त्यात तिची छोटीशी बंद पेटी असतेआणि लपुन ठेवलेला त्याच्या फोटो....…तो फोटो बघत नकळत तिच्या गालावरून पाणी वघळत.....

राधिका : (रडतच) का असा वागलास......का असा अविश्वास दाखवला..........काय चुकलं माझं.....
एवढंच ना .........की मी जास्त प्रेम केलं तुझ्यावर......जास्त विश्वास केला तुझ्यावर.......आणि तु  का अविश्वास दाखवलास माझ्यावर........(राधिका थोड्यावेळ तशीच तिच्या अश्रुना वाट मोकळी करते).....थोड्याच वेळात तिला स्वराजची आठवण येते म्हणुन ती स्वतःला सावरते......
राधिकाने आज स्वरजच्या वाढदिवसासाठी बरीच छान तयारी केलेली........कारण तिला स्वराजला सरप्राईज जे दयायच होत.........म्हणुन ती तशीच मागे वळते.........स्वराज तिच्या मागे उभा असतो........

स्वराज: मम्मा....... तु इथे का उभी..........काय आहे तुझ्या हातात........मला दाखव

राधिका तीच कपाट मागुनच हळुच बंद करते...........

राधिका : काही नाही रे माझ्या राजा.........सहज कपडे सरळ लावत होते.....इकडे ये बघु..... अरे वा झाली तुझी शाम्बो आणि तयारी............वा.....आज आजीने खुपच खुलुन काढला तुला......

स्वराज : हो मम्मा.... आजीने आज मला ना ते ते लावलं......(त्याला काही आठवत नाही)

राधिका :ते .....ते म्हणजे काय......????

स्वराज :ते ज्याचा खुप छान स्मेल येतो बघ......

राधिका :(स्वराजला मांडीवर घेत....)ओ ......म्हणजे आजीने तुला आज सुगंधी उटणे लावले.....

स्वराज : हा तेच ते.........ते लावलं....बघ किती छान वास येतोना माझ्या मधुन......

राधिका : बघु बर......अरे वा......किती छान सुगंध आहे हा......

स्वराज : मम्मा........ तु आज शॉप वर नाही जाणार......?????

राधिका : नाही....आन माझ्या स्वराजचा बर्थडे आहे.....म्हणुन आज ममीला सुट्टी........

(राधिकाच छोटस केक शॉप होत......तिने तिच्या मेहनतीने बरच छान प्रकारे तीच शॉप चालवलं होत)

स्वराज : एएएएएय.....(आनंदात ओरडतो)मग माझं गिफ्ट दे ना

राधिका : अरे बापरे.....ते तर मी विसरले......(कपाळावर हात मारत बोलते)

स्वराज : धिस इज नॉट फेर मम्मा............आज माझा बर्थडे आहे.......तु कशी विसरलीस.....

राधिका : हम्म.......आता काय करायचं.....आयडिया.... अजुन पूर्ण दिवस बाकीये.....हो ना.....मग मी आता बाहेर जाते.....आणि छान पैकी तुला एखादं गिफ्ट आणते.....ओके.....

स्वराज : एएएय्येय ......मस्त मम्मा.......(एक गालावर पपी देत बोलतो)

राधिका : आता एक काम कर....तु जा आणि आजीकडुन नाशता करून घे....ठिके....मी जरा माझं काम करून घेते......

स्वराज : ओके मम्मा.....(खुश होत निघुन जातो)

थोड्याच वेळात मीना ताई राधिकाच्या बेडरूम येतात........

मीना ताई : ( आज शॉप मध्ये नाही जाणार ना.......)

राधिका : नाही....माझा स्टाफ आहे लक्ष द्यायला.( तीच काम करतच बोलते)

मीना ताई : ठिके.......चल तु पण नाशता करून घे.......

राधिका : हम्मम तु हो पुढे मी आलेच हे काम संपवुन.....(मीना ताई निघणारच तेवढ्यात राधिका विचारते.......नंदिनी आली का......(काम वाली......जी राधिकाच घर सांभाळुन स्वजला पण सांभाळायची)

मीना ताई : हम्म आली.....तिनेच नाशता बनवलाय.... आता ती स्वराजला पण भरवते....चल ये तु पण लवकर

थोड्याच वेळात दोघी माय लेकी नाश्ता करत बसतात.....

मीना ताई : रात्री सगळ्या बिल्डिंग मधल्या मुलांना मी बोलावलं आहे.........त्या मुलांसोबत त्यांची आई सुद्धा येईल.....

राधिका : हो चालेल......मी डेकोरेशन वाल्याला बोलावलंय....तो चार वाजेपर्यंत येइल......आणि हो....मी जरा बाहेर जाऊन येते.......ते स्वराज साठी गिफ्ट आणायचं बाकीये.....ते घेऊन येते.....तुला काही हवं आहे का......

मीना ताई : नाही मला नको काही.......तु लवकर जाऊन ये....

राधिका थोड्याच वेळात गिफ्ट आणण्यासाठी निघते........रस्त्यात जाताना तिला लांबुनच कोणी तरी ओळखीचं दिसतंय अस वाटत........ती इग्नोर करते.....पण परत ति नकळत त्या व्यक्ती कडे ओढल्या जात होती .....(हो हा तोच आवाज आहे.....तोच आवाज ज्याच्या आवाजाने मी स्वतः भारावुन जायची.....हा तोच आवाजे ज्या मध्ये मी स्वतःला गुंतवुन टाकलेल....हा तोच आवाज आहे ज्याने मला प्रेमाची पहिली ओळख करून दिली..........न राहुन राधिका मागे वळुन बघते......तिला तर आधी तिच्या डोळ्यावर विश्वास च बसत नाही.......किती तरी वेळ ती एका दुकानाच्या कोपऱ्यातून त्याला न्हयाळत होती........हा तोच....आहे त्यावर मी माझा जीव ओवाळुन टाकला.....आजही त्याच्या त काहीच फरक नव्हता.....त्याची ती स्माईल....त्याच ते बोलणं..... त्याच ते हसन......(हहहहहा)अजुनही तसाच आहे हा..........काहीच बदलला नाही हा.......राधिका सुद्धा तिच्या भुतकाळात हरवुन जाते........

@@@@@@@@@@@@@@@@@@@

भुतकाळ.......

सगळे मित्र रात्री त्यांच्या ठरलेल्या जागेवर पोहोचतात........स्वप्नील सुद्धा येतो.........

बाबु : ही तृप्ती आणि राधिका अजुन का नाही आली.....

रिंकी : येतील .....थांब जरा........नाहीतरी तृप्ती आज राधिकाच्या घरी जाणार हाती ना......तिला गणित शिकवायला.........येतीलच(ते बघ आल्या......)

सचिन : काय मग झालं शिकवुन.... आता तरी समजलं का तुला.......

राधिका : (काळजीत) नाही यार.......अजुन नाही समजलं......जाऊदे उद्या सरांना विचारते.....

राधिकाच टेन्शन बघुन स्वप्निल स्वतः बोलतो....

स्वप्नील : सॉरी....पण तुला काही हरकत नसेन तर मला सांगशील का........तुला गणिताची काय अडचण आहे ते....

राधिका थोडी शांत होते....कारण त्या दोघांची जास्त ओळख नसते....

तृप्ती तिला तिच्या हाताचा एक कोपरा मारते.....: अग काय विचारतोय तो.........

राधिका : (भानावर येत)....अ...... हा....म्हणजे .....मला काही हरकत नाही..........चालेल....मला...


बाबु : अरे देवा .....म्हणजे आता ह्याच पण....डोकं खाणार.....

राधिका : (रागात) ये मी नव्हती बोली त्याला....शिकव म्हणुन तो स्वतः बोला मला......हो ना रे स्वप्नील.....???

स्वप्नील : (हसतच) अरे त्यात काय एवढं .....मला आवडेन....मदत करायला....आणि माझं काही डोकं दुखणार नाही.....(हसत)

बाबु : ठिके.......जशी तुझी इच्छा.....

राधिका : हम्म......ए ऐकणा.....रविवारी आईने सगळ्याना बोलावलंय.....आई पाव भाजी बनवणारे....

नम्रता : अरे वा.......मस्त....माझी फेव्हरेट पावभाजी.....यम्म्मम.....

माधुरी : काही स्पेशल .......का ग.....????

राधिका : नाही ग .....तस काही नाही.....आईबाबांच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस आहे....म्हणुन आई बोली तुझ्या मित्राना बोलावं....आणि नाही तरी तुमच्या सगळ्याना खुप दिवसा पासुन खायची होती ना आईच्या हातची पावभाजी.....मग त्या दिवशी ती बनवणारे.....तुम्ही सगळे या.....

सगळे एकत्र खुश होत.........हो बोलतात.....

राधिका : स्वप्नील तु पण ये.....म्हणजे माझ्या घरच्यांशी पण ओळख होईल तुझी........

स्वप्नील : हसतच हो बोलतो.....

माधुरी : राधिका टीका आताच सांग तुला गणित कधी शिकवायचं ते.....म्हणजे तो तसा तयार राहील.....

नम्रता : हो .....स्वप्नील तुला उद्या मधल्या सुट्टीत जमेल का......????

स्वप्नील : हो चालेल.....काही हरकत नाही.......

उज्वला : चला मग निघुया....आता.....दहा वाजलेत....उद्या परत शाळेत जायचंय........

