अविश्वास त्याचा (पार्ट18 )

अविश्वास त्याचा ,(पार्ट18)


इकडे मीनाताई स्वराज आणि राधिका घरी येतात मीनाताई मुद्दामून बेडरूम मध्ये जातात आणि थकले आहे ह्याच नाटक करतात राधिका त्यांच्यासाठी चहा बनवायला जाते स्वराज हॉलमध्ये खेळत असतो......

(सगळे मित्र राधिकाची घरासमोर उभे असतात..... स्वप्नील  राधिका च घर न्याहाळत असतो त्याचे हात खूप थरथरत असतात काय म्हणून तो तिचा सामना करेल आणि काय म्हणून तो तिची माफी मागेल त्याच त्याला सुचत नसतं पण काही केलं तरी त्याला आज तिची माफी मागायची होती हे त्याने मनातून पक्क केलं होतं)

बाबू : काय झालं स्वप्नील जाऊया ना आत....????

स्वप्नील : बाबू हिम्मत होत नाहीये तिच्या सामना करायची ......कशी होईल सांग ना तु ते दुःख मी तिला  दिले ...सगळव तिने एकटीने सहन केलं मी तर तिला काहीच मदत केली नाही यात आणि काय मदत करणार दुःख मी तिला दिलय...

माधुरी :  हे बघ बाबु आता ती वेळ निघून गेली आहे त्याचा विचार करून तु स्वतःला कोसू नको.... अरे परिस्थितीच तशी होती तुझ्या जागी कदाचित दुसरा कोणी असता तर त्याने हे असंच रिऍक्ट केलं असतं .....त्यामुळे तो सगळा विचार सोडून दे ... चल तू आता  लवकर घाबरू नकोस आम्ही सगळे आहोत तुझ्याबरोबर....

रिंकि बाबुचा हात पकडत  त्याला घेऊन जाते ....

(इकडे राधिका चहा टाकत असत तेवढ्यात दारावरची बेल वाजते राधिका दार उघडायला येते दार उघडताच तिला त्याचे सगळे मित्र दिसतात आणि ती सरप्राईज होते)

राधिका :  अरे हे काय तुम्ही सगळेजण इकडे किती छान सरप्राईज दिलं मला यांना ती सगळ्यांना हसून ग्रिट करते(आणि ती मागे वळते....)

सगळे घरात येतात.......तेवढ्यात स्वप्नील राधिकाला आवाज देतो......


स्वप्नील :  राधिका

(राधिका जागीच थांबते.....हा आवाज तिला अनोळखी नव्हता........तिच्या डोळ्यासमोरून सगळ्या जुन्या गोष्टी पळत जातात...तिला परत एकदा आवाज येतो.......मिनाताई सुद्धा बाहेर येतात......त्या तोंडाला पदर लावून उभ्या असतात.)

राधिका मागे वळून बघते तर स्वप्नील तिला तिच्या समोरच उभा दिसतो ... थोडावेळ कोणीच कोणाशी बोलत नसतं सगळे मित्र एकत्र उभे असतात पण कुणाला कुठून सुरुवात करावी काहीच कळत नसतं

राधिका एक नजर तिच्या मित्रान वरती टाकते तेवढ्यात माधुरी पुढे येऊन राधिकाला बोलते....

माधुरी हे बघ राधिका आम्हाला जे काय बोलायचं ते तु नीट एकूण घे ..... मला माहिती  आहे तुझ्या मनात असंख्य प्रश्न असतीळ की की हे सगळे जण ईकडे कसे काय त्यात स्वप्निल पण इथे कसा काय.... आम्ही सगळे तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो पण त्यासाठी तु तुझं मन घट्ट कर.....

राधिका प्रश्नार्थक नजरेने माधुरी कडे बघतो तेवढ्यात मीनाताई बाहेर येतात राधिका जवळ उभे राहतात

मीनाताई  : हे बघ बेटा मला आधीच माहीत होतं हे सगळेजण इकडे येणार आहे पण मला ते तुला सांगायची हिम्मत होत नव्हती आता फक्त तु यांच एकदा  ऐकून घे मग तू तुझा डिसिजन घे तुला काय करायचे ते

राधिका भरल्या डोळ्यांनी तिच्या आई कडे बघते...

स्वराज पळतच राधिक्का कडे येतो....

स्वराज : मम्मा हे तेच वाले अंकल आहेत जे आम्हाला दुसऱ्या आज्जी कडे जाताना दिसले होते मी पडलो होतो ना तेव्हा यांनी मला जवळ घेऊन मला कुठे लागलं ते बघत होते

राधीला : आई तु स्वराज ला घेऊन आत जा.....( स्वप्नील कडे बघतच बोलते)

तश्या मीनाताई त्याला आत घेऊन जायला निघतात...

