अविश्वास त्याचा (पार्ट 14)

अविश्वास त्याचा (पार्ट 14)

दुसऱ्या दिवशी स्वप्नील बस स्टँड वर उभा असतो.....तिकडेच स्वराज आणि त्याची आजी (मीनाताई )उभ्या असतात.....त्या दोघांचे लक्ष नसत.....पण स्वप्नीलच मात्र लक्ष जात.....

मीनाताई स्वराज बरोबर खेळण्यांमध्ये गुंग असतात स्वप्निल त्या स्वराज्य कडे एक तक बघतो न जाणे त्याची ओढ त्याच्याकडे खेचत असते

अचानक खेळता-खेळता स्वराज खाली पडतो तसा स्वप्निल त्याच्याकडे धावत येतो.....

स्वप्निल : काय झालं बाळा तुला लागलं तर नाही ना बघू कुठे लागला असेल तर सांग मला( स्वप्निल ला असं अचानक समोर बघून मीनाताई थोड्या घाबरतात स्वराज स्वप्निल चा  हात सोडून मीनाताई च्या मागे लपतो.....)

स्वप्निल त्याला लपताना बघून थोडा हसतो..... अरे तू तर मला घाबरलास मी तुला घाबरणार नाही...... तू पडलास ना म्हणून तुला उचलायला आलो(हसत)

स्वराज मी तुम्हाला ओळखत नाही म्हणून मी तुमच्याशी बोलणार सुद्धां नाही..... मम्मा बोलते कोणी अनोळखी माणूस दिसलं तर त्याच्या बरोबर बोलायचं नाही नाहीतर ते मला पोत्यात घालून पळून नेणार...…

स्वराज्य बोलणं ऐकून स्वप्नील आता जोरजोरात हसतो...... मीनाताई त्या दोघांच्याही गप्पा ऐकत असतात......

स्वप्निल :  अरे वा खूप छान तुझी मम्मी अगदी बरोबर बोलते मी तुला ओळखतो पण तू मला ओळखत नाहीस काही हरकत नाही पण मला सांग तुला लागलं तर नाही ना

स्वराज मानेनेच नाही म्हणतो

आता मात्र स्वप्नीलच लक्ष मीनाताई मी कडे जात ..... त्या अशा समोर असताना न बोलून कसं काय चालणार म्हणून स्वप्निल स्वतःहून त्यांच्याशी बोलतो......

स्वप्निल : कशा आहात काकू...??????( थोडं नर्व्हस होत)

मीनाताई  : मी बरी आहे(थोडं रागातच)

स्वप्निल ला त्यांचा राग समजत होता म्हणून तो त्यांच्याशी जास्त न काही बोलता सरळ स्वराज्य बरोबर बोलायला जातो

स्वप्निल बाळा तू फिरायला चाललास तुझ्या आजी बरोबर

स्वराज  : मी नाही सांगणार तुम्हाला ..... की मी माझ्या दुसऱ्या आजी कडे चाललोय म्हणून ......मी तुम्हाला ओळखत नाही ......


स्वप्निल मनातच हसतो एकदा बोलतो सांगणार नाही आणि सांगून पण टाकलं किती गोड मुलगा हा ......

तेवढ्यात त्यांची बस येते.....

मीनाताई स्वप्नील कडे बघत बोलतात चल स्वराज आपली बस आली आपण निघू या दोघेजण बस मध्ये बसतात स्वराज खिडकीजवळ बसल्यामुळे त्याला स्वप्नील स्पष्ट दिसत होता .....जशी बस निघते तसा स्वराज आपण होऊन त्याला बाय करतो स्वप्निल सुद्धा त्याला मनमोकळेपणाने आनंदाने बाय करतो.....

@@@@@@@@@@@@@@@@@

( तिकडे बाबू च्या डोक्यात काहीतरी शिजत असतं त्याचं कामांमध्ये काहीच लक्ष लागत नसतं तेवढ्यात बाबू आनंदला कॉल करतो आणि काहीतरी सांगतो आनंद सुद्धा त्याला होकार देतो त्याचं काम करण्यासाठी)

बाबू त्याच्या मोबाईल मध्ये नम्रताच नंबर चेक करतो तिचा तोच नंबर आहे का तिने बदलला..... पण देवा कृपेने नम्रता चा नंबर तोच असतो .....तो लगेच त्या नंबर ची हेराफेरी करतो.....

बाबू  : हा घे नंबर आणि जेवढं सांगितलं तेवढं काम वेळेत व्हायला पाहिजे आणि चलाखी करायची नाही(आनंदला )

@@@@@@@@@@@@@@@@

नेहमीप्रमाणे नम्रता टीव्ही बघत बसलेली असते तिला अननोन नंबर वरून कॉल येतो तसा ती रिसिव्ह करते

नम्रता : हॅलो कोण....??????

