तु मी आणि कॉफी : भाग ३ (अंतिम भाग)

गोष्ट त्यांच्या प्रेमाची आणि कॉफीची!


             


"इतकं प्रेम करतोस तु माझ्यावरं??",

क्रमशः
   "हो..", नंदिनी च्या प्रश्नावर समर अगदी शांतपणे उत्तर देतो, तेव्हा नंदिनी म्हणते,
"पण समर.. हा इतका दुरावा?? आपलं तर बोलणं ही कमी होत गेलं, गेल्या काही वर्षांपासून म्हणजे अगदी सुरुवातीला रोज रोज  मगं नंतर आठवडय़ातून आणि नंतर नंतर महिने आणि अगदी पुढे महिन्यातून एकदा. मी माझ्या कामात इतकी गुतुंन गेले की नैनीताल वरून पुढे एका वर एक बदली, प्रमोशन खूप अडकले. आणि तु इकडे मात्र.. ",

" मी इकडे तुझी वाट पाहत होतो. ",
  नंदिनीचे बोलणे तोडतं समरने तिचे बोलणे पूर्ण केले,तेव्हा नंदिनी म्हणते,

" हो, पण का तेचं विचारतेयं मी? व
समर मध्ये मी तुला सांगितले होते दोन वर्षांपूर्वी आपले बोलणे झाल्यावर "

" आपले शेवटचे बोलणे ", समरचे बोलणे ऐकून नंदिनी म्हणते," हो शेवटचे बोलणे.. तुला मी सांगितले होते तु पुढे जा, मगं तु का नाही लग्न केले??"

   "हो तु सांगितले नंदिनी पण मी तयार नव्हतो पुढे जायला. "

   समरचे बोलणे ऐकून नंदिनी म्हणते," का?? आणि तु  मॉम डॅड चा ही विचार नाही केलास?? त्यांनी तुला मध्ये काही मुलींचे फोटो दाखवले होते ना, मगं तु का नाही लग्न केले, का पुढे नाही गेला? "

    नंदिनीचे बोलणे ऐकून समर म्हणतो," ए नंदिनी तु पुढे गेलीस का? "

त्यावर नंदिनी म्हणते, "हे बघं प्रश्न मी विचारला आहे आणि मी आज माझ्या स्वप्नांपेक्षा खूप पुढे आहे मी, ज्याचा विचार ही कधी केला नव्हता मी. तु कुठे आहेस पण??
तिथेचं...?? "

    " हो.. मी तिथेच आहे नंदिनी .. तु जशी सोडून गेली होती अगदी तसाच आहे मी आणि तिथेचं... "

    तेव्हा समरचे बोलणे ऐकून नंदिनी म्हणते," मला तसे म्हणायचे नव्हते समर.. "

  तेव्हा नंदिनीला थांबवत समर म्हणतो," मला कळतंय गं तु कोणत्या अर्थाने बोलली ते, पण खरे सांगू मी आहे तिथे खूप खूश आहे. आणि मॉम डॅड चे म्हणशील तर तुला माहित आहे अवनी सगळे. त्यांचं लग्न झाल्यापासून पटलं नाही आणि अगदी मला मुली ही लग्नासाठी दोघांनी वेगवेगळ्या पाहिल्या. याबाबतीत ही ते एकत्र येऊ शकले नाही. मगं मी ही त्यांना सांगितले की, मी तुझ्याशिवाय नाही लग्न करणारं कोणाशी? "

" अरे पण मुलगा म्हणून त्यांनी ही तुझ्या लग्नाची किती स्वप्नं पाहिली असतील ना? मगं त्यांना का त्रास ",

  नंदिनी चे बोलणे ऐकून समर म्हणतो,
" त्रास कसला गं..??
मॉम डॅड चे सतत वाद पाहून माझा प्रेम, लग्न यावर विश्वास नव्हता आणि मी लग्न चं करणार नव्हतो, पण फक्त तुझ्यामुळे मला प्रेम, लग्न, नाती यावर विश्वास ठेवायची पुन्हा इच्छा झाली, आणि हे मॉम डॅडना सुद्धा माहित आहे की मी फक्त तुझ्यामुळे चं लग्नाला करायला तयार झालो होतो आणि त्यांना ही तु आवडली चं आहेसं त्यामुळे ते ही फार काही बोलले नाही. हा कोणी बोलले की ते मला विचारायचे फक्त, अजून किती वर्ष एवढेच??"

