अर्धवर्तुळ भाग 1(जलद कथामालिका लेखन स्पर्धा )

प्रस्तुत कथा रहस्य कथा आहे यात प्रेम आणि भिती यांच्यातुन तयार होणारे रहस्यचा पाठपुरावा, म्हणजे अर्ध वर्तुळ कथा.
भाग -1
# रहस्य कथा
टिक, टॉक,  टिक,  टॉक, टिक,  टॉक  असा आवाज येत होता. भिंतीवरील घड्याळाच्या काट्यांचा तो क्षणभंगुर आवाज सर्वत्र शांतता विचलित करत होता. घळ्याच्या काट्यांचा आवाज त्याच्या कानावर स्पष्टपणे ऐकू येत होता,
आज त्याच्या डोळ्यात किंचित मात्र झोप नव्हती, का कोण जाणे..??
काय चालले होते नेमके त्याच्या डोक्यात...? हे कोणी ही ओळखू शकले नव्हते..? सारखं विचारांचं काहूर डोक्यात थैमान घालून बसले होते. भिंतीवर एक पाल आपल्या पक्षावर दबाव धरून होती पण त्या पक्षाला विचारला त्याची जरा सुद्धा कल्पना नव्हती. त्या क्षणी बाहेर कुत्र्यांची ते भिक्षण ओरडणे मनाला घायाळ करत होते. त्या कुत्र्यांचे ओरडणे हे नेहमीच होऊन बसलेले होते. पण आज त्या कुत्र्यांचे ओरडणे मात्र काहीसे वेगळेचं होते. एका तालासुरात रडणे. त्यांच्यासोबत मांजराचे ते विलक्षण रडणे अगदीच लहान बालक रडल्या सारखे... जणू काही ते कुणाच्या तरी मृत्यूवर रडत असावेत.
राजेशने हातात एक धारधार सुरा आणि दुसऱ्या हातात त्याच्या प्रियसीने  वाढदिवसाला दिलेला आयफोन घेऊन तो बिछान्यावर तसाच पडून होता. त्याचे केव्हापासून डोळे विस्तारले होते, घरा घरा फिरणाऱ्या पंख्याकडे तो एक टक निहारच होता. अश्रूनी भरलेले डोळ्यांची किंचितही हालचाल होत नव्हती, त्याच्या पापण्या एक टक फिरणाऱ्या पंख्याकडे पाहत होत्या. त्याला क्षणभरात वाटे घ्यावीत एक दोरी आणि लटकावे हात पाय झाडीत त्या पंख्याला,नाही तर तो धारधार चाकू  फिरवावा आपल्या मनगटावर आणि काढाव्यात त्या रक्तबंबाळ आतड्याबाहेर, सर्वत्र उडाव्यात पिचकारी त्या रक्ताच्या, ते थेंब थेंब रक्त लाल भडक आणि गरमागरम मग शांत होईल तो भयंकर आत्मा ज्याच्यापासून मुक्ती हवी होती जीवला. एजदाचा होईल मी त्याच्यापासून मुक्त. नाहीतर त्या भयंकर आत्मांना आपणचं मुक्ती दिली तर...
असे दुविधांचे काहून त्याच्या डोक्याचं खुपदा लपंडाव खेळत होते. ती अकल्पित ( अमावस्येची )रात्र ओसंडून नंतरची ती प्रसन्न सकाळ होईल की नाही, याचीच जरा शंका वाटत होती. नाही असे आयुष्य संपवून  काही होणार नाही. त्या भयंकर आत्मांनाच  मला एकदाचे संपवले पाहिजे. हें आयुष्य संपवण्याकरिता मी काही एकटाच नाही माझ्यावर अजून दोन जीव अवलंबून आहेत, त्यांचे काय...?सारिका आणि माझे होणारे बाळ यांच्या करीता मला जगायचे आहे.
मृत्यूच्या बाता करने सोपे असते तितकेचं मृत्यूला कवटाळणे अवघड असते हें मात्र खरेचं होते.
हातामध्ये फास आणि सुरा असतांना देखील कुठेतरी जगण्याची उमेद मात्र नव्याने जागी झाली होती. तसाच बेचैन अवस्थेत राजेश झपझपा पावले टाकत आपल्या घरातून अंगणात आला. बाहेर सर्वत्र काळोख पसरला होता, बाहेर एक चिटपाखरू देखील नजरेस पडत नव्हते. त्यात ती अमावस्याची रात्र आणखीनच भयंकर  वाटत होती, कुणाचा तरी संपण्याचा दिवस आला होता. एका हातामध्ये फावडा घेऊन राजेश गेटाच्या बाहेरील  जागेत लिंबुचे वर्तुळ केले. बाहेर गारवा असताना सुद्धा त्याच्या कपाळावर घामाचे दवबिंदू अलगत खाली टपकत होते. तोंडाने पुटपुटत तो काही तरी बोलत होता.
" आज यांना संपवूनच माझ्या जीवाला चैन मिळेल, यामुळेच तर माझे सारे आयुष्य पणाला लागले, नको मला हे माझ्या संसारात, यांना आज कायमचीच मुक्ती मी देणार. माझ्या साऱ्या आयुष्याला एक अविश्वासाची अडसर निर्माण झाली... फक्त आणि फक्त यामुळेचं...!!"
बोलतांना त्याच्या डोळ्यातून आग ओतत होती.
गुलालाची पिशवी घेऊन, त्याने त्याचे तीन वर्तुळ बनवले. त्या तीन काळ्या कपडाच्या बाहुल्या घेऊन त्याच्यात एक एक जीव टाकावा म्हणून प्रत्येकात एक जिवंत माश्या टाकल्या. 


कथेचा पुढील भाग क्रमशः
लेखिका :- सौं रुपाली बोरसे.

*******
प्रस्तुत कथा ही काल्पनिक स्वरूपाची असून याचा अंधश्रद्धा पसरवणे बिलकुल मात्र हेतू नाही, कथा फक्त मनोरंजनाकरिता वाचवी , याचा जिवंत व्यक्तीशी काहीही एक संबंध नाही.
*******
कथेचा पुढील भाग वाचन्याकरीता कथेशी जुडून रहा. कथेचे  भाग जर आवडतं असतील तर कंमेंट्स आणि like  नक्कीच करा.

🎭 Series Post

View all