अपहरण....

ही कथा आहे.कोणाच्यातरी संघर्षाची...त्याच्या हक्काची जो मिळवण्यासाठी त्याने काय काय धडपड केली त्याची






आज सगळ्यांचीच धावपळ उडाली होती.सगळे पत्रकार आपापले कॅमेरे आणि माईक हातात घेऊन सज्ज झाले होते.कारण बातमीच काहीशी तशी होती.


शिवगड तालुक्याचे आमदार बाळासाहेब इनामदार यांच्या मुलाचे आणि सुनेचे अपहरण झाले होते. त्यामुळे सगळी कडे चर्चेला उधाण आलं होतं.पत्रकार तर आपल्या प्रश्नांचा पिटारा घेऊन सज्जच होते .. की कोण त्यांच्या कचाट्यात सापडतय आणि ते सर्वजण प्रश्न विचारून त्याच्या मेंदूचा चुराडा करतायेत .तेव्हड्यात इन्स्पेक्टर विजय भोसले तिथे आले होते...तेच ही केस हॅण्डल करत होते.


"सर .... सर..तुम्हाला काय वाटतं की,हे अपहरण कुणी आणि कशासाठी केलं असेल..... तुमचा शोध कुठपर्यंत आला आहे...".पत्रकार.


"हे बघा आमचा शोध चालू आहे....ते लवकरच सापडतील....आम्हाला आमचं काम करू द्या...".इन्स्पेक्टर जरा वैतागत म्हणाले.


"सापडतील म्हणजे...तुम्हाला अजून काहीच पुरावा सापडला नाही का...म्हणजे हे नेमकं कुणी व कशासाठी केलं असेल.."दुसरा पत्रकार.


"सांगितलं ना शोध सुरू आहे..".इन्स्पेक्टर चिडून.


"तुम्हाला काय वाटतं...हे खरंच अपहरण आहे की...या मागे काही राजकीय डावपेच असू शकतात....नाही म्हणजे निवडणुकाही तोंडावर आल्यात म्हणून...".तिसरा पत्रकार...


"हा...काय प्रश्न झाला का.....कोण राजकारणासाठी स्वतः चाचं जीव धोक्यात टाकेल का... ..कुठून आणतात प्रश्न कोण जाणे..". असं म्हणून ते तिथून रागाने निघून गेले.


"तर मित्रांनो आपण बघितलं की..पोलीस ही या गोष्टीचा शोध घेत आहेत की,हे नेमकं अपहरण आहे की आणखी काही...राजकीय डावपेच...या मागे नेमका कुणाचा हात आहे जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत च रहा आपल्या लाडक्या जनतेचा आवाज ..या बातमीपत्रात...मी आशा नाईक... कॅमेरामन सुधीर बरोबर..".


इकडे बाळासाहेब खूप तापले होते...विजय भोसले आत येताच..


"इन्स्पेक्टर...हे काय चाललंय... गेले आठ तास झाले माझे मुलगा आणि सून गायब होऊन, तरी तुम्ही अजून शोध लावू शकला नाही .काय करतय तुमच् डिपार्टमेंट. मला कसल्याही परिस्थितीत ते चोवीस तासाच्या आत भेटायला हवेत गुन्हेगारासकट ज्याने त्यांच अपहरण केलं आहे." बाळासाहेब तावाणे म्हणाले.


"होय साहेब....आमची पूर्ण टीम त्याच कामात आहे...त्यांचा शोध आम्ही लवकरच घेऊ...".इन्स्पेक्टर.


"घेऊ ...म्हणजे....पटकन घ्या... मला कुठल्याही परिस्थितीत ते लवकरात लवकर घरी यायला हवेत. निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि आता मला माझ्या राजकीय कारकिर्दीवर कुठलही लांछन लागलेलं मुळीच आवडणार नाही..".ते जास्तच चिडत.


"हो साहेब...तुम्ही निश्चिंत रहा,मी स्वतः लक्ष घालतो....येतो मी..."असं म्हणून इन्स्पेक्टर निघाले.


"इन्स्पेक्टर...अजून एक... जाता जाता त्या पत्रकारांच तोंड बंद करून जावा...माणसांना आधीच काय कमी टेन्शन असतं का म्हणून हे अजून वाढवतात..".साहेब म्हणाले आणि निघून गेले.


इन्स्पेक्टर ही मागच्या दाराने..पोलीस स्टेशनला पोहोचले.


"सर...ह्या माणसाला खरंच मुलाची अन् सुनेची काळजी आहे का...उगाच आपलं कांगावा करतोय...".हवालदार शिंदे म्हणाले.


"काय झालं शिंदे...".इन्स्पेक्टर विजय.


"बघा ना सर....इतकं सगळं होऊनही...याला आपल्या राजकारणाच च पडलंय... मला तर वाटतं यानेच गायब केलं असणार त्या दोघांना..". शिंदे दात खात म्हणाले.


"काय बोलताय शिंदे....तुम्ही कायद्याचे नोकर आहात...आणि कायदा पुरावा मागतो...आहे का तुमच्याकडे काही पुरावा...".इन्स्पेक्टर भुवया उडवत म्हणाले.


"तेच तर ना सर....कधी कधी सगळं माहिती असूनही....ह्या पुरव्यापाई..खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा होत नाही...".शिंदे खंत व्यक्त करत म्हणाले.


"मग....पुरावे जमा करा...लगा कामाला...जावा..".इन्स्पेक्टर...म्हणाले


तेव्हड्यात हवालदार जाधव आले,ते इन्स्पेक्टर ला सेलुट करत.


"जय हिंद सर...".


"जय हिंद....तुम्हाला सांगितलेलं काम केलं जाधव..".इन्स्पेक्टर काहीतरी तपासाच्या दृष्टीने म्हणाले.


"होय सर...त्यांची सगळी कुंडली काढून आणलीय..".जाधव फाईल सरकवत म्हणाले.


"गुड...हेच पाहिजे होतं  आपल्याला ."इन्स्पेक्टर रहस्यमयी  हसत म्हणाले.


"होय सर...प्रताप इनामदार आणि गौरी देशमुख ...यांचं गेल्या महिन्यातच लग्न झालं...त्यांचा हा प्रेम विवाह आहे.. बाळासाहेबांचा या लग्नासाठी विरोध होता..पण मुलाच्या हट्टापायी त्यांना हे लग्न मान्य करावं लागलं...ते.दोघे हनिमून साठी लोणावळ्याला गेले होते...तिथून नच त्यांचं अपहरण करण्यात आले आहे.".जाधव म्हणाले.


"पण जाधव....माझ्या लक्षात एक गोष्ट येत नाही की...एव्हढ्या मोठ्या आमदाराचा मुलगा...आणि हनिमून साठी लोणावळ्याला कसकाय गेला ..कुठेतरी काहीतरी शिजतंय...".इन्स्पेक्टर रहस्यमयी चेहरा करत.


"म्हणजे सर तुम्हाला ही तेच वाटतंय का...जे पत्रकार बोलत होते.".शिंदे खोचकपणे म्हणाले.


"तसा विचार करायला हरकत नाही....नाही म्हणजे निवडणुका तोंडावर आल्या आहेत...जनतेच्या सहानभूती साठी राजकारणी कुठल्याही थराला जाऊ शकतो...".इन्स्पेक्टर हातातला क्युब फिरवत म्हणाला.


"होय सर मलाही तिचं शंका हाय...".शिंदे.


"मग लागा कामाला....साहेबांचे कॉल रेकॉर्ड करा....बघा त्यांना कुणाचा पैशासाठी किंवा काही धमकीचा फोन येतोय का ते.."इन्स्पेक्टर.


"येस सर...". असं म्हणून तो ही निघून गेला.


थोड्याच वेळात जाधव पुन्हा कॅबिन मधे आले.


"सर... एक महत्वाची बातमी आणलीय...".जाधव सस्पेन्स क्रिएट करत म्हणाले.


"बोला जाधव पटकन..काय बातमी आहे...".इन्स्पेक्टर उताविळपने .


"सर साहेबांना ... किडण्यापर चा फोन आला होता...". त्यांचं बोलणं पूर्ण होण्याच्या आत शिंदे मधेच म्हणाले.


"मला वाटलच....हे प्रकरण पैशासाठी च असणार...किती पैसे मागितले त्याने..."..पण इन्स्पेक्टर ने डोळ्यांनीच शिंदेंना आवर घातला.


"तुम्ही बोला जाधव...".


"सर किडण्यापर ने हे अपहरण पैशासाठी नाही केलं...त्याची वेगळीच मागणी आहे...त्याच्या मागणी वरून असं वाटतंय हे सगळं ती कशाचा तरी बदला घेण्यासाठी करत असावा...".जाधव म्हणाले.


"काय मागणी केलीय त्याने..".इन्स्पेक्टर.


"ते अजून समजलं नाही...पण तो इतकचं म्हणाला की जर ते दोघे जिवंत हवे असतील तर तो म्हणेल ते साहेबांना करावं लागेल...आणि पोलिसांना सांगितलं तर त्यांची डेड बॉडी घरी येईल म्हणून...".जाधव.


"पण त्याला काय माहित...जाधव ...,की पोलीस आधीच यात involve झाले आहेत...तुम्ही कॉल ट्रेस केला का...काही लोकेशन कळली का..कुठून बोलतोय तो..". इनस्पेक्टर .


"होय सर...,आम्ही नंबर ट्रेस केला ..पण नेमकी लोकेशन कळाली नाही....पण एव्हढ मात्र नक्की की तो बोलणार लोणावळ्यातून च बोलत होता....पण तो इतका चलाख आहे...की त्याची लोकेशन सारखी बदलत राहतोय...त्यामुळे नेमकं हेच कळत नाही की तो कुठून बोलतोय...".जाधव .


"हे काय जाधव....तुम्ही आता म्हणालात की ते नक्की लोणावळ्यातून बोलत होता...आणि आता म्हणताय की त्याची नेमकी लोकेशन कळू शकत नाही...तुम्ही आधी ठरवा काय म्हणायचंय ते...".इन्स्पेक्टर जरा रागात म्हणाले.


"सॉरी सर ...ते मी...अंदाज लावला..".


"जावा...नीट तपास करा....अंदाज लाऊन गुन्हेगार सापडत नाहीत.."विजय रागाने हात टेबल वर आदळत म्हणाला.


आता तो स्वतः कॉल स्ट्रेसर जवळ जाऊन बसला...थोड्याच वेळात पुन्हा साहेबांच्या फोन वर कॉल आला...त्याने लगेच एअरफो्न कानात घातले.


"हॅलो...".साहेब.


"हॅलो....तू तयार आहेस ना माझ्या अटी मान्य करायला..".पलीकडील व्यक्ती .


"हे बघ तुला माहित नाही ..तू कुणाच्या नादाला लागलाय...तुला हे लय महागात पडेल..".साहेब ओरडून म्हणाले.


"आवाज खाली.....विसरू नको...तुझी मान माझ्या हातात आहे...राग आला तर मी चिरडून टाकेन..".पलीकडील व्यक्ती तितक्याच रागात.


साहेबांचा सेक्रेटरी त्यांना सल्ला देत,"साहेब प्रताप दादांसाठी राग आवरा...तो काहीही करू शकतो..".


"बोल ....काय करायचय मी...".साहेब रागाला आवर घालत म्हणाले.


"तुझ्या तालुक्यातील....शेगाव माहिती असेलच तुला....".पलीकडील व्यक्ती.


"हो माहितेय...माझा मोठा मतदार संघ आहे तो..पण त्याचं काय..".साहेब.


"त्याचं काही नाही.....त्या गावात जी शाळा आहे तिथे तू दोन दिवस जाऊन...त्या विद्यार्ध्यांची भेट घेऊन यायची..".पलीकडील व्यक्ती.


आता मात्र साहेबांचा पारा अगदी चढला..की हा काय फालतू पना आहे...येव्हढ्याशा कारणासाठी कुणी आमदाराच्या मुलाचं अपहरण करत का....


