मी घरी गेलो आणि विचार करत होतो की काय घेऊन जायचं, माझ्या डोक्यात आलं की मला त्यांना impress करायचंय करण मला तिच्याशिवाय कुणाशीच लग्न करायचं नव्हतं, आता नाही पण कधीतरी तिला विचारणार होतो म्हणून त्याची पूर्व तयारी चालू होती माझी. बहुतेक तिच्याशी नाही तर दुसऱयाकुणाशीच नव्हत करायचं लग्न. तेवढ्यात तन्वीचा फोन आला,
"सर, एक बोलायचं होतं"
"बोला मॅडम"
"ते आपण रात्री elephanta ला अडकलो होतो ते सांगू नका ना प्लिज, करण दादा खूप रागवेल मला की मी उगाच वेळ घालवला आणि तुम्हाला त्रास झाला ते"
मी जोरात हसायला लागलो,
"नाही ग ...नाही सांगणार...अजून काही"
"नाही ...आणि वेळेवर या उद्या"
"नक्की, मला खूप इच्छा आहे भेटायची त्यांना"
"भेटून काय करणार"
"Impress करणार त्यांना,दुसरं काय"
"कशाला?"
"सहज...तू ये ना माझ्याघरी कधीतरी... आवडेल मला खूप "
"येईन ना नक्की..."
"मला सोडून नको जाऊस कधी!"
"का गेले तर काय होईल..."
"महित नाही पण मुंबई मध्ये पूर येईल"
"You are such a drama king"
"Who is saying this...दादा आणि वाहिनी आले का?"
"हो हो आले, अराम करत आहेत! जेवण पण झालं"
"अच्छा. तुला एक विचारू, तुला राग नाही ना येणार?"
"आता राग येतो का नाही ते काय विचारणार ह्या वर आहे ना...विचारा, राग आला तर मग समजूत काढा"
"बरं, तुझ्या दादा आणि वहिनीला का भेटायचं मला?"
" मी ज्या माणसाला पाहिले इतक्या शिव्या घातल्या, हिटलर, खडूस असं काय काय म्हणायचे, त्याच्या प्रेमात पडले, तर कोण आहे हा आणि कसं काय, म्हणून"
" बरं, ठिके. "
"झोपायचं का? झोप आलीये खूप"
"माझी झोप उडवली आहेस तू, आणि स्वतः झोपतेस, not fair"
"मग काय करू"
"गिफ्ट दे मला"
"काय गिफ्ट?"
"जे मी आज दिलं तुला"
"मी पण दिलं होतं की!!"
"मी कसं दिलं आणि तू बघ...असं लपून येऊन नाही"
"झोपतीये मी good night!"
"Good night"
असं म्हणत फोन कट केला तिने. आमच्या लग्नाची स्वप्न बघत मी झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी sunday होता म्हणून थोडा उशीरच झाला उठायला, तसं ही लवकर उठून काय करणार, मी एकटाच होतो ना! दिवसभर मी तयारी आणि विचात करत होतो की काय अजून केला तर तिच्या घरच्यांना मी आवडेन . तन्वीच्या बोलण्यावर हे समजलं होतं, की ती साधी माणसं होती आणि त्यांना उगाच काहीतरी शो वाली वस्तू आवडणार नाही. खूप विचार केल्यावर माझ्या डोक्यात आलं की एखाद्या गोड पदार्थ आणि त्याच्याबरोबर एक फूल झाड. मी लगेच नर्सरी मध्ये गेलो आणि एक युनिक झाड शोधत होतो.
खूप वेगळी वेगळी झाडे पाहिले, पण कुठलच अस आवडलं नाही. शेवटी मी निघणार होतो तेवढ्यात मी थांबलो, फुलेला मोगऱ्याचा वास मला मोहक वाटला मी लगेच तो मोगरा घेतला आणि एका छानशा पॉट मध्ये त्याला लावलं. गोड पदार्थ तर माझा ठरलेलाच होता, तो म्हणजे गुलाबजामुन. मला फार आवडतात आणि न्यायला म्हणून पण चांगले वाटतात. मी व्यवस्थित तयार झालो, द्यायची भेटवस्तू घेतली आणि निघालो. जातांना माझ्यामनात नुसता विचारांचा गोंधळ झाला होता. शेवटी मी पोहीचलो आणि त्यांच्या घराचे दार वाजवले, एक घारे डोळे , उंच आशा व्यक्तीने दार उघडले,मी ओळखलं होतं की तो तन्वीचा भाऊ होता,त्याने मला विचारले,
"Mr. Virat right, please come !"
"Yes yes, thank you"
"Make yourself comfortable , ही माझी wife, Anu"
"Hi Anu "
"Hello"
"मी रोहित राव"
"Great to see you !"
मी जिला शोधत होतो, ती तर सापडतच नव्हती, मी त्यांना नेलेला मोगरा आणि गुलाब जमून दिले, त्या दोघांना पण खूप आनंद झाला,
"हा मोगरा आमच्या छोट्याशा बागेत खूप छान बहरेल"
मी फक्त हसलो, तन्वी तर मला दिसत नव्हती, शेवटी मी विचारलं,
"तन्वी दिसत नाहीये?"
तिची वहिनी म्हणाली,
"ती काहीतरी आणायला गेलीये, येईलच"
"विराट सर, आम्हाला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय"
असं रोहित म्हणाला, माझ्या मनात एकदम भीतीशी अली,
"हो प्लिज, बोला ना"
"तन्वी ने आम्हाला तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल सांगितलं, आम्हाला खूप आनंद झाला, पण तुम्ही एका खूप मोठ्या इंडस्ट्री चे मालक आहात आणि आम्ही म्हणजे तन्वी हे खूप सर्वसादाहरण माणसं, ती खूप सिरीयस आहे तुमच्या विषयी. मला एवढंच विचारायचं होतं की तन्वी विषयी तुम्ही पण तेवढेच सिरीयस आहेत का? सॉरी मी खूप स्पष्ट बोलतोय पण तिची काळजी म्हणून आम्हाला हे विचारायचं होतं. तुमच्यासारख्या high class मुलींसारखं राहणं तन्वीला खूप अवघड आहे"
मी गालात हसलो,आणि म्हणलो,
"मला तुमची काळजी पूर्ण समजत आहे ,पण मी तुम्हाला खरं सांगतो, मला नाही वाटत मी तन्वी शिवाय दुसऱ्या कुठल्या मुलीशी लग्न कारेन, ही वेळ खूप लवकर आहे पण तुम्हाला तन्वीची काळजी करायची गरज नाही आणि high class , चं सांगायचं तर, मी स्वतः म्हणतो हे सगळं फक्त देखावा आहे. खरं आयुष्य के असतं हे मला तन्वी ने शिकवलं! थोडीशी वेगळी आहे पण जशी आहे तशी मला खुप आवडते"
माझं हे ऐकून त्या दोघांच्या चेहऱ्यावर हसू उमलले.
"आणि दादा,होप मी दादा म्हणलं तर चालेल! "
"रोहित would be better, we are of the same age it seems"
"ठिके, लग्नाचं। आत्ताच तिला नाका सांगू प्लिज करण माहीत माही काशी प्रतिक्रिया असेल, अजून काही दिवसांनी मी स्वतः तिच्याशी बोलणारे"
"ठीक आहे, तुमच्या बोलण्यावरून आम्ही विश्वास ठेवतो तुमच्यावर! पण तन्वी खूप सेन्सिटिव्ह मुलागी आहे"
"तुम्ही नका काळजी करू"
तेवढ्यात बेल वाजली, तन्वी अली होतो, मी तिच्याकडे बघून हसलो ती पण लाजत हसली आणि लगेच आत मध्ये गेली.
"तन्वी बॅग की ह्यांनी किती सुंदर मोगरा आणलाय"
" हो बघते..."असं म्हणत ती बाहेर आली, पण ती लाजताच होती. आम्ही एकत्र खूप गप्पा मारल्या,एकत्र जेवलो आणि त्या दोघांच्या वागण्या वरून असं समजत होतं की त्यांना मी थोडा फार आवडला असेन ! माझं सगळं लक्ष तर तन्वीकडेच होतं, जेवण झालं आणि मी निघालो.
"Thank you for a wonderful dinner !!"
"Pleasure is all ours, keep coming "
"Will love to...तुम्ही पण या माझ्याघरी नक्की या, खुप छान वाटेल मला. "
"नक्की "
ते सगळेच लोक मला खाली सोडायला आले , छान वाटलं पण तन्वीशी काही नीट बोलताच नाही आलं पण. मी तिला रतेय फक्तं मेसेज केला,
"See you tomorrow darling"
"Yes sir, I loved that you came over today "
"Because I love you !"
"Even i love you, good night "
"Good night "
दुसरा दिवस खुपच हेक्टिक गेला आम्हाला नीट भेटता नाही आलं, म्हणून मी ठरवलं की रोज काही झालं तरी ऑफिस झालं की भेटायचं. आम्ही पहिल्यांदा दोघं लॉंग ड्राईव्ह वर गेलो, आणि परत येताना मी तन्वीला माझ्या घरी आणलं,
"Wow...Such a beautiful house you have "
"It just looks incomplete though !"
"भरेल भरेल लवकर"
"कॉफी करायची"
"चालेल"
आम्ही माझ्या टेरेस वर बसलो होतो, आमची नेहमीची मज्जा चालू होती. मी तिला रोहित आणि माझ्यात झालेलं बोलणं . मी रोज सारखा सारखा तिच्या नव्याने प्रेमात पडत होतो...ती काहीतरी बोलत होती, तेवढ्यात मी उठलो आणि तिचा चेहरा मी माझ्या हातात पकडला आणि ती एकदम गप्प बसले तेवढ्यात मी पटकन तिच्या ओठांना किस केलं. ती माझ्याकडे बघत राहिली आणि येवढी गोड दिसत होती मी तिच्या कपाळावर पण किस केलं, मग तर ती लाजून माझ्या मिठीत आली. केवढं सुंदर वाटत होतं,असं वाटत होतं हे कधीच नाही संपलं पाहिजे.
सहा महिन्यांपेक्षा जास्त वेळ गेला, आम्ही खुप comfortable झालो होतो एकमेकांबरोबवर, आमचं अजूनही सीक्रेट अफफैर होतं ऑफिस मधल्या खडूस बिस आणि एका employee मधलं. आतातर मी तिच्याशिवाय मी माझं आयुष्य पण इमॅजिन करू शकत नव्हतो. मी लवकरात लवकर तिला लग्नासाठी विचारणार होतो पण मी योग्य वेळ आणि पद्धत शोधत होतो. आम्ही एकमेकांच्या खुप वेळा घरी जायचो , local ने फिरायचो, खुप काही काही करायचो आणि भांडायचो पण हे सगळं खूप सुंदर होतं.
नेहमीसारखा मी तयार होत होतो, तेवढयात तन्वीचा फोन आला,
"बोल ग राणी"
"विराट , माझं डोकं दुखतंय खूप मी नाही आले तर चालेल का आज?"
"हो हो, काळजी घे मी येतो तुला भेटायला संध्याकाळी"
"ठिके, मला बरं वाटलं तर मी येते आपण भेटू, काहीतरी सांगायचंय"
"मला पण सांगायचंय, काळजी घे तू , बाय "
मी ऑफिस ला नेहमी सारखा गेलो, साने गेल्यागेल्या मला म्हणाले,
"कुणीतरी भेटायला थांबलय तुमच्या केबिन मध्ये, आमचं नाही ऐकलं डायरेक्ट केबिन मध्ये जऊन बसले"
"हो का, बघतो मी. Thank you "
कोण आलं असावं, ह्याचा विचार करत मी दार उघडलं तर माझ्यापायखलची जमीन सरकली, खूप संताप आणि राग आला होता. काय करावं सुचत नव्हतं.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा