अविश्वास त्याचा (पार्ट 19)

अविश्वास त्याचा (पार्ट 19)


इकडे नम्रता आज खूप खुश असते ते तिला जे हवं असतं ते तिने केलेला असत..... पण तिला याची जरासुद्धा भनक नसते कि तीच  पितळ सगळ्यांसमोर ऑलरेडी उघडलेला आहे

स्वप्निल घरी येतो पण तो असं दाखवतो की त्याला काहीच माहित नाही तो घरी आल्यावर फ्रेश व्हायला निघून जातो इकडे नम्रता त्याच्यासाठी चहा टाकते स्वप्निल थोडा फ्रेश होऊन बाहेर हॉल मध्ये येतो आणि टिव्ही लावतो.....

नम्रता  : हा घे तुझा कडक चहा(हसत)

स्वप्नील सुध्दा हसून तो चहा तिच्या हातातून घेतो.....

थोड्याच वेळात स्वप्नील नम्रताला बोलतो तू तुझ्या मैत्रिणीला पैसे दिले का ग

नम्रता : (अडखळत) हो दिले ना आज च दिले मी तुला सकाळीच सांगून गेलेलो ना

स्वप्निल :  मग कधी परत देणार ती काही बोललीका ती  पैशाबद्दल की रिटन कधी देणारे

नम्रता  : अडखळत हो बोलली ना ती .....ती बोलली जसे पैसे तिच्याकडे येतील  तशी हळूहळू देत जाईल

, स्वप्नील :  ठीक आहे काही हरकत नाही... आणि हो उद्या मी जरा बाहेर जाणारे कामानिमित्त त्यामुळे मला डबा वगैरे नाही दिला तरी चालेल मी घरी येऊन जेवेल

नम्रता मानेनेच होकार देत
@@@@@@@@@@@@@@

दुसऱ्या दिवशी स्वप्नील सकाळी सकाळी घराच्या बाहेर पडतो त्याच्या कामानिमित्त आणि तो कमीत कमी  दुपारी 2 ते 3 च्या सुमारास घरी येतो

नम्रता  : झालं तुझं काम खूप थकला असेल ना जा हात पाय  घे मी जेवण वाढते

स्वप्निल  :मिश्किलपणे हसत हो झालं ना खूप इम्पॉर्टंट काम होतं बरं झालं वेळेतच केला नाही तर काय क्लाइंट आपले फसवेगिरी करतच राहतात

नम्रता :  हो ना काही वाटत कसं नाही लोकांना असं फसवायला...... शि बाबा मला तर खूप राग येतो अशा माणसांचा

स्वप्निल :  हो ना मला सुद्धा खूप राग येतो एक विचारू तुला नम्रता तू कधी कुणाला फसवल आहेस म्हणजे कधी तू कुणाच्या चांगुलपणाचा फायदा घेतलास काय म्हणजे तू ज्याप्रकारे बोलते म्हणून सहज विचारले तुला चांगलाच एक्सपिरीयन्स असेल

नम्रता:  घाबरतच मी.... मी कशाला कोणाचा फायदा घेईल मला नाही जमत असं काही ह्या..... गोष्टीत मी कधी  पडतच नाही.... ते सगळं सोड मी तुला जेवायला वाढते ऑल रेडी खूप उशीर झाला तुला भूक लागली असेल ना आणि नाहीतरी मी आज सगळं तुझ्या आवडीचं बनवले

नम्रता स्वप्निल ला जेवायला वाढते आणि त्याच्या बाजुलाच असते तिच्या मनात काही तरी चालेल थोड्याच वेळात ती स्वप्निल ला बोलते

नम्रता :स्वप्निल ह्या येत्या शुक्रवारी काहीतरी आहे तुला आठवतंय का????