   समरचे बोलणे ऐकून नंदिनी क्षणभर थांबते आणि मगं समरकडे पाहून म्हणते,
" मध्ये दोन वर्षे तु पुढे जावं म्हणून चं तर मी तुझ्याशी बोलणे ही टाळलेले समर. म्हणजे आपलं महिन्यातून होणारं बोलणं ही मुद्दाम बंद केले मी तरीही तु...
हा इतका दुरावा कसा सहन केला तु??"

   "प्रेम माणसाला दुरावा कायं खूप काही सहन करायला शिकवते.", नंदिनी च्या प्रश्नावर समर अगदी सहज उत्तर देतो.

" ओहं.. हे असं बोलण पण दुराव्याने आणि प्रेमाने शिकवलं वाटतं तुला? "

" हो ", मिश्किल हसतं समर म्हणतो, तेव्हा नंदिनी म्हणते,
" ह्म्म...! दिसतेच आहे ते.  तु ही अगदी दाढी वगैरे एकदम.. खूप बदल झालाय ना इतक्या वर्षात?"
   तेव्हा नंदिनीचे बोलणे ऐकून समर म्हणतो

" छे!! मला तर काहीच बदल दिसत नाहीये. "
तेव्हा उत्सुकतेने नंदिनी विचारते,
"हा बदल दिसत नाहीये तुला?"

  तेव्हा  समर म्हणतो," हा दिसतोय, म्हणजे तु जरा थोडी जाड झाली आहे, पण शरीर काय गं रोजचं नव्याने बदल होतात. बाकी कायं सेम आहे सगळे!"

   समरचे हे बोलणे ऐकून नंदिनी म्हणते,
" कायं सेम आहे???"
"तु, मी आणि ही कॉफी!!"

   समर उत्तर देतो आणि समरचे हे बोलणे ऐकून नंदिनी गालातल्या गालातं हळूच हसते, तेव्हा समर म्हणतो,

" कायं मगं आता अजून किती वर्षे वाटं पाहू मी?? आता अमेरिकेला किती वर्षे??"
   नंदिनीकडे पाहंत समर विचारतो.

"अमेरिकेला तर जायचं पण आपण एकत्र ",

नंदिनीचे बोलणे ऐकून समर प्रश्नार्थक नजरेने तिला विचारतो,
"म्हणजे??",
  तेव्हा समरकडे पाहंत ती मिश्किल हसतं म्हणते,
" म्हणजे असं की, आता मला फक्त तुझी बॉस व्हायचं आहे आयुष्यभरासाठी!"
  तेव्हा समर लगेचचं समोरच्या व्हेसल मधील एक गुलाबाचे फूल नंदिनी च्या पुढ्यात घेऊन तिला विचारतो,
" लग्न करशील माझ्याशी?"

"हो, फक्त एक अटं आहे.."
  समर च्या बोलण्यावर नंदिनी म्हणते, तेव्हा समर थोडासा वैतागून म्हणतो,
" आता कायं अटं अजून गं नंदिनी ??"

  तेव्हा मिश्किल हसतं समरचे हळू चं गालगुच्चे घेतं नंदिनी म्हणते,
"अटं अशी आहे समुडी की, लग्नानंतर पण मला आपली ही डेटं हवी आहे अशीचं रोजं आणि मला अजून कोणी नकोयं त्यामध्ये.
फक्त तु मी आणि ही कॉफी..!"

    तेव्हा नंदिनीचे बोलणे ऐकून समर हसतो आणि प्रेमाच्या नव्या प्रवासासाठी ते निघतातं.

समाप्त
(ही कथा इथे समाप्त झाली आहे.. तुम्हाला ही छोटुशी कथा कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा)

समाप्त