अविश्वास त्याचा(पार्ट 11)

अविश्वास त्याचा (पार्ट 11)

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी राधिकाला जाग येते......तेव्हा ते दोहे एकमेकांच्या कुशीत असतात.......राधिका त्याच्या पासून थोडी दूर जाण्याचा प्रयत्न करते पण स्वप्निल तिला परत आपल्या जवळ खेचतो तशी ती त्याच्या अंगावर आदळते........

राधिका :  स्वप्नील सकाळचे सहा वाजले आहेत आपण प्लीज घरी जाऊया ना आई-बाबांचा कितीतरी वेळा फोन येऊन गेला असेल मला पण नाही माहीत .... प्लीज चल ना लवकर......

दोघे जण  फ्रेश होऊन बाहेर येतात तेव्हा राधिका बेड वर बसून कोणत्यातरी विचारात गुंग असते

स्वप्निल :  तिच्या बाजूला जाऊन बसतो काय झालं राधिका कसला एवढा विचार करतेस.....(काळजीने)

राधिका स्वप्नील काल रात्री जे  आपल्या दोघांमध्ये घडलं ते......( राधिका पुढे काही बोलणार तेवढ्यात स्वप्निल तिच्या तोंडावर ती हात ठेवला)

स्वप्निल  : काळजी नको करूस मी लवकरात लवकर आपल्या घरच्यांना आपल्या दोघांच्या रिलेशन बद्दल सांगणार आहे थाटामाटात तुझ्या घरी तुझा हात मागायला येणार येणार

राधिका  :(स्वप्निल चा हात हातात घेत)असच माझ्यावर विश्वास ठेव स्वप्नील तुझ्याशिवाय मी कोणावरही जास्त विश्वास करत नाही खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर अशीच साथ देत रहा जोपर्यंत माझे डोळे बंद होत नाही तो पर्यंत

स्वप्निल वेडी झालीस का काही पण काय बोलतेस तुला काही व्हायच्या आधी मला हो आता कुठेतरी आपला छान मूड फ्रेश झाला आहे  ......आणि आता नको ते बोलतेस चल वेडाबाई नाहीतर उशीर होईल....

दोघेई हॉटेलमधून चेक आउट करतात स्वप्निल राधिकाला कोणाच्या नकळत तिच्या घरी सोडतो..... राधिका पुन्हा फ्रेश होऊन थोडा आराम करते आणि स्वप्नील त्याच्या जॉइनिंग ची तयारी करतो......

( सगळं काही सुरळीत चालले असतो पंधरा दिवसानंतर संदीप त्याने नवीन हॉटेल खोल आहे त्या हॉटेलच्या ओपनिंग साठी सगळ्यांना मेसेज करतो..... सगळेजण त्याला होकार देतात......)

( संदीप ने दोन मजली हॉटेल खोलेलं असतातअविश्वास त्याचा.

खालच्या फ्लॉवर वरती जेवणाची सोय असते आणि पहिल्या मजल्यावर ती गेस्ट ची राहण्याची सोय केलेली असते...... नम्रता ला ही बातमी कुठून तरी कळते ती डोक्यात काहीतरी शिजवत असते......

संदीप च्या सांगण्यानुसार सगळे जण दुसऱ्या दिवशी त्याच्या हॉटेलवर येतात संदीप हॉटेल खूप सुरेख असत त्याने जास्त करून वॉलपेपर डिझाईन इन केलेली....असते......त्याची मेहनत आज फळाला आलेली ......सगळे पाहुणे मंडळी निघून जातात.....फक्त हीच मित्र मंडळी गप्पा गोष्टी करत बसलेली असतात.....

रिंकी:  काही पण म्हण संदीप एक नंबर हॉटेल बनवलस तु...... किती छान डेकोरेशन केलस मला तर भरपूर आवडलं आणि जेवण सुद्धा एक नंबर होत.....

संदीप :  थँक्यू ..
बाबू  : पण हे हॉटेल बनवण्यासाठी लोन घेतलं होतं का .....

संदीप :  नाही रे जास्त लोणची गरज नाही पडली .....पहिला हॉटेल होत त्याच्यामध्ये जे काही प्रॉफिट व्हायचं ते साठवून साठवून हे हॉटेल घेतल आणि थोडीफार बाबांनी पण मदत केली गावच्या शेतीमध्ये पण थोडाफार यावर्षी चांगलं प्रॉफिट झालं होतं त्याच्यातून थोडीफार मदत झाली....