राधिका : बोल आता .....आता काय बोलायचं य तुला .......(रागात)

स्वप्निल थोडा राधिकाच्या जवळ येतच बोलतो ......

हे बघ राधिका मला सगळं खरं खरं कळलय ...... ते सुद्धा आजच ....नम्रता च खरं रूप माझ्यासमोर आजच आलय आणि ह्या सगळ्यात मला ह्या आपल्या मित्रांनीच मदत केली..... मला माहिती नाही मी कुठून सुरुवात करू कशी तुझी माफी मागु मला काहीच सुचत नाहीये....…हे बघ मी जे केलं ते सगळं मग करण्यासारख सुद्धा नाहीये......हे सगळं नम्रताने घडवून आणलेलं...

तृप्ती :  हे बघ राधिका हा माझा मोबाईल याच्यामध्ये मी नम्रता जे काही बोलली आहे ते सगळं रेकॉर्ड करून ठेवलेला आहे तु प्लीज एकदा शांतपणे एका जागी बस आणि बघ....(तृप्ती तिचा मोबाईल राधिकाची हातात देत बोलते)

राधिका शांत पणे तो व्हिडीओ बसुन बघते..... नम्रता असं काही करेल ह्याचा विचार राधिका ने  सुद्धा केला नव्हता कारण सर्वात आधी तिनेच तिला माफ केलं होतं आणि तीच तिला सगळ्या  मित्रांमध्ये घेऊन अली होती

तिला स्वतःला विश्वास बसत नव्हता.....(स्वप्नील तिच्या जवळ जात )

स्वप्निल :  राधिका आता तूच सांग यात माझी काय चूक मला माहितीये माझी चूक आहे याच्यात.... जो मी तुझ्यावरती विश्वास नाही केला पण नम्रताने  एवढं काही कारस्थान करून ठेवलं होतं की माझं डोकं काम करत नव्हतं तूच सांग काय करू मी आता खुप प्रेम करतो ग मी तुला आणि आजही करतो

राधिका भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती....

राधिका : पण आता त्याचा काय उपयोग ह्या गोष्टीला कितीतरी वर्षं होऊन निघून गेली.... तू तर आता नम्रता बरोबर लग्न सुद्धा केलं मग तीच काय .....????

स्वप्निल :  तो आमचा फक्त एक कॉन्ट्रॅक्ट होता आम्ही दोघे जरी नवरा-बायको असलो तरी नवरा बायको सारखे नाही राहत ग ....कारण अजूनही तु  माझ्या मनात  होतीस मी तुझी जागा कशी काय दुसऱ्याला देऊ .....मी तुझ्यावरती रागावलो होतो तुझ्यावरती अविश्वास दाखवला मान्य आहे मला ह्या सगळ्या गोष्टी...... पण नम्रता ही  आजही माझी  बायको कमी मैत्रीण जास्त आहे मी तिला कधीच बायकोचा दर्जा दिला नाही।.....

राधिका :(  रडतच)तू आता माझ्याबरोबर माफी मागतो.... त्यावेळेस मी तुला जीव तोडून तोडून सांगत होती अरे मीच काय संदीप सुद्धा सांगत होता तरी तु आमच्यावर विश्वास नाही केला मग हे सगळं आत्ता का एवढे सगळे वर्षे निघून गेल्यानंतर .....आता त्या गोष्टीचा पश्चाताप होतोय ....मी नाही माफ करू शकत तुला

तृप्ती : राधिका अग त्याच्या जागी दुसरं कोणी।असत तरी त्याला सुद्धा असच काहीतरी वाटलं असत......हे सगळं नम्रताने घडवून आणलेलं.......मला त्या वेळेसच तिच्यावर संशय आलेला.......पण बघ ना माझ्या पण हातात नव्हतं हे सगळं.....तिने ज्या प्रकारे हे सगळं घडवून आणल.....त्यावर स्वप्निल तसाच रिऍक्ट होणार ना....

