आर्या.... भाग 11

आर्या
 (भाग ११)



             आज विश्वास आणि रमाचे लग्न होते..संपूर्ण गावामध्ये पत्रिका वाटण्यात आली होती..
        लग्न रमा चा गावी असल्यामुळे नवर देवाची वरात तिकडे जाणार होती. गावची च नाही तर तालुक्यातील प्रशस्त व्यक्ती आज या लग्नात उपस्थित राहणार होते. त्यासाठी सकाळपासून माधवराव यांचा वाड्यात लगबग सुरू होती..

          आर्या ,,आर्या , आवरले का तुझे.वरात निघाली केव्हाच चल लवकर..मामी ने आर्या ला आवाज दिला..परंतु ती अजून हि काम करण्यात बिझी होती..

मामी तुम्ही सर्व निघा. मला वहिनी चा स्वागताची तयारी करायची आहे. आर्या.

अग पण. मामी काही बोलणार विलास तिथे आला.

        आई तुम्ही निघा.मी येतो आर्या ला घेऊन .
त्याचा बोलण्याने मामी चा जीव भांड्यात पडला. त्यातच आई ही तिकडे आली .तिने ऐक नजर आर्या कडे पाहिले.तिने लूज टी शर्ट व गुढग्यापर्यंत ट्रऊजर घातली होती.

      अग ये करटे...आज तुझा भावाचे लग्न आहे. हे अस   ध्यान घेऊन तिकडे येऊ नको...जरा मुलीचा जातीला शोभेल असे कपडे घालून ये. आई बोलली तशी आर्या हसायला लागली.

       जो हुकूम मातोश्री...आज तुमची ही कन्या असा वेश धारण करून येईल की , संपूर्ण मांडवात लोकांचे लक्ष फक्त माझावर असेल... तिथे माझा मूळे स्वयंवर नाही झाले म्हणजे मिळवले... आर्या म्हणाली तसे आई ने डोक्याला हात लावला .

तुझ्या तोंडी लागणे म्हणजे विहरित जीव देण्यासारखे आहे. आई वेतागुन तेथून निघून गेली.

    संग्राम चा घरी ही लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. आबा साहेब हे गावचे मनी प्रस्त होते...म्हणून आज मोठमोठे नेते , उद्योगपती या लग्नाला हजार राहणार होते...आणि त्याचा घरचे हे पाहिले लग्न असल्यामुळे लग्नात कशाचीही कमी नव्हती... घराचा बाहेर मोठा मांडव टाकण्यात आला होता... बँड पथक , वाजत्री यांचा आवाज सार्विकडे घुमत होता... जेवणाचा सुगंध सर्वी कडे घुमला होता... रमाचे लग्न हे त्याचं गावातील मोठ्या हॉल मध्ये करण्यात येणार होते.


   माई रमा चा रूम मध्ये गेल्या... मुली तिला तयार करत होत्या. माई ची नजर तिच्यावर गेली तसे तिला भरून आले...भरजरी लाल कळतच शालू...त्यावर सोन्याचे दागिने... नाकात नथ , केसांचा अंबाडा त्यावर मोगराचे गजरे व हातात हिरवा चुडा मेहंदीच्या हातावर आणखी खुलून दिसत होता... माई तिचा जवळ आल्या व तिचा चेहऱ्यावरून बोटे मोडली.

       माझीच नजर लागेल...खुप  सुंदर दिसत आहे....माई.

     नाही माई...आज तुमची नजर नाही लागणार..आज रमा  वर फक्त विश्वासराव यांची नजर असणार आहे... ते असताना कोणाची नजर लागले शक्य नाही... रमा ची मेत्रिन म्हणाली तसे सर्व हसले.  तसे सगळे रामाला चिडवू लागले..

       रमा तर लाजून अजून गुलाबी झाली होती.आधीच लग्न ची लाली तिचा चेहऱ्यावर चढली होती.

    चला चला , नवरदेव ची वरात अली. एक मुलगी ओरडली तसे सर्व मुली पळत बाहेर गेल्या.

    माई ही नवर देवाचे औषण करायला बाहेर गेल्या.... आता रूम मध्ये रमा ऐकती होती... तिचा जीवाची घालमेल सुरू होती.

       कारण लग्न ठरले पासून विश्वास आणि तिचे जास्त बोलणे झाले नव्हते... दोघे अजून तरी अनोळखी होते... लग्न नंतर दोघे ऐकदुसऱ्यांना समजून घेतील का. हा विचार तिचा मनात येत होता...म्हणून ती अस्वस्थ झाली होती.

       नवरदेव दारात आला...तसे माई ने त्याला ओवाळले व अस्त घेतले...सर्वाचा नजरा त्याचा वर खिळल्या होत्या.

दिसायला आधीच रुबाबदार विश्वास. क्रीम कलर चा शेरवानी मध्ये आणखी राजबिंडा दिसत होता...सर्व रमा चा नशिबाचे कौतुक करत होते..  सर्व पाहुणे आत आले.

