अर्धवर्तुळ भाग 2(जलद कथामालिका स्पर्धा )

प्रस्तुत कथा ही रहस्यमय आहे.


भाग -2
# रहस्य कथा
त्या तीन काळ्या कापडाच्या बाहुल्या घेऊन त्याच्यात एक एक जीव टाकावा म्हणून प्रत्येकात एक जिवंत माश्या टाकल्या. 
हें सारे खुप घाई घाईत तो करत होता. गेटाच्या बाहेर तीन वर्तुळाकार खड्डे खोदून त्यात त्याने गुलाल टाकला. हें सारे कुणालाही दिसता कामा नये म्हणून वरून पटपट आटोपण्या मागे तो होता तसेच रात्रीचे बारा वाजेच्या आत त्याला हें सारे करायचे होते, कारण बारा नंतर अमावस्याची रात्र होणार होती.
*********

राजेश आणि सारिकाचे लव्ह मॅरेज होते. तसें ते अगोदर चांगले मित्र होते. त्यांची ओळख(लव्ह स्टोरी )सांगायची म्हणजे अगदीच रोमँटिक किस्सा.

*********
" तुम्ही ठीक आहात ना आता..? आय मी मला म्हणायची आहे की आत्ता बरे आहे ना...?"
सारिका ने  रिताला विचारलं. रिता म्हणजेच राजेशची लहान बहिण.
" हो. मी आता अगदीच बरी आहे खरं तर तुमचे खूपच उपकार आहेत माझ्यावर तुमच्यामुळेच तर माझा जीव वाचला." रिता बोलली.
" अहो, त्यात उपकाराचे काय..?खरं तर कर्तव्यचं होते ते माझे. "सारिका बोलली.
"बाय द वे, आज तुमची सुट्टी होणार आहे, मिस रिता."
"हो का, मग मी माझ्या भाईला कॉल करून इकडे बोलावून घेते, तोच घेऊन जाणार मला घरी."रिता
"का हो...? तुमचे बाबा नाही येणार का..?"
"हम्म. नाही, माझे बाबा ह्या जगात नाहीत आम्ही दोघीच असतो. "
"सो सॉरी , माझं चुकलं मी तुला तूमच्या बाबाविषयी  नको होत विचारायला."सारिका
तेवढ्यात रिता आपल्या भावाला कॉल करून घ्यायला सांगते.
" तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही जाऊ शकतात, नाही म्हणजे कालपासून तुम्ही माझ्या जवळच आहात, तुमचा वेळ नको वाया जायला म्हणून म्हटलं. "रिता बोलली.
" बाय द वे, तुमचे नाव काय हो, मी विचारायलाच विसरली...!"रिता
"सारिका, माझे नाव. पण सारे मला सरूच म्हणतात. तुम्ही ही मला त्याच नावाने हाक मारा."
" अरे वा...!!"खुपच छान नाव गं तुझं, आपण एकमेकांना अगं तु गं बोलू शकतो आता...
आणि माझं नाव रिता...
त्या दोघींमध्ये बराच वेळ गप्पा झाल्यानंतर चांगली मैत्री जमली. त्यातच रिताला सारिकाचा स्वभाव फारच आवडला. दोघीनी एकमेकांचा फोन नंबर घेतला.
बोलता बोलताच सारिकाच्या लक्षात आले  की रिताने कालपासून काहीही खाल्ले नाही.
" रिता मी तुझ्यासाठी काहीतरी, खायला घेऊन येते." म्हणत सारिका  रितासाठी  काहीतरी आणायला गेली.
येतांना सारिकाने ज्युस आणि काही सामोसे पार्सल घेतले. हॉस्पिटलच्या दारातच  तिला एक भर्गच  बांधा  असलेला,अतिशय देखणा, तुर्डक दाढी, हवेत उडणारे रेशमी केस असलेला एक सववीस वर्ष्याचा तरुण येऊन धडकला. त्याच्या धक्क्याने  सारिकाच्या हातातले ज्यूस आणि समोसे खाली पडले. तशी ती त्या तरुणावर चिडली, तिचा राग अनावर झाला होता.
