Login

Yes sir ? PART 25

Dear all, New surprises really strengthen the bond , keep reading and keep loving... ~the story express

प्रिय वाचकांनो,
खूप वाट बघावी लागली तुम्हाला, ह्यासाठी क्षमस्व, पुढचा भाग पण लवकरात लवकर येईल. असाच प्रेम तुम्ही तन्वी आणि विराट वर करत राहा...

तुमची
~ the story express

विराट स्तबध्द ऐकत होता, की सानिया के म्हणत होती .
" विराट, हे जे सगळं घडलय त्या मध्ये मायराचा अप्रत्यक्ष पद्धतीचा हात आहे, तिला तुझी उणीव खूप भासवत होती, तुमचं नातं संपल्यावर, ती खरच तुझ्या प्रेमात होती...."
" ऐक ऐक, मला मायरा च ऐकण्यात आजीबात रस नाहीये, get to the point "
" विराट, मायरा चा अप्रत्यक्ष रुपात हात आहे, ती पूर्णपणे ह्या मध्ये नाहीये !"
" म्हणजे ..." असं विराट उठत म्हणाला,
" विराट, अरे, तिने एका खूप श्रीमंत मुलाशी लग्न केलं, पण त्याचा उद्योग बंद पडला काही कारणामुळे म्हणून मायराने त्याच्याशी संबंध तोडला, तुझ्याकडे तिला परत यायचं होतं, पण टीने तुला आणि तन्वीला बरेचदा बाहेर एकत्र पाहिलं, तिला कळलं की तू आता वेगळ्या मुलीवर प्रेम करतोस ते. पण तरीही तिला तुझ्याकडे यायचं होतं, तेव्हाच तिला कुणीतरी भेटलं, कोण ते माहीत नाही, त्या व्यक्तीची आणि तुझ्या वडिलांची खुप जुन वैर आहे ! "
" एक मिनिट मला बहुतेक ती व्यक्ती माहीत आहे, मला थोडा विचार करावा लागेल ".... विराट असं सानियाकडे वळत म्हणाला.
" त्या माणसाने तिला जे करायला सांगितलं, ते तिने केलं, तिला फक्त तू हवा आहेस आता "
हे ऐकताच विराटने तन्वीचा हात आपल्या हातात घट्ट पकडला. त्याचा मनात एकच गोष्ट होती, त्याला तन्वीला स्वतः पासून लांब जउ द्यायचं नव्हतं, आणि आता विराट तन्वीची साथ कायम ठेवण्यासाठी काहीही करायला तयार होता.
" अजून काय माहीत आहे तुला ..?"
" मला जे माहीत होतं मी ते सांगितलं, पुढे तुला बघावं लागेल"
" सानिया, मला खूप मदत केलीस तू ... खूप खुप आभारी आहे मी तुझा"
" No formalities, my pleasure, मला निघायला हवं, उशीर होईल, बाय, तुम्हाला दोघांनाही भेटून खूप बरं वाटलं आणि मला नक्की विश्वास आहे की तू मायराला बरोबर हँडल करशील..."
" सानिया, पुढच्या वेळेस येशील तेव्हा निवांत ये... माझी नवीन मैत्रीण म्हणून..."
असं म्हणत तन्वीने सानियाला मिठी मारली.
सॅनियचं बोलणं ऐकून विराट जरा गोंधळून गेला होता, मायराच्यया विषयी त्याला तिच्यावर दया येत होती आणि तिच्या मूर्खपणाचा रागही येत होता. तो ह्यात विचारात चालत हॉलच्या टेरेस वर गेला, रात्र झाली होई, सुंदर चांदणं पडलं होतं, तेवढ्यात तन्वीने त्याचा दंडाला अलगद स्पर्श केला,
" तू खूप गोंधळून गेला आहेस, आपण काढू ह्यासागळ्यामधून मार्ग "
" ते आहेच, पण कसं?"
" तू बोल ना तिच्याशी, तिला सांग ना कबूल करायला "
" तन्वी, तेवढं सोपं नाहीये ते, डोकं दुखतंय..."
" आपण बाहेर जायचं का कुठेतरी...?मला पण खूप कंटाळा आलाय आणि हे सगळं सुरू आहे, त्याचा पण ताण आहे!! मला खूप लाजिरवाणे वाटतं...."