      आबा साहेब माधवराव आणि गावचे काही प्रतिष्ठित व्यक्ती यांचा सत्कार केला...संग्राम ही आलेल्या पाहुण्याचे स्वागत करण्यात व्यस्त होत्या..परंतु त्याची नजर कोणालातरी शोधत होती...सर्व आले आहेत मग ही आर्या कुठे राहिली हा विचार त्याचा मनात येत होता...त्यामुळे त्याचे कशात लक्ष लागत नव्हते.

माई ही नवरदेवाच्या मंडळी चे ओळख करून देत होत्या...की ,त्यातच आत्या बाई तिथे आल्या व त्यांची नजर आर्या च आई वर पडली...काहीवेळा साठी दोघी एकमेकांचा नजरेत पाहत होत्या..जसे काही दोघींची खूप आधी पासून ओळख आहे...
आर्या ची आई आत्या सोबत बोलायला जाणार आत्याबाई ने तिचा कडे रागात पाहिले व तेथून निघून गेल्या...तसे तिला खूप वाईट वाटले.


      लग्न घटिका जवळ आली होती.. ब्राह्मण ने नवरी मुलीला आणण्यासाठी सांगितले...तसे काही मुली रमा ला घेऊन खाली आल्या...विश्वास तर तिचे निरागस सौदर्य डोळ्यात साठवून घेत होता... खरच किती सुंदर दिसत होती ती... सर्वच नजरा तिचा कडे होत्या. अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा वाटत होतं दोघांचा.


संग्राम अजून हि बाहेर पाहत होता... आर्या ला कोण काही बोलले तर नसेल ना...नाहीतर घरचे लग्न आणि ती येणार नाही असे कसे शक्य आहे...म्हणून तो अस्वस्थ होता.


काय रे काय झालं.तुझ लक्ष कुठे आहे....महेश त्याचा जवळ येत म्हणाला.


    ती आर्या अजून कशी आली नाही...तिचीच वाट पाहतोय... संग्राम पटकन बोलून गेला व शांत बसला.


तरीच मला संशय आला होता..
ही तीच आहे ना, जी त्यादिवशी आपल्या घरी आली होती... मला तेव्हाच संशय आला होता दाल में कूछ काला हे...महेश हसत म्हणाला.


असे काही नाही... मी असेच म्हणालो..
कारण ती नवरदेवाची बहिण आहे ना...संग्राम काहीतरी बोलायचे म्हणून म्हणाला.


     अस होय, हे पहा संग्राम ...मी तुझा भाऊ आहे.... माझाशी ही बनवाबनवी करू नकोस...आणि हो मनात जे असेल ते लगेच बोलून मोकळा हो.नाहीतर दुसरं कोणी येईल आणि तिला घेऊन निघून जाईल... महेश म्हणाला तसे संग्राम ने त्याचा कडे रागात पाहिले..
तो काही बोलणार त्याची नजर दरवाजा चा दिशेने गेली
आणि तो पाहतच राहिला.


     मोकळे लांब केस, चेहऱ्यावर हलकासा मेक अप, गुलाबी कलर ची सुंदर भरलेली साडी, हातात मॅचिंग बांगड्या, कानात झुमके व चेहऱ्यावर डाईमंड ची टिकली...संग्राम ची विकेट कधीच पडली होती
आपण स्वप्नात तर नाही ना.असे त्याला वाटत होते
कारण समोर दुसरी तिसरी कोणी नसून आर्या उभी होती
ते ही चक्क साडीत....फक्त तोच नाही तर घरचा कोणालाही विश्वास होत नव्हता...की ती आर्य आहे...सर्व डोळे मोठे करून फक्त तिलाच पाहत होते.


अहो वन्स; ही आपली आर्या आहे ना.... मामी.


    माझातर माझा डोळ्यावर विश्वास बसत नाही...
हीचामध्ये इतका बदल झालं कसा...आई अजुनही शॉक मध्ये होती.


      भटजी ने मंत्र बोलायला सुरुवात केली. मंगलाष्टे सुरू झाले....अंतरपाट दोघांचा मध्ये धरला गेला.... आर्या आपली ऐका बाजूला उभी राहून दोघांवर अक्षदा टाकत होती
त्यातच संग्राम तिचा बाजूला येऊन उभा राहिला.


खुप सुंदर दिसत आहे साडीत...  संग्राम तिच्याकडे पाहत म्हणाला तशी तिने लाजून मान खाली घातली... तिची ही अदा त्याला खूप आवडली.


ते लग्न आहे म्हणून....  नाहीतर नेहमी थोडी मी साडी नेसनार आहे.... आर्या.


आता नाही, परंतु लग्न नंतर तुला साडी नेसावी लागेल....मला तूला साडीत पाहायला आवडेल.. तो म्हणाला निघून गेला... .आर्या त्याचा बोलण्याचा विचार करू लागली.


          असे का बोलत होते हे.... यांना नक्की काय बोलायचे होते. यांना का मला साडीत पाहायला।आवडेल म्हणजे लग्नानंतर हे मला ... ओहह संग्राम एव्हढे कसे बिनधास्त बोलून जातात हो तुम्ही... ,मला तर विचार करायला पण वेळ देत नाही.. आर्या एकटीच विचार करत उभी होती..


        लग्न एकदाचे पार पडले...सर्व जेवण करण्यासाठी बसले होते. आर्या ही माई ना जमेल ती मदत करत होती..जे आत्या ला अजिबात आवडत नव्हते.


       मेनका जा...संग्राम ना जेवायला बसायला सांग आणि हो ...तुझा हाताने त्याला जेवण वाढ. आत्या बोलली जे आर्या ने ऐकले ...जे तिला अजिबात आवडले नाही.


       मेनका गेली व संग्राम आणि महेश ल जेवायला बसवले
बाकी सर्व जण ही जेवण करण्यासाठी बसले होते.


       मेनका जशी वाढायला घेणार आर्या तिथे आली
Excuse me. तुझे नाव मेनका आहे ना.... आर्या.


हो, काही काम होत का... मेनका.

तुम्हाला आत मध्ये माई बोलवत आहेत.ते ही अर्जंट....आर्या.

यांना आधी जेवण वाढते नंतर जाते...मेनका.

त्यांनी आताच बोलवले आहे.नाहीतर मी कशाला आले असते... आर्या म्हणाली तसे ती निघून गेली..
संग्राम आणि महेश दोघींची गंमत पाहत होत्या... संग्राम ला ऐक मात्र समजले की ती खोटं बोलत आहे.


आर्या ने त्याला व महेश ल वाढायला सुरुवात केली तसे त्यांनी शेजारची प्लेट मध्ये ही जेवण वाढायला सांगितले...तिला वाटले कोणी येणार असेल म्हणून तिने वाढले .

बस आता... .संग्राम.

काय....आर्या.

तुला ऐकायला कमी येते का ?... .तू ही अजून जेवली नाही...बस आमचा सोबत .....संग्राम.

अस काय करताय....कोणी पाहिले तर काय बोलेल... आर्या आजूबाजूला पाहत म्हणाली.

      तू केव्हापासून लोकांचा विचार करू लागली.. संग्राम म्हणाला व तिला हाताला धरून स्वतःचा बाजूला बसवले...तिला खूप संकोच वाटतं होत...पण ती काहीही न बोलता गप्प जेवण करू लागली.

     महेश ही अधून मधून दोघांना पाहत होता.त्यांना पाहून त्याची खात्री पटली होती.... की दोघांचे ही एकमेकांवर प्रेम आहे....फक्त ते अजूनही व्यक्त झालेले नाही.... दोघांमध्ये अजून हि अबोला आहे जो लवकर तुटला पाहिजे.


       दोघे जेवण करतच होते....की मेनका तिथे आली.दोघांना एकत्र जेवताना पाहून तिची तल पायाची आग मस्तकात गेली.... कारण तिला समजले होते की आर्या खोटं बोलली आहे....पण का हे तिला समजत नव्हते... तुला याची किंमत मोजावी लागेल आर्या..
मेनका स्वतःशी बोलली व पाय आपटत तेथून निघून गेली.


        लग्न निर्विघ्न पार पडले... आता रमाचा पाठवणीची वेळ जवळ आली होती...म्हणून सर्वांना भरून आले होते....माई तर आतापासूनच रडायला लागल्या होत्या....ते पाहून मामी ,आर्या ,आई सर्वाचे डोळे भरून आले होते.शालू ने कसेतरी दोघींना सावरले.


        रमा ही आता मोठमोठ्याने रडत होती. संग्राम ची हालत ही वेगळी नव्हती.... आज पहिल्यांदा त्याची बहीण त्याचा पासून दूर चालली होती.ते ही कायमची. म्हणून त्याला भरून आले होते.... आर्या ने त्याला डोळ्यानेच आश्वस्त केले की काळजी करू नका मी आहे... संग्राम ने हलके हसत मान हलवली...


     तुम्ही वहिनी ची काळजी करू नका.... जोपर्यंत मी आहे वहिनी चा केसालाही धक्का लागणार नाही...असे समजा आजपासून ती माझासाठी माझी मोठी बहीण आहे....आर्या म्हणाली तसे सर्वांना धीर आला... माई ने तिचा डोक्यावरून हात फिरवला.

      सर्व परतीचा प्रवास साठी निघाले... सर्व गाडीत बसत असताना ऐक गोष्ट मात्र कोणाचा लक्षात आली नाही ..ती ही की मेनका ही त्याचा सोबत निघाली होती


आता या मागे तिचा उद्देश काय आहे हे त्या देवालाच माहित....पण काहीतरी मनात पक्के करून ती निघाली होती हे खरे.

🎭 Series Post

View all