Yes sir ? PART 7

Dear readers, Hope you are enjoying the story. See what happens at Elephanta caves, how does story takes turns in the lives of Tanvi and Virat.

आता पर्यंत च्या भाघांमध्ये तन्वीच्या दृष्टीतून कथा होती, आता विराट च्या दृष्टीतून कथा रंगणार आहे, पुढचे भाग नाकी वाचा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. 

(मी मुलगी असल्यामुळे तन्वी चे भाग लिहिणे सोपे होते तर जर विराट चे भाग लिहितांना उशीर झाल्यास क्षमा करा. )

खलील असली कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा अस्तित्वाशी कसलाही समंध नाही, फक्त वाचकांच्या मनोरंजनासाठी रचलेली ही कथा आहे.

ही मुलगी पूर्ण वेडी आहे, हिच्या नादात मी काय काय करणार आहे ते मलाच माहीत नाही...आज रस्त्यावरचे चणे खाल्लेत, God knows अजून काय, पण खूप छान वाटत होतं तिच्याबरोबर, तिचं उगाच हसणं, खोड्या काढणं, वेडे पणा करणं...असं वाटत होतं हे सगळं काधिकज संपलं नाही पाहिजे. 

"ओ मॅडम, हे काय ...."

"Street shopping sir...हे किती छान आहेत ना कानातले, मी घेणारे आणि ते दगडाचे शिल्प पण..."

रस्त्यावरची खरेदी...वाह... किती आनंद होत होता तिला, स्वस्तातले कानंतली आणि गोष्टी, न कुठला ब्रँड होता न कुठल शोरूम. तिच्याकडे बघत बसावं असं वाटत होतं, तेवढ्यात हसत ती माझ्याकडे अली,

"Sir, this is for you "

असं म्हणत तिने माझ्या हातात एक सुंदर छोटंसं हत्तीच्या दगडाचे शिल्प दिले, खूप आवडल मला ते.

"आवडलं का? हे माझ्याकडून for you!!"

"Thank you so much... I loved it"

हे गिफ्ट खूप मौल्यवान होतं माझ्यासाठी, ज्याची किंमत करणं शक्य नव्हतं. मी ते लगेच माझ्या कोट च्या आतल्या खिशात ठेवलं,

"मी ठेवू ला माझ्या बॅगेत, जातांना देते परत"

"No no...Let it remain close to me"

तन्वी नावाच्या एका सुंदर आणि सव साधारण मुलीने मला जगातल्या सगळयात सुंदर ठिकाणी आणलं होतं, तिच्या बरोबर चालायचं होतं मला पण ती पूर्ण हरवून गेली होती, प्रत्येक शिपाशी दगडाशी बोलत होती. मी तिचे सिक्रेटली फोटोस काढत होतो, माझं लक्ष सुंदर रेखाटलेल्या शिल्पांपेक्षा तन्वी कडे जास्त होतं. आम्ही आमचे पण काही फोटोस काढले होते, पण ते ही टिपिकल कपल वाले नव्हते वाटत ...तिच्यात विचारात अडकलेला होतो तेवढ्यात ती माझ्या नजरेच्या बाहेर गेली, पूर्ण घरून गेलो होतो, येण्या जाणाऱ्याला प्रत्येकाला फोटो दाखवून विचारात होतो, ह्या मुलीला पहिला का म्हणून, कुणीच पाहिलं नव्हतं. तेवढ्यात मला आवाज आला,

"Virat, Mr.Virat...."

मी मागे वळून पाहिलं तर ती एका गुहेत गेली होती, तिच्या आवाजाने मला एक समाधान दिलं. मी धावत तिच्या दिशेने गेलो, मधेच माझा पाय अडकला, मी पडता पडता वाचलो, आणि हिने येऊन माझी विचारपूस करायच्या ऐवजी हसायला लागली...तिच्यावर तेव्हा रागवाव का काय करावं हे पण कळत नव्हतं.

"Are you stupid"

"You are stupid, आत जाऊ खूप छान आहे "

"वेडी आहेस का...ना सांगता का गेलीस?"

"न सांगता? काहीही...एकतर गर्दी झेपत नाही आपल्याला तर नीट बघावं ना, तर फोटोस काढणे जास्त महत्वाचं होतं ना..."