असं बोलता बोलता, तन्वीच्या डोळ्यातुन पाणी येतं आणि ती रडायला लागते, विराट तिचे डोळे पुसत म्हणतो,
" तू काहीही केलं नाहींयेस, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे"
तन्वी रडत हुंदके देत म्हणते,
" पण.... माझी चूक नसतांना माझ्यावर किती आरोप केले गेले !"
" आपण 1 2 दिवस जायचं का कुठेतरी, तिथे फक्त तू आणि मी, बाकी काहीच नाही !"
"नको ,जेवढा उशीर होईल तेवढा घोळ वाढेल, आत्ताच थोडा वेळ जाऊन येऊ , लॉंग ड्राइव्हला , चालेल एंड आपण जेवण करुं निघू !"
" येस , काय मदत करू मी तुला ?"
" तू शांत बस, मी काहीतरी करते ... "
दोघांच्या चेहऱ्यावर हसू फुलेले, जेवण झालं आणि साधारण 9 च्या सुमारास दोघंही निघाले, गाडी सुरू केली आणि निघाले.
विराट गाडी चालवत होता, तेवढयात त्याचा फोन वाजला, केशकाचा फोन होता, विराट ने गाडी थांबवली आणि तो बाहेर जाऊन काहीतरी बोलला, तेवढ्यात तन्वी पण बाहेर आली ,
" विराट, काही महातावचे आहे का ?"
त्याने फोन बंद केला , तिच्या जवळ गेला, आणि तिचे गाल ओढात म्हणाला,
" तुझ्याशिवाय काहीच नाही आत्ता... "
तन्वी लाजली, परत दोघे निघाले, खूप मस्त गप्पा रंगल्या होत्या, हसत होते दोघेही,
"सर..."
" काय ग..."
" ice cream खाऊ ना ..."
" माझ्या मनातले बोलत आहेस तू राणी..."
सुमारास 11 वाजले होते, रस्ता तसा शांत होता, दुकान मिळत नव्हतं,
"जाऊदे आपण घरी जाऊ , तुला जायचंय ना उद्या ?"
" हो हो, चल, तुला झोप आलीये का ?"
" नाही रे ... ",
"मग बोलत नाहीयेस तू ?"
" तुझ्या बरोबरची शांतता खुप आवडते मला, तू जवळ असलास की मज्जा येते मला..."
" मज्जा..."
" हो, ये परत ऑफिसला मग बघ मज्जा..."
दोघही हसायला लागले,काही वेळात शांत झाले आणि एक वेगळीच शांतता होती, ते दोघं ना बोलता, एकमेकांशी खुप संवाद करत होते, तेवढ्यात तन्वीचा डोळा लागला, विराट ने तिच्या हातावर हात ठेवला,
" तन्वी, तन्वी....?"
अशी हाक मारली, पण ती काहीच बोलली नाही, गाढ झोपली होती ती, त्याच्या गालावर हसू आले, त्याने गाडी वळवली आणि घराच्या दुसऱ्या दिशेने गेला, बराच वेळ झाला अजून तन्वी झोपलीच होती. विराट ने 2 मिनिटे गाडी थांबवली आणि 1 फोन केला, तेवढ्यात तिला जाग आली,
" येवढ्या रात्री कुणाशी बोलत आहे ?"
" तू झोप, काही नाही ..." असं तो फोन आवरत म्हणाला. विराटला खूप हसू येत होतं, काही वेळाने त्याने गाडी थांबवली आणि तन्वीच्या गालावर किस करत म्हणाला,
"उठ माझी राणी..."
तन्वी दाखचून उठते, पटकन खिडकीच्या बाहेर बघते तर मोठं हॉटेल असतं, ती गोंधळून म्हणते,
"हे घर नाहीये आपलं, कुठं आहोत आपण "
" गप ग, चल तू ..."
दोघं गाडीच्या बाहेर पडतात, आणि त्या हॉटेल मधल्या एका रूम मध्ये जातात, तन्वीला समजतं की ते दोघे लोणावळा ला आलेले आहेत, मनातून खूप आनंद झालेला असतो तिला, त्या आनंदात ती विराट ला घट्ट मिठी मारते, तो पण तिला घट्ट मिठी मारतो..
विराटच्या डोळ्यात बघत तन्वी म्हणाली,
" Thank you sir "
विराट तिला सोडतो आणि म्हणतो,
"सर म्हणलं ना मला, आता पुढचे 2 दिवस फक्त माझं ऐकायचं"
तन्वी त्याच्या सामोर जाऊन उभी राहते आणि म्हणते,
" Yes sir !"