Yes sir ? PART 3

मी थांबले होते माझ्या डेस्क पाशी तेवढ्यात राजू आला, "तन्वी मॅडम ते खडूस बोलवत आहे त्यांच्या केब

मी थांबले होते माझ्या डेस्क पाशी तेवढ्यात राजू आला,
"तन्वी मॅडम ते खडूस बोलवत आहे त्यांच्या केबिन मध्ये!"
"वाह राजी भाई तुम्ही पण ..."
असं म्हणत राहुल हसला माझ्याकडे बघून. मी , राहुल, सिया आणि प्रेम एकत्र काम करायला बसायचो. राहुल चा असं ऐकून आम्ही सगळेच हसायला लागलो. 
"चला मग तन्वी मॅडम ...स्पेशल मीटिंग साठी बोलावलंय ..." असं बोलत प्रेम पण मला चिडवत होता.
मी पण हसत गेले, बहुतेक ह्यांच्या जोक्स मुळे माझा गेलेला मूड परत आला. तरीही मी अलिबाग ला जाणं मिस करत होते, कारण माझं सर्व कुटुंब एकत्र येणार होत. सगळ्यांना भेटायचं होतं.
" May  I come in sir ? "
"Come in  "
मी कामाच्या तयारीतात गेले. तो विराट एका राजासारखा त्याचा खुर्चीवर बसला होता,
"तन्वी आज आपल्याला खूप काम , पुढच्या महिन्यात म्हणजे ३१ जुलै ला आपली एका परदेशी क्लायंट बरोबर एका मोठ्या प्रोजेक्ट साठीची मीटिंग आहे, मी सगळ्यांना त्यांचं त्यांचं काम दिलंय. तुझं खूप मोठं काम आहे, आटा पर्यंत च्या सगळ्या पहिल्या झालेल्या मिटींग्स चे रिपोर्ट्स आणि डिटेल्स मला आज संध्याकाळ पर्यंत पाहिजेत"

पण सर, मी त्या प्रोजिरेक्ट वर काम नव्हतं केलं, मला त्या बद्दल माहिती नाहीये . 
"मग काढ माहिती , त्याचा अभ्यास कर "
मला जे बोलायचं होतं ते राहून गेलं, मला हे कळलं होतं की अलिबाग ला जाणं शक्य नाहीये. मी खूप मनापासून काम केलं त्या प्रोजेक्ट वर, चीड चीड व्हायची कारण खूप वेळा उशिरा पर्यंत थांबवा लागायचं. ते कमी होतं की ह्याची बोलणी पण खायची, परत तो खूपच हिटलर होता, हिटलर असं नवीन नाव पण मी ठेवला. पण ह्या दरम्यान आमची चांगली मैत्री झाल्यासारखी पण झाली होती. आम्ही कधीतरी एकत्र जेवायचो अँड एकत्र हसायचो पण, म्हणुन एकमेकांची थोडीफार आवडी पण कळल्या होत्या, तो एकदम पौष्टीक जेवणाचा फॅन होता आणि मी जिला खायची भरपूर आवड असणारी अशी. त्याने माझ्या कामाचं कौतुक कधीच केलं नाही. माझे सगळे मित्र मला त्याच्यावरून चिडवायचे पण मी साफ नकार द्यायचे कारण तो एकतर बॉस होता आणि खडूस हिटलर पण. 
शेवटी 30 जुलै उजाडला जेव्हा ती मोठी मीटिंग उद्यावर आली होती. माझी पूर्ण तयारी झाली होती, माझं काम संपवून मी घरी पोचले, दादा आणि वहिनी जवेण करायला थांबले होते,
"काय मग काय म्हणतोय हिटलर"असं दादाने विचारलं
मे हसत म्हणले " बघू आता उद्या काय म्हणतोय,उद्या एकदाच संपेल मग मी मोकळे माझं पहिला काम करायला"
"All the best darling, मसतं कर आणि त्या हिटलर ला बंद पाड जरा वेळ म्हणजे आपल्याला सगळ्यांना एकत्र वेळ घालवता येईल आणि मस्तं फिरायला पण जाऊ " असं वहिनी म्हणाली मला. आमचं जेवण झालं आणि मी झोपायला गेले, सकाळी वेळेवर सगळं घेऊन बॅकअप सहित तयार होते. आज मी पण फॉर्मल ड्रेस आणि जॅकेत घातलं होतं, सकाळ पासून सगळ्यांच्या कॉम्प्लिमेंट्स येत होत्या. आज मी ठरवूनच आले होते की मी मीटिंग मध्ये स्टार होणार ते. आजची मिटिंग आमच्याच ऑफिस मध्ये होती, मे आणि अजून काही जण कॉन्फरन्स रूम मध्ये थंबलो होतो, क्लायंट ला घेऊन विराट यायची वाट बघत होतो, तेवढ्या दार उघडत क्लायंट आत आले , आम्ही त्यांना बसवला तेवढ्या माझ्या डोळ्यासमोर विराट आला, आज जरा खूपच स्मार्ट दिसत होता, तो बोलतांना माझ लक्ष त्याच्या वरून हलतात नव्हतं,मी कुठेतरी हरवून गेले की काय असं वाटलं तेवढ्या,
"Miss Tanvi please take the meeting ahead"
 असं ऐकून मी दचकून उभी रहिले, मी त्याचा शेजारी जाऊन उभी राहिले आणि विराट ने मला इन्ट्रोदुस केलं,
"Sir this lady here is one of our most capable employees who has put blood and sweat for today, please hear from her"
असं ऐकून मला धक्काच बसला, अपेक्षित नव्हत मला हे,
मी माझं बेस्ट दिलं आणि क्लायंट पण खुश वाटत होतं, विराट माझ्याकडे पूर्ण वेळ स्माईल करत बघत होता, मला जे जरा अवघडल्यासारखं वाटत होतं. असे त्याने माझ्याकडे पाहिले कधीच नव्हते, आणि अजून मध्ये मे त्याला एवढा शांत पाहिले नव्हते. मिटिंग संपली आणि खूप छान झाली होती. मला आनंद झाला होता . माझ्या कामाचं चीझ झालं होतं.
"Mr.Virat can you please visit with us to London. We need you personally to check a few things with us"
हे ऐकताच विराट ने माझ्याकडे पाहिले, मी खाली पाहिले, करण जेव्हा तो माझ्याकडे बघायचा मला एकदम अवघडल्यासारखं वाटायचं. आज तर अजूनच वेगळं वाटत होतं, विराट सर एवढे रुबाबदार दिसत होते की मी त्यांना बघून मनात लाजत होते,त्यांची पेरसोनलिटी होतीच तशी पण फार खडूस. विराट त्यांना लगेच हो म्हणला, आणि त्यांचं पुढे बोलणं सुरू झालं. एकदाचा दिवस पार पडला, दादा वहिनीला सगळं झालेलं सांगितलं. दादा झोपल्यावर वहिनी माझ्या रूम मध्ये  अली, 
" तन्वी, आज काहीतरी झालय तुला"
हे ऐकताच मी गालात लाजले,
"लाजू नकोस सांग काय झालंय ते"
"काहिनाही ग"असं म्हणत मी पुन्हा लाजले,
"हिटलर विराट आता बहुतेक डिअर विराट होतोय का"