संदिप : ह्यात स्वप्नील पेक्षा जास्त चुकी नम्रताची होती ना. .....अग तिने तुमच्या दोघांना लांब करण्यासाठी हे सगळं कारस्थान रचलं तुला सांगतो राधिका स्वप्निल च्या जागी दुसरा कोणताही मुलगा असताना त्यांनी सुद्धा असंच रिअक्शन दिला असता मग आपण एकालाच काय दोष देतोय तो तर आपल्याला सगळं खरं कळाला आहे मग आपण नम्रताला  सुद्धा तिची शिक्षा देणारच आहोत

स्वप्निल :  हे बघ राधिका मला लास्ट चान्स दे मी सगळं व्यवस्थित करेल मी आतापर्यंत खूप चुकलो त्याची शिक्षा तु मी आणि आपला मुलगा स्वराज सुद्धा भोगत आहे

( घराचं नाव काढताच राधिका स्वप्निल ला चकमकून बघते

स्वप्निल : हो मला सगळं खरं कळलं आहे स्वराज हा आपलाच मुलगा आहे एवढ्या दिवस मी त्याला वडिलांचे प्रेम नाही देऊ शकलो पण आता मला त्याला त्याचं हक्काचं प्रेम द्यायचं आहे आहे प्लीज मला त्याच्यापासून दूर नको करू मला त्याला भेटू दे मला त्याला घट्ट कवटाळून मिठी मारायचे आहे प्लिज एकदा मला त्याला भेटू दे  ......

( मीनाताई किचन मधूनच या सगळ्यांचा संभाषण ऐकत असतात तेवढ्या त्या बोलतात)

मीनाताई : राधिका जे झालं ते झालं मी समजू शकते.... एवढ्या वर्ष आपण कसे जगलो ते पण यात फक्त स्वप्नील ची चुकी नाहीये ....तू एकालाच गृहीत धरून नाही चालू शकत.... तू दुसरी बाजू पण बघ नम्रता ने तुमच्या दोघांच्या खिलाफ वापरली आहे .....अगं याला सगळं कारणीभूत ती एकटी मुलगी आहे....कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की असं काहीतरी ती करेल पण बघ ना देवाने तीच सगळं पितळ उघड केलं आता तरी तू याला माफ कर आतापर्यंत आपण सगळेजण एकच बाजू बघत होतो दुसरी बाजू देवानेच आपल्या समोर आणली आहे.....हे बघ आता त्याला सुद्धा त्या गोष्टीचा पश्चाताप होतोय....त्यासाठी त्याने माफी पण मागितली....अजून काय केलं पाहिजे त्याने....

राधिका   : मग आता पुढे काय....नम्रताच काय.......????मी आता परेनंतर माझ्या मुलासाठी सगळं सहन केल....पण ह्या पुढे कस होणार आई....काही केलं तरी नम्रता आता ह्याची बायको आहे....

स्वप्नील : हे बघ राधिका ती जरी माझी बायको।असली तरी आमचा कॉन्ट्रॅक्ट झालेला....आणि तीच पुढे काय करायचं ते मी बघून घेईल....

राधिका : ते कसं शक्य आहे.......(रडतच)

स्वप्नील : ते तु सगळं माझ्यावर सोड.....एकदा लास्ट टाइम माझ्यावर विश्वास ठेवून बघ..........प्लिज(हात जोडताच बोलतो.....तशी राधिका पाठी फिरते......आणि थोड्यावेळ शांत होते...)

राधिका : स्वराज.......स्वराज....बाहेर ये......

स्वराज धावतच येऊन राधिकाला बिलगतो.....

स्वराज : मम्मा... तु रडलीस....???

राधिका : नाही रे माझ्या बाळा....मी काशाला रडेल....ते ना माझ्या डोळ्यात कचरा गेला होता....म्हणून माझे डोळे असे दिसतात.....तुला एक गंमत सांगू.....तु माझं ऐकशील सगळं.....????

स्वराज मानेनेच होकार देतो.....

राधिका : हे बघ स्वराज मी तुला नेहमी तुझ्या वाढदिवसाला बोलायची तुझे बाबा तुझ्यासाठी मोठं गिफ्ट घेऊन येणार अंतिम हे मी बिझी असाल तर हो ना ....आज मम्मा ने तुझ्यासाठी एक खास गिफ्ट आणलंय.....

स्वराज : वाव....गिफ्ट.....माझ्या साठी (आनंदात बोलतो)

राधिका मागे वळून स्वप्नीला बघते...... आणि त्याला डोळ्यानेच इशारा करून स्वतःजवळ बोलावते.....स्वप्नील भरल्या डोळ्यांनी तिच्या जवळ जातो.....

राधिका : स्वराज  हे बघ कोण आले.....

स्वराज : हे तर त्या दिवशीचे अंकल आहेत.......(बोबडे बोल बोलत)

राधिका : हो ना .....स्वराज हे तुझे पपा  आहेत..........(राधिका अस बोल्यानंतर सगळे तिच्याकडे आनंदाने बघतात)

स्वप्नील च्या डोळ्यातलं पाणी सुद्धा थांबत नसत.....स्वराज जोरात त्याला आवाज देतो

स्वराज : पप्पा.....(आनंदाने )

स्वप्नील त्याला दोन्ही हात पुढे करून माझ्याकडे ये म्हणून रडतच इशारा करतो......तसा स्वराज पळतच त्याला बिलगतो.....त्या दोघा बाप लेकाला अस एकमेकांच्या कुशीत बघून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येत......

