दुसऱ्या दिवशी स्वप्नील नम्रता ला एक लाख रुपये बँकेतून काढून देतो .....तो तिला जास्त काही प्रश्न विचारत नाही... त्यामुळे ती मनातूनच खूप खुश होते ......तिला माहित असतं स्वप्निल जास्त तिच्याबरोबर बोलत नाही..... पण तो तिचं मन मात्र नक्की जोपासतो...... आज पर्यंत तर त्याने तिला कोणत्याच गोष्टीची कमी पडून दिली नाही..... नम्रता मागेल ती गोष्ट तिची होती ....स्वप्नील ने आधीच हे लग्नाबद्दल करार केला होता .....तरीही तिने त्याच्याबरोबर लग्न केलं .....त्याने स्पष्ट पेपर मध्ये लिहून ठेवलं होतं की लग्न जरी मी तुझ्याबरोबर करत असलो तरीही आपण एका मित्र-मैत्रीण सारखा राहायचं..... माझ्या कडून काहीच अपेक्षा करायची नाही नम्रता सुद्धा त्याच्या या अटीवर ती तयार झाली ....नाही तरी तिला फक्त स्वप्निलचा हवा होता त्या दोघांनी लग्न केलं पण हळूहळू वर्षभरानंतर तिची चिडचिड होऊ लागली..... तिने ही भरपूर स्वप्न बघायला सुरुवात केली होती .....पण स्वप्निल मात्र त्याच्या अटींवर ठाम होता ......हे नम्रताला माहीत होतं त्याला कितीही मनवल तरी तो ऐकला नसता .... स्वप्निल नेहमी राधिका ची आठवण काढायचा..........
@@@@@@@@@@@@@@
सचिन बाबुच्या सांगण्यावरून सगळ्या मित्रांना एक एक करून कॉल करतो आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांना राधिकाच्या घरी भेटायला बोलवतो याची कल्पना राधीकाला नसते परंतु याची कल्पना मीनाताईंना देऊन ठेवतो
सगळे मित्र ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सात ते आठच्या सुमारास राधिका च्या घरी पोहोचतात
मीनाताईंना माहित होतं राधिका दहा किंवा अकरा च्या आधी कधी घरी येत नाही ......तसं तिचं कामच असतं..... म्हणून तिने राधिका ला न सांगता त्यांच्या सगळ्यांची येण्याची सोय करून ठेवलेली असते..... थोड्याच वेळात सगळे जण येतात
तृप्ती : बोल बाबू आम्हाला सगळ्यांना कशाला बोलावले इकडे ते पण राधिका नसताना( काळजीने विचारते)
बाबू : थांब जरा काकू यांना बसा इथे आमच्या जवळ....
मीनाताई बाबू च्या शेजारी बसतात
बाबू : मी काय म्हणतो काकूंना पण सगळ्या घडलेल्या गोष्टी सांगूया ज्यांनी करून त्यांना सगळं काही कळून येईल की आपण या एक दोन दिवसात काय काय केलं(सगळे होकारार्थी मान हलवतात......
बाबू मीनाताईंना सगळी घडलेली गोष्ट सांगतो ......त्यांनी राधिकाला न्याय द्यायचा ठरवलेला असत..... कसे ते आनंद पर्यंत पोहोचतात आनंद कसा कबूल.... होतो ......त्यांना मदत करण्यासाठी..... तो कशी शमा मागतो .....तो काय काय बोलतो हे सगळी गोष्ट ते मीनाताईंना सांगतात हे सगळं ऐकून मीनाताईंच्या डोळ्यात पाणी ....येत ....
मीनाताई : ते सगळं ठीक आहे ....मला खूप आनंद झाला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणले .....ते पण ह्यासाठी राधिका तयार होईल का ....????तुम्हाला माहितीये ती किती हळवी आहे ते....ती कधीच कोणाचा आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या बाबतीत विचार सुद्धा करणार नाही.....
बाबू ..: आम्हाला माहिती आहे का तिचा स्वभाव म्हणून तर आम्ही तुमच्या घरी आलो आहे आम्हाला सगळ्यांना तुमची एक मदत हवी आहे...????
मीनाताई : मी काय मदत करणार तुमच्यासाठी ......मदत तर तुम्ही करत आहात माझ्या राधिका साठी..... आणि जरी माझ्याकडून तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी होत असेल तर मला नक्की आनंद मिळेल......
बाबू उद्या काही केलं तरी नम्रता आनंद ला भेटायला जाणार आहे ..... मला माहितीये नम्रता ने काही करून स्वप्नील कडून पैसे नक्कीच मिळवल्या असतील मला थोड्या वेळाने आनंदचा फोन येणारच आहे .....आणि तो तिला फोन करून जी जागा सांगेल त्या जागेवर ती आपल्याला स्वप्निला घेऊन जायच आहे.....
सचिन : अरे पण स्वप्निल कसा येणार तो तर आपल्या कुणाशीच बोलत सुद्धा नाही.....
बाबू ; ते काम मी ऑलरेडी आनंदवर सोपवले ला आहे..... त्याला मी सांगितलं की तू काही करून स्वप्निल ला तू जिथे नम्रता ला भेटणार आहे तिकडे येऊन भेटायला सांग आणि मला वाटतं तू नक्की याच्यामध्ये सफल होईल
रिंकि : मग आपण सगळे काय करणार आहोत....?????
रिंकी च बोलून झाल्यावर तेवढ्यात बाबूला मोबाईल वरती आनंद चा मेसेज येतो ते बघून बाबू खुश होतो....( हे बघा आत्ताच आनंद चा मेसेज आला आहे मी वाचून दाखवतो तुम्हाला सगळ्या यांना)
आनंदचा मेसेज ( मी नम्रता ला फोन करून हँगिंग गार्डन मध्ये भेटायला बोलावलेला आहे .....ती उद्या संध्याकाळी चार वाजता मला भेटायला येणार आहे..... त्यामुळेच मला जमलं तर तुम्ही सगळे तिकडे या आणि स्वप्निल ला सुद्धा घेऊन या.....)
बाबू : काकू तुम्ही काही करून राधिका आणि स्वराज या दोघांना पण उद्या चार वाजता हँगिंग गार्डनला घेऊन या...... काही झालं तरी उद्या राधिका कामावर ती गेली नाही पाहिजे ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे
मीनाताई मानेनेच हो म्हणतात.......
बाबू : आणि हो आपण सगळे उद्या साडेतीन वाजेपर्यंत हँगिंग गार्डनला पोहोचू या स्वप्निल ला कसं बोलवायचं ते मी माझं बघून घेतो.....
माधुरी : बाबू मला तर खूप भीती वाटते रे या नम्रता चा काही भरोसा नाही
उज्वला: त्यात घाबरायची काय गोष्ट आहे आपण जे करतोय ते चांगलेच करत आहोत .....राधिकाला स्वप्नील च प्रेम मिळेल आणि स्वराज्य ला त्याचे बाबा मिळतील...... ज्या गोष्टीपासून स्वराज एवढ्या दिवस वंचित होता ती गोष्ट जर त्याला मिळाली तर आपल्याला सगळ्यांना आनंद नाही का होणार
माधुरी : बरोबर बोलतेस तू उज्वला आज किती वर्ष झाले स्वराज्य ला त्याचे बाबा माहितच नाही हे दर वेळेस तो राधिका ला विचारतो त्याचे बाबा कधी येणार ती बिचारी काही ना काही कारण सांगून टाळून द्यायची आता बघूच ही नम्रता कशी सुटते आपल्या सगळ्यांच्या तावडीतून
संदीप : ठीक आहे उद्या सगळे आपण भेटूया आणि प्लीज वेळेच्या आधीच्या या म्हणजे कुणाला शक नाही होणार....
मी काय बोलतो मी निघू का सध्या निशा ची तब्येत ठीक नाहीये(संदीपची बायको)
सचिन : हो तू निघ बाकीचं काही असेल तर मी तुला मेसेज करतो.....
बाबू: आता जे काही होईल ते फायनल उद्याच होईल....
मीनाताई सगळ्यांना जेवणासाघी आग्रह करतात....ओएन सगळे नंतर एकत्र जेवू राधिकासोबत......अस सांगून निघतात.....
@@@@@@@@@@@@@@@@
इकडे स्वप्नील ऑफिस मधून निघत असतो......तेवढ्यात त्याला अनोन नंबर वरून फोन येतो ......
स्वप्नील : हॅलो ....
बाबू : (स्वप्निल चा आवाज ऐकून शांत बसतो....आज कित्तीतरी वर्षाने त्याचा आवाज ऐकलेला असतो...…नकळत त्याच्या डोळ्यातून पाणी येत)
स्वप्नील : हॅलो....कोण........तुमचा आवाज नाही येत.....????
बाबू : मी बाबू बोलतोय.....
बाबू चा आवाज ऐकून स्वप्नील एकदम शांत होतो त्याला काय बोलावं आणि काय नाही काहीच सुचत नाही......
स्वप्नील : (थोड्याच वेळात बोलतो ) बाबू ....तु एवढ्या वर्षानंतर कॉल केलास....
बाबू : मी कॉल तरी केला.... पण तुझ्याकडे तर माझा नंबर सुद्धा नाहीये एवढ्या रागवलास आमच्यावर....
स्वप्निल : ते सगळ सोड काय काम होतं बोल
बाबू : बोलतो थोडा वेळ तर जाऊदे खूप वर्षानंतर तुझा आवाज ऐकला बरं वाटलं थोडं काम होतं तुझ्याकडे..... तुझ्याकडे वेळ आहे माझ्यासाठी....
स्वप्निल ; आज एवढ्या वर्षानंतर तुला माझी काय गरज आहे तुम्ही लोकांनी तर कधीच माझी साथ सोडली....(हलक्या स्वरात....)
बाबू :नीट आठव स्वप्नील साथ कोणी सोडली ते..….आम्ही तर आज पण तुझे मित्र आहोत.... तूच आमच्या पासून दूर गेलास...
स्वप्निल : (थोड्या वेळा शांत रहातो) वेळ काय होती तुला नाही माहित....तु तर माझा सगळ्यात जवळचा मित्र होतास ना....मग तु का माझी साथ सोडलीस....ते पण राधिकासाठी...........जाऊदे ना तेच तेच आठवून मला परत त्रास नाही करून घ्यायचाय स्वतःला .....तु मुद्द्याचा बोल....
बाबू : ठिके ....पण हे सगळं ....अस फोन वर नाही बोलता। येणार......तु उद्या मला भेट.....(हँगिंग गार्डन मध्ये.....तीन वाजता .....)
स्वप्नील : का ......मला नाही वेळ.....आणि अस अचानक सुट्टी नाही घेऊ शकत......
बाबू : हे मी तुला मनापासून रिक्वेस्ट करतोय....प्लिज काही करून उद्या ये.....
स्वप्निल: पण तू फोनवर का नाही काहीच सांगू शकत एवढं काय अर्जंट आहे.....
बाबू : ते मी तुला उद्या भेटल्यावर सांगेल आणि हो अजून एक रिक्वेस्ट तुही कोणतीच गोष्ट नम्रताला सांगणार नाही प्लीज रिक्वेस्ट....हे मी तुला लास्ट टाइम सांगतोय.....त्याच्या नंतर तूच डीसाईड कर तुला काय करायचं ते......
स्वप्नील : ठीक आहे मी बघतो तुला उद्या बारा वाजेपर्यंत सांगतो
बाबू : मला माहित आहे स्वप्नील तू येणार आहे आम्ही एवढे पण वाईट नाही आहोत हे तुला उद्याच कळेल
(एवढ बोलून दोघेही फोन ठेवून देतात पण स्वप्निल मात्र विचारात पडतो बाबू असा का बोलला की नम्रता ला सांगू नकोस ठीक आहे काही हरकत नाही ही बघून घेता येईल उद्या)
@@@@@@@@@@@@@@@@
(दुसऱ्या दिवशी नम्रता स्वप्निल ला आरामात बसलेला बघून विचारात पडते याला आज कामाला जायचं नाही का ....विचारून बघते)
नम्रता : स्वप्निल तू आज कामाला नाही जातेस (काळजीत विचारते)
स्वप्नील : नाही मला जरा बाहेर काम आहे त्यामुळे मी आज घरीच आहे आणि हो तुझ्या कोणत्या मैत्रिणीला पैसे आले होते ते तू दिलेस तिला ....
नम्रता : थोडी गोंधळते नाही नाही अजून नाही दिले आज जाणार आहे मी तिच्या घरी दुपारी तेव्हा देऊन येईल
स्वप्निल : ठिक आहे मी पण जरा बाहेर जाणार आहे मला यायला थोडा उशीर होईल
नम्रता: तू कुठे जाणार आहेस आज कारण मी पण घरात नाहीये........??????
स्वप्निल माझ्या साहेबांनी मला थोडा बाहेरचं काम दिला आहे तेच करायला जाणार आहेस वेळेत येईल मी घरी काळजी नको करूस.....(आणि उठून बेडरूममध्ये निघुन जातो)..
( स्वप्निल नम्रताच्या आधीच घरातून बाहेर पडतो नम्रताला ते बघून खूप बरं वाटतं ती पैसे घेऊन निघण्याची तयारी करते)
ती घड्याळ बघते अजून अर्धा तास बाकी असतो तोपर्यंत सगळे पैसे एका बॅगमध्ये भरते आणि तयारीला लागते तेवढ्यात तिला आनंद चा फोन येतो
नम्रता : हॅलो .....हा बोल......( रागातच बोलते)
आनंद : पैशाची सोय झाली का .....?????
नम्रता : हो झाली आणि एक लक्षात ठेव ही लास्ट वेळ आहे मी तुला पैसे देताना..... परत जर माझ्याकडून पैसे मागितले ना तर लक्षात ठेव मी काय करेल ते (रागातच चिडून बोलते)
आनंद : (जरा हसतच )तू काय करणार आहेस जे काय करायचे ते सगळं माझ्या हातात आहे विसरू नकोस वेळ दिलेली आहे मी तुला त्यावेळी ते नाही तर लक्षात ठेव फक्त एक कॉल करावा लागेल मला तुझ्या नवऱ्याला बाकी तू जबाबदार राहशील ह्या गोष्टींना
नम्रता: रागातच आता फोन ठेवशील तर मी वेळेत पोहोचले आणि यापुढे मला परत फोन करू नकोस(रागाने फोन ठेवते)
( काय मग कसा वाटला आजचा भाग काय वाटतं तुम्हाला नम्रता आनंद ला वेळेवर पैसे पोचवेल स्वप्निल ला नम्रता चा असली चेहरा दिसेल का नक्की कळवा तुमच्या कमेंट द्वारे)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा