Yes sir ? PART 8

Hey readers, Love has started blossoming within Tanvi and Virat. See how they share a lovely and strange bond. ~The story express

कालचा दिवस हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस होता. मे झोपून उठलो आणि पाहिलं तर माझ्या शेजारी तन्वी होती, ती पण झोपली होती मी तिला माझ्याकुशीत ओढलं आणि परत झोपलो. तेवढ्यात कुणीतरी जोरजोरात बेल वाजवत होतं, पण माझे डोळेच उघडत नव्हते. शेवटी मी उघडले आणि पाहिलं तर तन्वी नव्हती, माझं स्वप्नं होतं ते. आता स्वप्नं पण इतकी गोड पडत होती. पाहिलं तर संध्याकाळचे 5.30 वाजले होते, जाऊन दार उघडलं तर राज होता,
"काय मग कशी होती डेट" 
मी त्याला मिठी मारली आणि त्याच्या गालावर किस करत म्हणालो,
"अशी होती..."
राज हा माझा इकडच्या शाळेतला मित्र होता , आम्ही पाचवी पर्यंत एकत्र होतो पण मी UK ला गेलो तरी आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. खूप जवळचा मित्र होता राज. सगळं सांगायचो मी त्याला. तन्वी बद्दल पण मी पहिल्यांदा त्यालाच सांगितलं होतं, की मला ती आवडायला लागलीये म्हणून. त्याला सगळं ऐकायचं होतं काल के झालं होतं, मी सांगितल्यावर तो म्हणाला, 
"मला ह्या मुलीला भेटायचंय..."
"गप्प नाही, माझ्याबद्दल काही सांगशील तू तिला,पाहिलेच ती मला काय काय नावाने हाक मारते"
"Awww, काय आहेत आणि ही नावं"
"सांगतो ना नंतर... चल आपण बिअर पियू"
"पहिले नाव... "
"गप्प नाही..." 
तेव्हढ्यात माझा फोन वाजला, तन्वीच होती, मी पटकन उचलला,
"Hey...काय म्हणतेस ?" 
"तुम्ही कसे आहात हे विचारायला फोन केला"
"मी मस्स्त, झोपून उठलो माझा एक मित्र आलाय त्याच्याशी बोलतोय"
आमचं बोलणं सुरू असताना खूपच माझी मस्करी करत होता हा राज.
आमची रात्रीची पार्टी झाली, माझ्या एबी राजच्या खूप छान गप्पा झाल्या. रात्री 10 च्या सुमारास तो गेला, मी थोडासा नशेत होतो. झोप तर येत होती मला पण झोपायचं नव्हतं , करण मला तिची आठवण येत होती, मी तिला लगेच फोन लावला,
" काय करतीयेस?"
" कॉफी पितीये, what about you ?"
"एकटीच ?"
"हो मग अजून कोण असणार, दादा वहिनी पुढच्या आठवड्यात येणार आहेत, तुमचा आवाज का वेगळा वाटत आहे, 30 60 जास्त झाली का ?"
हे ऐकून मी मनापासून हसलो,
"हो ना..."
"झोपा मग...उद्या ऑफिस मध्ये परत हिटलरगिरी करायची आहे ना"
"हो हो...good night राणी"
"राणी..."
"हम्म...झोप आता" 
असं म्हणत मी फोन ठेवला आणि झोपलो. 
सकाळी मला, ऑफिस ला जायची ओढ लागली होती, खरंतर तन्वीची ओढ होती . मी गेलो आणि सकाळीच मिटींग बोलावली, करण काम होतं आणि तन्वीची गम्मत पण करायची होती. मी मीटिंग रूम मध्ये गेलो तर  सगळे जमले होते तिथे, पण माझी नजर तन्वीला शोधत होती, मी बसलो आणि बोलतांना पण तिलाच शोधत होतो, शेवटी मला ती सापडली एकदम लांब बसलेली, ती पण मुद्दाम लांब बाली होती हे तिच्या चेहऱ्यावरच्या मिश्किल हस्यावरून कळत होतं. मी पण ऐकणार नव्हतो, करण आता जंग सुरू झाल्यासारखं होतं, 
"तन्वी, तुझं लक्ष नसतं माझ्या बोलण्याकडे मी खूप वेळा पाहिलंय, please improve your behaviour, atleast in the meetings "
"Sorry sir, I will do that..."
तेवढ्यात आमच्या कंपनी मधले एक सिनियर जे खूप वर्ष काम करत होते ते म्हणजे साने, ते मला हळूच म्हणाले,
"विराट सर, तन्वी ही खूप चांगली employee आहे...तुम्ही तिला सारखं रागावणं मला योग्य वाटत नाही, probably she's still getting used to your style of working "
"Yes ...I got your point"
असं म्हणत मी तन्वी कडे बघत राहिलो, ह्या मुलीने जादू केली होती,काय माहित,मी माझ्या आयुष्यातला कुठलाही क्षण तिच्याशिवाय इमॅजिन करू शकत नव्हतो. असं वाटत होतं 'पपा अत्ता असायला पाहिजे होते त्यांना सगळं सांगायचं होतं. रोज गोड दिसायची ही, साधा कुर्ता घालायची पण खूप सुंदर दिसायची...मीटिंग नंतर सगळे आपल्या आपल्या कामाला गेले, मला एका मीटिंग साठी ऐनवेळेस बाहेर जावं लागलं, म्हणून आमच्या दोघांची आरामात भेट झालीच नव्हती. मी तिला फक्त "????"हा असा ईमोजी पाठवला करण प्रत्येक्षात पण जाऊन तिला हेच करायचं होतं पण ती सुद्धा इतकी वात्रट, "????????"असं रिप्लाय केलं.असं काही केला ना की ती अजूनच आवडायची मला. पुढचे 2 3 दिवस तसे हेक्टिक गेले, फार नाही बोलणं व्हायचं आमचं, पण तरिही मला कधीच तिच्यापासून दूर गेल्यासारखं वाटलं नाही. Friday ला ती माझ्या केबिन मध्ये अली,
"सर, मी उद्या घरी लवकर जाऊ शकते का?"
मी हसत तिला म्हणालो,
" अगं राणी, तुला एवढ्या गोष्टींसाठी माझी परवानगी घ्यायची गरज नाही, एखादा मेसेज टाकला असतास तरी झालं असतं"
"नाही, वर्क रिलेटेड आपण सगळं फॉर्मल ठेवू" and we have a secret affair right in the office "
मग  मी पण ठरवलं आत्ता बॉस गिरी करायची,
"Okay then...Get a formal permission "
"Will write a letter and email it to you "
"Okay, the letter will only be accepted if there's a kiss on my cheek "
असं वाटलं की मी जिंकलो अत्ता ,पण ती सुद्धा काही कमी नव्हती,
"Sir your beard would hurt my lips "
असं म्हणत ती लाजून बाहेर निघून गेली. ऑफिस संपलं आणि घरी गेले सगळे.
"हम्म i understand , जा मग भेटू उद्या आणि मी उद्या आल्यावर माझ्याकडे अशी बघत नको बसू"
"मी का बघत बसेन"
"मला काय माहीत ते आता, वेडी आहेस तू काही करू शकतेस तू"
"Ohh please, जाऊदे मी निघते, बाय"
आम्ही दोघेही उठलो, आणि ती निघायची तेवढ्यात माझा फोन आला म्हणून मी माझ्या खुर्चीवर बसलो, माझं लक्ष फोन वरच होतं, तेवढ्यात तिने माझ्या गालावर येऊन किस केलं आणि पटकन सटकून जायच्या प्रयत्नात होती, तेवढ्यात तिचा हात घट्ट पकडून ठेवला मी. दुसऱ्या हाताने माझा हात सोडण्याचा प्रयत्न करत होती, पण मी अजिबातच सोडत नव्हतो तिला. माझा फोन झाल्यावर उठलो आणि तिच्या गालावर किस करत म्हणालो ,
"माझं शेविंग करण्याचा वेळ वाया नाही गेला"
"पण मी मज्जा करत होते, there was nothing in my mind against your style "
मी तिला परत गालावर किस करत म्हणालो,
"Okay...But what about distracting me during a important phone call?"
"I am sorry for that"
"परत असं झालं तर अजून काहीतरी द्यावं लागेल "
"हम्म मी जाऊ, उशीर होतोय"
"जा की, मी कुठे पकडून ठेवलंय तुला, तूच माझा हात पकडला आहेस, बघ जरा"
मी तिला बोलण्यात गुंतवून तिचा हात सोडूनझ तिच्या हातात माझा हात पकडवला होता. तिने पाहताच पटकन माझा हात सोडला. 
"तन्वी, तुझ्या दादा आणि वहिनी ला सांग, thanks for inviting , मी येईन नक्की"
"हो सांगेन, बाय..."
"मला आठवण येईल तुझी...तन्वी"
"बाय"
असं म्हणत ती निघून गेली, मला तिच्या आशा गोड वागण्यावर खूपच प्रेम येत होतं. माझं फोन वाजला पाहिलं तर ,तन्वी चा मेसेज होता, ज्यात फक्त "????" हा ईमोजी होता. मला पण हळु हळू आता तिची मज्जा करायला आवडायला लागली होती,
"Give me this in person !"
असं मी तिला मेसेज पाठवला. तिचा रिप्लाय आला, 
" Lets see !! "
उद्या तिच्या घरच्यांनी का बोलावलं असेल असं मला प्रश्न पडत होता, काही प्रोबेलम तर नसेल ना! पण तन्वीच्या बोलण्यावरून तरी वाटत नव्हतं. मी काहीतरी तिच्याकडे घेऊन जायचं ठरवलं पण काय आवडेल त्यांना असा विचार करत होतो. पण माझ्या मानत उगाच काहीतरी शंका येत होत्या, पण शंका येन्यासारखं काहीच नव्हतं. Hope everything goes welll!!!

🎭 Series Post

View all