अविश्वास त्याचा (पार्ट 16)

अविश्वास त्याचा (पार्ट 16)

इकडे  मिनाताई सांगितल्याप्रमाणे डोक्याला बाम लावून बसलेले असतात राधिका त्यांना असं बघून त्यांच्याजवळ जाते

राधिका  : काय झालं आई तुला बरं वाटत नाही आहे का(काळजीने विचारते)

मीनाताई :  आज जरा तब्येत वर खालीच आहे आता हे उतरत वय आहे त्याच्यामुळे ते दुखणे तर सहाजिकच आहे जाऊदे तु जा  तुझ्या कामावर तुला उशीर होईल ना

राधिका  : नको आई सर्वात आधी आपण डॉक्टरांकडे जाऊया डॉक्टर तुला चेक करतील मग काय ते आपण ठरवू या जास्त अंगावर काढू नकोस उगाच पुढेमागे काही झालं तर

मीनाताई : अग मला काय होणार आहे थोडंसं चालले ना तर बरं वाटेल ते एकाच जागी बसून बसून पायाला जरा गोळे आलेत..... विचार करते स्वराज ला घेऊन जरा फेरफटका मारायला जाऊया पण ते पण नाही करू शकत  तू जाशील कामाला आणि मी जर याला घेऊन गेली तर याच्या मागे कोण धावपळ करणार आणि  मधेच जर मला चक्कर आली तर मला कोण सांभाळणार...

राधिका  : अगं असं काय बोलतेस जे तोंडाला येईल ते बोलून जातेस तुला काय होणार आहे..... मी एक काम करते आज मी नाही जात शॉप मध्ये नाही तरी जास्त काही ऑर्डर नाही येत माझं स्टाफ सांभाळून घेईल तुला बाहेर जायचे ना चल मी तुला घेऊन जाते

मीनाताई मनातूनच खूष होतात त्यांना जे हवं होतं तेच झालं त्या थोड्यावेळातच तयार होऊन बाहेर जाऊया असं राधिकाला सांगतात

@@@@@@@@@@@@@@@@@@


स्वप्निल ठरल्याप्रमाणे वेळेवर हँगिंग गार्डन मध्ये पोहोचतो त्याला बाबू तिकडे कुठेच दिसत नाही म्हणून तो त्याला फोन करतो स्वप्निल त्याला फोन करणार तेवढ्यात मागून बाबू त्याला आवाज देतो .....

बाबू :  स्वप्निल....(स्वप्निल मागे वळून बघतो..... आज कित्येक वर्षानंतर ते दोघे एकमेकांच्या समोर असतात काय माहीत काय झालं पण स्वप्निल पळत जाऊन बाबुला मिठी मारतो बाबुला सुद्धा खूप भरून येत)

स्वप्निल :  कसा आहेस तू।  ......????

बाबू : मी बरा आहे.......(हसत)

( थोड्या वेळ का होईना पण स्वप्निल मात्र सगळे जुन्या गोष्टी विसरून त्याला मिठी मारतो त्यांची मैत्री अशी होती किती एकमेकांपासून लांब राहू नव्हते शकत आज खूप वर्षानंतर त्याला त्याचा जिवलग मित्र दिसला म्हणून त्याला थांबवलं नाही थोड्याच वेळात स्वप्नील या सगळ्या गोष्टी आठवल्या आणि तो थोडा लांब झाला..... स्वप्निलच्या अशा वागण्याने बाबू थोडा अपसेट होतो पण तो तसाच चेहऱ्यावर दाखवत नाही)

बाबु : ये बसूया इकडे .....

( दोघी गार्डनच्या चेहऱ्यावर बसतात थोड्यावेळ कोणाच एकमेकांशी बोलत नसतो मग स्वतःहून स्वप्निल बोलायला सुरुवात करतो)

स्वप्नील : बोल काय काम होतं तुझं आज एवढ्या वर्षानंतर माझी आठवण जी  आली तुला(थोडं रागातच)

बाबू : शांतपणे अरे रागावतोस कशाला बोलेल मी मला जे बोलायचे ते....आधी हे सांग तु कसा आहेस....आणि इकडे अचानक....तु तर पुण्याला हातास ना......

स्वप्नील : मी बरा आहे पुण्यावरून मला परत ट्रान्सफर मिळाली म्हणून मी इकडे मुंबईला आलो बाकी तू कसा आहेस ......????

बाबू  : मी पण मस्त.... छान दोन जुळे मुले आहेत मला माझ्या वरती लक्ष देण्यासाठी माझी माधुरी आहे माझ्याजवळ आई-बाबा सगळे एकत्र खुप छान चाललंय आमचं....

स्वप्नील :  (चकित होऊन) तू माधुरी बरोबर लग्न केलस....????

बाबू हो आमचं लव्ह मॅरेज आहे..... आणि ओळखीचे असल्यामुळे घरच्यांनी सुद्धा विरोध नाही केला ते म्हणतात ना चट मंगनी पट ब्याह तसाच तो प्रकार घडला आमच्याबरोबर...(हसत)

स्वप्नील : छान ........आवडलं एकूण.......असाच खुश रहा.....मग आता सांगशील तु मला इकडे का बोलावलं......???

तेवढ्यात मागून संदीप आवाज देतो ....

संदीप : मी सांगतो ......(संदीपच्या आवाजाने दोघे मागे वळुन बघतात.....(संदीप  त्याच्या बायको (निशा )बरोबर  असतो)

संदीप ला बघून स्वप्नील थोडा हळवा होतो पण त्याला लगेच जुन्या गोष्टी आठवल्या वरती त्याच्या वरती राग येतो आणि तो बाबू वरती  ओरडतो

स्वप्निल  : आमच्या दोघांना एकत्र करण्यासाठी इथे बोलावलं (रागाने बोलतो)

बाबू :  बिलकुल नाही मी तुमच्या दोघांमध्ये बिलकुल नाही पडणार तुला आज काहीतरी खरं सांगायचं ते पण पुराव्यासकट


स्वप्नील: ( रागाने) आता काय बाकी राहिले .....जे व्हायचं होतं ते तर झालं ....माझं पूर्ण आयुष्य उध्वस्त झालं आता त्याचं हसू करणार का तुम्ही लोक इकडे

निशा : नाही भाऊजी तुम्ही जे समजत आहे ते पूर्णपणे चुकीचा आहे ही गोष्ट घडलेच नाही त्याच्यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास केला आणि जी गोष्ट आता तुमच्या समोर आहे त्याच्यावर तुमचा जर पण भरोसा नाहीये

स्वप्निल तसाच निशा कडे वळून बघतो त्याला माहीत नसतं ही कोण आहे ते

निशा : स्वप्नील भाऊजी माझं नाव निशा .....मी संदीप ची बायको आणि तुमच्या मध्ये जे काही मिस अंडस्टँडिंग झालेला आहे त्याबद्दल संदीप ने मला लग्ना आधीच सांगितलं होतं मला ....संदीपवर पूर्ण भरोसा आहे त्याने ती चूक केलीच नाही त्याची त्याला आतापर्यंत शिक्षा मिळत आली आहे.... त्या बद्दलच आम्हाला तुमच्या बरोबर बोलायचं होतं

स्वप्निल:  निशा तु त्याची बायको असून सुद्धा त्याच्यावर ती  विश्वास केला ....अग मी तर डोळ्यांनी पाहिले सगळं त्यावेळेस तू जर तिकडे असती तर तु या व्यक्तीवर ती बिलकुल विश्वास ठेवला नसता...

निशा  : म्हणजे डोळ्याला दिसतं तेच सत्य असतं असं कुठे लिहिलेला आहे .....ते घडवून सुद्धा आणू शकत ना माणूस

स्वप्निल ....म्हणजे......????