"तुला जमणार नसेल तर सांग....त्या दोघांना मारून मी माझं काम पूर्ण करतो..".पलीकडील व्यक्ती.


साहेबांना हे त्याचं पोरकट बोलणं ऐकून त्यांना हसावं की रडाव तेच कळत नव्हतं....त्याचा तो बाल हट्ट समजून ते लगेच हो म्हणाले.


"पण तिथे फक्त तू एकट्यानेच जायचं....न अंगरक्षक किंवा पोलीस घेता ." पलोकडील  व्यक्ती.


"हे शक्य नाही...मी एक आमदार आहे....आणि माझ्या सुरक्षेचा प्रश्न आहे...मी कुठेही एकट्याने जाणे योग्य नाही..". साहेब म्हणाले.


"तुला तुझ्या मुलापेक्षा तुझी सुरक्षा जास्त महत्वाची असेल...तर मी इथेच विषय संपवतो....करतो खल्लास दोघांना.".तो धमकीच्या स्वरात म्हणाला.


"बरं...ठीक आहे... जातो मी शेगाव ला एकट्याने...".साहेब घाबरत म्हणाले.


इकडे इन्स्पेक्टर विजय भोसले सगळं ऐकत होते.


"शिंदे...आपला संशय खोटा ठरलाय...हे सगळं साहेबांनी नाही केलंय...या मागे दुसरीच कोणीतरी व्यक्ती आहे...जी आपल्याला शोधून काढायची आहे..".इन्स्पेक्टर.


"होय सर...अजून एक व्यक्ती आहे ज्याच्यावर आपण संशय घेऊ शकतो...".शिंदे विचार करत.


"कोण शिंदे....पटकन बोला..".इन्स्पेक्टर.


"सर ...कालच साहेबांच्या एका कार्यकर्त्यांशी  बाचाबाची झाली होती...तो खूप जुना कार्यकरता आहे त्या पार्टीचा.".जाधव म्हणाले.


"जाधव काय ते स्पष्ट बोला....".इन्स्पेक्टर.


"सर....निवडणुकीसाठी दिलेल्या रकमेतून काही रक्कम घहाळ झाली आहे....आणि त्या रकमेची जबाबदारी  सतीश या त्यांच्या विश्वासू  कार्यकर्त्यांकडे होती...पण साहेबांनी त्याच्यावर विश्वास न ठेवता...त्या गेलेल्या रकमेसाठी त्याला दोषी मानून...त्याचा भर पार्टीत अपमान करून ..त्याला पार्टीतून काढून टाकलं....त्याचाच बदला घेण्यासाठी त्याने हे केलं असावं..".जाधव.


"इतकी रक्कम..गेली..तर मग त्यांनी पोलिस कंप्लेंट का केली नाही..".इन्स्पेक्टर.


"काय सर... काळया  पैशाची कोण कंप्लेंट करतं व्हय..".शिंदे मिश्कीलपणे हसत म्हणाले.


"ते पण आहेच म्हणा....चला ह्या  सतीश ची कुंडली काढा...तो आता कुठे आहे...आणि काल कुठे होता..सगळी माहिती हवीय मला.".इन्स्पेक्टर.


************


                     


इकडे बाळासाहे बांचे  सेक्रेटरी ,"साहेब  एकट्याने ..आणि एव्हढुश्या गावात काय काम असेल त्याचं.".


"ते तर तिथे गेल्यावरच कळेल.... भुईटे.".साहेब स्वतः ला तिथे जाण्यासाठी तयार करत.


"पण नाही साहेब...तुम्ही तिथे एकट्याने जायचं नाही...बाहेर वातावरण बघत आहात का...सगळीकडे वादळ आणि पाऊस चालू आहे...आपली माणसं ही तुमच्यासोबत येतील.." भुइटे काळजीने म्हणाले.


"मुलांसाठी मला जावं लागणार भुईटे.... पूर आला तरी..".साहेब दुःख व्यक्त करत म्हणाले.


