तू अन् मी एक आता!

The Poem Narrates The Situation Between Two Couples. Then In The End They Meet And All Good Starts Ahead

कवितेचे नाव :- तू अन् मी एक आता!
विषय :- दोन ध्रुवावर दोघे आपण
फेरी :- राज्यस्तरीय कविता स्पर्धा


मी तुझी वाट पाहता
सुकून गेले आसू आता
होऊन गेली बरसात
दोन ध्रुवावर दोघे आपण

प्रिये तुजला त्रास होता
हृदयी तू नेहमीच असता
ऋतू आले ऋतू गेले
दोन ध्रुवावर दोघे आपण

वसंत बहर आला
घेऊन सुखाची चाहूल
मी चिंब भिजता
दोन ध्रुवावर दोघे आपण

तुझी माझी भेट
अवचित पुन्हा घडावी
दिवस रात्र एक व्हावे
दोन ध्रुवावर दोघे आपण

आली ती वेळ
तुझ्या माझ्या मिलनाची
श्रावण बरसे रिमझिम
दोन ध्रुवावर दोघे आपण

समाप्त
©पूजा आडेप
जिल्हा - पुणे