Jan 26, 2022
नारीवादी

झुंजार स्त्री (भाग २)

Read Later
झुंजार स्त्री (भाग २)
भाग 2

असेच काहीसे दिवस जात होते, वडिलांच्या बढती नंतर ते दुसऱ्या शहरात नोकरी निम्मित असतं, अधून मधून येणं जाणं असायचं. त्यावेळी गप्पांनी घर गजबजून जायचं. तिची मोठी काकी आणि तीचे कुटुंब मध्ये मध्ये काहीतरी खुसपट काढून तीच्या आई सोबत वाद घालायचे. परंतु तीच्या वडिलांच्या समजावण्याने ती आणि तीची आई दुर्लक्ष करायचे. भाऊ सुद्धा दहावी मध्ये ८७% गुण मिळवून उत्तीर्ण होतो. तीचे ही शिक्षण चालूच असते. वडिलांना पुन्हा ह्याच गावात बदली करून मिळते. "बाबा, बर झालं हा, तुम्ही आमच्या सोबत परत इथेच रहायला आलात."
हो, ग बेटा, खरंच स्वतःच्या कुटूंबासोबत राहण्यासारखा दुसरा आनंद नाही ग.
ए आई आता बाबा पण आपल्या सोबत आहेत, आपण ह्या रवीवारी मस्त फिरायला जाऊ. अरे राजा जाऊ आपण फिरायला पण तुमच्या बाबांना सुट्टी नको का?
हो ते पण आहेच. थोडीशी उदास होऊन ती आत गेली.
अरे माझी चिमणी आज का उदास? अस नाही ग व्हायचं उदास. आपण नक्की जाऊ फिरायला. बघतो मी काही करता येत का ते.
अहो बाबा राहू द्या. तुम्ही आमच्या सोबत आहात हेच खूप आहे.
अखेर तो रविवार उजाडला. दोघेही भावंड आरामात लोळत होते. उठा आधी लवकर दोघे पण पटापट आवरा. गरमागरम नाश्ता करा. म्हणजे मला जेवणाच्या तयारीला लागू दे. संध्याकाळी बाबा आले की आपल्याला फिरायला जायच आहे. रात्रीच जेवण बाहेर करून मग आल्यावर झोपा.
दोघ भावंड, ए फिरायला जायच, म्हणून ओरडतच भराभर सर्व आवरू लागले.
आई बाबा आले ग, द्या बाबा तुमची बॅग. तुम्ही मस्त फ्रेश व्हा.
अरे वाह आज सर्व एकदम खुशीत दिसताय? चला मी आवरून येतो. मस्त गरम चहा घेतो मग आपण निघू. तुम्ही तोपर्यंत तयार व्हा. बाबा दादा तर कधीच तयार आहे. माझीच तयारी बाकी आहे.
ह्या घ्या चहा, आणि भजी. उपाशी नको बाहेर पडायला.
हो हो चालेल. बर वाटल ग पोट तृप्त झालं.
हा हा...काहीपण तुमचं. पोरं तयार आहेत चला आता.बस झालं ते कौतुक माझं.
अग लाजतेस काय? बर बाई चल.
चला रे पोरांनो.
पण बाबा आपण आधी कुठे जायच.
चला सांगतो.
वाह चौपाटी, बाबा किती छान आहात तुम्ही. असे म्हणत दोघेही भाऊ बहीण सागराच्या लाटांसोबत बागडू लागली.
कितीतरी दिवसांनी आई आणि बाबांना निवांत क्षण वेचायला एकमेकांची सोबत मिळालेली. नाहीतर एक घरी तर एक बाहेर.
मुलं किती छान बागडत आहेत बघ.
हो ना, खरच ओ. खूप छान वाटत. पण…
अग पण काय आता? काय झालं?
काही नाही ओ. पण भीती वाटते. माझ्या ह्या चौफेर संसाराला कोणाची नजर…
ए गप काहीतरी आपलं तुझं. परत हे अस बोलणं नको हा.
ए भेळ वाल्या, ये इकडे.
अरे पोरांनो या भेळ खाऊया. भया, दोन सुक्या आणि दोन ओल्या भेळ द्या.
बाबा मला ओली हवी हा. हो रे तुम्हाला दोघांना ओलिच घेतली.
काय मग कशी आहे भेळ राणीसरकार?
इश्य काहीतरी आपलं तुमचं. मुलांच्या पुढ्यात राणीसरकर काय?
अग त्यात काय होतं? मुलांसमोरच काय अख्या जगासमोर सांगेन की तू माझी राणीसरकार आहे ते.
अस म्हटल्यावर सर्व जण जोरजोरात हसू लागतात.
किनाऱ्यावर निवांत क्षण वेचत असताना, वाळूचा बंगला कधी तयार झाला कळल देखील नाही.
हळूहळू रात्र स्वतःचा अंधार सर्वत्र पसरवत होती.
शीतल चांदण अथांग अश्या सागराच्या कुशीत शिरू पाहत होतं. तेव्हड्यात एक लाट येऊन वाळूचा बंगला उध्वस्त करू पाहते. परंतु चौघांच्या प्रयत्नाने तो तसाच छान ऐटीत उभा राहतो.