स्वराज : तुम्ही माझे पप्पा आहे....(बोबडे बोल बोलतच)

स्वप्नील त्याच्या डोळ्यात बघत परत त्याला।त्याच्या छातीशी कवटाळून घेतो......

स्वराज :- ये ये ये ये ....मी माझ्या सगळी फ्रेंड्स ला सांगणार तुम्ही माझे पप्पा आहे......तुम्ही बाहेर गावावरून आलात....येयेये...

स्वप्नीला काय बोलू नि काय नाय काहीच काळात नाही.......

त्या दोघांचे प्रेम बघून तिकडे उपस्थित असलेले सगळेच भाऊक होतात

स्वप्निल राधिकाला नजरेनेच थँक्यू बोलतो

स्वप्निल राधिका मला तुझ्याबरोबर बोलायचं आहे स्वराज तु आत मध्ये जाऊन  थोडं खेळ मी परत तुला भेटतो

स्वराज आनंदाने त्याच्या बेडरूममध्ये जातो
राधिका :  स्वप्निल आता पुढे कसं करायचं कारण नम्रता सुद्धा तुझी जिम्मेदारी आहे तिला काय तु उत्तर देणार


तृप्ती  : तिला काय बोलायचं ....आपल्याकडे तिच्याबद्दल प्रूफ आहे...... आता जे काही करायचं ते  स्वप्नील बघून घेईल

स्वप्नील : राधिका जवळ जातच बोलतो : काळजी नको करूस याच्या आधी मी तुला खूप दुःख दिले आणि याच्यापुढे तुला मी काहीच दुःख देणार नाही आता जे काही करायचं आहे ते मी बघून घेईल नम्रता ने जे केलं त्याची शिक्षा तर तिला मिळणारच आहे....... तू फक्त मला थोडे दिवस दे मी बघतो काय करायचं ते कारण मी माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या वर्षात जे काही गमावला आहे ते मला याच्यापुढे नाही गमवायचं माझा स्वराज आज मला तू दिलास आता मी त्याच्या शिवाय एक मिनिट सुद्धा नाही राहू शकत पण नम्रता साठी मला थोडा दिवस दे......( स्वप्निल मागे वळून सगळ्या मित्रांना बोलतो)

स्वप्निल  : आज तुमच्या सगळ्यामुळे मला माझी राधिका आणि माझा मुलगा भेटला ....तुमचे उपकार कसे मानू तेच कळत नाही ..मी माझ्या आयुष्यामध्ये एवढी मोठी चूक केली त्याची शिक्षा तर मी भोगली माझ्या मुलापासून लांब राहून...... पण याच्यापुढे मी असं होऊन देणार नाही..... नम्रताला तिची शिक्षा देऊनच मी शांत  राहणार .....संदीप निशा वहिनी मला माफ करा मी खूप मोठा आरोप केला  तुझ्यावर  जी गोष्ट घडलीच नाही त्याच्यावर विश्वास ठेवून तुमच्या लोकांना वरती अविश्वास दाखवला पण यापुढे माझ्याकडून काही चूक होणार नाही मी हात जोडून माफी मागतो आय एम सॉरी

निशा  : भाऊजी तुम्हाला तुमची चूक कळाली हीच खूप मोठी गोष्ट आहे आता जे काही करायचं ते सावधपणे करा कारण मला नाही वाटत जी मुलगी एवढं कारस्थान करू शकते ती सहजच तुम्हाला सोडेल

स्वप्निल:  काळजी नका करू वहिनी आता आपल्याकडे तिच्याबाबत पुरावे सुद्धा आहे त्यामुळे मी काहीच करू शकत नाही तिने तिचा खेळ खेळायला आता इथून पुढे माझे खेळ सुरू

स्वप्निल  : राधीकाकडे बघतो आता मी निघतो खूप वेळ झाला आहे हे पुढे जाऊन मला माझी सुद्धा तयारी करायची आहे काळजी घे लवकरच मी तुला आणि स्वराज ला आपलं नाव देणार आहे चला मग आपण सगळे निघूया.... आई निघू आता मी

( सगळे मित्र मीनाताई आनंदाने स्वप्नील ला निरोप देतात..... काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कमेंट द्वारे)







🎭 Series Post

View all