तिच्याशी भांडायला पण मजा येत होती, मी तिच्याबरीबर आतल्या बाजूला गेलो, डोळ्यांना विश्वास बसणार नाही एवढे सुंदर शिल्प होतें... आम्ही दोघेही ते बघण्यात गर्क झालो, आम्ही दोघे सोडले तर खणीच नव्हत तिथं, तेवढ्यात मी घड्याळात पाहिलं तर 5.35 वाजले होते, 

"तन्वी किती वेळ आहे अजून? It's 5.35"

तिने चमकून माझ्याकडे पाहिलं, माझा हात पकडला आणि धावत बाहेर निघालो आम्ही, जातांना कुणीच नव्हतं, काहीतरी घोळ झालाय असा संशय आला होता मला. जाऊन पाहिलं तर फेरी निघून गेली होती, 

"Sir... sorry 5.30 ला शेवटची फेरी असते मग उद्या सकाळी"

"ऐक, ही मजा करायची वेळ नाहीये...थांबू आपण येईल दुसरी फेरी..."

"नाही नाही नाही..."

झालं ... गोष्टीत होतं तसं झालेलं, निर्जन बेटावर अडकलो होतो. 

"तरी मी तुला म्हणलो होतो , अपली नेऊ बोट पण नाही...परत फिरत बसायचं आरामात...काय करणार आहोत आपण इथे ? "

मी जोरात ओरडलो तिच्यावर, तिचा गोड चेहरा पडला, मी असा कधीच कुठे अडकलो नव्हतो. मला भीती वाटत होती!तेवढ्यात तन्वी एका मागच्या टपरीवर गेली, मी तिच्या मागे गेलो,

"काकू फेरी गेली का? दुसरी नाही का येणार, आम्ही अडकलोय इथे, मदत करू शकाल का ? " 

"नाही , उद्या आत्ता,रात्रीचा समुद्र फेरी साठी चांगला नाही..." 

त्या बाई सुद्धा आम्हाला हसायला लागल्या. भूक पण लागली होती पण इथे हॉटेल्स पण नव्हते, 

"तन्वी तुला भूक लागलीये ? "

"हो"

"आपण ह्या काकुंकडून खाऊ...काकू आता काय आहे ?"

"बंद झाले दुकान" असं आवरत त्या म्हणाल्या

"काहीतरी बघा ना प्लिज, जास्तिचे पैसे देतो आम्ही..."असं तन्वी म्हणाली

"मॅगी आहे चालेल का ? " 

"हो हो...  मला 2 प्लेट्स, सर तुम्ही किती घेणार ?"

"2 प्लेट्स... भूक जोरात लागलीये.."

"मालक हाय का तुझा?"

"हो मी ह्यांचा मालक..."

"नाही नाही... ते.." तन्वी

"लै मोठा दिसतो रे हिच्या पेक्षा...पळवली वगरे नाहीस ना ? " 

मला कळत नव्हतं काय बोलत होत्या त्या... त्यांची मॅगी होत होती तोवर तन्वी मला घेऊन जरा बाजूला आली,

"घोळ घातला ना ... "

"मी काय केलंय ? तूच तर केलस ना !!!"

"ग्रामीण भाषेत husband ला मालक असे म्हणतात आणि तुम्ही बोललात की तुम्ही माझे मालक आहेत!!!"

मी तिचा हात पकडत म्हणलो,

"Dear Queen, आज नाहीये कधीतरी होईन ना मी तुझा husband...आणि ऑफिस मध्ये तरी मीच आहे ना तुझा मालक"

दुसऱ्या बाजूला वळाली, काहीच बोलली नाही,मी तिच्याकडे बघून हसत होतो.

"ओह दादा, झाली बघा तुमची मॅगी"

मी जाऊन मॅगी आणली आणि कधी न पाहिलेला सूर्यास्त बघत खात होतं. एवढं रोमँटिक फूड डेट वर मी कधीच गेलो नव्हतो. त्या संध्याकाळच्या सूर्यप्रकाशात ती अजून पण छान दिसत होती, असं वाटत होतं हे क्षण कधीच नाही संपले पाहिजेत. हळू हळू प्रकाश कमी होत होता आणि माझी भिती वाढत होती, मी तन्वी ला म्हणालो,

"आपण ह्या बाईंच्या गावात राहता येईल का बघायचं का ? इथे तर नाही ना राहू शकत?"

"हो, विचारू आपण आणि मी बोलते ..."

आम्ही तिथे गेलो,

"काकू, आम्ही इथे अडकलोय, तर आम्ही तुमच्या गावात येऊ शकतो का रात्री पुरते, पैसे देऊ आम्ही तुम्हाला पण राहत आलं तर बरं होई...विनंती आहे "

"हो चालेल या, चला माझ्याबरोबर...आता अडकला आहात तर तुम्ही सुद्धा के करणार?"

आम्ही त्यांच्या बरोबर त्यांच्या गावात गेलो, असं गाव मे कधीच पाहिलं नव्हतं, खूप साधं पण तरीही सुंदर आणि आपलंसं वाटणारे. छोटी घरं अगदी सिनेमात पहिली असतील तशी. तन्वी परत हरवून गेली होती, तिकडच्या लहान मुलांबरोबर खेळत बसली होती...माझ्याकडे तिचं लक्षच नव्हतं, मी शांत पणे झाडाखाली बसलो होतो, 3 पीस सूट मधला माणूस झाडाखाली पारावर बसलेला, कसं दृश्य असेल, आणि स्कर्ट आणि टॉप घातली एक मुलगी लहान मुलांसारखी ओरडत खेळत होती. माझ्या आयुष्यात असं कधीच झालं नव्हतं, मी जेव्हा मायरा बरोबर होतो, आम्ही फक्त मॉल्स, महागडी हॉटेल्स, पब्स अशा ठीकाणी जायचो. करण प्रेम होतं का ते माहीत नाही का फक्त आकर्षण होतं? आम्ही शारीरिक संबंधांमध्ये पण होतो, पण ते ही काहीसं प्रेम नव्हतंच. जे मला मायरा बरोबर 10 वर्ष राहून जाणवलं नाही ते मला तन्वी बरोबर काही महिन्यात जाणवत होतं. तिचा सहवास हवाहवासा वाटायचा, तिला स्पर्श नाही केला तरी तिच्यावर खूप प्रेम करतोय आपण जे शब्दात नाही मांडता येत असे वाटत होतं. तिकडची लोक पण चांगकी होती, त्यांनी आम्हाला एकाच्या घराच्या बाहेरच्या खोलीत राहायला जागा दिली. मोबाइलला ला रेंज नसल्यामुळे खूप शांत वाटत होतं. तेवढ्यात तन्वी धावत माझ्याकडे अली,

"सर, चला ना खेळायला, खुप मज्जा येतेय"

"नाही ,you continue...मी बघतोय तुला "

माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत्ताच तीने माझा हात पकडून मला ओढून नेलं. पण तोवर अंधार झाला होता, गावात सगळं लवकर बंद झालं, 8 वगरे वाजले असतील तोवर आम्ही झोपायला गेलो, वीज नव्हती तिथे म्हणून सगळं दिव्यांवरच होतं, आम्ही दोघे पण आडवे पडलो, तेवढ्यात तन्वी माझ्या जवळ आली,

"सर..."

"बोल ना..."

"आपण जाऊ फिरायला"

मी पटकन उठून म्हणालो,

" वेडी आहेस का, नाही झोप चुपचाप"

"प्लिज ना...जाऊ ना काही नाही होणार...खूप छान वाटेल"

"नाही मी नाही येणारे...तू पण नको जाउ, माझ्या जवळ येऊन झोप..."

"नाही ना, मी चाललीये, यायचं तर या नाहीतर बसा मग"

ती उठून निघाली, मी पण तिच्या मागे गेलो, 

"आपण कुठे जाणार आहोत..."

"नुसतं फिरू"

त्या चंद्रप्रकाशात फिरणं म्हणजे स्वप्न, वाटत होतं, मी असल्या गोष्टी कधी केल्या नाही, तिचा हात घट्ट पकडून ठेवला होता. फिरत फिरत आम्ही शिल्पांच्या इथे पोहोचलो, 

"रात्री हे खुप वेगळं दिसेल, आपण जाऊयात पुढे..."तन्वी असं माझा हात ओढत पुढे जात म्हणाली.

"नाही ,परत जाऊ...भीती वाटते मला"

"घबराट..."

