सुरेश बाल्कनीत बसुन चहाचा घोट घेत बसलेला असतो.
आयुष्याची उजळणी करताना, आपला काही चुकल का याचा विचार तो करत होता.
आयुष्याच्या उतारवयात तो आणि त्याची बायको, दोघच रहात होते घरी.
सुरेश आणि त्याची बायको रमा, त्यांना दोन मुल, एक साक्षी आणि एक सार्थक. साक्षी तिच्या संसारात रममाण. तर सार्थक त्याच्या संसारात, लंडन ला स्थानिक होता तो.
लहानपणापासून सुरेश ने सार्थक ला कडक शिस्तीत ठेवले होते. त्यामुळे सार्थकला नेहमीच वाटायचे की, ते जास्त जीव साक्षीलाच लावतात.
जसजसा तो मोठा होत गेला, तसतसा तो त्याच्या वडीलांपासुन दुर होते गेला. त्याने त्याचा जॉब पण देशाबाहेर बघीतला होता.
सगळ आयुष्य सुरेशच्या डोळ्यासमोरुन चालल होत. नकळत त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. रमा ने पाहीले. ति त्याच्याजवळ आली.
“एवढच तर मग एक फोन करा न त्याला” रमा
“तो त्याच्या मनाने गेलाय, मी नव्हत सांगीतल” सुरेश रागात बोलला.
बाप लेकाच्या भांडणात आई घुसमटत होती.
तेवढ्यात दारावरची बेल वाजली.
रमाने दार उघडून पाहील तर पोस्टमन होता.
“आजच्या काळात पत्र कोणी पाठवल?” रमा मनातच विचार करते. सोबत एक बॉक्स असतो.
रमाने पत्र उघडुन पाहील तर ते सार्थक ने पाठविले होते. त्याच नाव बघताच सुरेश ने मान फिरवुन घेतली.
रामाने पत्र वाचायला सुरवात केली.
“प्रिय बाबा,
मला माहितीये, तुम्हाला माझा खुप राग आला असेल, मी वागलोच तसा. पण मग लहानपणापासून तुम्हाला फक्त दिदीला जीव लावताना पाहील मी. मग मला पण राग यायचा. बाबा असुन असे कसे वागता म्हणून.
पण जेव्हा राजु झाला न, तेव्हा कुठेतरी मनात आल, बाबा कधी चुकु शकतात?? राजु तुमच्या वरच गेलाय. खुप समजुतदार झालाय तो.
इथे लंडन ला, ख्रिसमस खुप जोरात सण साजरा करतात. राजुच्या शाळेत पण त्याची तयारी चालु असते. राजुने पण त्याच्या उशाशी पिशवी ठेवली होती. म्हणे सांताक्लॉज येइल आणि माझी विश पुर्ण करेल. तशी त्याची इच्छा पूर्ण पण झाली.
दुसऱ्या दिवशी राजुने मला मिठी मारली, म्हटले काय झाल. तर बोलतो कसा, “थॅंक्यु सांताक्लॉज”
दोन क्षण तर मला शॉक बसला. मग तोच बोलला. आमच्या मॅडम बोलल्या होत्या. सांताक्लॉज ला प्रत्येकाच्या घरी जाता यात नाही म्हणून त्याने आपल्या वडीलांना त्या विश पुर्ण करायला सांगीतलेल्या असतात. आजोबांनी पण तुमच्या विश पुर्ण केल्या असतील ना??
त्याच्या ह्या एका प्रश्नाने, माझ आजपर्यंतच आयुष्य झरकन सरकल.
मग मला आठवल, एक वेळच जेवण करून, आम्हाला दोन वेळ खायला घालणारे बाबा, गरजेनुसारच माझ्या विश पुर्ण करणारे बाबा, जे हव ते सहज भेटल असत तर मी पण कदाचीत, कुठेतरी असाच मागे राहीलो असतो.
शिकायला बाहेर जात आहे म्हणून, हौसेने केलेल सोन, आईच्या सोन्याच्या बांगड्या गहाण टाकल्या. त्याच सोडवून आणल्या आहेत. सोबतच्या बॉक्स मध्ये आहेत. आजवर मी पाठवलेले पैसे तर तुम्ही घेतले नाहीत. पण याला नाही म्हणु नका.
आजच्या दिवशी सांताक्लॉज सर्वांच्या इच्छा पुर्ण करतो, मी पण माझ्या सांताक्लॉज ला विश मागतोय, माझा बाबा मला परत तसाच हवा आहे.
मी तिथेच आहे, जेव्हा पहील्यांदा हट्ट करताना खाली बसुन राहीलो होतो. अपेक्षा करतो, सांताक्लॉज माझी इच्छा पुर्ण करेल.
तुमचाच सार्थ
सुरेश पटकन बाल्कनीत गेला. सार्थक लहान असताना हट्ट करत जसा खाली बसला होता, तसाच तो आपण बसलेला होता.
सुरेश आणि रमा पटकन खाली आले.
“वेडा आहेस का, अस कुठेही बसतात का??” सुरेश
कितीही राग असला तरी आपल्या मुलाला अस रस्त्यावर बसलेले बघुन त्यांना कसरतीच झाल.
“सॉरी न बाबा, चुक झाली. आज बाबा झाल्यावर कळते की सांताक्लॉज होण सोपी गोष्ट नाहीये” सार्थकचे डोळे भरून आले होते.
“रमे याला आत घे, फक्त शरीराने वाढलाय, बुद्धीने कधी वाढशील रे” सुरेश ने सार्थकला मिठीत घेत बोलले.
“अजुन एक” सार्थक एक कागद सुरेशच्या हातात ठेवतो.
“आता हे काय??” सुरेश
“मी भारतातच शिफ्ट होतोय, आजपासून तुमच्याजवळच राहील. आज यांना इथे सोडतो, बाकी प्रोसेस पुर्ण करून मी नेक्स्ट महीन्यात येइल” सार्थक
“यिपीपीपीपी सांताक्लॉज ने माझी विश पुर्ण केली” राजेश जोरात ओरडत बोलला.
तस सुरेश, रमा, सार्थक आणि त्याची बायको कोमल त्याच्याकडे बघत राहिले.
“तुझी विश तर कालच पुर्ण झाली न??” कोमल
“ते असच होत, माझी खरी विश आज पुर्ण झाली, सगळी फॅमिली एकत्र आली” राजेश त्याच्या आत्या कडे धावत जात बोलला.
साक्षी पण तिच्या नवरा आणि मुलांसोबत तिथे पोहोचली.
परत सगळ्यांना शॉक बसला.
राजेश ने गुपचुप त्याच्या आत्याला कॉल लावुन बोलावून घेतल होत.
“आमचा खरा सांताक्लॉज तर तु आहेस” साक्षी त्याचे लाड करत बोलली.
सार्थकनेही साक्षीला मिठी मारली. ब-याच वर्षांनी भाउ बहीण भेटले होते.
“आजची पार्टी माझ्याकडुन” सार्थक
तसे सगळी लहान पिलावळ आनंदाने नाचु लागली.
ते म्हणतात ते खोट नाही, की प्रत्येकाजवळ त्याला पोहोचता येत नाही, म्हणून कोणाच तरी निमित्त तो करुन घेत असतो.