अनोळखी माणूस  :  आता कशी तू मला ओळखणार .... बरीच वर्ष झाली आपण कधी बोललो नाही एकमेकांबरोबर

नम्रताला हा आवाज थोडा ओळखीचा वाटतो पण तरीपण ती तोच सेम क्वेश्चन करते .... हे बघा मी तुम्हाला ओळखत नाही कदाचित तुम्ही रॉनग .....नंबर लावलेला आहे.........आधी नंबर चेक करा म्हणजे कळेल कोणाशी बोलायचं ते .....

अनोळखी माणूस : नाही ओ मॅडम मी एकदम करेक्ट नंबर लावला आहे.....तुम्ही नम्रता बोलतायत .....ना......मी आनंद बोलतोय...


नम्रता : आनंद .....????(तेवढ्यात तिला आठवत.... आणि दरदरून घाम फुटतो) तुला सांगितलेला ना मला परत कॉल नाही करायचा ते......मग परत का कॉल केलास .....आणि माझा नंबर कोणी दिला तुला ......(रागातच तिचा आवाज ठलथरथरत होता .....)

आनंद :जास्त काही नाही ....मला थोडी पैशाची गरज आहे..........

नम्रता : पैसे ....आता परत .....तेव्हाच आपलं बोलणं झालं होतं ना ......मग आता मी कुठून देऊ तुला ........

आनंद :ते मला नाही माहीत ......पण मला पैश्याची अत्यंत गरज आहे.....ते पण तीन दिवसात..........बघ जमतंय का ....नाहीतर.....?????


नम्रता : नाहीतर काय (घाबरतच )

आनंद : जास्त काही नाही माझ्या कडे तुझे काही पुरावे आहे जव तु केले पराक्रम सगळ्यांसमोर आणण्यासाठी काफी आहेत....

नम्रताकडे काहीच पर्याय उरत नाही......तुला किती पैस हवेत.....????

आनंद : जास्त नाही फक्त एक लाख.....

नम्रता (जोरात ओरडते) एवढी मोठी रक्कम।कुठून आणू मी....आता तर मी कामाला पण नाही जात ......प्लिज जरा माझा विचार कर.....

आनंद : तु त्या वेळेस त्या मुलीचा विचार नाही केलास मग आता तू स्वतःचा विचार करतेस......कमाल आहे तुझी.....(हसत)

नम्रता : ठिके .......मी ट्राय करते....(काळजीत)

आनंद : ट्राय वगैरे काही नाही.....मला एक लाख हवे म्हणजे हवे.......ते पण तीन दिवसात.........

नम्रता : तीन दिवसात कस शक्य आहे.....?????

आनंद : तु एखाद्याच आयुष्य उध्वस्त करण्याचा प्लॅन एका दिवसात बनवू शकतेस....मग हे का नाही.......मला ते सगळं नाही माहीत ......तीन दिवसात सगळे।पैसे रेडी कर.....मी थोड्याच दिवसात तुला ऍड्रेस पाठवतो त्यावर घेऊन ये...….

नम्रता : पण माझं ऐकून तर घे मला एवढी मोठी रक्कम नाही जमा करता येणार( रिक्वेस्ट करत)

आनंद:  पहिल्या वेळेस कसे दिले होते तसेच दे .....तुझा नवऱ्या कडून घे नाहीतर कोणाकडूनही घे ....पण मला दे नाहीतर मी काय करेल हे तुला चांगलंच माहित आहे......

नम्रता : रिक्वेस्ट करत हे बघ आनंद तू मला असं धमकावून नाही शकत

आनंद :  नाही तर काय काय करणार तू..... एक लक्षात घे आता जे काही करायचे ते तुलाच करायचंय .....कारण तुझे सगळे राज माझ्याकडे ......आहे आणि ते मी कधीही तुझ्या नवऱ्या पुढे आणू शकतो त्यामुळे जेवढं इझी घेता येईल तेवढं इझी घे...... आणि तीन दिवसात पैशाचा बंदोबस्त कर मी तुला परवा ऍड्रेस पाठवतो तिकडे ये...(आणि फोन कट करतो.....)

नम्रता  :  हॅलो हॅलो हॅलो आनंद हॅलो( नम्रता रागातच फोन सोफ्यावर फेकते)

नम्रता : शीट यार ....हा आता परत का आला....आणि आता तर चक्क मला ब्लॅक मेल करतोय.....काय करू मी....(काळजीत) स्वप्नील ला जर हे सगळं कळल तर तो तर मला जिवंत नाही सोडणार.......काय करू मी आता.....मला आता काही करून ह्याच तोंड आधी गप्प करावा लागेल नाहीतर माझं काही खरं नाही नम्रता काहीतरी अक्कल लढव नाहीतर तू गेलीस

@@@@@@@@@@@@@@@@

स्वप्निल संध्याकाळी घरी येतो त्याचा आज मूड खूप चांगला असतो नम्रता ला त्याला एवढे खुश बघून बरं वाटतं

नम्रता  : अरे वा स्वप्निल तू तर खुश दिसतोय खूप आज काय बॉस ने प्रमोशन दिलं का काय तुला.....

