Login

तुझाच चेहरा

ई Remember Only You

तुझाच चेहरा


वेल्हाळ पापण्यांना
स्मरतो तुझाच चेहरा
बेधुंद होत असे मी
आठवून रंग गोरा

उमलते जाई जुई
मनमोर नाचे थुई थुई
स्वप्नातली तू ललना
मुर्त माझ्यासाठी ना

चंद्र चांदण्या
होती देखण्या
तूझ्या रूपाचा खजीना
तुज वाचून अधुरे पणा

तुझीच जादू जंतरमंतर
कधी दूर होईल अंतर
तना मनावर
तव स्वप्नांचे अत्तर

एक तुझा कटाक्ष
रोम रोमी शहारे दशलक्ष
जे असतील रुक्ष
तेही भेदतील अंतरिक्ष


स्थापिले तुज हृदयांगणी
सदा पाहिले तुज प्रेमदर्पणी
तुझं वाचून अन्य न कुणी
कर स्विकार माझा राणी