आणि गाडी घेऊन निघाले ...सोबतीला एक ड्रायव्हर होता. वारा आणि पाऊस खूप असल्याने त्यांना जायला वेळ लागत होता.पुढचं काहीच दिसत नसल्याने गाडी नीट चालवता येत नव्हती...शेगाव जवळच आलं होतं.पण तिथे पोहचायला एक नदी ओलांडून जावे लागत होतं...ज्याचा पुल पाण्याखाली जाण्यास थोडाच बाकी होता ...पुल खूप जुना असल्याने रस्त्यावर खड्डे पडले होते...ज्यामुळे साहेबांच्या मानेला कमरेला दचके बसत होते.


"साहेब...रस्ता लय खराब हाय...माघारी जायचं का आपण..". ड्रायव्हर.


"नाही...तू चालव गाडी...काही झालं तरी आपल्याला शेगाव ला पोहचायचयं आहे...आणि लगेच माघारी यायचं आहे.." .साहेब रागाने म्हणाले.


कशे बशे ते गावाजवळ पोहचलो...पण गावात चांगला रस्ता नसल्याने....आहे त्या वाटेचा चिखल झाला होता...त्यामुळे तिथून मोठी गाडीच काय.... दोनचाकी जाणं सुद्धा अवघड होतं...त्यामुळे साहेबांना आता पावसातच आणि पायीच पुढचा प्रवास करावा लागणार होता..साहेब चिखलात उतरले खरे पण चालता येत नव्हते...तसेच पडत आपटत ते गावच्या वेशीवर पोहचले.


चिखलाने भरलेले कपडे आणि तोंड बघून त्यांना कुणीच ओळखू शकत नव्हतं.


"पाव्हण कंच्या गावच म्हणायचं तुम्ही...". एक शेतकरी म्हणाला,ज्याच्या एका हातात गाईचं दावं...चार पाच शेळ्या पुढे गेल्याल्या...डोक्यावर पोत्याचा खोपा केलेला...धोतराचा खोसा खवलेला ..पायात चापलेचा पता नव्हता...दाढी वाढलेली ..आणि हातात काठी....वय साधारण ७० च्या आसपास..


"तुम्हाला काय करायचय...".वैतागलेला ड्रायव्हर म्हणाला.


"आव...नाय गावात नवीन दिसताय म्हण इचारल.." .तो जरा खोकत म्हणाला.


"आजोबा इथ शाळा कुठं आहे...".साहेब ड्रायव्हरला डोळे वटरत म्हणाले.


ते आजोबा आधी जरा हसले...आणि म्हणाले,"तुम्हाला अन् शाळच काय करायचं हाय...".


"तुम्हाला हसायला काय झालं....".साहेब हैराण होऊन म्हणाले.


"आव हसू नग तर काय करू...शाळा असल तर... सांगल नव्ह कुठं हाय ते...". म्हतारा त्याचं हसू दाबत म्हणाला..पण त्या हसण्यात बरच काही होतं... एक खंत ..कुणा विषयी तरी राग...


साहेबांना आता मात्र खूप राग आलेला त्या किडण्यापरचा   जिथे शाळाच नाही त्या गावात मला विध्यार्ध्यांची भेट घ्यायला का पाठवलं असेल.


"आजोबा...मग ह्या गावातली मुलं शाळा शिकत नाहीत का..".


"पोरांची शाळा म्हणजी ह्या पावसाच्या मर्जीवर हाय बघा....शेजारच्या गावात दोन वर्ग अन् एक गुरुजी हाय तिथंच जात्यात बघा...पाऊस नसला की...".आजोबा.


"का..पाऊस असल्यावर काय झालं..न जायला...". साहेब.


"आव दुसऱ्या गावाला जायचं म्हणलं की नदी वलडून जायला लागतय बघा...अन् थोडा पाऊस आला अन् नदीला पाणी आलं की..तो पुल बारका असल्यानं पाण्याखाली जातूया....किती येळा तर...शाळेत गेलेली पोरं तिकडचं गुतून बसायची बघा आठ आठ दिस...अन् काय काय तर वाहून बी गीली बघा.".आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं.