स्वप्निल : ( मुद्दामून)
खरं सांगू तुला कामाचा एवढा प्रेशर आहे ना माझ्यावर मला हल्ली काहीच आठवत नाही...... खरंच काही आणायचं जरी म्हटलं ना तरी तेवढ्यापुरता आठवतं घरी येऊस पर्यंतर विसरून जाते.... एक काम कर ना तूच मला आठवून देत जा माझं ना हल्ली खूप विसरण्याचा प्रमाण वाढलेले आहे

नम्रता:( थोडी नाराज होताच )पण तुझं लक्षात असायला पाहीजे माझ्यासाठी किती मोठी गोष्ट आहे

स्वप्निल : आता मी तुला काय बोललो नम्रता माझ्या हल्ली नाही लक्षात राहात तरी मी कॅलेंडर बघून सांगेल ठीक आहे

नम्रता खूप खुश होते स्वप्नील च  जेवण झाल्यानंतर तो त्याच्या बेडरूममध्ये निघून जातो आराम करायला

स्वप्निल जसा बेडवर पडतो त्याला आठवतं येत्या शुक्रवारी नम्रता चा वाढदिवस असतो म्हणून ती त्याला तो आठवून देण्याचा प्रयत्न करत असते पण स्वप्निल मुद्दामून त्याला काहीच माहित नाही असं सोंग आणतो त्याच्या मनात काहीतरी वेगळाच प्लॅन असतो


( असेच काही दिवस निघून जातात जसजसे दिवस निघून जातात नम्रताला तिच्या वाढदिवसाची खूप उत्सुकता लागलेली असते.... तिला मनामध्ये वाटत स्वप्निल ने नक्कीच काहीतरी माझ्या साठी प्लॅन केलेल असेल तो असा कधीच माझा वाढदिवस विसरला नव्हता.... मग यावर्षी तरी कसा विसरेल तो मुद्दामूनच माझ्यासाठी काहीतरी करत असेल म्हणून मला ते दाखवत नसेल हे सगळे.... मनात विचार आणून ती मनामध्ये खूप खुश होत असते अशाच शुक्रवारचा दिवस उजाडतो

रात्रीचे बारा वाजले तरी स्वप्निल नम्रताला हॅपी बर्थडे म्हणून विश केलेलं नसत... नम्रता थोडी नाराज होते पण तिला वाटतं कदाचित तो सकाळी करेल ....पण तसं काही झालं नाही..... तो सकाळी उठून तयार होऊन त्याचा टिफिन घेऊन त्याच्या कामावर निघून जातो..... नम्रता मनामध्येच विचार करते हा असा का वागतो त्याने आजपर्यंत कधी केलं नाही.... याच्या मनात काही दुसरं तर प्लॅन नाहीये ना म्हणजे मला काही सरप्राईज असेल द्यायचं म्हणून तर नाही ....चल जाऊ दे संध्याकाळपर्यंत वाट  बघू तर शकतो ना आपण

संध्याकाळी नम्रता छान तयार होते .....छान लाल रंगाची साडी घालते त्याच्यावरती डायमंड नेकलेस .... हातामध्ये ऑक्‍साईडच्या बांगड्या घालते तिचा आज रूप काही तरी वेगळच खुलून गेलेलं असत.....

( नम्रता स्वप्नील ची वाट बघत हॉलमध्ये बसलेली असते तेवढयात दारावरची बेल वाजते तिला वाटतं स्वप्नील आला आहे म्हणून ती दार उघडायला जाते तर तिकडे एक कुरियर बॉय उभा असतो)

कुरियर बॉय : मॅडम हे तुमचं पार्सल ......