स्वप्निल  : बरं झालं तू आत्ताच इन्वेस्टमेंट केली सध्याच्या काळात मुंबईमध्ये स्वतःचं काही असणं खूप मोठी गोष्ट आहे.... मग तू पहिल्या  हॉटेल्स च काय केलंस......

संदीप :  ते मी भाड्याने दिलं तिकडचे कस्टमर भरपूर आहेत रे( संदीप बोलता-बोलता त्याला बाहेरून नम्रता आणि तिच्याबरोबर एक कोणीतरी अनोळखी मुलगा येताना दिसतो)

नम्रता  : आता येऊ का मी संदीप

( नम्रताला असं अचानक बघून सगळे एकमेकांकडे बघतात)

संदीप डोळ्यानेच तिला ये म्हणून बोलतो...... बोल काय झालं

नम्रता :  मी इकडे सगळ्यांची माफी मागायला आलीये.......( नम्रता असं बोलतात तृप्ती च्या तोंडातून पाणी बाहेर येत)

तृप्ती  : आता हे काय नवीन नाटक चालू केलस तु

नम्रता : मी नाटक नाही करते ....तृप्ती मी खरं बोलते...... एवढ्या वर्ष मी तुमच्या सगळ्यांपासून लांब राहिली..... पण खरं सांगते एक दिवस पण असा नाही गेला ज्या दिवशी तुमची आठवण मला नाही आली .....प्रत्येक क्षणाक्षणाला मी तुम्हाला सगळ्यांना मिस करत होते .....आता मला माझ्या गोष्टींचा पश्चाताप होतोय .....मी तसं नव्हतं बोलायला पाहिजे..... उगच मी बडबड करत गेले आणि आपल्या सगळ्या मित्रांपासून लांब गेली मला माफ करा आणि मला परत तुमच्या मध्ये सामील करून घ्या ...

सगळे मित्र एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात....कोणाला काहीच कळत नाही तिच्या या बोलण्यावर ती विश्वास ठेवावा की नाही..... नम्रता हात जोडून सगळ्यांसमोर उभी असते तेवढ्यात स्वतःहून संदीप तिच्या जवळ जातो आणि तिला इट्स ओके आम्ही तुला माफ केलं असं बोलतो..... तशी तिच्या चेहऱ्यावरती स्माईल येते....

नम्रता  : अरे हा हा माझा मित्र आनंद माझ्या ऑफिसमध्ये असतो माझा बेस्ट फ्रेंड( सगळे जण त्याला हॅलो बोलतात)

नम्रता : स्वप्नील राधिका मी मनापासून तुमची माफी मागते मी खूप चुकीचं वागली तुमच्या दोघांबरोबर प्लीज मला माफ करा मी परत असं नाही वागणार प्रॉमिस...…

राधिका तिच्या जवळ जात बोलते जे झालं ते झालं आता विसरून जा ......किती वर्ष झाली त्या गोष्टीला आम्ही तर कधीच विसरलो ये बस इकडे

नम्रता आधी सगळ्यांबरोबर......चांगली वगते...पण न जाणे तृप्ती ला तिच्या अशा वागण्यावर शंका होत असते....ती ही गोष्ट उज्वला जवळ बोलूनही दाखवते मन उज्वला मात्र त्याला दुजोरा देते

नम्रता अरे स्वप्निल एवढी थंडथंड पार्टी का देतोस जरा म्युझिक लाव थोडा डान्स होऊ दे.....

नम्रताच्या सांगण्यावरून संदीप म्युझिक लावतो ......लाईट ऑफ करून डिस्को लाइट लावतो सगळेजण मिळून ताल धरतात स्वप्नील आणि राधिका एकत्र नाचताना बघून नम्रताला परत चीड येत असते....

नम्रता संदीपला सांगून सगळ्यांसाठी ज्यूस आणते......ती स्वतःच्या हाताने सगळ्यांना ज्यूस देते.....नम्रताच हे रूप......पाहून तृप्ती आणि उज्वला ला थोडी शंका येते......पण त्यांना संदीपचा मड स्पोईल नव्हता करायचा म्हणून ते तिला काहीच बोलत नसतात......

