अंधार आणि मी..

Darkness Is My Partner..
  


       कसा स्वभाव आहे ना मानवाचा? आपल्याला अंधार नेहमी नकारात्मकतेचं प्रतिक वाटतो पण मी अशी आहे की, अंधारातंच मला माझं स्वरुप आढळतं.. कारण अंधारात माझी सावली मला परकी भासत नाही.. ती माझ्याशी एकरुप झाल्याचं जाणवते. एवढंच नव्हे तर हाच अंधार बरंच काही शिकवून जातो.. कारण आयुष्यात अंधार आला नाही तर प्रकाशाचं महत्त्व कळणार नाही. 
          जसे आयुष्यात चढ उतार येत असतात. आणि त्यानंतर आपल्याला नवीन प्रेरणा मिळत असते. तसंच अंधाराची काळरात्र अमावास्या आली नाही तर आपल्याला पौर्णिमेच्या चंद्रप्रभेचं अप्रूप वाटणार नाही. हो ना..
         कसं असतं ना.. मानवी स्वभावच झालाय की, जे दिसेल त्यात खोड शोधायची, आणि होतंही तसंच.. अंधाराची केवळ नकारात्मक बाजू पाहिली जाते, त्याला सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पाहिलंच जात नाही.
         इतरांचं सोडून जर मी स्वतःबद्दल बोलायला बसली तर खरं सांगते, मला रात्रंच भावते. दिवसाच्या प्रकाशात जेवढं काही सुचत नाही ना तेवढं या रात्रीच्या तिमिरात सुचतं. आणि एका शास्त्रीय संशोधनानुसार आढळलं की, ज्यांना रात्रीचं सुचतं ते क्रिएटिव्ह असतात म्हणे.. ?मग मीही असेल कदाचित क्रिएटिव्ह ? हा भाग अलाहिदा.. 
             पण तुम्हाला नाही का वाटत ओढ अंधाराची? मला तर खरंच ओढ वाटते.. त्या अंधाराची नीरव शांतता मनात वादळ उठवत असली तरी त्या एकांतात मला माझीच नव्याने ओळख होते. 
               बरंच काही शिकायला मिळतं. त्या अंधारात कसलाच भेद नसतो. काळ्या- गोऱ्याचा.. कारण तिथे प्रत्येक रंग रंगहीन असतो! आणि राज्य असतं ते काळ्या रंगाचं.. आणि तो काळा रंग कुणालाच परकं करत नाही.. कुठलाच वर्णभेद करत नाही. सगळ्यांना आपलंसं करत हा अंधार समतेचे खरे रुप सादर करतो. 
               त्या काळोखातंही ऊर्जा शोधता आली पाहिजे. तो काळोख बरंच काही सांगतो. काळोखरात्र.. आणि चांदण्यांनी आच्छादलेले आकाश.. ☁? भारी फिलींग येते राव ?? त्यात कविताही सुचायला वेळ लागत नाही, लगेच लेखणी धावायला लागते माझी..
                आणि त्या अंधारात महत्त्वाचं म्हणजे इतरांसारख्या कटू आठवणी आठवत नाहीत मला तर गोड आठवणींचा स्पर्श होतो मनाला.. आपल्या लोकांशी झालेले संवाद, त्यांच्यासह घालवलेले सारेच क्षण आठवतात आणि असते मनात समाधान आणि ओठांवर स्माईल.. ????
                 म्हणून अंधार मला मार्ग दाखवतो कधीच भुलवत नाही. तो फक्त खुणावतो, नवीन शब्दसंपत्ती आणि कवितांची पर्वणी करायला भाग पाडतो. ? आणि म्हणून अंधारात, चांदण्यांच्या अंथरुणात, त्या नीरव शांततेत, एकांतात वेळ घालवण्याची माझी ही सवय मला खूप आवडते. कारण नव्याने माझी मीच स्वतःला भेटते. नव्याने स्वतःची भेट घेत नव्याने जन्म घेते, त्या काळ रात्रीच्या कुशीत.. ??आणि खरं सांगायचं तर मी कायम माझी ही सवय जपणार आहे.. कारण माझी ही सवय इतरांसाठी माहिती नाही पण माझ्यासाठी मला समाधान देणारी आहे. ??

............ 

          जस्ट सहज सुचलं.. म्हणून व्यक्त केलं.. बाकी काळजी घ्या! शुभ रात्री.. तुमचीच सेजल अर्थात श्रावणी..