Nov 30, 2021
कथामालिका

झुंज त्याची स्वतः शिच...

Read Later
झुंज त्याची स्वतः शिच...

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

झुंज त्याची स्वतः शीच......

समीर अतिशय हुशार मुलगा,प्रत्येक गोष्टीत अव्वल येणारा,सर्वांना आपलेसे करून घेणारा,..कोणत्याही समस्येला तोंड देणारा...पण म्हणतात ना,ज्यांना सहन करायची सवय झाली असते त्यांनाच सर्व सहन करावे लागतात,असेच काहीसे समीर च्या बाबतीत...

चला तर मग जाणून घेऊया समीर च्या जीवनातील काही प्रसंग.....
समीर ला चार भावंडे म्हणजेच तीन भाऊ आणि धाकटी बहिण,यासर्वांनमध्ये समीर मोठा,.. आई होती पण असून नसल्या सारखी म्हणजेच शरीराने अधू होती आणि वडील नुसते रात्रंदिवस दारूत राहायचे..अशावेळी समीर वर सर्वस्व जबाबदारी होती,तो तरी बिचारा काय करणार,परिस्थिती च तशी होती...

समीर जरी खूप समजदार असला तरी त्याची भावंड मात्र स्वार्थी होती,त्यांना वाटायचे,,,काय हे नशीब आपले अन् कसल्या दळभद्री घरात जन्म घेतला आपण....याउलट समीर मात्र कशाचीच खंत बाळगत नव्हता...

लहानपणापासून समीर मिळेल ते काम करून स्वतःचे घर व सर्वांचे शिक्षण देखील सांभाळत होता,समीर ची जिद्द व चिकाटी ठाम होती,त्याला त्याच्या आई बाबा भाऊ व बहीण यांची सैदेव काळजी वाटत होती,पण तो सर्वांना धरून जरी चालत असला तरी त्याची भावंडे ही फार स्वार्थी होती...

समीर त्याच्या अधू आईची नेहमी काळजी घेत असे,येवढेच काय तर घरात स्वयंपाक देखील तोच करायचा,समीर चे जेवढे कौतुक करावे तितके कमीच,पण घरातील लोकांना त्याचे कष्ट कधी दिसायचे नाही,दिसायच्या फक्त त्यांच्या मागण्या...सर्वांच्या मागण्या पूर्ण करतांना स्वताच्या इच्छा तर त्याच्या मरून च गेल्या होत्या...

अशातच त्याच्या कॉलेज मधील साची नेहमी त्याचसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असे पण समीर तिच्या कडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचा,साची ही श्रीमंत होती,पण कुठेतरी तिला समीर खूप आवडतं होता,तिने  तसा प्रयत्न देखील केला,पण समीर तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचा,खर म्हणजेच समीर च्या मनात देखील साची होतीच,पण त्याच्या जबाबदाऱ्या खूप असल्यामुळे तो साची पासून लांब राहायचा...

एक दिवस साची ने समीर ला लग्ना ची मागणी घातली,मात्र एका क्षणा चा विलंब न करता समीर ने तिला थेट नकार दिला...साची ला खूप वाईट वाटले पण शेवटी तिने स्वतःची समजूत काढत समीर चा पिच्छा सोडून दिला,..आणि कुठेतरी समीर ला देखील साची आवडायची पण त्याला जबाबदाऱ्या खूप होत्या म्हणून त्याने तिला नकार देत घरच्यांकडे लक्ष दिले....भाऊ जरा स्वार्थी च होते म्हणून त्यांनी आपापल्या आवडीने लग्न केले,व बायकांना घेऊन वेगळे राहत होते...

आता उरली बहीण तर बहिणी ला वाटले घरातील काम करावे लागेल,आणि तिचा प्रियकर नेहमी तिला लग्नासाठी विचारायचं म्हणून ती देखील घरातील परिस्थिती चा विचार न करता निघून गेली...समीर आता पूर्णपणे एकटा पडला होता,त्याला त्याच्या भावंडांची खूप आठवण येत होती,पण काय करणार,,,त्यांना कुठे घराची समीर सारखी आवड होती...

मुलांच्या अशा वागण्या मुळे समीर च्या बाबांना झटका बसला,आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला,..आता समीर ला फक्त आणि फक्त त्याच्या अधू आईची साथ होती,पण आई चा आजार दिवसेंदिवस वाढतच चालला होता,,समीर मात्र आईला अजिबात कशातच दुख्वत नव्हता,तो जेवढी सेवा करता येईल तेवढी करायचा...आईची काळजी घेता घेता स्वताकडे पूर्ण दुर्लक्ष करायचा...

आई कडून समीर चे दुःख बघविल्या गेले नाही,आणि तिने सुध्धा प्राण त्यागले...आता समीर पूर्ण एकटा पडला होता...त्याला सुध्धा मरून जावेसे वाटले...पण लगेच मग साची ची आठवण झाली,,,आणि तो तिच्या घरी निघाला तर काय साची च्या गळ्यात मंगळसूत्र त्याला दिसले,त्याच्या डोळ्यात लगेच अश्रू वाहू लागले आणि मनात तो म्हणाला,,माझ्या नशिबात कदाचित सुख नाहीच पण साची सुखी रहावी बास येवढेच मागणे...

त्याने साची ची माहिती काढली तर त्याला कळले की साची खूप आनददायी आहे,...स्वताच्या नशिबाला तो कोसत तिथून निघाला...

समीर प्रत्येक गोष्टीत चांगला असून देखील त्याला सुख मिळाले नाही...आणि तेच त्याचे भावंड आज सुखाने जीवन जगत आहेत...असे असतात एकेकाचे नशीब,समीर सारखे खूप मुलं असतात ज्यांना दुसऱ्यांना सुख देण्यातच आनंद मिळत असतो,मात्र स्वतः ला दुःख सहन करावे लागतात..

Ashwini Galwe Pund...

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ashwini Galwe Pund

Teacher

I am simple living women