सगळे जण आवडीने जूस पिट असतात.....ज्यूस पिल्यावर थोड्यावेळाने राधिकाला .थोडं मळमळायला लागत......ती स्वप्नीला काही तरी करण देऊन जवळच्याच टेबलवर बसते..... नम्रता तिच्या वरती लक्ष ठेवूनच असते ती सगळ्यांच्या नकळत राधिकाला वॉशरूम मध्ये घेऊन जाते राधिका सुद्धा नम्रताला न अडवता तिच्या सोबत निघून जाते......

नम्रता  : राधिका काय होतंय तुला तुझं डोकं दुखतंय का...????

राधिका हो ग थोडं मळतो पण आहे आणि आता तर डोकं सुद्धा खूप जड झालंय काहीच समजत नाही काय चालू आहे माझ्या बरोबर

नम्रता( मनातच खुश होत) एक काम कर वरती काही रुम्स आहेत तू तिकडे चल थोड्यावेळ ....आराम कर म्हणजे तुला बरं वाटेल आणि मी खाली जाऊन स्वप्निल ला सुद्धा पाठवते तुझ्याजवळ

राधिका एका हाताने डोक पडतच मानेने होकार देते आणि नम्रता बरोबर जाते नम्रता तिच्या संधीचा फायदा उचलत तिला बेड वर झोपवते..........इकडे आनंद ......सुद्धा संदीपवर पाळख ठेवून असतो ....त्याला सुद्धा थोडं डोकं जड झाल्यासारखं वाटत म्हणुन तो सुद्धा थोडा लांब बसतो सगळ्यांच्या नकळत......इकडे राधिका तथोड्यावेळाने चक्कर येऊन बेडवर  झोपते.....तिला आता कसलीच शुद्ध नसते.....आनंद संदीपजवळ जातो.......आणि त्याला काही तरी करण देऊन वरच्या फ्लोर वर न्हेतो....जिथे राधिका आणि नम्रता आधीच असतात......संदीपला सुद्धा आता चालणं जड झालेलं असत......त्याची सुद्धा शुद्ध हरपते.... आनंद त्याला सावरत सावरत नम्रता जवळ आणतो..........आणि संदीपला सुद्धा राधिकाची बाजूला झोपवतो.....

नम्रता : आनंद तुला महितीयेणा....काय करायचं ते......ते तु कर तो परेनंतर मी बाहेर थांबते.....

नम्रता दहा मिनिटे बाहेर थांबून आत मध्ये येते.....तसाच आनंद पण बाहेर थांबतो......नंतर दोघे पण एकत्र आत मध्ये येतात......आणि समोरचा नजारा बघून हसतात......ह्या दोघांनी मिळून त्यांची अशी स्थिती केलेली असते ज्याने करून कोणाला ही त्या दोघांवर शक येईल......त्या दोघांची अंगवस्त्रे विस्कटलेली असतात......राधिकाची कानातले.....सांडिओच्या शर्ट वर लावलेली असतात.....तिची लिप्टिक पुसलेली असते.....तिच्या लिपस्टीक चे ठसे संदीपच्या  अंगावर काढलेली असतात.....तसं थ दोघं मध्ये काहीच घडलेलं नसत....हे सगळं आनंद आणि नम्रताच काम असत......

इकडे खाली कुणालाच काही माहीत नसतं....सगळे आप आपल्या धुंदीत असतात........

नम्रता : हे घे तुझे पैसे...आणि कुणाच्याही नजरेत न येता इकडून निघून जा........परत मला भेटायचं नाही....आताच सांगून ठेवते....चल निघ आता इथुन......

नम्रता सुद्धा तिकडून निघून जाते....आणि ती सगळ्या बरोबर डान्स करते.......धोंड्या वेळात स्वप्नील राधिकाला शोधण्याचा प्रयत्न करतो...पण ती त्याला दिसत नाही.....ह्याच संधीचा फायदा घेऊन ती त्याच्या जवळ जाते...


नम्रता : काय झालं.....कुणाला शोधतोय......???

स्वप्निल : अजून कोण .....राधिका ....मगाशी तिकडे समोर होती माझ्या...माझं लक्ष काय हटल ही तर मॅडम गायबच झाली......(हसत)

नम्रता : अरे मी तर तिला वरच्या दिशेने जाताना पाहिलं.....

स्वप्नील : वरती......(आश्चर्यचकित होत)

नम्रता : अरे हो तर....आणि थोड्याच वेळात संदीप पण तिच्या मागे गेला.....

आता मात्र स्वप्नील तिला रागाने  बघतो......

नम्रता : अस रागाने काय बघतोयस माझ्या कडे.... माझा बोलण्याचा अर्थ तसा नव्हता ती गेली असेल कोणत्यातरी कामानिमित्त वरती  तेवढ्यात थोड्याच वेळात संदीप सुद्धा त्या दिशेने मला दिसला म्हणून तुला बोलले.....

( या दोघांचे बोलणे चालू असताना सगळ्या मित्रांचा लक्षा दोघांकडे जात म्युझिक बंद करून सगळेजण आता त्यांच्यापाशी येतात)

बाबू :  काय झालं एनी प्रॉब्लेम

स्वप्नील:  अरे काही नाही रे राधिका दिसत नव्हती म्हणून तिला शोधत होतो तरीही बोलते ती वरती गेली म्हणून

बाबू : हो मग गेली असेल काही तरी काम असेल म्हणून मग त्यात काय झालं तुम्ही दोघे एवढे सिरीयस का होतायत

स्वप्निल : ही बोलते तिच्यामागून संदीप पण गेला आता हिला त्याच्याबद्दल बोलायची काही गरज होती का( रागाने नम्रता कडे बघत बोलतो)

तृप्ती संशयाच्या नजरेने नम्रता कडे बघते....... मला सांग तुझा मित्र कुठे गेला (संशयाने विचारते)

नम्रता :  त्याच्या घरून त्याला फोन आला म्हणून तो तुम्हाला सगळ्यांना डिस्टर्ब न करता निघून गेला काहीतरी अर्जंट काम आहे असं तो मला बोलला

माधुरी ठीक है नम्रता आम्हाला सांग राधिका कुठे दिसली तुला....?????

नम्रता :  वरती जाताना दिसली त्यादिशेने तुम्ही वाटलं तर जाऊन शोधू शकता....

सचिन :  एक काम करूया आपण सगळे जण जाऊया आणि बघूया कुठे गेली ती राधिका संदीप गेला असेल कुठेतरी बाहेर आता त्याचे हॉटेल आहे त्यामुळे त्याला दुसरे पण काहीतरी काम आलं असेल.....

सगळे मित्र एकत्र वरच्या दिशेने जाण्यासाठी निघतात नम्रताचे हावभाव बदललेले बघून तृप्ती ला आता पूर्ण खात्री होते की हिने काहीतरी गडबड नक्कीच करून ठेवलेली आहे

सगळे मित्र एक एक करून रूम चेक करत असतात तेवढ्यात त्यांना एक रूम अर्धा उघडा दिसतो

रिंकी आता शेवटचा रूम राहिला आहे चला तिकडे जाऊन बघू या सगळेजण आता त्या दिशेने जातात...... आणि तिकडचा दृश्य बघून सगळे दरवाजाजवळच स्तब्ध उभे रहातात स्वप्निल तर पूर्ण कोसळून गेलेला असतो..... उज्वला पळतच येऊन बेडवर असलेली चादर राधिकाच्या अंगावर टाकते तिचे पूर्ण अंग झाकते.....सचिन आणि बाबू दोघे पळत  संदीपच्या सुद्धा अंगावरती चादर टाकतात.....

तृप्ती रागाने नम्रता कडे बघते आणि तिच्या जवळ जाऊन एक सनसनीत तिच्या कानाखाली देते......

नम्रता तिच्यावरची धावून जाते तशी तृप्ती तिला मागे धक्का देते......

नम्रता :  रागातच तुझी हिम्मतच कशी झाली माझ्या वरती हात उगारण्याची.....

तृप्ती :  मी तुला स्पष्टीकरण द्यावं यासाठी मी बांधील नाही आहे आणि मी हे का केलं याचं उत्तर तुझ्याकडे आहेच

नम्रता बघितलं स्वप्निल आता हेच बघायचं बाकी होतं काय करून ठेवलं हे राधिका ने .....

बाबू : माधुरी खाली जा आणि दोन लिंबू पाणी घेऊन ये लवकर जा.. . .( बाबू च्या सांगण्यावरून माधुरी पळतच खाली जाते आणि दोन लिंबू सरबत घेऊन वर येते)

राधिका आणि संदीप यांना हळूहळू लिंबू सरबत पाजला जात होता कारण ते दोघेही शुद्धीत नव्हते

बाबू नजरेने माधुरीला राधिकाला दुसऱ्या रूम मध्ये घेऊन जा सांगतो उज्वला रिंकी माधुरी तिला सांभाळत घेऊन जातात.......

नम्रता सुद्धा थोड्यावेळ रूमच्या बाहेर येते....इकडे सचिन आणि बाबू मिळून संदीपची  अवस्था नीट करतात.....स्वप्नील एकाच जागी खाली कोसळुन बसलेला असतो....त्याला तर आता सहनच होत नसत....

बाबू सचिनला सांगून घरी कळवायला सांगतो की आज जरा लेट होईल म्हणुन सांग......तसं सचिन करतो.....कमीत कमी एक तासा नंतर ..... संदीप डोकं धरून उठण्याचा प्रयत्न करतो बाबू आणि सचिन त्याला आधार देतात स्वप्नील रागाने संदीप कडे बघत असतो ...... जिकडे माधुरी तृप्ती ..... रिंकी आणि राधिका असते तिकडे सुद्धा सेम सिच्युएशन असते

राधिका :(डोकं धरून )एका कोपऱ्यात बसते तृप्ती मी इकडे काय करते..... आणि बाकीचे फ्रेंड्स कुठे गेले.....

सगळ्या मैत्रिणी एकमेकांचे चेहरे बघत असतात त्यांना सुद्धा कळत नसतो आता कोणाला काय उत्तर द्यावे

राधिका:( काळजीने )तुम्ही सगळ्या मिळून मला असे का बघतात काही झालंय का आणि डोकं पण अचानक एवढं का जड झालंय मला स्वतःलाच कळत नाही....

उज्ज्वला राधिका च्या बाजूला बसते राधिका तुला खरच काही आठवत नाही का गं( काळजीने विचारते) म्हणजे तू इथे वर कशी काय आली...?????

राधिका :  डोक्याला हात लावत बोलते मला स्वतःलाच नाही माहित मी इकडे कशी आली ते....... पण तुम्ही हे सगळे प्रश्न मला काय करतायेत काही प्रॉब्लेम झाला का

( राधिका च्या प्रश्नावर कोणी काहीच बोलत नाही नाही तिकडे सुद्धा काही वेगळी हालत नसते)

स्वप्निल संदीप काही बोलायच्या आत उठतो आणि त्याच्या कानाखाली लावतो..... बाबू आणि सचिन स्वप्निल ला सांभाळण्याचा प्रयत्न करतात पण तो त्याच्या रागावर कंट्रोल करू शकत नव्हता सहाजिकच होतं त्याने जे दृष्य पाहिलं त्याच्याने कोणालाही राग येईलच......

संदीप : तु मला कानाखाली का मारलीस मी काय केलं...( काळजीने विचारतो)

स्वप्निल (रागातच )हे तू मला विचारतोयस जे प्रश्न तुला पडायला पाहिजे ते प्रश्न तू मला विचारतोयस अरे लाज कशी नाही वाटली हे सगळं करताना..... मला तर तुला माझा मित्र म्हणून बोलायची सुद्धा लाज वाटते( स्वप्निल परत जातो आणि संदीप ची कॉलर पकडतो..... नम्रता ला हे बघून मज्जा येत असते)
संदीप  : लाज आणि मला मी काय केलं असतं ज्याने मला लाज वाटेल कोणी मला काही सांगेल का काय चालू आहे इथे.....( तिथे घडलेला सगळा प्रकार बाबू आणि सचिन संदीप ला सांगतात संदीपच्या तर पायाखालची जमीनच सरकून जाते)

( सेम तसंच उज्वला रिंकी आणि माधुरी तृप्ती या सगळ्या मिळून राधिका ला घडलेला प्रकार सांगतात राधिका सगळं काही ऐकून भोवळ येऊन खाली पडणारच तेवढ्यात तिला तिच्या मैत्रिणी सांभाळतात)

( काय मग वाचकांनो कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कमेंट द्वारे)








🎭 Series Post

View all