( नम्रता ते पार्सल वरचं नाव बघते त्याच्या वरती तिचं नाव लिहिलेलं असतं बॉक्स तर खूप मोठा आहे म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये माझ्या वाढदिवसाचे सरप्राईज आहे असं मनामध्ये बोलून ती कुरियर बॉयच्या हातातल्या रिसीट वर सही करते आणि बॉक्स घेऊन आत येत..... ती खुश होत बॉक्स कोणते बॉक्सच्या वरच्या बाजूवर एक छानसं वाढदिवसाचे ग्रीटिंग कार्ड असतं असतं..... ते वाचून झाल्यानंतर नम्रता खूप खुश होते म्हणजे याला माझा वाढदिवस लक्षात आहे ग्रीटिंग कार्ड च्या खाली तिला एक चिठ्ठी भेटते त्यात स्वप्निल ने त्याच्या हाताने काहीतरी लिहिलेलं असतं नम्रता ते वाचते

डिअर नम्रता ..... आज तुझा वाढदिवस .....कसा काय मी विसरणार तू खूप स्पेशल आहे ना माझ्यासाठी ....आपण तुझा वाढदिवस खूप छान सेलिब्रेट करू .....पण त्या आधी तु त्या बॉक्सच्या खाली एक एन्वलप आहे ते उघडून बघ ते तुझं खास गिफ्ट आहे तुझ्या या वर्षाच्या वाढदिवसासाठी..... तू खूप खुश राहा आनंदी राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना हॅपी बर्थडे नम्रता

नम्रता  चिठ्ठी वाचून खूप खुश होते ती बॉक्स बाजूला ठेवून त्याच्या मध्ये असलेला एनवलप उघडून बघते

एन्वलप उघडून बघितल्यावर नम्रताला थोडा धक्का बसतो कारण त्या एनवलप मध्ये डिवोर्स ची नोटीस असते.....

नम्रताला काहीच सुचत नसत ती तशीच खाली सोफ्यावर बसते......तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत......हा असा कसा काय माझ्याशी वागू शकतो.....एवढ्या वर्षाचा संसार कसा काय तोडू शकतो......हे अस सरप्राईज दिल त्याने मला.....त्याची हिम्मत कशी काय झाली हे अस सगळं करण्याची.....येऊ दे त्याला मी जाब विचारेल त्याला ह्याच्या बद्दल (रागातच)ती तशीच पेपर हातात घेऊन सोफ्यावर स्वप्निल ची वाट बघत बसते....तिला स्वतालाच समजत नसत की का असा वागला स्वप्नील..... ती मनामध्ये सारखी स्वप्निल ला कोसत होती......

कमीत कमी नऊ ते साडेनऊ च्या सुमारास स्वप्निल घरी येतो त्याच्याकडे घराची चावी ऑलरेडी असते म्हणून  स्वतःहूनच दरवाजा खोलतो...... घरात आल्यावर ती नम्रता पेपर हातात घेऊन बसलेली त्याला दिसते त्या दोघांची नजरानजर होते नम्रता रागाने त्याच्याकडे बघत असते....पण त्याला त्या गोष्टीचा जराही राग येत नाही.....तो तिच्याकडे इग्नोर करून सरळ आत मध्ये निघून जातो.... नम्रताला ह्याच गोष्टीचा जास्त राग येतो ती स्वप्नीलची....हॉलमध्येच वाट बघत बसते

थोड्याच वेळात स्वप्नील फ्रेश होऊन बाहेर येतो तरीसुद्धा तो तिला काहीच विचारत नाही आता तर नम्रताला भरपूर राग येतो हा असा का वागतो याचा तिला प्रश्न पडतो.....

स्वप्निल समोरच पडलेला रिमोट हातात घेतो आणि शांतपणे टीव्ही बघतो

नम्रता  : (रागातच) मला तुझ्याशी बोलायचं आहे

स्वप्नील काहीच उत्तर देत नाही तो मुद्दामून टीव्हीचा आवाज वाढवतो..... स्वप्निल नम्रताला काहीच रिस्पॉन्स देत नाही म्हणून ती अजूनच चिडते

नम्रता  : (थोड्या मोठ्या आवाजात)कदाचित तू नीट ऐकलं नाहीस मी काहीतरी बोलते मला तुझ्याशी बोलायचं आहे आत्ताच्या आत्ता

स्वप्नील परत रिमोटने  टीव्ही चा आवाज अजून मोठा करतो

नम्रता रागातच त्याच्या हातातून रिमोट खेचून घेते आणि जोरात खाली जमिनीवर आदळते

मी काय बोलली तुला ऐकू येत नाही का हे काय आहे मला याच उत्तर हव.....