आईच्या मनावर आलेली पुसटशी चिंतेची चुणूक तीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पण सर्वच आम्ही लगेच तिथून निघालो, आणि बाबांच्या ओळखीच्या हॉटेलमध्ये जाऊन मनसोक्त जेवणावर ताव मारून आलो.
सर्व काही सुरळीतच होतं. दिवसामागून दिवस जात होते. ऊन सावल्यांच्या खेळात जीवन जगणे चालूच होते.
एके दिवशी अचानक त्यांच्या घरी एक पत्र येतं. त्या पत्रातील मजकूर वाचून तीची आई बेशुद्ध च पडते. बालमनाची घालमेल होते घरी वडील, भाऊ कोणीच नसते.....
अशा वेळी ती धावतच शेजारच्या आजीकडे जाते, आजी ए आजी...लवकर ये ग..आई बघ बेशुद्ध पडली. ती अशीच ओरडत असते, पण आजी घरी नव्हती....तीचे रडणे ऐकून तीची मोठी काकी नाक मुरडतच थोड्याश्या शंकेने च तीच्या घरी जाते. ती वेडी त्या काकी ला रडत रडत सांगते....आई तर बेशुद्ध च असते. हे बघ काकी, हे पत्र वाचून आई च अस झालं. काकी पत्र वाचते...आणि तोंड मुरडतच तीच्या आईच्या तोंडावर पाण्याचे हबके मारते.
आई शुद्धीवर येते....ही वेडी नाचू लागते. तेव्हड्यात काकी बोलते....आता तुमची नाचायचीच वेळ आली आहे. आई ला कळलेलं की पत्राच गुपित, गुपित नाही राहिलं. संध्याकाळी वडील आल्यावर आई ते पत्र त्यांच्या कडे भिरकावते. तेव्हा ही चिमुरडी बोलू लागते....बाबा नका वाचू पत्र...तुम्ही पण आई सारखे बेशुद्ध व्हाल. तेव्हड्यात पाठीत एक जोरात धपाटा पडतो. काही कळण्याच्या आतच आई तिला दुसऱ्या खोलीत ढकलून देते. जिथे तिचा मोठा भाऊ अभ्यास करत असतो.आई त्या दोघांना कडी लावून घेते. काहीच कळत नसतं.... फक्त बाबांचा आवाज येत असतो...अगं माझ्या कोणीतरी शत्रूने हे कारस्थान केलं असणार...तू नको रडूस.. काही बदनामी नाही होणार माझी. देवावर विश्वास ठेव. त्या दिवशी कोणीच धड जेवत नाही. हसत खेळत घर शांत होतं. काही शेजारी यायचे आणि समजवायचे तर काहीजण खूप काही बोलून जायचे. तीचे बाबा मात्र प्रसन्नच असायचे. पण आई मात्र कधी गप्प तर कधी रडत असायची. एव्हढच काय तर आईने नोकरीचा राजीनामा दिला. वडील आईला खूप समजवायचे. तिच्या भावाला काय झालं ते कळलेलं. पण तो आई आणि बाबा ह्यांना समजावत रहायचा. तीला मात्र काहीच कोणी सांगत नव्हतं. असच एक वर्ष निघून जातं. वडिलांची तातडीने बदली होते ती पण एका दुर्गम भागात. आई चा आणि मुलांचा डोळे भरून निरोप घेतच ते निघून जातात.
एक दिवस वडिलांचे मित्र आईला सांगायला येतात, आपण त्या अज्ञात पत्र पाठविणाऱ्याचा शोध लावला आहे. आई एकदम खुश होते...एवढे दिवस मलूल झालेला तीचा चेहरा खुलून येतो. कोण आहे ती व्यक्ती... सांगा आधी मला...कोण आहे ती? तुमचीच मैत्रीण निलू. काय???? निलू???? पण ती का करेल अस? वहिनी केवळ तुम्हाला मुख्याध्यापिकेच पद मिळू नये यासाठी तीने हा खेळ रचला, ह्या मध्ये माझा मित्र निर्दोष आहे. आई निलू मावशी ला बडबडू लागते....तिला तस हवं होतं तर तीने मला सांगायच मी हसत हसत ते पद दिलं असत...म्हणजे मला नोकरीवर असताना तू घरी थांब घरी थांब यासाठीच करायची तर ती.शी...मी माझ्या देवासमान पती वर उगाच रुसून होते....काय झालं हे माझ्या कडून.
वहिनी,वहिनी सांभाळा स्वतःला....आणि तुमचा नवरा आला की त्याला ही बातमी तुम्हीच द्या. त्या दिवसा पासून आई बाबांची वाट पहायची. कधीतरी बाबांच खुशाली च पत्र यायच...मग त्यालाच उत्तर म्हणून आम्ही पत्र पाठवायचो.दादाच कॉलेज आणि माझी शाळा चांगली चाललेली. पण आमचं लक्ष बाबांच्या वाटेकडे लागलेल असायचं.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now