तु..❤️

A Poem On Someone Special


वसंतात या बहर येईल
तुटल्या पर्णाने गळून जावे..
कणखर ती रातराणी जणू
काट्यांनीही पळून जावे...

वैशाख वणव्यात गुलमोहोर फुलतो
हर्षाने थोडे लोळून घ्यावे...
काटेरी प्रांजळ गुलाब जणू
अपेक्षांना थोडे घोळून घ्यावे...

अफाट कल्पनेंच विश्व ते
अद्वितीय क्षितीजाचे चांदणे खुलून यावे...
नाजूक शुभ्र जाई-जुई जणू
यशाने कसे ऊन्हातही फुलून जावे...

तव..."सुष्म"-स्मितमधुरहास्ये
मकरंदानेही विरघळून जावे...
खिडकीतला निशीगंध जणू
सुखाने वेड्या दरवळून यावे..

कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे