अनोखी मैत्री

#गोष्ट छोटी डोंगराएवढी या कॅटेगरीत नुसार "नाते मैत्रीचे या विषयावर माझा लेख" अनोखी मैत्री.

प्रिय सखे, 

 रागावलीस नक्कीच नाही, कारण तुझी माझी मैत्री अशी रोजच्या रोज फोन वर निभावत नाही. 

  कारण तसा आपला रोज फोन होतच नाही. पण जेव्हा मनातलं बोलावसं वाटत पापणीच्या कडेला पाणी साठतं आणि तेव्हा, तेंव्हा प्रकर्षाने तुझीच आठवण येते.आणि मग तुझा नंबर डायल होतो. 

   कसे कोठे भेटलो कोठे भेटलो? कदाचित पुर्वजन्मीचे हे आपले ऋणानुबंधच. 

  प्रथम भेटीत मी थोडी बुजलेलीलच होते. म्हणजेच चक्क तुला टाळत होते. कारण दोघीही पुर्व पश्चिम! 

    पण सहज सामावलो एकमेकीत. स्वभाव जुळला कि, मैत्री होतेच ग, मग रूप, रंग सगळे अगम्यच ग!मैत्री स्वभावातून जुळते ग याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपले मैत्र! 

   खुपदा आपल्या मैत्रीचा इतरांना हेवा वाटायचा, पण आपण तिकडे दुर्लक्ष करायचो.ठामपणे तु माझी बाजू घेऊन मोकळी व्हायचीस. एवढेच नाही तर मला सावध करायचीस. माणसं ओळखायला शिक म्हणायचीस.
  
 आपण परदेशात मैत्रीचा वेल लावला खरा,तो आजही मायदेशी आल्यावर पण मस्तच फुलतोय. 

 आपल्या मैत्रीला देवाण घेवाण फक्त सुखदुःखाच्या गुजगोष्टीची मनातलं बोलले कि, मन कसं फ्रेश व्हायचे. 

कधी काही छोट्या मोठ्या वस्तू अगदीच किरकोळ, देवाणघेवाणीचे खत पाणी आपण घालत गेलो आणि सहज दोन कुटुंब परदेशात जिवाभाव जिवाभावाचे नातेवाईक झालो. अगदी रक्ताच्या नात्यापलिकडेही. 

 अन्विताच्या प्रेग्नन्सीत तुझे  ढोहाळे  मी पुरवायचे तर त्या बदलात तु नेहाच्या आभ्यासात नेहाला मदत करायचीस. 

   तुझे एक बरं होतं एका दगडात दोन पक्षी मारायचीस. विनोदाचा भाग सोड पण आज त्याचे फळ बघतेस म्हणून तर आज अन्वि टॉपवर आहे. येतयं ना लक्षात!.

    पण  कालांतराने मला भारतात परत यावे लागले.मी परदेशातून परत येताना तुला तिथे बऱ्याच ओळखी करून दिल्या पण तुझे मन मात्र लागले नाही.इकडे माझेही नाही. माझ्या मागे तुही परत आलीस. 

  नैरोबी सोडताना मला वाटले कदाचित यापुढे आपली भेट होणं शक्य नाही. कारण माझ्या बाबतीत नेहमीच असेच व्हायचे.तसे पाहता आपण खरेच हरवलो पण होतो.

  कारण तेंव्हा माझ्याकडे मोबाईलही नव्हता.तुझा नंबर देखील नव्हता. हा सोशल मिडिया देखील माझ्यासाठी नवाच होता, म्हणजेच थोडक्यात एवढे त्याबाबत ज्ञान नव्हते.
 
   अग पण अंजू जग खुप छोटे आहे. मनात घर करून राहिलेली माणसं परत गवसतात. तद्वत माझी परत जिवाभावाची सखी परत मला शोधून दिली. याच सोशल मीडियाने धन्यवाद फेसबुक धन्यवाद. 
 
   मग आपली फोनची देवाणघेवाण झाली.परत मैत्रीची वेल फोफावत राहिली.मग तु थोडे दिवस मुंबईत परत पंजाब परत पुणं आणि परत दुबई म्हणजे तुझं आपलं विंचवाचे बिह्राड पाठीवर अशी तुझी भटकंती.

    पण मात्र आपली मैत्री आपण जपत राहिलो आणि अजुनही तेच करत आहोत.कधी खंड पडतो. प्रापंचिक जबाबदाऱ्या आहेत.पण मैत्री मात्र जपायची बरका!. 

   सखे मैत्र दिन  त्यानिमित्ताने थोडसं ज्ञानवंत,सखे तु किर्तीवंत तर आहेस आणि जातीवंत रूपवंत पण आहेसच. लाडके आपल्या मैत्रीचा वेल असाच. निष्पाप, निस्वार्थी व प्रफुल्लित ठेवूया. ही जबाबदारी आपल्या दोघींचीही हं! 

  आपले हे ऋणानुबंध आसेच जपूया, काही चुकभुल असेल तर समजून उमजून घेऊया हक्काने भांडूया पण
 
 शेवटी एवढेच सांगावेसे वाटते कि,
एक हक्काचा कोपरा असतो, 
रोज तिथे वावर जरी नसतो. पण आठवणींचा तो बांधील असतो.

  मनातलं गुज या कोपऱ्याशी शेअर होतं.रोज भेटायला पाहिजे असे कोठे लिहिलेले असते?आठवण मात्र रोज येते.सुखदुःखाच्या प्रसंगी मात्र मी आवर्जून त्या कोपऱ्यात जाऊन येते मनातलं गुज भरभरून बोलून घेते.

  वेळेकाळेचे भान विसरते.म्हणून तर त्या कोपऱ्याशी माझ्या हक्काचे नातं असते. अंजू माझी जिवलग सखी या नात्याच्या ऋणानुबंधात ते कायमचे बांधले जातं  कायमचे बांधले जाते.

  आज या मैत्रीदिनाच्या निमित्ताने  आपल्या अतुट नात्याची शब्दांची फुले तुझ्या ओंजळीत हे नाते असेच फुलावे हि सदिच्छा, सखे मैत्रीदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा मनपूर्वक ! ????????????????????????❤️

 तुझ्या आठवणींच्या कप्प्यात काही क्षणाची भागीदार तुझीच एक हळवी सखी,

  सौ. ऊज्वला रवींद्र राहणे