Login

अविश्वास त्याचा अंतिम (पार्ट 21)

अविश्वास त्याचा अंतिम (पार्ट 21)



स्वप्निल कामावर जायच्या आधी त्याचे पेपर त्याच्या वकिलाकडे देऊन जातो

स्वप्निल ला आता राधिका आणि स्वराची जिम्मेदारी हवी असे तो त्याच्याबरोबर घडलेला सगळा प्रकार त्याच्या आई-वडिलांना सांगतो त्यांना सुद्धा हे सगळं ऐकून धक्का बसतो स्वप्निल पुढे जे काही करणार आहे त्याच्यासाठी त्याच्या आई वडील त्याला साथ देतात त्यामुळे तो निश्चिंत असतो...... नम्रताला ऑलरेडी तिची चूक कळलेली असते त्यामुळे ती कितीही काहीही बोलली तरी त्याचा कोणताच उपयोग होणार नव्हता किंवा त्याचा काहीच फरक स्वप्नील वरती पडणार नव्हता

हा घटस्फोट नम्रता आणि स्वप्निलच्या मर्जीने होत असल्यामुळे तो म्युचल घटस्फोट असतो.... त्यामुळे त्यांना तो सहा महिन्यातच बिना कोणाच्या तक्रारीनुसार मिळत असतो

फायनल पेपर वरती सही  बाकी असते तेव्हा स्वप्निल नम्रताला कोर्टामध्ये बोलून घेतो अखेर तो दिवस उगवतो..... कोर्टामध्ये स्वप्निल चे सगळेच मित्र-मैत्रिणी आलेले असतात राधिका स्वतःहून एकटी आलेली असते थोड्याच वेळात नम्रता तिथे पोहोचते नम्रताला तिकडे बघून सगळे एका जागी चुपचाप उभे असतात..... राधिका आणि स्वप्निल ला एकत्र बघून नम्रताला थोडं वाईट वाटतं पण ती तसं काही दाखवत नाही नम्रता थोड्याच वेळात तिच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये जाते

नम्रता : ( संदीप ला) संदीप मला माफ कर...... मला माहित आहे माझी चुकी माफ करण्यासारखि नाही आहे..... पण काय करू स्वप्नील च प्रेम दुसरं कोणावर तरी आहे हे कळल्यावर ती माझा माझ्यावर ताबा नाही  राहिला ....त्याला माझं करण्यासाठी मी सगळे प्रयत्न करत होती पण ते सगळे फेल होत होते.... म्हणून मी हा रस्ता निवडला ....पण बघ ना शेवटी खऱ्या प्रेमाची जीत झाली... एक म्हण आहे जसे करावे तसे भरावे तेच माझ्याबरोबर झाल... मी जे केलं त्याचा नतीजा आज माझ्यासमोर आहे आहे..... मी राधिका बरोबर तुझे पण।खूप मोठे नुकसान केलं ज्याच्यामुळे तुझा मित्र तुझ्यापासुन लांब झाला..... तृप्ती तू तर मला खूप चांगली ओळखत होती..... पण मी अशी सिच्युएशन तयार करून ठेवली ज्याने करून स्वप्निल ला माझ्यावरच विश्वास होईल पण बघ ना त्यांचं प्रेम खरं होतं म्हणून आज ते दोघे एकत्र आहे हे मी इकडे मला जमलं तर सगळे जण मिळून प्लीज माफ करा मी याच्यापुढे कधी तुमच्या आयुष्यात येणार नाही प्रॉमिस....

तृप्ती : जे झालं ते झालं आता परत हा विषय नको.... हा विषय परत नजरेसमोर आला तरी जीव घाबराघुबरा होतो.... त्यामुळे परत नको हा विषय आणि आम्ही सगळ्यांनी तुला माफ केला आहे  त्यामुळे काही बोलण्याचा प्रश्नच येत  नाही

तेवढ्यात नम्रता आणि स्वप्नील चे वकील त्यांना फायनल सिग्नेचर साठी बोलावतात ....
फायनल सिग्नेचर करताना वकील त्यांना विचारतो

वकील :  तुमच्या दोघांचा डिसीजन फायनल आहे... मॅडम तुम्हाला काही बोलायचं आहे आता

नम्रता एक नजर स्वप्निल वर टाकते स्वप्निल सुद्धा तिलाच बघत असतो... ती मानेनेच नकार दर्शवते

वकील :  सर तुम्हाला काही बोलायच आहे

स्वप्निल  : नाही

वकील त्याची फायनल प्रोसिजर करायला घेतो ...₹तो सांगेल तिथे तिथे हे दोघं सही करतात आणि शेवटी फायनल सिग्नेचर होती आणि या दोघांचा घटस्फोट होतो .....कागदपत्र पूर्ण झाल्यानंतर सगळे बाहेर येतात.....

नम्रता: स्वप्नील जवळ येते स्वप्निल तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी ऑल द बेस्ट याच्यापुढे आपला काहीच संबंध नसणार तुला पुढे जो डिसिजन घ्यायचा आहे तो तुझाच असणार राधिका आणि स्वप्नील मी पुन्हा एकदा तुमच्याकडे मनापासून माफी मागते जमलं तर मला नक्की माफ करा.... मी येते

नम्रता निघायला बोलते तसं तिच्या डोळ्यातून पाणी यायला निघत..... ती परत मागे वळते आणि जोरात जाऊन स्वप्नीला मिठी मारते ......राधिकाला कळत असत सध्या जी तिच्यावरती परिस्थिती ओढावली आहे ती सुद्धा काही कमी नाही.... मी जसं प्रेम केलं तसं तिने सुद्धा एकेकाळी स्वप्निल वर प्रेम केलं होतं पण तिने जो रस्ता निवडला होता तो चुकीचा होता त्यामुळे आता आपण तिला कोणत्याच प्रकारची मदत करू शकत नाही.... सगळे मित्र फक्त तिला बघु शकत होते तिला कोणत्याही प्रकारची मदत करू नव्हते शकत.......

नम्रता एकटक स्वप्नीलला बघत असते राधिका नम्रताला त्याच्याजवळ बघून थोडी लांब होते

सुन सजना सजना सजना
ओ मुझे एक पल चैन न आये
मुझे एक पल चैन न आये
सजना तेरे बिना सजना तेरे बिना
मेरे दिल को कुछ नहीं भये
मेरे दिल को कुछ नहीं भये
सजना तेरे बिना सजना तेरे बिना
सजना तेरे बिना

मुझे एक पल चैन न आये
ओ मुझे एक पल चैन न आये
सजना तेरे बिना सजना तेरे बिना

अखियाँ मिलाके तूने जाने
की ये कैसी बात
हाथ की मेहँदी मेहके माहि
अब तोह सारी रात

तू मेरी जान है तू मेरी धड़कन
तू है मेरी ज़िन्दगानी
मिलके लिखूँगा साथ में तेरे
इस जीवन की कहानी
जुदाई जुदाई ओ कभी आए न जुदाई
जुदाई जुदाई ओ रब्बा आये न जुदाई

नम्रता रडत च तिची  पावले मागे घेते....आणि सगळ्यांना हात हलवून निघून जाते..... सगळेजण थोड्यावेळाने आपापल्या घरी निघून जातात

@@@@@@@@@@@@@@

थोडे दिवस निघून गेल्यानंतर स्वप्निल राधिका ला फोन करून तो आज तिच्या घरी येणार आहे हे सांगतो.... त्याला तिच्याबरोबर थोडं महत्वाचे बोलायचं असतं

कमीत-कमी नऊच्या सुमारास स्वप्निल राधिकाच्या घरी येतो स्वप्निल ला बघून स्वराज त्याच्याजवळ  धावतच येतो

स्वराज :  पप्पा तुम्ही आज काहीच नाही आणलं माझ्यासाठी???

स्वप्निल  : असं कसं होईल मी माझ्या बाळा साठी काही न आणता कसाकाय घरी येईल

स्वराज : म्हणजे तुम्ही आज माझ्या साठी परत गिफ्ट आणलं

स्वप्निल  : हो आणलं ना हे घे हे तुझे एबीसीडी चे बुक्स आता तू मोठा झालास ना  मग तू जसा खेळतो तसाच स्टडी सुद्धा करायचा म्हणजे तुला मोठं होऊन जे बनायचे ते तू बनशील

स्वराज  : अरे वा मला आवडतं स्टडी करायला मी हे माझे बुक्स माझ्या फ्रेंड्स ला पण शेअर करणार चालेल ना पप्पा

स्वप्निल  : हो नक्की तर पण आता खूप रात्र झाली आहे तुझं जेवण सुद्धा झालं असेल आता तू जाऊन थोडा आराम कर आपण उद्या परत भेटू

मीनाताई आतूनच ह्या दोघांचं संभाषण ऐकत असतात त्या स्वराज्याचा आवाज देऊन खोलीमध्ये घेऊन जातात

थोड्या वेळातच मीनाताई बाहेर येतात

स्वप्नील  : राधिका अजून आली नाही का...????