स्वप्निल : (मुद्दामून )अरे हो मी तुला आज कोणतेतरी पेपर्स पाठवले तु सही केली त्याच्यावरती

नम्रता :(रागातच) सही आणि मी..... मी का करू त्याच्यावरती सही पहिला मला त्याचे उत्तर दे हा डीवोर्स पेपर तू मला का पाठवला..... मी केलं तरी काय ज्याने तु एवढा मोठा निर्णय घेतला

स्वप्निल  : तुझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मी बांधील नाही तुला जेवढं सांगितलं तेवढं कर

नम्रता : (रागातच स्वप्नील ची कॉलर धरते) काही झालं तरी मी ह्या पेपर्स वर सही करणार नाही कारण मला त्याच्या आधी उत्तर हवा आय वॉन्ट आन्सर मी काय केलं ज्याच्यामुळे तू एवढा मोठा निर्णय घेतला आणि हा निर्णय घ्यायच्या आधी तू मला विचारलं सुद्धा नाही

स्वप्निल : आधी माझी कॉलर सोड तुला काही हक्क नाही मी बोललो ना मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला बांधील नाही चुपचाप याच्या वरती सही कर नाहीतर

नम्रता : नाहीतर काय ....नाहीतर काय करणार तु....सगळे डीसीजन स्वतःच घेतो....माझा विचार नाही केलास का हे सगळं करायच्या आधी........(रागातच)....अरे काय केलं मी अस.....ज्याने तु एवढा मोठा निर्णय घेतलास

स्वप्निल : (आता मात्र त्याचा रागाचा  पारा चढतो) मी डिसिजन घेऊन करतो तू पण काही तरी गोष्टी डिसिजन घेऊनच केले आहेत आयुष्यामध्ये हो की नाही

नम्रता:( स्वप्निल ला धक्का देत बोलतो) मी काय केल आतापर्यंत एवढ्या वर्षात तू म्हणत आला तसेच मी वागत गेले तू उठ म्हटलं तर मी उठले मी तू बस म्हटलं तर मी बसले अरे अजून काय करू मी तुझ्यासाठी आणि मी कोणतेही काम चुकीचं नाही केलेला आहे ते फक्त मी माझ्यासाठी केलेला आहे (नम्रता चुकून बोलून जाते)

स्वप्निल : (आश्चर्याने तिला बघतो )काय बोललीस तू तू तुझ्यासाठी काम केलंय कोणतं मला सांगशील...???


नम्रता : ( कन्फ्युज होत  बोलते) ते मी चुकून बोलून गेले पण त्याचा या गोष्टींशी काही संबंध नाही तू मला सांग ह्या पेपर चा काय अर्थ आहे मी कोणत्याही बिना रिजन शिवाय याच्या वरती सही करणार नाही

स्वप्निल :  काही झालं तरी तुला याच्यावरती सही करावी लागणारच हा माझा फायनल डिसिजन आहे बाकी मी काहीही ऐकून घ्यायला तयार नाही

नम्रता : तुला काय वाटलं मी तुला सहजच सोडून देईल अरे तू मला आज पर्यंत ओळखलंच नाही...₹ मला जे वाटेल ते मी करते.... मला कोणाच्या आधाराची गरज नाही ... कळलं.... आत्तापर्यंत तर मी तुझं सगळं ऐकत आले पण ही गोष्ट मात्र मी तुझी बिलकुल नाही ऐकणार तू मला त्याच्याआधी रीजन दे नाहीतर मी मी काय करेल याची तुला कल्पना नाही येणार

स्वप्निल : तू धमकी कोणाला देतेस जरा नीट आठवून बघ तू काय केलं होतं या चार वर्षा आधी......

नम्रता  : मी मी काय केलं होतं मला तर काहीच आठवत नाही

स्वप्निल:  तुला काहीच आठवत नाही ठीक आहे मला सांग तू तुझ्या मैत्रिणीला पैसे पोहोचवून आलीस ना का कोणत्या मित्राला देऊन आलीस....???(रागातच)

नम्रता:  स्वप्नीलचा अशा प्रश्नाने घाबरते तिला दरदरून घाम फुटायला सुरुवात होतो) ते मी मी माझ्या मैत्रिणीला पैसे दिले तुला सांगून गेले होते ना त्यासाठी तिला गरज आहे म्हणून पैशाची

नम्रता : ते मी माझ्या मैत्रीणीला च दिले.....पण तू हा प्रश्न मला सारखा सारखा का विचारतोयस......

स्वप्नील : नम्रता। निदान आता तरी खर बोल....(चिडून)तु आनंदला पैसे द्यायला गेलेली ना.......

नम्रता : आनंदच नाव एकूण नम्रता जागेवरच हादरते.....ते मी.....ते ...अअअ.....


स्वप्नील : काय .....आता काय झालं....आता काही नाहीये का बोलायला तुझ्याकडे....मला सगळं कळालं आहे.....तु काय केलस ते राधिकासोबत......(रागात आवाज चढवत)

नम्रता : हे बघ मी जे केलं ते आपल्या दोघांसाठी केलं...(..त्याच्या जवळ जात बोलते)आणि ती राधिका खरच तुझ्या लायकीची नाहीये.....एक नंबर बदमाश आहे ती....अरे ती खरच तुझ्या प्रेमाच्या लायक नाहीये.... तु बघितलस ना तिने काय केलं ते.....छि ....मला तर अजून ओएन विश्वास होत नाही तिने संदीप बरोबर.....(नम्रता पुढे काही बोलणार तेच स्वप्नील जोरात तिच्या काणाखाली लावून देतो.....)

स्वप्नील : बस.....एकदम चूप व्हायचं आता.....आता एक शब्द पण नाही बोलायच्या राधिका बद्दल.(त्याचे डोळे लालबुंद झालेले असतात....स्वप्नील रागातच नम्रता चे हात धरतो) एक स्त्री असून तु दुसऱ्या स्त्री बरोबर येवढ नीच वागशील ह्याचा स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला मी.....काय बिघडवलेलं तिने तुझं.....बोलना .....काय बिघडवलेलं......(ओरडतच)अग किती प्रेम होतं आमच्या दोघांचं एकमेकांवर.... आणि तु ...तु त्या प्रेमाचा चुकीचा फायदा घेतलास......लाज नाही वाटली का तुला अस करताना.......(स्वप्नील बोलतच बाजूच्या टेबलवर असलेली काचेची फुलदाणी फोडतो.....त्याच्या आवाजाने नम्रता तिच्या कानावर हात ठेवते....)माझं पाहिलं प्रेम होत ते.....त्यात तु हे अस घाणेरडं वागलीस...... मला तर अजुन पण विश्वास होत नाहीये की हे तु काम केलस......

नम्रता : हे बघ मी जे केलं ते आपल्या दोघांसाठी केलं माझा याच्यामध्ये काहीच वाईट हेतू नव्हता

स्वप्निल : मला हात लावायचा नाही लांबून बोलायचं जे बोलायचं ते ....आणि काय बोललीस तू तुझा याच्यात काहीच वाईट हेतू नव्हता .....तू जे केलस त्याच्यापेक्षा अजून काही वाईट होतं का..... तुला लाज नाही वाटली हे सगळं करताना ...एक स्त्री दुसर्‍या स्त्रीचे आयुष्य उध्वस्त करते.... याच्यापेक्षा मोठे पाप काय आहे.... मला तर लाज वाटते आता स्वतःची..... तिने मला किती सांगायचा प्रयत्न केला तिच्यावर  मी जरा सुद्धा विश्वास केला नाही आणि जिने हे सगळं कारस्थान रचलं तिच्यावर क्षणाचाही विचार न करता विश्वास ठेवला का केलंस तू असं बोल ना का केलस तू असं( स्वप्नील रडतच डोक्याला हात लावून बसतो)

नम्रता  : माझं प्रेम होतं तुझ्यावर मी नव्हती पाहू शकत तुला आणि राधिकाला एकत्र ....म्हणून मी हे सगळं केलं ....मी खूप प्रेम करते तुझ्यावर त्या राधिका पेक्षा सुद्धा जास्त तुझ्या आयुष्यामध्ये माझ्या व्यतिरिक्त मी दुसरं कोणालाच पाहू शकत नव्हते ...म्हणून मला हे सगळं करावं लागलं पण ऐक ना माझा याच्यात काही चुकीचा हेतू नव्हता पण ती सरळ मार्गाने पण  निघून जात नव्हती आणि त्यात तू सुद्धा मला साथ देत नव्हता मी किती तुला सांगायचा प्रयत्न केला की माझं प्रेम खरं आहे पण तू सुद्धा मला एक मैत्रीण म्हणून पसंत करेल असं बोललास म्हणून मला हे सगळं करावं लागलं
स्वप्निल : नम्रता तुला जरासुद्धा भान आहे की तू जे काही बोलते ते एकदम बरोबर आहे म्हणून .....तुला समजते मी तुझ्यामुळे माझ्या मुलांपासून सुद्धा दूर राहिलो( मुलाचं नाव काढताच नम्रता त्याच्याकडे आश्चर्याने बघते) हो माझा मुलगा स्वराज ज्या वेळेस हे सगळं घडलं त्याच्यानंतर राधिका माझ्या मुलाची आई होणार होती... तिच्यावर ती मी विश्वास ठेवला नाही म्हणून तिने मला हे सांगितलं नाही आणि कसं सांगितलं असतं तूच सांग ना.... राधिकाच्या मनात एकच भीती होती जसं मी तिच्याबरोबर वागलो तसंच तिच्या  मुलावर ती सुद्धा मी संशय घेऊ शकलो असतो..... त्यात तिची काही चूक नाही तिने जे केलं ते योग्यच केलं आणि ह्या गोष्टीसाठी सुद्धा तूच जबाबदार आहे .....आज तुझ्यामुळेच मी माझ्या मुला पासून लांब राहिलो आणि मी तसं बोलूनही दाखवलं राधिकाला की हे मूल माझं नाही तरी एका शब्दाने ती मला काही बोलली नाही .... आणि कशी बोलेल  जी ऑल रेडी माझ्या वागण्याने तुटून गेलेली..... शी मला आता माझीच लाज वाटते आहे का म्हणून मी तुझ्या वरती विश्वास ठेवला आता जे झालं ते झालं जे पेपर दिले त्याच्यावरती चुपचाप सही कर मला तुझ्याबरोबर नाही राहायचं

नम्रता  : मी सही करणार नाही मी तुला एवढं इझी ली सोडणार नाही माझं प्रेम आहे तुझ्यावर ती आणि कोणत्या पुराव्यावर तू मला सोडणार मी पण बघते

स्वप्निल :रागातच तुला पुरावा हवाय थांब पुरावा सुद्धा देतो( नील खिशातून मोबाईल काढला आणि आनंद आणि नम्रता च जे काही संभाषण झालेलं होतं त्याचा व्हिडिओ तिला दाखवतो तो व्हिडिओ बघून नम्रताला अजूनच भीती वाटते)

( काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कमेंट द्वारे नम्रता करेल का पेपर वर सही का अजून काही दुसरा खेळेल नक्की पहा पुढच्या भागात)














🎭 Series Post

View all