"बरं. ते नव्ह... तुमि कुनाकड आलाय ते सागितलं नाय..".आजोबा स्वतः ला सावरत म्हणाले.पण साहेब काहीच बोलले नाहीत.पुन्हा बाबाच म्हणाले,"बर...असूद्या चला आमच्या घरी .. वाईस  च्या पाणी करा...पावसानं भिजल्याल दिसताय..".


"अहो नाही...आम्ही जातो माघारी आमच्या घरी..". असं म्हणून ते निघाले तितक्यात.


"आव पाव्हं न...कुठं चाललास...तुम्हाला आता माघारी जायला रस्ता नाय...तो पुल मगाशीच पाण्यात बुडाला हाय...आता रातच पाऊस नाय आला तर...उद्या तीसरापरा तुमाला जायला इल... माझं ऐका चला घरी...". असं म्हणून त्यांनी...हातातली काठी साहेबांच्या हातात दिली..अन् खोसा धरून पुढे गेलेल्या शेळ्यांना अडवू लागले...


**********


"सर...सतीश ची कुंडली काढून आणली."जाधव घाईने आत येत म्हणाले.


"बरं..बोला पटकन..".इन्स्पेक्टर.


"याचं पूर्ण नाव..सतीश दत्तू माने....आणि हा शेगाव चाचं राहणारा आहे...आणि घरी विचारल्यावर कळलं की काही कामानिमित्त तो दोन दिवस झाले बाहेरगावी गेला आहे म्हणून....पण कुठे गेलाय हे त्याने त्याच्या बायकोलाही सागितले नाही.  ...आणि त्याच्या मोबाईल ची शेवटची लोकेशन ही लोणावळ्याचीच होती...".जाधव एका दमात सांगून बसले.


"जाधव चला...गाडी काढा...लोणावळ्याला चला.... सगळा गुंता तिथेच सुटेल.....आणि हो साहेबांची काही खबर.."इन्स्पेक्टर.


"हो सर ते त्या गावात पोहचले त...पण रस्ता नसल्याने आज ते तिथून माघारी येऊ शकत नाहीत...पण आपली दोन माणसं आहेत त्यांच्या मागावर...".जाधव.


"पण सर...त्या किडण्यापर ने ..तिथेच जाण्याची का अट घातली असेल..काय असेल नेमके त्याच्या मनात...".शिंदे.


"ते आपल्याला लोणावळ्याला गेल्यावरच कळेल...".इन्स्पेक्टर रहस्यमयी चेहरा करत.


*********


इकडे साहेब त्या म्हंतार्याच्या घरी गेले...घर कसलं छप्पर फाटलेल...भिंती पडलेलं..घरात पाणी साचून इथ इथ खड्डे पडलेले...त्याला माणसं रहात होती म्हणून घर म्हणायचं नाही तर...एखाद्या खंडरापेक्षा बेक्कार  .तशातच एक माऊली कसाबसा चहा घेऊन आली बिन दुधाचा....सुशिक्षित लोक त्याला ब्लॅक टी असं म्हणतात तो...


रात्र झलीपन लाईट चा काही पत्ता नव्हता..मच्छर फोडून खात होते...साहेबांना तिथे राहणे म्हणजे नरकापेक्षा काही कमी वाटत नव्हते..


"आजोबा.. लाईट कशकाय गेली.." न राहाऊन साहेबांनी विचारले.


"अहो लाईट असाय पहीजी ना....आम्ही दोघं महतारा महतारी रहातुया....आम्हाला ना फोन...ना फॅन...ना..टीव्ही...अन् एका बल्प च बिल ...महिन्याला हजार रुपई मागत्याती....कुठून आणायचं इतकं पैसं...म्हण मनल. .नगुच ती लाईट....आधीची माणसं काय रहात नव्हती का लाईटिबगर...अपून बी राहू... तसबी...कितीक दिवस राहिलेत आमचं.."त्यांचं बोलणं ऐकून कुणाच्याही काळजात चर्र झालं असतं.


