अनु... भाग दुसरा

Hii... kalyani here

अनूच लग्न झाल. जे वडिल कायम कडक वाटायचे आज कन्यादानचावेळी त्यांचा  चेहरा जणू अनूला नविनच जाणवला होता. अनूच्या पाठवणीवेळी अनू आपल्या आईच्या खांद्यावर डोक ठेवून रडली.. अनूच्या आईने' रडत रडतच लेकिला बिलगून घेतल. ति बाबांकडे वळली , बाबांना आज पहिल्यांदा रडताना इतक हळव होताना तिनी बघितल बाबांचाही पाया पडली आणि खूप रडली. बाबा बोलले,, बास  लेकरl !!!आत्तापर्यंत या घराच चैतन्य होतीस आता तुझ ते चैतन्य तुझ्या सासरी फुलू दे. अनूने सर्वांचा निरोप घेतला आणि जड पावलांनी ति सुधीर सोबत निघाली.
गाडीत बसली आणि आईचे शब्द तिला आठवले..बाळा स्त्रि चा जन्मच मुळी असा असतो ग.. एक ना एक दिवस तिला आई वडिलांच घर सोडून  परक्या घरी जावच लागत..आत्तापर्यंत मी होते , राणी!!सगळ सांभाळायलl आता तुला फक्त स्वतःलाच नाही तर तुझ्या नविन घराला आणि तुझ्या नवऱ्या ला देखिल सांभाळायच.. तेव्हा आता बाळा सारा अल्लडपणा इथे सोड आणि तुझ्या संसाराला तुला जास्त कसं फुलविता येईल त्याची गोडी कशी वाढविता येईल हे बघ!!!!! अनूने पाणावलेले डोळे पुसले.........अन् अनूच्या आयुष्याची नविन पहाट झाली. अनुच्या आयुष्याची नविन सुरुवात झाली.............
सुधीर ...तो ही आई वडिलांचा एकूलता एक मुलगा. पण सुधीर लहान असतानाच त्याच्या आई वडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर सुधीर ला त्याची आत्या तिच्याकडे घेऊन गेली तिन  सुधीरच पालन पोषण शिक्षण सारं केल आणि सुधीरच लग्न ही लावून दिल . आत्या आज त्यांच्यासोबत होती.  आत्याने अनूचा  गृहप्रवेश केला. लग्नानंतर दोन दिवस सर्व पाहुणे रावळ्यांची ये जा चालू होती त्यानंतर मात्र तिसऱ्या दिवशी सुधीर आणि अनूच घर रिकाम झाल . आणि आत्याने ही सुधीरला सांगून संध्याकाळची जायची तिकीटे मागवली होती. सुधीर आणि अनूने त्यांना थांबण्यासाठी आग्रह केला पण त्या लग्ना अगोदरच महिना भरापूर्वीच सुधीरकडे आल्या होत्या तेव्हा म्हणाल्या आता खूप दिवस झाले निघायलl हवं अरे माझी नातवंड माझी वाट बगत असतील... लग्नात त्यांना दोन दिवसांनी येते सांगितल होत. आत्यानेही संसाराच्या चार गोष्टी सांगितल्या. दहा दिवस दोघांची अजून सुट्टी आहे तेव्हा कुठेतरी फिरून या अस सांगून आत्या ने दोघांचाही निरोप घेतलl.

दोघांना एक्मेकांनl द्यायला वेळ असा मिळाला नव्हता. आज सार घर शांत होत पण  सुधीरला असं वाटत होत जणू बऱ्याच वर्षानंतर घर जिवंत झाल होत....दोघांनी बऱ्याच गप्पा मारल्या...एकतर्फी गप्पा!!!!! अनू बोलत होती सुधीर फक्त अन फक्त तिला ऐकत  होता. तो पूर्ण रममाण झाला होता. अनूने विचारल तर मग आपण फिरायला कुठे जायचय,  यावर तू म्हणशील तिकडे जाऊ , सुधीर उत्तरला. त्यावर ति म्हणाली महाबळेश्वर ला जाऊ या का???? यावर तो हा म्हणाला आणि दुसऱ्या दिवशीच निघायच प्लॅनिंग ठरल..........
क्रमशः...(भाग दूसरा )
पुढील माग लवकरच.......
कल्याणी राजगे शिंदे........

🎭 Series Post

View all