"काय म्हणालीस ? मी घाबरट, एकतर तुझं लक्ष पण नाहीये माझ्याकडे, मला सोडून जातेस तू मधेच"

"मग फिरायला आल्यावर तुम्हीच बॉस सारखं रागावता" 

"कारण आपण कामच करतो ना असं, बेटावर अडकून बसतो" 

"मुद्दाम नाही केलं मी, sorry म्हणले मी त्यासाठी" तेवढ्यात जोरात कुठल्यातरी प्राण्याचा आवाज आला आणि तन्वी माझ्या जवळ आली आणि माझा कोट पकडला, मी पण तिला अजून जवळ घेतल,

"ह्या खडूस च्या नशिबात असा क्षण आलाच नसता अडकलो नसतो तर...सो बरं झालं मी म्हणेन अडकलो ते"

ती माझ्याकडे बघत म्हणाली,

"Please leave me, आपण ह्या वर बोलू नंतर, आता ही शिल्प रात्री काशी दिसतात ती बघू"

"हो का... माझा हात सोडलास तर बघ..."

"बरं ठिके, आपण जाऊ पुढे" ती लाजून पूढे चालायला लागली, आणि मी तिच्याबरोबर.

एक वेगळच सौन्दर्य पाहिलं आम्ही त्या शिल्पांच जे कधीच बघायला मिळाले नसतं, आमच्यात बोलणं फार होत नव्हतं पण आम्ही दोघेही आजूबाजूचं बघण्यात गर्क होतो. पहाट व्हायची वेळ झाली होती,  आम्ही सूर्योदय बघायला समुद्राजवळ आलो,

"तन्वी, I am sorry ...मी उगाच तुझ्यावर एवढा ओरडलो काल, पण मी घाबरलो होतो करण मी आशा परिस्थितीत पाहिले कधीच नव्हतो"

"आता you are Hitler तर तसच वागणं असेल ना " असं म्हणत ती हसायला लागली. 

"Hitler....मी... तुला दाखवतो ना Hitler काय करु शकतो ते..."मी हे म्हणताच ती जोरात पळत सुटली आणि मी तिच्या मागे. इथे sunrise होत होता आणि आम्ही इथे पळत  होतो. किती सुंदर होतं ते सगळं, पण मी विसरून गेलो की आज monday आहे ते . पळत दमल्यावर आम्ही गावाजवळ जात असताना ही तन्वी एका झाडावर चढली, ती तिचं आयुष्य किती बिनदास्त जगत होती. मी का नाही असं जगू शकत?  नेमही reserved राहणं किती बोरिंग असतं. 

"तन्वी खाली उतर, पडशील"

"नाही पडत..."

"उतर, ते आपली वाट बघत असतील जाऊ आपण मग निघायचाय, today is monday, if you have forgotten !"

"काय.... नाहियार ऑफिस" असं म्हणत ती उतरताना घसरून पडली, 

"झालं, म्हणलो होतो, दाखव कुठे लागलाय"

वाकडं तोंड करून म्हणाली,

"गुडघ्याला, मी ठीक आहे ...जाऊ आपण"

मी तिला खालू बसवत म्हणलो,

"दाखव, बघू मला काय झालंय"

तिने संकोचत तिचा स्कर्ट वरती घेत तिचा गुडघा दाखवलं, पूर्ण रक्त येत होतं, लहान मुलांसारखी पडली होती ही . मी तिचं काही न ऐकता, माझा रुमाल काढून तिच्या गुडघ्याला बांधला, आणि तिला उठवत म्हणालो,

"सावकाश जाऊ आता, मस्ती कमी कर जरा... लहान आहेस का?"

"Are you my mom?"

"No"

"ती अशीच म्हणते मला"

"तुमच्या आई वडिलांना मी नमन करतो, तुझ्यासारखीला वाढवलं ते" 

ती हसत म्हणाली मला,

"दादा आणि वहिनी पण, त्यांना सुध्दा खूप छळल मी"

"बरं ...मी स्वतःला पण आपलं लग्न झालं की नमन करेन"

"आपलं लग्न?"

"हो...मला आवडेल तुझ्याशी करायला, तुझ्याबरोबर आयुष्यात असले सगळ्या गोष्टी करायला आवडेल " 

"Stop kidding yaar..."