सगळे एकमेकांना गुड नाइट बोलुन आपापल्या घरी निघतात........

दुसऱ्या दिसवशी सगळे वेळेत शाळेत पोहोचतात..........

मधल्यासुटीत स्वप्नील त्याच्या नवीन मित्रांसोबत येतो.....

राधिका : स्वप्नील चल....मला शिकव....हे घे पुस्तक.....आणि ही वही पेन......

स्वप्नील थोडा आज तिच्या बरोबर फ्री वागतो.....तिने दिलेल्या वहिमध्ये तिला गणित शिकवतो.......राधिका सुद्धा मन लावुन ऐकत असते.........थोड्याच वेळात ते दोघे पुन्हा त्यांच्या ग्रुप मध्ये जॉईन होतात....

तृप्ती : आता तरी समजलं का तुला......?????

राधीका : नुसतं समजलं काय बोलते.......एक दम भारी समजलं.......काय छान शिकवतो हा.....(खुश होत)आता काही प्रॉब्लेम झाला रंग मी ह्यालाच विचारत जाईल.......

नम्रता : बर झालं.....कोण तरी भेटलं हिला.........नाहीतर एवढ्या वर्ष किती डोकं खाल्ल हिने आमचं.....बर झालं....आता आम्ही सगळे वाचलो.......स्वप्नील.....तुच झेलरे बाबा हिला.....
नम्रताच्या बोलण्याने सगळे हसतात........राधिका सुद्धा दिलखुलास हसत होती......तिच्या हसण्यातच स्वप्नील आज हरवुन गेलेला...........

@@@@@@@@@@@@@@@@

वर्तमान काळ.....

पी पी पी पी पी पी.....पीईईईईई

अनोळखी माणुस..... आहो मॅडम.....जरा बाजुला तरी व्हा.....किती वेळचा मी हॉर्न देतोय.....निदान येण्या जाण्याचा रस्ता तरी सोडा......

होर्ण च्या आवाजाने राधिकाच्या तंद्री भंग होते.....ती दचकुन च तिच्या भुतकाळातून बाहेर येते.......आणि त्या माणसाला काही न बोलता रस्ता देते........

राधिका मनातच : (कशाला मी ह्याचा एवढा विचार करते..........का म्हणुन...... कोण आहे हा आता माझा.....जेव्हा मला ह्याच्या विश्वासाची गरज होती.....तेव्हा तर ह्याने सगळ्यांसमोर पाठ फिरवली........मग का .....का मी त्याचा एवढा विचार करते.......थोड्याच वेळात तिला ती व्यक्ती डोळ्यासमोरून नाहीशी होते) राधिका तिच्या मुलाचा विचार करून शॉप मध्ये एन्टर होते....आणि स्वराज साठी एक छान सायकल घेते..........दुकानदाराला पैसे देऊन राधिका तिच्या घरी येते.....

राधिका : (घरक्त येतच) नंदिनी ......नंदिनी......(नंदिनी बाहेर हॉल मध्ये येते......

नंदिनी : हा ताई......

राधिका : थोडी स्ट्रॉंग कॉफी बनव माझ्यासाठी.......आणि हा आज स्वराजचा बर्थडे आहे....तर तु रात्री सात वाजता तुझ्या चिऊला पण घेऊन ये......

नंदिनी :  ठिके ताई.........

राधिका : आणि रात्रीच्या जेवणाच्या मागे नको पळुस.... मी बाहेरच ऑर्डर दिलीये......जेवणाची......

नंदिनी राधिकाच सगळं एकुण किचन मध्ये जाते.........तिथेच मीना ताई स्वराज साठी काही तरी गोड खायला बनवत असतात........

नंदिनी : आज पण ताईंचा मुड चांगला  नाहीये वाटत......

मीनाताई तशाच हातातलं काम थांबवतात..... का काय झालं......

नंदिनी : काही नाही .....त्यांनी स्ट्रॉंग  कॉफी बनवायला सांगितली.......म्हणुन समजलं.....

मीना ताई : हमम्म्मम.......जाऊदे.......कितीही समजावलं.....तरी ती समजणारे का.....एवढे वर्ष झाले तरी ती त्याच्यातुन बाहेर नाही येत.......मी पण आता प्रयत्न करून थकले..... आता तीच तीच बघेन..........

नंदिनी : पण अजुन अस किती दिवस त्या स्वतःला त्रास करून घेणार.....(काळजीत)????

मीना ताई : नंदिनी .....ज्या गोष्टीच उत्तर माझ्या कडे नाहीये......ते मी तुला कस सांगु......(डोळ्याला पदर लावतच बोलतात)

नंदिनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवते......नका काळजी करू आई.....सगळं होईल ठीक........

मीनाताई : हम्मम परमेश्वर च आता ह्यातुन मार्ग काढेन.......

राधिका तशीच हॉल मध्ये बसुन तिच्या स्टाफ बरोबर बोलत असते.........

नंदिनी : ही घ्या कॉफी ताई.......

राधिका : थँक्स......आणि हा तुझं काम झालं असें तर तु निघु शकतेस......

नंदिनी : हो ....काम तर झालंच आहे......जेवण पण बनवुन झालय.....तुमच्या सगळ्यांच जेवण झाल्यावर भांडी तशीच ठेवा मी आल्यावर घासेल.....

राधिका : ठिके .....तु आता निघ आणि वेळेवर ये.........

नंदिनी सुद्धा तीच सगळं काम आटोपुन निघते.......

@@@@@@@@@@@@@@@

बघता बघता संध्याकाळ होते.......

डेकोरेटरच्या मदतीने घर छान प्रकारे...........सजवलं होत....... हळुहळु स्वाराजचे मित्र घरी येऊ लागले......स्वराजने सुद्धा मस्त आज टाय कोट घातलेला असतो.......राधिका तर न राहुन सारखी सारखी त्याला  बघायची........ आज जणु तिला तोच दिसत होता........हो हो तोच जो सकाळी तिला दिसलेला.....सेम बोलणं.....सेम वागणं.......सगळे एकुनएक सगळे नखरे त्याच्याच सारखे होते त्याचे......आज जणु तिला खुपच आठवण येत होती त्याची......राधिका पुन्हा तिच्या भूतकाळात शिरते

@@@@@@@@@@@@@@@

असेच शाळेचं दिवस पुढे जात होते.........राधिका आणि स्वप्नीलची बरीच छानशी अशी मैत्री झालेली..........राधिकाला कोणतीही अभ्यासात अडचण आली की हा हाजीर असायचा.....तिला मदत करायला.......राधिका प्रेम ह्या गोष्टींन पासुन थोडी अल्लडच होती....पण  स्वप्नील मात्र तिच्या प्रेमात पडत जात होता.....स्वप्नीला राधिकाची प्रत्येक गोष्ट आवडत होती.....तीच हसन तीच बोलणं.....तीच रागावणं..... हे सगळं त्याला आवडु लागलं........अशातच त्याने त्याच्या बेस्ट फ्रेंडच्या मदतीने म्हणजे(बाबु च्या मदतीने)तिला प्रपोज करायचा विचार ठरवला.......बाबु हा राधिकाचा जेवढा खास मित्र होता तेवढाच आता स्वप्नील चा सुद्धा होता......

असच एकदा स्वप्नीचा शाळेत लास्ट दिवस म्हणुन निरोप समारंभ होता.........त्या दिवशी त्याने सेम टायकोट घातलेला........आणि ह्या बाकीच्या लोकांची नेहमी प्रमाणे शाळा होती.........त्याच दिवशी स्वप्नील ने ठरवलं.....की काही झालं तरीही मी आज राधिकाला माझ्या मनातली गोष्ट सांगुणच राहणार........म्हणुन त्याने सगळ्याच मित्राना बाहेर ट्रीट देण्याचा प्लॅन केला......नाहीतरी त्याच शेवटचं वर्ष होत त्या शाळेत..........आणि प्रत्येकाच्या आईवडिलांना स्वप्नील माहीत असल्यामुळे त्याच्या पार्टी ला जायची परवानगी दिली.......

सवनीलचा निरोप समारंभ संपला तसा तो सगळ्याना शाळेच्या बाहेर भेटतो......

सचिन :अरे वा.....खुप भारी दिसतोयस आज तु.........टाय कोट....मस्त

स्वप्नील : थॅंक्यु.......पण तुम्ही सगळे तयार  कसे होऊन आले......?????

माधुरी: तुझा निरोप समारंभ संपायच्या एक तास आधी आमची शाळा संपली म्हणुन आम्ही सगळे घरी जाऊन फ्रेश तयार होऊन आलो........छान ना....

स्वप्नील : हो मस्त...........(स्वप्नील हळुच राधिकाला बघतो......ती पण आज पिवळ्या सलवार कमीज मध्ये छान दिसत होती......तो कलर तिला खुपच उठुन दिसत होता.....)....ठिके मग आपण निघुया.....एक काम करा......आपण सगळे रिक्षाने जाऊया.....सगळे जण मिळुन..........ह्या XXX हॉटेल ला पोहोचा......आपण तिकडेच भेटु.....

सगळे एकमेकांना होकारार्थी मान हलवुन रिक्षा पकडायला निघतात......

(काय मग वाचकांनो कसा वाटला आजचा भाग नक्की  कळवा तुमच्या कंमेंट द्वारे)















🎭 Series Post

View all