मीनाताई  : मगाशी फोन आलेला ती निघाली होती ....रस्त्यात ट्रॅफीक असेल ना म्हणून अडकली असेल...


एवढ बोलतच राधिका मागून येते

राधिका : (थोडी हसतच )सॉरी सॉरी सॉरी थोडा वेळ झाला रस्त्यामध्ये ट्राफिक होता ना म्हणून मी हात पाय धुऊन आले मग आपण बोलू या

मीनाताई : आज कितीतरी वर्षानंतर मी राधिकाला थोडं हसताना  पाहिले हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं स्वप्नील

स्वप्निल : मी तर काहीच नाही केलं आहे जे केलं ते सगळं नियतीने केलं उलट आम्ही तर तिला फक्त दुःखच देत आलो आहे

मीनाताई  : जे झालं ते झालं परत परत विषय नको जेणेकरून आपल्याला फक्त त्रास होतो

राधिका फ्रेश होऊन बाहेर येते मीनाताई तिला पाणी आणायला जातात

राधिका :  हा बोल ना स्वप्निल तुला काहीतरी बोलायचं होतं

स्वप्निल : उद्या आई-बाबा येत आहेत आपल्या दोघांच्या लग्नाची बोलणी करायला (स्वप्निल्स बोलणे ऐकून राधिका थोडी शांत होते)

स्वप्निल  : काळजी नको करू त्यांना मी सगळं आधीच सांगून ठेवलेलं आहे..... त्यामुळे ते लोक आपला पुढचा डिसिजन घेण्यासाठी इकडे येत आहे

राधिका  : ते लोक मला एक्सेप्ट करतील का ...????

स्वप्निल  : का नाही करणार जी गोष्ट तू केलीच नाही त्याची शिक्षा तुला का मिळणार.... आणि त्या लोकांना सुद्धा माझं म्हणणं पटलं आहे

राधिका:  तू काय बोललास...?(काळजीत विचारते)

स्वप्निल मी त्यांना सांगितलं आहे मला तुझ्या बरोबर लग्न करायच आहे ..... जी गोष्ट खूप आधीच व्हायला हवी होती ती खूप उशिरा होते .....याची मला खंत वाटते पण आता उशीर करून चालणार नाही तुला माझ्यामुळे बरच काही भोगावा लागला आहे.... याच्यापुढे तुला माझ्याकडून कोणताच त्रास होणार नाही.... आई बाबा आता दोघेही बस मध्ये बसले आहे ....सकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचतील मी त्यांना उद्या बारा वाजेपर्यंत तुझ्या घरी घेऊन येतो तुला जमलं तर तू उद्या घरी राहा मी सुट्टी टाकलेली आहे.....

राधिका :  ठीक आहे मी उद्या घरीच राहते

मीनाताई  : उद्या ताईच्या सगळ्यांचं जेवण मी इकडेच  बनवते

स्वप्नील : जशी तुमची इच्छा आई आम्ही वेळेवर

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

दुसऱ्या दिवशी स्वप्नील त्याच्या  आई-वडिलांना घेऊन वेळेवर राधिकाच्या घरी पोहोचतो

मीनाताई त्यांना पाणी आणून देते  त्यांची विचारपूस सुद्धा करतात

तेवढ्यात राधिका बाहेर येते...... राधिका स्वप्निलच्या आई-वडिलांना वाकून नमस्कार करते

स्वप्नीलचे वडील : आम्हाला स्वप्नीलने......सगळ्या गोष्टीची कल्पना आधीच दिलेली आहे.... जे तुझ्याबरोबर घडलं ते खूप चुकीचं घडलं ......आम्हाला अजूनही या गोष्टीवर विश्वासच बसत नाही की नम्रता असं काही करेल ....कारण ती आमच्याबरोबर वागायला एकदम बरोबर होती.....पण तिच्या मनात काय होतं ते तिने तिच्या कृत्यातून करून दाखवल आणि आज तिला त्याच गोष्टींची शिक्षा मिळाली......