" ओ मिस्टर, दिवसा ढवळ्या डोळे काय वर करून चालतात की काय तुम्ही..? तिच्या कडे बघून राजेश जरा लाजिरवानाच  झाला होता. तिचे ते देखणे अति सुंदर रूप बघून तो तिच्या डोळ्यातच हरवून गेला, तेवढ्यात त्याला आपल्या बहिणीची आठवण झाली, जिच्या करिता तो हॉस्पिटलमध्ये आला होता.
"माफ करा, चुकून धक्का लागला माझा, मी मुद्दाम नाही केल हें असं."एवढं बोलून तो तिथून निघू लागला.
" ओ मिस्टर, अगोदर चूक करायची मग नंतर सॉरी म्हणायचं हें आपल चांगला आहे तुमचं. "
सारिकाला तो फक्त सॉरी म्हटला हें बिलकुल आवडल नाही.
" हे बघा मी, अगोदरच सॉरी म्हटलो याबद्दल....
मला नाही वाटत की मी काही चूक केली असावी. " जरा तो रागातच बोलला.
" सॉरी म्हणून तुम्ही काही उपकार नाही केलेत माझ्यावर, किती नुकसान केले माहिती आहे तुम्ही माझे...?याचा अंदाज तरी आहे का..? मी कुणासाठी तरी हें घेऊन जात होती पण तुम्ही मात्र तेही वेस्ट केल.
आता कोण भरणार याचे पैसे..? त्याखाली पडलेल्या वस्तूंकडे बोट दाखवत सारिका रागात म्हणाली. तसें राजेश ने ही रागात येऊन तिच्या हातात शंभर रुपयाची नोट टेकली. हें बघून तर तिचा पारा आणखीनच  चढला.
" मी तुम्हाला काय भिकारी वाटली काय...?तुमच्यासारखे श्रीमंत घरातले  लोक असेच पैश्याने माणसांची किंमत करतात, माहीती आहे मला. "
हें ऐकून तर राजेशला आणखीनच खजिल  झाल्यासारखं वाटू लागलं, हॉस्पिटलमध्ये सारे त्याच्याकडे बघू लागले. तिचा तो चढलेला आवाज ऐकून तर आजूबाजूचे त्यांची गंमत बघू लागले.
"हें बघा मॅडम, तुम्ही ना आत्ता जरा जास्तच बोलता आहेत, मी जरा घाईत होतो म्हणून चुकून लागला धक्का तर त्यात एवढं काय...?" त्याच बोलण होत नाही तेवढ्यात तिचं बोलण सुरु झाले.
"ते काहीही असो...!! मला त्या बद्दल काहीही एक सांगू नका, तुम्ही लोक सुंदर मुली बघून असे धक्के मारतात. तुमच्या सारख्या लोकांना  मी चांगलीच ओळखून आहे."
हें सर्व ऐकल्यावर आत्ता राजेशचं राहिलं तरी काय...?? त्याने डोक्याला हात मारून घेतला, आणि वैतागल्या स्वरात हात जोडत म्हणाला, हें बघा अक्का बाई... मला जरा समजून घेणार का...? "
तरी तिचे आपले बोलणे सुरूच, तेव्हा मात्र त्याने एका हाताने तिचे तोंड दाबून ठेवले आणि समजावण्याचा प्रयत्न करू लागला.
ती त्याचा हात सोडण्याचा प्रयत्न करू लागली. डोळे मोठे करत.
" हें बघा मॅडम, मी खरचं सांगतो माझी काहीही एक चूक नाही,माझ्या बहिणीचा एक्सीडेंट झाला आहे आणि त्याच टेन्शनमध्ये मी घाई घाईत आलो होतो, त्यातच चुकून तुम्हाला धक्का लागला. "


कथेचा पुढील भाग क्रमशः
लेखिका :- सौं रुपाली बोरसे.
बघूया कथेच्या पुढील भागात  काय होते ते...

🎭 Series Post

View all