संदीप : हे बघ स्वप्नील मी आजही तेच बोलतोय की आमच्या दोघांमध्ये असं काहीच घडलं नाही ....ते फक्त तुला दाखवण्यासाठी तुझ्यात आणि राधिका मध्ये फुट आणण्यासाठी त्या गोष्टी घडवून आणल्या गेल्या होत्या..... आमच्या दोघांमध्ये खरंच काही घडलं नव्हतं ....मी निशा ची शपथ घेऊन सांगतो आणि आज आम्हाला ते सगळ आम्हाला तुला नम्रताच्या   तोंडातून आत ऐकवायचं आहे म्हणून आम्ही तुला आज कडे बोलवलं

स्वप्निल  : परत तीच गोष्ट ....तुला काय वाटतं आता मी नम्रता वरती अविश्वास दाखवणार ते पण तुझ्या सांगण्यावरून ....अरे आज तिच्यामुळेच तर मी स्वतःला सावरू शकलो ....कधी कधी वाटतं मीच तिचा अपराधी आहे.... आज पर्यंत तिने  माझ्याकडून कोणत्याच गोष्टीची अपेक्षा केली नाही....


तृप्ती  : जे दिसतं तेच सत्य असतं असं नाहीये स्वप्नील कधीकधी पडद्याच्या मागे एक आणि पडद्याच्या समोर एक अशा गोष्टी घडत राहतात(मागून तृप्ती , रिंकि , उज्वला, माधुरी येतात)

स्वप्निल  : तुम्ही सगळेजण एकत्र म्हणजे हा सगळा तुमचा प्लॅन असेल मला परत ह्या गोष्टीमध्ये अडकवण्याचा ....हे बघा मी आधीच खूप मुव्हॉन केलेला आहे.... मी खूप पुढे गेलेला आहे मला परत परत तीच गोष्ट नको आहे .....ते आठवून आजही मला त्रास होतो प्लीज हात जोडून विनंती करतो आता परत नको तीच गोष्ट.... किती स्वप्न रंगवली होती राधिका बरोबर पण तिने काय केलं फक्त विश्वास घात केला माझा..... माझ्या विश्वासावर पाणी फसरवल....

बाबू  : (त्याच्या जवळ जातो त्याच्या खांद्यावर हात ठेवतो)
हे बघ मित्रा आम्ही आजही तुझे मित्र आहोत आणि यापुढेही तुझे मित्र राहणार..... तुला काय वाटतं तू आमच्या पासून लांब गेला तर आम्ही तुला विसरलो का .....बिलकुल नाही रे प्रत्येक दिवस प्रत्येक मिनिटाला तुझी आठवण यायची पण काय करणार नम्रता ने आपल्यापुढे सिच्युएशन अशी मांडून ठेवली होती की काहीच कळलं नाही

स्वप्निल :  हे बघ मी आतापर्यंत सगळं ऐकून घेतलं पण प्लीज नम्रता च नाव याच्यामध्ये काढू नकोस तिची यामध्ये काही चूक नाही .....तिला परत परत बोलू नकोस ती माझी बायको आहे आणि मी तिच्या बद्दल एकही शब्द खपवून घेणार नाही

संदीप  : ठीक आहे नाही बोलत आम्ही तिच्याबद्दल ...जरा मागे वळून त्यामागच्या  गेट कडे बघ....

स्वप्नीला  ला मागे नम्रता दुसऱ्या गेट मधून येताना दिसते....तिच्या हातात बॅग असते....

स्वप्नील : ही इकडे काय करते...???

तृप्ती : तुला लवकरच कळेल....ही इकडे काय करते ते.....

स्वप्नील : म्हणजे ....????

उज्वला स्वप्निल तू एक काम कर तू आमच्या मागे मागे चल तुला थोड्याच वेळात सगळ्या गोष्टी क्लिअर होईल

स्वप्निल  : (थोडा कन्फ्युज होत) अरे हे सगळं चाललंय काय तुम्ही मला जरा स्पष्ट सांगाल का माझं तर आता डोकं सुद्धा काम करत नाही.... तुम्ही सगळे इकडे ती नम्रता पण इथे आहे हे सगळं काय काय आहे जरा स्पष्ट सांगा ना....???

रिंकी:  हे बघ स्वप्नील आता उज्वला तुला काय बोललो तेच तू करू तू आमच्याबरोबर चल प्लीज एकदा आमच्यावरती लास्ट विश्वास ठेवून बघ तू लवकर चल वेळ वाया घालू जाऊ देऊ नकोस......(रिंकि स्वप्नीलचा हात धरत त्याला न्हेते...... आणि सगळे मित्र बाबुच्या मागे जातात......)

ते सगळे मित्र अशा ठिकाणी लपलेले असतात ज्याने...त्यांना नम्रता दिसणार नाही....

नम्रता सांगितलेल्या वेळेत पोहोचते आनंद आधी तिकडे पोहोचलेला असतो नम्रता त्याची वाट बघत असते.... तिला याची कोणतीच कल्पना नसते की कोणीतरी तिच्यावरती पाळख ठेवून उभं आहे

तेवढ्यात आनंद तिच्या समोर येतो......

नम्रता रागाने त्याच्याकडे बघते......

आनंद :  थोडा हसतच काय मॅडम कशा आहात खूप वर्षांनी भेटलो आपण

नम्रता :(चिडचिड करत )हो बरोबर बोललास तू खूपच वर्षांनी भेटलो आपण पण मीही आशा नव्हती केली की तू मला असा प्रकारे बोलवशील इकडे ....

आनंद : आहो मला तरी कुठे वाटलं होतं की मलाही तुमची कधीतरी गरज पडेल पण बघा ना आज कितीतरी वर्षाने तुम्ही मला भेटलात खेर हि देवाचीच कृपा म्हणायची

नम्रता : ए जास्त शहाणपणा नको करूस समजलं आणि काय रे कसली धमकी देतोस तू मला तू स्वतःला समजतोस काय विसरलास का तू माझ्या अंडर काम करत होतास मी नाही

आनंद:  नाही नाही मी कसं विसरेल आणि विसरून चालेल तरी कसं... पण एक लक्षात घ्या मॅडम मी जरी तुमच्या अंडर काम करत असलो ना तरी गरज तुम्हाला होती माझी मला नव्हती तुमची

नम्रता:  पण मी तुला त्याच वेळेस सांगितलं होतं जे आपल्या प्लॅनप्रमाणे ठरलं होतं... एकदा की मी तुला सगळ्यांची ओळख करून देईल त्याच्यानंतर तुला जे काय करायचं होतं ते तू केलस आणि तु निघुन सुद्धा गेला परत कशाला आलास(चिडून)

(हे सगळं संभाषण लपून बसलेल्या सगळ्या मित्रांना ऐकू येत होतं)

आनंद : अहो मी बोललो ना तुम्हाला मला पैशाची गरज आहे म्हणून म्हणून मी तुम्हाला फोन केला आता तुम्ही मला सांगा मी तुमच्या वेळेला आलो का नाही त्या वेळेस त्या दिवशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं केलं तर मग आता मला गरज आहे मग आता तुमची बारी मला मदत करण्याची

नम्रता हे घे पैसे आणि फूट इकडून  परत कधी तुझ तोंड दाखवू नकोस मला....

आनंद पैशाची बॅग घेतो आणि तसाच उभा राहतो एक विचारू का मॅडम काय गरज होती ओ एवढी हे सगळ करण्याची उगाचच त्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाला असेल हो की नाय

नम्रता : त्याच्याशी तुझं काय लेन देन ....तू तुझं काम कर ना तुला पैसे मिळाले ना मग बाकीच्या गोष्टीत कशाला नाक खुपसतोयस

आनंद :  नाही नाही तसं मला काही काम नाही त्या  गोष्टींशी पण तरी पण सहज विचारलं .....आज खूप वर्षांनी आठवण आली ना मला त्या मुलीची.... काय बरं त्या मुलीचं नाव आत्ताच लक्षात होतं हा राधिका काय प्रॉब्लेम काय होता तुमचा तिच्याबरोबर


नम्रता : चांगलंच सगळं लक्ष्यात आहे तुझ्या......मला वाटलं विसरला अशील सगळ...पण तु तर नव्याने उगवलास माझ्या आयुष्यात..एवढीच हाऊस आहे तर .....मग ऐक.....

( काय मग कसा वाटला आजचा भाग काय होईल ....नम्रता सांगेन सगळं खरं खरं आणि जर खरं सांगितलं तर स्वप्निलच रिएक्शन काय असेल नक्की कळवा तुमच्या कमेंट द्वारे)



















🎭 Series Post

View all