"तुला विश्वास नाही बसणार मी एवढा खुश कधीच नव्हतो"

"बरं हा बरं... चला नाहीतर आत्ताची पण फेरी सुटेल"

असं म्हणत मी तिला आधार देऊन हळू हकु चालत गेलो तर ते गावातले लोक आमची वाट बघत होते,

"साहेब कुठे गेला होता सकाळी सकाळी, चहा केलाय तुमच्यासाठी"

"द्या ना काकू, अहो आम्ही फिरायला, अशी वेगकीच सकाळ बघायला कधी पाहिली नव्हती ना,खूप सुंदर आहे, एवढा सुदंर कधीच पाहिलं नव्हतं " 

"अमच्यासाठी रोजचं आहे हे..."

"खूप सुखी आहात तुम्ही सगळे" असं तन्वी हसत म्हणली.

आम्ही चहा पिला आणि त्यांनी दिलेला नाष्टा केला आणि निघालो. मी थोडे पैसे दिले त्यांना आम्हाला राहायला जागा दिली म्हणून पण ते नको म्हणत असताना पण मी दिले, सगळे जण आम्हला सोडायला आले होते फेरी पर्यंत. येवढं सुंदर farewell मला कधीच मिळालं नव्हतं. किती सुंदर आहे हे बाहेरचं जग असं मला वाटत होतं, मी किती बंदिस्त वातावरण होतो इतके दिवस...आम्ही बसलो आणि फेरी निघाली, 

"तन्वी आज नको येऊ ऑफिस ला, अराम कर आपण पूर्ण रात्री जागे होतो"

"पण माझा बॉस खूप खडूस आहे ...रागवेल मला"

मग मी तिचा हात पकडत म्हणालो,

"सांग त्याला, माझ्या boyfriend ने सांगितलय आराम करायला..."

आणि आम्ही दोघेही हसायला लागलो. 

"तन्वी, thank you so much, never did I enjoy something so much it's only because of you "

"You are welcome sir"

"आता तरी सर नको ना म्हणुस..."

"बघू... ठरवेल मी ते"

मला तिला आपलस करायचं होतं आणि ही सर म्हणणं सोडत नव्हती. पुर्ण रात्र जागून पण ही एवढी कधी काय फ्रेश होती God knows. आम्ही एकदाचे पोहोचलो Gate way of India च्या इथे, आणि दोघंही एकदम रिलॅक्स झालो. 

" Okay mag bye , great day and night with a खडूस बॉस" 

"कुठे निघालीस??"

"घरी...जाते मी लोकल ने"

"नाही मी सोडतो ना तुला..."

"नाही, you look tired ... खूप वेळ आणि energy दोन्ही जाईल"

"मी आज सुट्टी घेणारे , गजर गेलो की करतो अराम, सोडतो ना तुला, छान वाटलं मला"

"Okay..."

आम्ही दोघे गाडीत बसलो आणि निघालो, मी काहीतरी बोलणार होतो तेवढ्यात पाहिलं की तन्वी झोपली होती माझ्या शजरी, खुप गोड दिसत होती, असं वाटत होतं तिच्या गालावरचे केस बाजूला करावे आणि किस करावं. पण म्हणलं राहूदे अजून आमचं नातं नवीन आहे आणि काल झालेली गम्मत ती पण नवीन आहे. पूर्ण रास्ता ती झोपली होती, घर आलं तिचं आणि मी गाडी थांबवली,

"Good morning my girl, घर आलं "

ती दचकून उठली ,

"सॉरी ते कधी डोळा लागला नाही समजलं, "

"शहह ठिके जाऊन झोप ...बोलु आपण बाय ..."

"बाय आणि thanks आणि सॉरी पण"

"हाहा...Same to you "

असं म्हणत आम्ही आमच्या घरी गेलो. मीही पूर्ण दमलो होतो पण तिचा सहवास मला खुप आवडत होता, नेहमी जवळ राहावी असं वाटत होतं. मला पण कधी झोप लागली ते कळलंच नाही, तन्वी चाच विचार करत झोपलो, मनाशी ठरवलं होतं, तिला कधीच सोडणार नाही. 

पुढचे सगळे दिवस अजून सुंदर असणार होते हे मला माहित होतं मला उद्याची तिची प्रतिक्रिया बघायची होतो, ऑफिस मध्ये तिची गम्मत आणि प्रेम दोन्ही करायला खूप काही गोष्टींचा विचार केला होता.

🎭 Series Post

View all