स्वप्नील ची आई : हो ना तिला तर तिचे शिक्षा मिळाली पण आता आम्हाला तुला शिक्षा नाही द्यायची... आम्हाला तुझा आणि स्वप्नीलचा लवकरात लवकर लग्न करायचा आहे आम्ही नम्रता मुळे आमच्या नातवापसून सुद्धा खूप लांब राहिलो..... पण तो आहे कुठे आल्यापासून  दिसला नाही
राधिका :  आहे तो आत मध्ये थांबा मी त्याला घेऊन येते

राधिका थोड्याच वेळात स्वराज्यला बाहेर घेऊन येते

स्वराजला बघून स्वप्नील च्या आईच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्या त्याच्या जवळ जातात.... त्या भरभरून त्याला प्रेम देतात

स्वप्नील ची आई : अगदी त्याच्या वडिलांना सारखाच दिसतो फक्त नाक तुझं घेतले त्याने...

स्वराज  : (नाक मुरडत) नाही मी माझ्या मम्मा सारखा दिसतो हो की नाही मम्मा

राधिका :  स्वराज मोठ्यांना असं नाही बोलायचं सॉरी बोल त्यांना

स्वराज कानाला हात लावून स्वप्नील च्या आईला सॉरी बोलतो :  सॉरी आजी

स्वराज स्वप्निलच्या आईला आजी बोलला त्यामुळे त्यांचे मन भरून येतं आणि त्याला त्याला मिठी मारतात : काय चूक होती या लहान जीवाची ज्याला एवढं भोगावं लागलं.... आता यापुढे कोणतच दुःख तुझ्या आणि तुझ्या आईच्या वाटेला येणार ना नाही .....आहो जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर यांचं लग्न करून द्या म्हणजे आपण हक्काने या दोघांना आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो

स्वप्निल : आई मी काय बोलतोय माझी अशी इच्छा आहे की आम्ही कोर्ट मॅरेज करावं

राधिका :  माझी सुद्धा हीच इच्छा आहे.. जीवनामध्ये एवढे सगळे प्रॉब्लेम्स  येऊन गेले आता मला नव्याने सुरुवात करायची आहे .....पण आम्हाला लग्न कोर्ट मॅरेज करायचा आहे

स्वप्निल चे वडील  : जशी तुमची इच्छा.. जमलं तर आधी रजिस्ट्रेशन करून  येऊया .....वाटलं तर मी उद्याच स्वप्निल बरोबर जाऊन येतो ....ज्या दिवशी ची तारीख मिळेल त्या तारखेवर त्यांचं लग्न लावून देऊया

सगळ्यांच्या संमतीने दुसऱ्या दिवशी स्वप्निल चे वडील स्वप्निल बरोबर कोर्ट मध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करून येतात त्यांना बरोबर पंधरा दिवसानंतर ची तारीख मिळते
ही बातमी  स्वप्नील सगळ्या मित्रांना सांगतो ......सगळे मित्र मैत्रिणी त्या दोघांसाठी खूप खुश असतात .....पंधरा दिवसानंतर त्यांच्या लग्नाची वेळ येते.... अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे लग्न होतं.... मीनाताईंच्या डोळ्यातील पाणी आज काही थांबायचं नाव घेत नव्हतं त्यांची लेक आज हव्या त्या व्यक्तीबरोबर तिचा संसार थाटणार आहे..... हीच त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती ... राधिका आणि स्वप्नील च्या लग्नाला त्यांचे मित्र मैत्रिणी सुद्धा हजेरी लावतात

लग्न झाल्यानंतर सगळेच जण जेवायला बाहेर जातात ..... जेवण झाल्यानंतर निघण्याची वेळ येते त्यावेळेस राधिका मन भरून रडते ......स्वप्निल मीनाताईंना राधिकाला कायमचं सुखी ठेवेल असे आश्वासन देतो......

सगळेजण त्यांना मनापासून त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी आशीर्वाद देतात ....आज राधिका पूर्णपणे स्वप्नीलची होती तिला तर अजूनही विश्वास नव्हता कि तिचं लग्न झालं ते पण त्या व्यक्तीबरोबर जिच्यावर तिने जीवापाड प्रेम केलं आज तीचा अविश्वास हा विश्वासात झाला

(काय मग वाचकांनो कसा वाटला अंतिम भाग नक्की कळवा तुमच्या कमेंट द्वारे थोड्याच दिवसात मी एक आगळी वेगळी कथा घेऊन येत आहे पण त्याच्या साठी तुम्हाला वाट पहावी लागेल मी आशा करते तू मला माझ्या पुढील कथाही आवडतील तुम्ही माझ्या या कथेला भरभरून प्रेम दिलं त्यासाठी मी तुमची ऋणी राहील तुमच्या या प्रेमासाठी आणि तुमच्या विश्वासाठी मी नक्कीच तुमच्या आवडीच्या कथा घेऊन येत राहील..... धन्यवाद)



















🎭 Series Post

View all