अरे वेड्या मना भाग १

.......

मुंबई.स्वप्नांच शहर. या मुंबई शहराच मन जितकं मोठं तितकीच प्रत्येक व्यक्तीला सामावून घेण्याची क्षमता.अशा या मुंबई आमच्या मोठ्या मनाची ईशा ही तिच्या छोट्या कुटुंबासोबत राहतेे. 

       ईशा ही दिसायला सुंदर,काळेभोर केस,गोरीपान, सडपातळ बांधा....

सविता(ईशाची आई):- चहा मिळेल का मला लवकर??????

ईशा:- २मिनिटात देते हं.......

सविता (ईशाची आई):-सकाळी सकाळी घश्यात चहा गेल्या शिवाय सकाळ झाली अस वाटत नाही.....ईशाची आई किचन मध्ये खुर्ची वर बसत ईशाला म्हणते.......

ईशा:-हे काय?????? 

तिचे बाबा तिथे हाॅलमध्ये नसतात........

ईशा :- आई अगं बाबा कुठे गेलेत?????ईशा विचारते......

सविता (ईशाची आई):- अगं ते शेजारच्या विजू अण्णा कडे गेले असतील पेपर आणायला......

ईशा तिच्या बाबांना बोलवायला जाते तेवढ्यात तिचे बाबा जिन्याने वर येताना दिसतात......

बाबा एवढे चालू नका ना तुमचे पाय दुखतील..... ती काळजीने बोलते.........

ईशाचे बाबा:- हे दुखणं काय जन्माचं आहे.... ते हसुन म्हणतात.

अस काही नाही डाॅक्टरांनी सांगितलं ना. ऑपरेशन केलं ना तर तुम्ही धावायला लागल.......ईशा तिच्या बाबांना म्हणते.......

मला धावून कुठे जायचंय????? ईशाचे बाबा तिला हसून बोलतात.....

सुनिलराव(ईशाचे वडील):- काही गरज नाही माझ्या ऑपरेशन पैसे खर्च करण्याची.......

ईशा:- तुम्हाला नसेल पण मला आहे........ ती बाबांच्या हातात चहा पोहे देत बोलते........

सविता (ईशाची आई):- गरज आम्हाला पण आहे ऑपरेशन करणं इतकं सोपं आहे का??ईशाची आई चहाचा घोट घेत बोलते.......खुब्याच्या ऑपरेशनला २-३लाख रुपये तरी लागतील एवढा पैसा आणायचा कुठून पेपर आणायला तरी पैसे आहेत का विचार त्यांना??शेजारच्या विजू अण्णांचा आदल्या दिवशीचा पेपर आणून वाटतात........ईशाची आई ईशाला म्हणते........

मी आहे ना......... ईशा बाबांजवळ बसत बोलते.........

शोधू दे त्यांना काम,घरात बसून काय करणार आणि तुझं लग्न झाल्यावर हे घर नंतर चालणार कसं......ईशाची आई तिरकसपणे बोलते.......

उगाच काळजी करतेस तू,काही होणार नाही.........ईशा आईला म्हणते.........

ह्या वर्षात काहीही झालं तरी तुमच्या खुब्याच ऑपरेशन करणार आहोत....... ईशा बाबांना म्हणते........

आधी तुझं लग्न....... बाबा ईशाला म्हणतात........

ते व्हायचं तेव्हा होईल हो बाबा....... ईशा बाबांना म्हणते.......

अर्धी लाकडं मसनात गेली माझी आता,ऑपरेशन करुन कुठे मॅरॅथॉन धावायची मला....... बाबा ईशाला म्हणतात......

सविता( ईशाची आई ):- पुढे कसे होणार आहे कुणास ठाऊक.....आता दोन्ही पायांनीचालताना त्रास होतो..... हिचं लग्न झाल्यावर पुढे .........ईशाची आई बोलता बोलता थांबते.......

ईशा:- आई.........

सुनिलराव (ईशाचे बाबा):- १मिनिट मी पण गोळी द्यायला विसरले..... ती बाबांना गोळी देत म्हणते..........

आई तू पण ना कशाला गं काळजी करतेस मी आहे ना........ईशा  बाबांना गोळी आणि पाणी देत आईशी बोलते.......

सविता (ईशाची आई ):- तू आज आहे गं पण उद्या तुझं लग्न झालं की........लोक तोंडात शेण घालतील आमच्या..आता तर लोक म्हणतील आई - बापांनी पोरीला बिनलग्नाची ठेवली......ईशाची आई ईशाला म्हणते........

ईशा:- आई गं लोकांच्या वागण्याचा कशाला विचार करायचा आपण.....ईशा तिचे केस पुसत बोलते.....

आणि मला माहिती आहे ना तुम्ही मला कशा परिस्थितीत वाढवले,शिकवले आणि मला ३५ वेळा नकार आला त्यात तुझी काय चूक ? तू प्रामाणिकपणे प्रयत्न की नाही ईशा आईला म्हणते.........

सविता (ईशाची आई):- लोकांची तोंड कोण धरणार.......आम्हाला तर वाटत बाई तुझं कुठेतरी जमून जावं..... कुठे तरी चांगल्या ठिकाणी.... आमचं काय ग तो आहे तो बघून घेईल........पण ह्यांना कुठे तरी चांगली नोकरी मिळाली पाहिजे पण देणार कोण... ह्यांना जििथे जिथे जातील तिथे पैैैैशांच्या  अफरातफरी खाली नोकरी वरून काढून टाकलंं बर मी काय म्हणतेय पैसेे खाल््ल्ले असत तरी चालले असते......पण नाही......त्या पैसे खाणा रानी  त्याचं बालंट हयाच्यावर आणलं नोकरी वरून काढून टाकलं पण आता तरी शहाणं व्हावंं माणसाने. जिथे नोकरीला जातील तिथे सांगावं दूर पडत होत,पैैैैसे कमी पडत होते पण तसे नाही........सत्यवानचा अवतार  ना हे सांगून बसतात. पैैैैशाच्या अफरातफरी खाली नोकरी वरून काढून टाकलं हे असं असल्यावर कोण देणार आहे नोकरी........ ईशाची आई ईशाला म्हणते.........

आई गं  मी असाच मुलगा बघून ज्याला मी माझ्या आई वडिलांची घेतलेली चालणार आहे...... ईशा आईला म्हणते.......

कोण असेल हा मुलगा.......???बघुया पुढील भागात.....

सदर कथा काल्पनिक आहेत कुठेही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.......

क्रमशः 

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो...... तुमची प्रतिक्रिया खूप मोलाची आहे त्यामुळे कमेंट करायला विसरू नका.....

 पुढचा भाग १/१२/२०२०ला पोस्ट केला जाईल.....

तोपर्यंत नमस्कार.......