बाबू च्या सांगण्यावरून सगळे मित्र मैत्रिणी हे संदीपच्या हॉटेलमध्ये भेटतात फक्त राधिकाला त्याची खबर नसते......
रिंकी : काय झालं बाबू माधुरी तुम्ही दोघे असे टेन्शनमध्ये का दिसतायत..... घरी सगळ ठीक आहे ना.....???
माधुरी : घरी सगळे ठीक आहे ग तुम्हाला सगळं बाबुच सांगेल.....
बाबू : अरे ते स्वप्नील परत आलाय ्वप्निल चं नाव ऐकताच सगळ्या मित्रांच्या मैत्रिणींच्या चेहर्यावरचे हावभाव बदलतात कोणाला काय बोलावं काहीच कळत नाही
संदीप : अरे पण तो लग्न करून कुठे पुण्याला गेला होता ना तो लगेच कसा आला.....
बाबू : माहित नाही यार.....पण राधिका आणि त्याची ऑलरेडी भेट झालेली आहे......
सचिन: व्होट......अरे पण ते अस अचानक...... हे कसं शक्य आहे....
बाबू ....हो ना ......त्यांचं बोलणं पण झालं सगळं.....( बाबू सगळ्यांना मीनाताईंनी सांगितलेला हा सगळा प्रकार सांगतो आतापर्यंत स्वप्नील काय काय बोलला तिला कुठे भेटला का भेटला हे सगळं काही बाबू नेत्यांच्या मित्रमंडळींना सांगितलेला असतो)
उज्वला : आता कुठे तरी राधिका सावरली होती....आता परत हे सगळं कसं सहन करेल ती.......
तृप्ती : पण मी काय बोलते...हा तिला जर नेहमी नेहमी एकच प्रश्न विचारतोय ......तर मग आपल्याला काहीतरी करायला हवं ............हे अस शांत बसून नाही चालणारं.....एवढे वर्ष राधिकाने सगळं एकटीने सहन केल....ते तर तिची आई खंबीर होती म्हणजन सगळं व्यवस्थित पार पडलं....पण आता ह्याच्या पुढे जे काही करायचंय ते आपल्यालाच करावं लागेल.......
उज्वला : तुझ्या डोक्यात काही आयडिया आहे का....???
तृप्ती : तुला आठवतं ज्यावेळेस हा सगळा प्रकार घडला त्यावेळेस नम्रता तिच्या कोणत्यातरी मित्राला घेऊन आलेली आणि तो त्याच वेळेस गायब झाला ज्या वेळेस हे सगळे प्रकार घडले तो मुलगा भेटला पाहिजे तेव्हा हे सगळं काही उघड होईल......
सचिन : वा काय आयडिया दिलीस अगं गेला ते पण न सांगता आता कुठून शोधून आणायचा त्याला तुला वाटेल तो आपल्याला सहजासहजी मिळेल काही पण नको ते आयडिया देते
बाबू : तुम्ही जरा सगळे शांत बस्ता का आधीच माझं डोकं काम नाही करत आहे मी काय बोलतो आपण जरा स्पष्टच बोलूया....आपण स्वप्नील बरोबर परत एकदा बोलूया का बघूया ह्या वेळेस तरी तो आपल्यावर विश्वास ठेवतो का.....
रिंकी : वा तू तर कमालच बोलतोस रे अरे....... त्या वेळेस त्याने आपल्यावर विश्वास नाही ठेवला ....तो बिना प्रूफ चा कसा काय विश्वास ठेवेल आपल्यावर त्यासाठी काही तरी प्रुफ पाहिजेल ना.....
संदीप : मी एक काम करतो ही नम्रता जिकडे कामाला होती ना तिकडे जाऊन त्या मुलाची चौकशी करत निदान काहीतरी हातात लागेल
(मग सगळे एकत्र बोलतात )मग आम्ही सुद्धा तुझ्या बरोबर येतो
संदीप : मी काय भंडाऱ्याला चाललोय जे लागले सगळे माझ्या मागे .....काय तुम्ही पण यार वेड्या सारखे बोलतात.... बाबु मला दोन दिवस दे मी जाऊन शोधतो
बाबू :ठिके... आणि तुला काही मदत लागली तर प्लीज कॉल कर मला ....आता तर ह्याला शोधूनच काढू....तुला तिचा कामाचा पत्ता माहीत आहे ना ....???
संदिप : हम्म....माहिते.....
सगळे मित्र थोडस खाऊन निघून जातात
@@@@@@@@@@@@@@@@@@
दुसऱ्या दिवशी संदीप नम्रता च्या ऑफिस मध्ये पोहोचतो तेथे तो काउंटरवर रिसेप्शनिस्ट ला आनंद नावाचा कोणीही व्यक्ती तिथे काम करत होता का याची चौकशी करतो.....
पण रिसेप्शनिस्ट काही करून त्याला ती माहिती देऊ शकत नव्हती कारण त्यांच्या कंपनीचा रुलच होता तो .....अनोळखी माणसाला माहिती न देण्याचा
संदीप बाबूला कॉल करतो: बाबू अरे मी नम्रताच्या ऑफिस मध्ये आलोय.......पण ही त्यांची रिसेप्शनिस्ट काही सांगायला तयार नाही कारण ते त्यांच्या कंपनीच्या रुल्स च्या खिलाफ आहे.....
बाबू पाच मिनिटात काहीतरी विचार करतो : एक काम कर संदीप तू तिथेच उभा राहा मी येतो पंधरा मिनिट दे मला
थोड्याच वेळात बाबू त्याच्या एका मित्राबरोबर येतो संदीप त्याला इशारा करून विचारतो कोण आहे हा
बाबू त्याला डोळ्याच्या इशाऱ्याने थांब म्हणून सांगतो.....ते तिघे मिळून ......परत नम्रताच्या ऑफिस मध्ये जातात......
रिसेप्शनिस्ट सर तुम्ही पुन्हा आलात मी सांगितलं ना मी नाही देऊ शकत तुम्हाला आमच्या एम्प्लोयी ची डिटेल्स ते आमच्या कंपनीच्या रुल्स च्या केला आहे
तेवढ्यात बाबूचा मित्र एक आयडी काढतो आणि तिच्यासमोर जातो मी सुनील जोशी पीएसआय सुनील जोशी घाटकोपर पोलीस स्टेशनला असतो आता तरी तुम्ही सांगाल आम्हाला.....
सुनील जोशी यांचा आयडी चेक करून झाल्यानंतर रिसेप्शनिस्ट त्यांना आनंदाची माहिती द्यायला तयार होते
आनंद च्या घरचा पत्ता भेटतो तसे ते दोघेही खूष होतात आणि निघायला लागतात
बाहेर आल्यानंतर बाबू (सुनीला मिठी मारतो): थँक यु सुनील आज तू नसता तर आम्ही ह्या माणसाचा पत्ता शोधू शकलो नसतो..... तुला माहित नाही तो आमचं केवढं मोठं काम हलकं करून टाकलं......
सुनील : अरे त्यात थँक्यू काय.... तू माझा मित्र आहे तुला कधीही गरज पडली तर मला कॉल कर पण तू याचा आत्ता का शोधतोय काही प्रॉब्लेम आहे का
बाबू अरे काही नाही रे याने जरा छोटासा घोळ केलाय तो आमच्याकडून सोल होईल आणि जर नाही झाला तर तुला कॉल करु .... अरे हो हा माझा मित्र संदीप( दोघेही एकमेकांना शेक ह्यांड करतात)
सुनील चल मग आता मी निघू मी ओंन ड्युटी आहे ना....
बाबू आणि संदीप सुनील ला निरोप देतात आणि ते त्यांच्या कामाला लागतात
संदीप : ॲड्रेस जरा चेक कर कुठचा आहे तो......