"तुम्हाला...घरकुल नाही भेटलं व्हय...".आता ड्रायव्हरने....नाही तो प्रश्न केला...


तेव्हड्यात माऊली म्हणाली,"आर बाबा...आमच्या सारख्या गरिबाला कोण देत घरकुल... मुडदा बशिवला त्या मत मागाय येनाराचा.... मत मागसतोर गॉड बुलतूया...अन् निवडून आला की तोंड काळ कर्तूया... बघाय सुधिक येत नाय... गरीबाच काय हाल चालल्यात ते...". म्हंतारी बोटं मोडत म्हणाली.


साहेब तर मूग गिळून गप्प बसले होते......


दुसऱ्या दिवशी अचानक....साहेबांची तब्बेत बिघडली.पण तिथे दवाखाना ही नव्हता....पुलावरील पाणीही कमी झालं नव्हतं ..त्यामुळे तिथून हलण्याचा कुठलाच मार्ग दिसत नव्हता...पण गावकऱ्यांनी कशी बशी सोय करून त्यांना नदी पार करून तालुक्याला आणलं.


*************


इकडे इन्स्पेक्टर विजय भोसले यांनी सुद्धा गुन्हेगाराचा शोध लावला होता...पण त्याची अट होती की सगळ्या जनतेच्या समोर...जिथे मुख्यमंत्री...आमदार..खासदार..मंत्री...पत्रकार सगळेच असावेत...आता साहेबांच्या तब्बतही सुधारणा झाली होती.


सगळे जण याच केस कडे लक्ष लागलं होतं...सगळे न्यायालयात हजर झाले...आरोपी चे नाव पुकारण्यात आले......गौरी देशमुख....उर्फ गौरी प्रताप इनामदार. हे नाव ऐकताच सगळीकडे एकच गोंधळ उडाला...की स्वतःच..... स्वतःच,...आणि नवऱ्याच अपहरण करून स्वतः च्याच सासऱ्याला इतका का त्रास दिला असेल..


"मिस...गौरी देशमुख इनामदार....तुम्ही मान्य केलत की हे अपहरण तुम्ही स्वतःच केलं....पण आमदाराच्या सुनेला असं का करावं लागलं...तुमच्यावर कुणी कशाचा दबाव आणला होता का...".वकील प्रश्न विचारत होते.


सगळे गौरीच्या उत्तराची वाट बघत होते.....गौरी सांगायला लागली,"होय....हे अपहरण मीच केले...कुणाच्या सांगण्यावरून नाही......आणि हा प्लॅन मी गेली एक वर्ष झालं बनवत होते...आणि मी त्यात यशस्वी सुद्धा झाले...याचा मला आनंद आहे...".


"म्हणजे...तुम्ही हे सगळं काहीतरी...जाती दुशमनी मधून केलं आहे तर...".वकील .


"नाही....माझी काहीही दुशमनी नाही....मी हे सगळं केलं ते माझ्या गावासाठी...तेथील लोकांसाठी....त्याची काय अवस्था आहे हे दाखवण्यासाठी......मी हे सगळं सरळ मार्गाने ही बऱ्याच दा प्रयत्न केला....पण आमचं म्हणणं कुणीच ऐकलं नाही ...मग मला हा वेगळा मार्ग निवडावा लागला...".गौरी..


"काय अडचणी आहेत....तुमच्या...".वकील.