असं म्हणत ती हसली, तिने माझ्या मनातले ओळखल होतं, मला त्याच्यावर क्रश होतच पण आज अजून काहीतरी स्पेशल वाटत होतं. 
"नाही असं काही, नाही, त्याचा सळरपूडा झालाय "
"अर्रे श्या, असुदे आपण तुला अजून वेगळा अजून भारी शोधू, चल झोप उशीर झालाय, उद्या बोलू आपण " 
दिवसभर तसा धावपलीचाच गेला म्हणून मी पटकन झोपून गेले.
दुसऱ्या दिवस एक नॉर्मल डोवस होता, गेला महिना जसा धावपळीचा गेला त्या मानाने आजचा दिवस निवांत गेला. हसणं , मज्जा, काम, एकत्र जेवण , चहा पिणे सगळं होत पण एकदम नॉर्मल, काहीच थ्रिल किंवा काहीतरी कमी वाटत होतं, माझ्या लक्षात आलं की आज मी माझ्या हिटलर बॉस ला भेटले नव्हते, पण मी त्याचा विचार करणं बंद केलं पाहिजे करण तो इंगजड आहे. मी माझ मन दुसरीकडे कुठेतरी वळवायला प्रयत्न करत होते. घरी जाताना लोकल मध्ये गाणी ऐकतांना माझा फोन वाजला मी पाहिलं तर विराट होता, उचलायचा का नाही ह्या नादात तो बंद झाला आणि दुसऱ्याच क्षणीं मेसेज आला
'hey Tanvi ,  please text me back when free , need to talk something important '
काही न विचार करता , 
'yes sir !'
असा मी रिप्लाय केला. अर्रे यार नव्हता कारायांचा लगेच. जाऊदे , खूप विचार नको. घरी पोचले जेवण झालं, आणि झोपताना विचार करत होते. पन पूर्ण 2 आठवड्यांपेक्षा जास्त गेले आणि मी त्याला काहीच रिप्लाय नाही केला. असं नव्हत की की राग आला होता पण मी त्याच्याकडे आकर्षित होत गीते जे चुकीचा होतं. अजून काही दिवस गेले आणि तो दिवस आला जेव्हा तो परत येणार होता. सगळं नेहमीसारखा होतं, आमच जेवण झालं मी माझं काम करायला बसले, तेवढ्यात वाहिनीचा फोन आला,
"तनु ऐक ना"
"बोल वहिनी, तुझा आवाज राडलेलं का वाटत आहे, बारियेस का"
वहिनी रडत म्हणाली,
"आता माझ्या भावाचा फोन आला होता, माझ्या बाबांना हार्ट अटॅक आलाय, ICU मध्ये आहेत , तर मी आणि रोहित गावाला जातोय, तू काळजी घे अजून 1 आठवडा तरी आम्हइ नाही येत, त्यांची तब्बेत ठीक झाली की येतो, सॉरी तनु तुला परत एकटीला राहाव लागेल"
"वहिनी सगळं नीट होईल तू नको काळजी करुस, आणि सॉरी काय ...तू जा काकांना गरज आहे आत्ता तुझी आणि दादाची...तुम्ही जा आणि माझी काळजी नाका करू, माझ्याकडून काही मदत लागली तर सांग"
"रोहित घेरी येईल मग आम्ही निघूच, बाय"
मला वहिनी साठी खुप वाईट वाटलं. मी मनात विचार करत होते की ते बरे झाले पाहिजे, माझा मूड तसा खराब झालेलं आणि सकाळ पासून मला पण जरा कणकण वाटत होतं, आणि थोडी सर्दी पण झाली होती. पण मी बोलले नाही कुणाला नाहीतर उगीच ते दोघे मझी काळजी करत बसतील. ऑफिस सुटायची वेळ झालेली,
"तन्वी तू भेटली नाहीस का विराट सरांना, आम्ही सगळे कामाच्या वेळात वेळ काढून भेटून आलो, तूच राहिलीयेस"
अस प्रेम मला म्हणलं, पण माझी पण ईच्छा होती जाऊन भेटायची पण मी नाही गेले.
" चला guys, मी निघते, मला थोडा बरं नाही वाटते , भेटू आपण उद्या, बाय"
"काळजी घे ,काही लागला तर सांग"असं सिया म्हणाली, मी धावत निघाले. मी बाहेफ पडताच जोरात पाऊस यायला लागला, पण मला घरी जायची घाई झाली होती. मी पावसात धावत चालले होते पूर्ण भिजले होते, थंडी वाजत होती खूप,आणि लोकल स्टेशन पर्यंत जायला कुणी ऑटो यायला पण तयार नव्हता, खूप वैतागले होते, माझे डोळे पण लाल झाले होते, तेवढ्यात एक कार माझ्या शेजारी येऊन उभी राहिली, आणि त्याने खिडकी उघडली तर विराट होता,
"Tanvi ,come inside fast, you are all wet in the rain"
"No sir thank you, I am okay"
"I donot think you are okay, I am your boss, come inside fast , you have to listen to what I say"
मी काहीच न बोलता त्याच्या शेजारी जाऊन बसले, थंडी ने कापत होते. मला नव्हत जायचं, पण माझी पण परिस्थिती अशी होती की मी बसले, आता कार मध्ये काय होणार होतं, देवच जाणे!!

🎭 Series Post

View all