बाबू : हा तर मुलुंड चा ऍड्रेस आहे चल एक काम करूया रिक्षाने जाऊया म्हणजे लवकर पोहोचू .....
दोघेही दिलेल्या ऍड्रेस....वरती पोहोचतात.....
बाबू : ती बघ सरस्वती चाळ....... चल लवकर( दोघेही आनंदाच्या घरासमोर उभे राहतात आणि दरवाजा ठोकतात.... आतून आवाज येतो ......कोण आहे)
संदीप : आनंद आहे का घरा मध्ये( तेवढ्यात इकडे एक महिला येऊन दरवाजा खोलते)
महिला : आपण कोण मी ओळखलं नाही तुम्हाला????
संदीप : आम्ही आनंद चे मित्र आहोत तो आहे का घरात थोडं काम होतं
महिला : हो आहेत ना ते आत या( अहो तुम्हाला तुमचे मित्र भेटायला आले आहेत बाहेर या बरं)
आनंद त्याच्या लहान मुलीला खांद्यावर बसून घेऊन बाहेर येतो...... तो समोर बाबू आणि संदीप ला बघून घाबरतो.... त्याला आता काय बोलावं आणि काही नाही काहीच सुचत नाही ....संदीप रागाने त्याच्या हाताची मूठ आवळतो .....पण बाबू त्याचा हात धरतो आणि त्या बाळाकडे बघून त्याला शांत बसायला लावतो
आनंद : प्रिया तू अनुला घे आणि बाहेर जा.... जरा ऑफिस महत्त्वाचं काम आहे अनु काही करून देणार नाही( आनंद ची बायको प्रिया तिच्या लहान मुलीला घेऊन वाजवल्या कडे जाते.... प्रिया जशी बाहेर जाते तसा बाबू आणि संदीप आनंद वर तुटून पडतात संदीप त्याची कॉलर धरतो)
संदीप : काय ओळखलं आम्हाला (रागातच बोलतो)
आनंद : माफ करा मला पण प्लीज माझ्या घरात काही तमाशा नका करू माझं लहान बाळ आहे माझी बायको आहे माझी आई वयस्कर आहे
बाबू : तमाशा आणि आम्ही अरे तमाशा तर तू केलास त्यावेळेस त्या मुलीच आयुष्य उद्ध्वस्त करून..... अरे लाज नाही वाटली का तुला हे सगळं करताना का म्हणून केलस तू हे सगळं
आनंद : घाबरतच मला नम्रता मॅडमनी हे सगळं करायला सांगितलं..... होतं म्हणून मी हे केलं आणि त्यासाठी त्यांनी मला पैसे सुद्धा दिले होते मला पैशांची पण खूप गरज होती..... माझी आई आजारी होती म्हणून मी हे सगळं केलं मला माफ करा पण प्लीज माझ्या बायकोला आणि आईला याबद्दल काहीच सांगू नका.....