स्वप्निल :  अग नाही नाही तसं काही नाही आज ते कामावर जाताना मला बस स्टॉप वरती एक आई मीन एक लहान मुलगा भेटला खूप छान होता त्यामुळे थोडं बरं वाटलं सगळा थकवा निघून गेला( हसतच बोलतो)

नम्रता  : अरे वा म्हणजे तुला लहान मुला आवडतात मला तर वाटलं तुला लहान मुलांमध्ये काहीच इंटरेस्ट नाही (थोडी चिडचिड करत बोलते)

स्वप्निल काही न बोलता हात पाय धुण्यासाठी मागे फिरतो

नम्रता  : थांब स्वप्निल असं किती दिवस मला ठेवणार तू काय होती माझी चुकी हे लग्न तू तुझ्या मर्जीने केलं.... तरीपण तू असा वागतोस......"""

स्वप्निल  : हे बघ नम्रता मी याच्या आधी हि तुला सांगितला आहे...… हे लग्न मी का केलं आणि मी काही तुझ्यावरती जबरदस्ती नव्हती केली..... मी तुला माझ्या अटी सांगितल्या होत्या आणि तशा मी त्या अटी बनवूनही घेतल्या होत्या त्या अटी मान्य सुद्धा केल्या आणि माझ्याशी तु  लग्न केलं ....बोल हे खरं आहे ना.... मी तर कोणतीही जबरदस्ती केली नव्हती तुझ्याशी की माझ्या बरोबर लग्न कर म्हणून...

आणि तू जे माझ्याकडं एक्स्पेक्ट करते ते मला देणे शक्य होणार नाही आणि मला सांग मी आजपर्यंत तुझ्या कोणत्या आवडीनिवडी जपले नाही तुला हवं नको ते बघतोय मग अजून काय हवं तुला(रागातच)

नम्रता :(रागातच) मला आपलं स्वतःचं हक्काचं मुल हवय.....

स्वप्निल हे शक्य नाही आणि परत परत तो विषय काढू नकोस (स्वप्निल निघून जातो)

नम्रता  : (रागातच सोफ्यावर बसते आणि मनामध्ये बोलते हे) काय केलंस नम्रता तू आज तर त्याचा मूड चांगला होता.....हीच तर संधी होती तुझ्या कडे.... तू त्याला काही खोटं सांगून पैशाचा विषय काढू शकली असतीस शीट मला हा नको तो विषय काढायचा नव्हता आता काय करू तो हात पाय धुऊन आल्यावर बघतेस कसा त्याचा मूड बनवायचा आणि ती त्याच्यासाठी किचनमध्ये कॉफी बनवायला निघून गेली

थोड्याच वेळात स्वप्नील हात-पाय धुऊन फ्रेश होऊन बाहेर हॉल मध्ये येतो हातात रिमोट घेऊन टीव्ही चालू करतो स्वप्निल हॉलमध्ये बसला आहे हे बघून नम्रता त्याच्यासाठी कडक कॉपी घेऊन येते

नम्रता त्याच्या बाजूला बसते हिगे कॉफी एम सॉरी मलाही नको बोलायला होतं पण मी काय करू घरी शेवटी मी पण एक स्त्री आहे मला सुद्धा मन आहे म्हणून ह्या सगळ्या भावना तुलाच बोलून दाखवू शकते ना एम सॉरी मी परत हा विषय नाही काढणार

स्वप्निल काहीच बोलत नाही थोड्यावेळ अशीच शांतता राहते संधीचा फायदा घेत नम्रता बोलायला लागते.....

नम्रता  : स्वप्निल माझं थोडं तुझ्याकडे काम होतं....?????

स्वप्नील कॉफी पितच : हम्मम .....बोल...????

नम्रता  : ते मला एक लाख रुपयांची गरज होती..... माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याची तब्येत थोडी खराब आहे तर तिला पैशाची गरज होती तर तिचा आज दुपारी मला कॉल आलेला मी तिला बोलले माझ्याकडे तर एवढे पैसे नसणार पण मी ट्राय करू शकते.....(काळजीत )

स्वप्निल टीव्ही बघतच बोलतो  : ठीक आहे मी तुला उद्या चेक देतो तो तू दे तिला

नम्रता चेक नको मला केस दे अरे म्हणजे तीच बोलली असेल तर तेवढं चांगलं होईल चेक कसं क्लिअर व्हायला वेळ लागतो ना म्हणून

.....

स्वप्निल ठीक आहे उद्या देतो मी तुला (स्वप्नीलच बोलून झाल्यानंतर नम्रता मनातच खूष होते )

( स्वप्निल तसाच उठून त्याच्या बेडरूममध्ये निघून जातो)

( काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कमेंट द्वारे)









🎭 Series Post

View all