"अहो... एक असेल तर सांगावी ना......साहेबांनी अनुभवलं आहे ह्या दोन दिवसात...पण हे सगळं तेथील लोक वर्षानुवर्षे अनुभवत आहेत......गेल्या वर्षीची च गोष्ट आहे....माझ्या बहिणीला बाळंतपणासाठी आणले होते...पावसाचेच दिवस होते...तिच्या पोटात दुखु लागल ...पण पुलावर पाणी आल्याने दवाखान्यात शक्य झालं नाही....आमच्या लोकांनी तिला झुळीमधे नदीच्या  पात्रातून रस्सिने नेण्यात आले....पण दवाखान्यात पोहचायला उशीर झाल्याने आणि त्या झोळीत बाळ दबल्या मुळे  त्याचा जीव काही वाचला नाही....ह्या तुम्ही राजकारण्यांच्या हलगर्जीमुळे ते बाळ जन्म घेण्याच्या आधीच जीव गमावून बसल.......हे इतकचं कारण नाही...आमच्या गावामधे शाळा नाही....त्या मुलांना रोज जीवघेणा प्रवास करून दुसऱ्या गावात जावे लागते...जिथे ही फक्त दोन वर्ग आहेत.... शेतकऱ्यांच तर  इतकं नुकसान होतं की हाता तोंडाशी आलेला घास ह्या पावसामुळे आणि रस्त्यामुळे निघून जातो.... ये एव्हढेच प्रश्न नाहीत...विचारायला गेलो तर बरेच सापडतील....".


"पण तुम्ही इनामदारयांचया सूनबाई आहात हे विसरलात...या सगळ्यात ..".वकील साहेब..


"तुमची काहीतरी गफलत होतेय वकील साहेब....मी या सगळ्यासाठी तर इनामदारांची सून झालेय..". गौरी.


"म्हणजे नीट स्पष्ट सांगा...".वकील.


"म्हणजे मी...सामान्य मुलगी होऊन यासाठी लढण्याचा खूप प्रयत्न केला...पण माझी कुणीच दखल घेत नव्हत....शेवटी..मी माझ्या सुंदरतेची उपयोग करून प्रताप यांना प्रेमात पाडलं...आणि त्यांच्याशी लग्न करून...स्वतः च अपहरण केलं....पण मी हे सगळं प्रताप ला आधीच सांगितलं होत...त्यांनीही मला पाठिंबा दिला...".गौरी.


"पण तुम्ही...हे सगळं.. इनामदारांची सून झाल्यानंतर सहज करू शकला असता...मग हा सगळा खटाटोप कशासाठी...".वकील.


"हो सांगू...शकले असते...पण काही गोष्टी सांगून कधीच कळत नाहीत...त्या अनुभवायला लागतात...आणि ते सगळं माननीय आमदार साहेबांनी जवळून अनुभवले असेल... माझं काम इथे संपले आहे...तुम्ही हवी ती शिक्षा मला देऊ शकता..".गौरी मान खाली घालून म्हणाली.


सगळे न्यायाधीशांकडे लक्ष देऊन होते की ते आता काय निर्णय देतील.सगळ्यांना गौरीच म्हणणं पटत होतं..पण तिचा मार्ग चुकीचा होता.


सगळे पुरावे आणि आरोपीच्या गुन्हा कबूल करण्यावरून हे न्यायालय त्यांना ही शिक्षा देत आहे की...


तेव्हड्यात साहेबांचा आवाज आला थांबा,"मला काहीतरी बोलायचं आहे..".ते पिंजऱ्यात येऊन उभे राहिले.


"बोला...".न्यायाधीश.


"आता जे गौरी देशमुख उर्फ गौरी प्रताप इनामदार यांनी जे राजकारण्यांवर आरोप केले आहेत ते सर्व मला मान्य आहेत....मी जेव्हा तिथली खरी परिस्थिती अनुभवली तेव्हा कळलं की....आपण मत मागायला गेलो तेव्हा केलेली आश्वासने कुठे गेली...जनतेच्या मनात आपल्याविषयी किती राग आहे....आपल्याला ज्या कारणासाठी त्यांनी या पदावर पोहचवले त्याच्या योग्य तरी आहे का आपण....आणि म्हणूनच आज मी या पदाचा राजीनामा देत आहे...आणि गौरी वर केलेले सर्व आरोप मागे घेत आहे.......आज तिने माझ्या पक्षाचे नेते पद स्वीकारावं अशी मी तिला विनंती करतो...." साहेब म्हणाले तशे सगळीकडे एकच जयघोष चालू झाला.


"गौरी ताईंचा विजय असो"......


(ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे ..पण खरच माझ्या हातात असेल तर मला गौरी सारखं काहीतरी करायला नक्की आवडेल...)


?????रोहिणी मगर ????