संदीप : काय रे तुला तुझा जशि तुझ्या घरच्यांची काळजी वाटते तशी त्या मुलीला नव्हती वाटत का....? तू जे केलस त्यामुळे ती आज पर्यंत तर त्याची शिक्षा भोगते...... हे सगळं करताना तुला तुझे घरचे नाही आठवले का त्यावेळेस आणि आता तू आम्हाला बोलतोस मला माफ करा पहिलं सांग हे का केलंस
आनंद : हो हो मी सगळं काही खरं सांगेन ....पण प्लीज जरा हळू बोला माझी बायको ऐकेन..... नम्रता मॅडम आणि मी एकाच ऑफिसमध्ये काम करत होतो नम्रता मॅडम माझ्या सिनियर होत्या त्यांना माहिती होतं की मला पैशाची गरज होती कारण माझा जेवढा पगार होता त्यामध्ये माझ्या आईचा आजारपणाचा खर्च भाग न मुश्किल होतं त्यामुळे त्यांनी माझा फायदा उचलला त्यांनी मला फक्त...... तुमचे कपडे काढायला सांगितले आणि हे सगळं करण्यासाठी त्यांनी मला दहा हजार रुपये दिले होते माझ्यासाठी सुद्धा हे खूप अवघड होतं पण काय करणार आईच्या तब्येती साठी मी हे सगळं केलं कारण जसा आम्ही आमच्या बाबांना आजारपणात गमावलं तसा आम्हाला आमच्या आईला गमवायचं नव्हतं...... मला माफ करा चुकी झाली माझ्याकडून मला माफ करा
संदीप:( रागातच जोरात त्याच्या कानाखाली देतो )बोलायला सुद्धा लाज वाटत नाही का रे तुला तू जे केलं त्याच्या साठी माफी देऊ तुला कसं शक्य आहे हे अरे ह्या तुझ्या नालायक पणामुळे त्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झालं त्या दोघांमध्ये दुरावा आला किती काय सोसलं तिने...... त्या दोघांचं मूल असताना तिने एकटीने आई आणि वडिलांची भूमिका निभावली आम्ही तरी माफ करू ती करेल का तुला माफ(रागातच बोलतो)
बाबू : एक काम कर आम्ही तुला जे जे काही सांगू ते करशील तू....?????
आनंद : (हात जोडून बोलतो )हो मी सगळं काही करायला तयार आहे फक्त एक माझ्यावरती उपकार करा माझ्या घरच्यांना यातलं काहीच कळून देऊ नका......
संदीप : किती सेल्फीश आहेस रे तु .......तुला तुझ्या घरच्यांची काळजी वाटते......आणि तिच्या बरोबर अस करताना काही नाही वाटलं....
आनंद : मला एक संधी द्या.......मी खरच तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहे......(रडतच बोलतो....)
बाबू : हा घे आमचा नंबर.....आम्ही तुला कळवू.....तेव्हा आम्हला मदत कर....आणि हो जास्त शान पणा करायचा नाही....इकडून पळून जायचं नाही......नाही तरी माझे मित्र आहेच पोलीस मध्ये.....तुझ्या शकत तुझ्या घरच्यांना पण आत टाकेल....कळलं .....(रागात )
आनंद : हो हो.....कधी पण मला कॉल करा मी मदत करेल.........आणि हा घ्या माझा नंबर......
(तेवढ्यात आनंदची बायको तिच्या मुलीला घेऊन येते....)
प्रिया : सॉरी हा....बाळाला भूक लागलीये म्हणून आले....तुम्ही सगळे बसा मी चहा टाकते तुमच्या सगळ्यांन साठी.....
संदीप : नाही नको.....आता ऑफिस ला जायचय....आधीच खूप उशीर झालाय......नंतर परत येऊच.....आनंदची गरज पडेलच आम्हाला...
प्रिया : हो या ना नक्की.....परत कधी आलात तर जेवणाचा बेत करू......
बाबू आणि संदीप आनंदच्या मुलीच्या हातात....खाऊ साठी पैसे ठेवतात....आणि निघतात.....
(बाहेर आल्यावर.....संदीप : आता पुढे काय करायचं..…?????)
बाबू : आता पुढे सगळं काही सांभाळून करावं लागेल ....ज्याने करून आनंदच्या फॅमिली ला पण त्रास होत काम नये.....
संदीप : जाऊदे झाला तर झाला त्याच्या फॅमिलीला त्रास त्याने तरी कुठे आपल्या राधिका च चांगलं केलं
बाबू असं नाही रे होत संदीप तो जसा वागला तसंच जर आपण वागलो तर त्याच्यात आणि आपल्यात काय फरक रहायला ......अस करून नाही चालणार............
संदीप : हम्मम ठिके ......मग काय करायचं ठरवलं तु.....????
बाबू : आधी ही बातमी सांगू सगळ्यांना मग बघू....पुढचं पुढे
(काय मग कसा वाटला अजचा भाग नक्की कळवा तुमच्या कमेंट द्वारे )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा