येशील ना..साथ देशील ना भाग 4 अंतिम
क्रमशः भाग 3
त्यानंतर मी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला,पण तो नाही ऐकला, तो तिच्यासोबत निघून गेला कधीही न परतण्यासाठी, तो माझ्यावर जीवापाड प्रेम करायचा, माझ्या डोळ्यातले अश्रू कधी बघवले नाही त्याला, मग असं काय झालं की तो मला सोडून तिच्याकडे गेला या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही मिळालेले नाही, रडत रडत सगळे सांगत होती.
तरुण बाईने अक्ख आयुष्य एकट्याने जगणं किती कठीण असत हे त्याला नाही कळलं. पण मी जगले माझ्या अनासाठी ,सिंगल पॅरेंट असूनसुद्धा तिच्यासाठी सगळं केलं.
अनिरुद्ध नी हळूच तिला जवळ घेतलं, तुझा होकार असेल तर मी घरी सांगतो.
“मला माझ्या काही प्रश्नांची उत्तर हवीत”
“बोल...”
“लग्न झालं आणि उद्या जाऊन तुला तुझं मूल हवं असेल आणि ते झालं तर माझ्या अनाया ला अंतर तर देणार नाहीस ना....?
“मी तुला विश्वास देतो, तुमच्या दोघांव्यतिरिक्त मी माझ्या आयुष्यात कुणालाही येऊ देणार नाही."
“आता तर तू तयार आहेस ना लग्नाला?”
तिने होकारार्थी मान हलवली
“ हो, पण माझ्यासाठी हे सोपं नाही आहे, हे सगळं मी माझ्या अनाया साठी करतीये तिच्या बेटर लाईफ साठी, आणि हो माझी मनाची तयारी व्हायला थोडा काळ लागू शकतो, तुम्ही समजून घ्याल ना."
तो हसला आणि तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी अनुरुद्ध दोघांची फॅमिली घेऊन त्याच्या घरी आला, सगळ्यांना बघून तिला आश्चर्य वाटलं, सगळे लग्नाच्या तयारीने आले होते अनिरुद्ध च्या बहिणीने तिला तयार केलं, घरच्या घरी लग्न विधी पार पडला आणि नेहमीसाठी अनिरुद्ध तिला आणि अनायाला त्याच्या घरी घेऊन गेला.
पहिल्या रात्री ईशानानी अभिराज ची डायरी उघडली त्यातली एक कविता वाचली.
“ डोळे मिटता तूच दिसायचास
डोळे उघडतानाही तूच दिसायचास
आता हे डोळेही थकले
तुला बघून
माझं विश्व पूर्ण झालं
तुझी जागा कुणीतरी घेऊन”
या कवितेच्या ओळी वाचून तिने डायरी जाळली आणि नेहमी करिता अभिराज चा विषय संपवला.
काही वेळाने अनिरुद्ध रूम मध्ये आला, इशाना बेड वर घुंघट ओढुन फिल्मी स्टाईल मध्ये बसली होती, त्याने हळूच तिचा घुंघट वर केला आणि
तू मिले, दिल खिले
और जीने को क्या चाहीये
तू मिले, दिल खिले
और जीने को क्या चाहीये
ना हो तू उदास
तेरे पास पास
मै रहुंगा जिंदगी भर
सारे संसार का प्यार
मैने तुझं ही मे पाया
तू मिले, दिल खिले
और जीने को क्या चाहीये
हे गाणं गुणगुनू लागला, तिनेे मान वर करून त्याच्या डोळ्यात बघितलं, त्याच्या डोळ्यात तिला फक्त प्रेम दिसलं, निरपेक्षित प्रेम, तिनी त्याला आलिंगन घातलं आणि स्वतःला अर्पण केलं....आणि अनिरुद्ध सोबत नवीन जीवनाची सुरुवात केली.
समाप्त:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा