त्याच रात्री विराटला घरी यायला उशोर झाला, तन्वी tv बघत सोफ्यावर झोपून गेली होती, त्याने तिला पाहिलं आणि तिच्या जवळ गेला ,तिच्या केसातून हात फिरवला, तेवढ्यात मागून जोरात आवाज आला,
" Romance बास आता, रेसिपशन च्या तयारीला लागले...."
प्रिया, डॅनियल, कायु, अनु वहिनी आणि दादा आले होते. तन्वी दचकून उठली आणि विराट पण दचकून मागे वळला, आणि लाजला.
" विराट आता लाजून काही उपयोग नाहीये, कामाला लागा..."
त्या रात्री सगळ्यांनी एकत्र जेवण केलं आणि रेसिपशन ची तयारी सुरू केली. दुसऱ्या दिवशी विराट आणि तन्वी ऑफिस मध्ये गेले.
विराट नेहमीसारखाच त्याचा style मध्ये होता. ऑफिस मधल्या सगळ्याच मुलीना तो आवडायचा. पण सिया सोडली तर कुणालाच कंपनी नव्हती की विराट तानवी सारख्या सध्या मुलीच्या प्रेमात पडला होता आणि त्याने तिच्याशीच लग्न केलय ते. सगळे जण फक्त हीच चर्चा करत होते की व्हिएट ची प्रेयसी कोण आहे ते, तन्वी समोर पण हाच विषय निघाला, केशका पन होते,
" केशका तुम्हाला तरी माहीत असेल ना कोण आहे विराट सरांची बायको ?"
हे ऐकताच तन्वी लाजली, तेवढ्यात केशका म्हणाले,
" हाहा, मला सिरांनि नाही सांगितलं.
" पण हे बोलतानाच त्यांनी तन्वीचे लाजणे टिपले, काहीतरी संशय आला म्हणून ते लगेच विराट कडे गेले. " विराट सर, बोलायचं होतं"
" बोला ना..."
" ती तन्वी तुमचं नाव ऐकलं की लाजते, तिच्यापासून लांब रहा ... काहीतरी आहे त्या मुलींमध्ये..." विराट जोरात हसायला लागला, आणि म्हणाला,
" तुम्ही काळजी नका करू, तशी बरी मुलगी आहे ती..."
असं म्हणाला आणि हसायला लागला परत, "सर के झाल?"
"काही नाही...काही नाही!!"
परत सगळे जण आपल्या कामाला लागले. Reception ची तयारी पण जोमात चालू होती, आणि विराटच्या प्रेयसीचे ऑफिस मध्ये खूप चित्र पण बनवली जात हाती ,आणि गम्मत म्हणजे तन्वी पण ह्या सगळ्या मध्ये चित्र रेखाटत होती. शेवटी रेसिपशन उद्यावर आलं, सगळेच जाणार होते, कुणीतरी तेव्हढ्यातब म्हणलं,
" तन्वी, तुझ्या घरावरूनच मी जाणारे , तर जाताना तुला पिक करतो..." तन्वी एकदम म्हणाली,
" नको नको, मी खरंतर उद्या जर कामात आहे, तर येणं होईल का नाही ते माहीत नाही... "
" आग असं नको करू, तू यायला हवस..." तन्वी फक्त हसली. तेवढ्यात विराट आला,
" Guys, its time to go home! तुम्ही अजून बसला आहात..."
" सर असच बोलत होतो! तुमच्या wife ला आम्हाला सगळ्यांना बघायचंय, खूप उत्सुकता आहे ! "
" हो हो... अगदी खरंय सर..." असं तन्वी म्हणाली
" उद्या या मह सगळे, तन्वी पण तुला जमणार नाही असं ऐकलं मी आत्ता ? "
असं विराट चेष्टा करत म्हणाला.
" हो सर, थोडं personal काम होतं !"
"ठीक आहे, आपण भेटू पण सगळे !!!"
विराट मुद्दाम तन्वीकडे बघत म्हणाला.
"हो हो..."
सगळे घरी निघाले, तन्वी पण चालत स्टेशन च्या दिशेने निघाली, मागून विराट गाडीमधून आला,
" मॅडम आत बसा!!!!"
" सर, तुम्ही मला घरी सोडणार "
" माझं काम आहे, करण घराच्या किल्ल्या तुझ्याकडे आहेत ..."
" येस..." तन्वी गाडीत बसली..
"मला खूप छान वाटतंय तन्वी! उद्या आपलं नातं सगळ्यांसमोर येणार.... आणि तू ह्या कंपनीची मालकीण आहेस हे सगळ्यांना समाजणर... तुला ऑफिस मध्ये आताची काम करायची गरज नाही, तुला वेगळं ऑफिस देतो मी, नवीन जबाबदाऱ्या देतो...
" विराटच वाक्य अर्धवट मोडत तन्वी म्हणाली,
" नाही, आपण आपलं पर्सनल आणि ओफिस च आयुष्य पूर्ण वेगळं ठेवुयाय !! नाहीतर कर्मचाऱ्यांवर अन्याय होईल, आणि मला अजून जबाबदाऱ्या नको,खूप खडूस आहेस तू, त्रास देशील खूप..."
विरॅट हसत म्हणाला,
"अग राणी .... तू जे काम करतेस ते उत्तम करतेस, you desreve it ... Thats all..." " आपण ह्याच्यावर नंतर बोलू..."
"ठीक आहे, मला आता सांग आपण फिरायला कुठे जायचंय, Europe, Australia? "
" तू माझ्याबरोबर असलास ना, तर मला आत्ता सुद्धा जगातल्या सुंदर ठिकाणी आहे असं वाटतंय! "
"पण मला तर जायचंय ना !"
" ठराव मग तूच, उद्याची तयारी राहिलीय ते पण आहे ना महत्वाचं..." विराट तन्वी च्या जवळ येऊन कानात म्हणा,
" आपलं honeymoon ला पण जाणं आहे ना महत्वाच..."
तन्वी लाजली. तो दिवस उजाडला, आणि तो क्षण ही आला , तन्वी ने सुंदर निळ्या रंगाची साडी नेसली होती आणि विराटने झब्बा कुर्ता घातला होता, दोघंही एकमेकांना बघून बेधुंद झाले, असे बघणाऱ्याला वाटत होतं की ते परत प्रेमात पडत आहेत एकमेकांच्या....
रेसिपशन च्या वेळेस सगळे जमा झाले होते, पण विराट फक्त पुढे आला स्टेज वर, ऑफिस मधले , त्यांचे सगळे गेस्टस, तन्वीच्या पण सगळे घरचे आले होते. विराट बोलत होता,
" Good evening everyone, I know I married my darling in a secret ceremony, but it was what needed at that time. All of you want to know who she is? Even I am eager to tell everyone that this my special girl. I fell in love with her innocence and simplicity which is also garnished by some craziness. She is not like me, she is different , she is precious...So here I get you all to meet my precious girl.... Tanvi Rao Kashyap "
हे ऐकून सगळ्यांनाच आनंदाचा धक्का बसला, की एकेकाळी तन्वीला ज्या बॉस ने त्रास दिला तो तिच्याच प्रेमात पडला. केशकाचा तर चेहरा वेगळाच रूप दाखवू लागला, मग शेवटी ते पण हसले. ऑफीस मधल्यांना तर समजलच नाही काय करावं, कारण त्यांची मैत्रीण आता मालकीण झाली होती, पण तुला सगळ्यांनाच माहीत होतं तन्वीचा स्वभाव खूप चांगला होता. विराट स्टेज वरून खाली उतरला ,त्याने तन्वीचा हात पकडून तिला स्टेज वर आणले, आणि अलगद तिचा खांद्यावर हात ठेवला. दोघेही लाजत होतें पण एकेमकबरोबर खूप सुंदर दिसत होते. हळू हळू सर्व आलेले त्यांना येऊन शुभेछा देत होतें. सगळ्यांना तन्वी अँड विराट हे खूप आवडले पण होते. सगळं छान होतं, अँड असच राहिलं......
इथे मी, Yes sir ... ह्या कथेची सांगता करते, तुम्ही दिलेल प्रेम आणि प्रतिसाद माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली ही नक्की सांगा. तुमच्यासाठी अजून पण कथा पुढे नक्की घेऊन येईन. तुमची, ~ the story express
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा