माझ्या सर्व प्रिय वाचकांनो,
काही वयक्तिक व्यस्थेतमुळे हा भाग यायलाउशिर झाला, ह्या साठी मी तुमची क्षमा मागते, पुढचा भाग लवकरात लवकर पाठवायचा नक्की प्रयत्न करेन....तुमचं प्रेम माझ्यावर असच असुदे...
"तन्वी अजून तयार नाही झालीस तू ?आपल्याला जायचंय ना !"
" विराट अरे हो, मी जरा दमले होते म्हणून डोळा लागला आणि आत्ताच तू याच्या काही वेळ अगोदर उठले , सॉरी ,मी हिते पटकन तयार "
" बरं, मी थांबतो बाहेर तू ये "
तन्वी पटकन तयार झाली आणि बाहेर गेली, तिला बघून विराट 2 क्षण स्तब्ध झाला, तिने एक सुंदर काळ्या रंगाचे साडी नसली होती आणि केसांचा बन बांधला होता, तो काहीच नाही बोलला. " चल, निघुयात , कुठे जायचं ठरवलं आहेस ?"
" सांगतो ऑन द वे..."
दोघंही निघाले, विराटने एका मोठ्या हॉटेल मध्ये टेबल बुक केलं होतं, मस्त आंबीएन्स होता , रात्रीची वेळ होती आणि मंद थंड हवेची झुळूक होती, अशा वातावरणात दोघांनी खूप एन्जॉय केले अँड ते झाले की दोघंही घरी गेले. आपल्या रूम मध्ये गेल्यावर आपले कपडे बदलले आणि झोपायची तयारी करत होते,
" विराट , Thank you , ही संध्याकाळ अँड रात्र खूप सुंदर गेली "
" तुझ्या साठी काहीपण... तू खुश होतीस ना ... आता मला तुझ्या सुखापेक्षा काहीच महत्वाचं नाहीये"
असं म्हणत त्याने तन्वीच्या कपाळावर किस केले, तन्वी गालातच हसली.
" झोप आता तन्वी, तू आज पण खूप दमलेली दिसत आहेस "
" हो "
दोघंही झोपले, सकाळी तन्वीचा फोन वाजला, तिचा डोळेच उघडत नव्हते, अँड तिने उठायचा प्रयत्न केला पण तिला कुणीतरी घट्ट पकडलं होते, विराट ने तिला घट्ट धरून झोपला होता. त्याचा हात काढायचा प्रयत्न केला पण तो खूप गाढ झोपला होता, शेवटी त्याने हात काढला आणि तन्वीने पाहिले तर सानियचा फोन होता, पण येवढ्या सकाळी का फोन आला असावा असा प्रश्न पडला. विराटला काही संशय येऊ नये म्हणुन ती हॉलच्या टेरेसवर येऊन फोन उचलला.
" बोल सानिया, येवढ्या सकाळी फोन केलास ? "
" हो, मला उद्या काही कारणाने दिल्ली ला जावं लागणार आहे, आणि तुला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे, आज भेटू शकतो का आपण? "
" हो चालेल ना, कधी भेटता येईल, तू सांग घरीच येतेस ? एकत्र लंच करूयात "
" आवडलं असतं, पण नको, कारण ते विराट चं पण घर आहे आणि त्याला माहित नाहीये आपण भेटलोय ते, तो आला काल सारखा तर आपलं बोलणं अर्धवट राहील "
" खरं आहे, तू ठरव मग कुठे भेटायचं आपण भेटुयात "
" मी पत्ता पाठवते मग , बाय, भेटूच लवकर "
" हो, भेटुयात "
तेवढ्यात मागून विराटने तन्वीला मिठी मारली, तिच्या मनात काही क्षण धडधडल,
" येवढ्या सकाळी, मला सोडून कुणाला भेटायचे प्लॅन्स सुरू आहेत! "
" माझी एक मैत्रीण आहे, तिला भेटायचंय ... ती खुप वर्षांनी मुंबईला आलीये, आणि चिडलीय, लग्न झालं सांगितलं नाही ते" विराट अजून घट्ट मिठी मारत तिला म्हणाला,
" ठीक आहे, मॅडम, चला आपण आता तरी नाष्टा बनवू अँड खाऊ, भूक लागलीये"
" Yes sir "
" तर सर म्हणायची सवय जाणार नाही तुझी लवकर ? "
हसत हसत तन्वी म्हणाली, " विसरेन त्या खडूसला जो माझा नवरा आहे आता..."
विराट अँड तन्वी आपल्या आपल्या कामाला लागले, विराट ऑफिस ला गेला आणि तन्वी सानियचा भेटायला गेली.
" बोल सानिया, मी ऐकायला उत्सुक आहे ..."
" तन्वी, मायरा ...."
" तिचं काय ? काही पुरावा मिळाला आहे का ? "
" तुला कसं सांगू कळत नाहीये..."
" बोल ना"
" मायरानेच गोंधळ घातले आहेत हे सगळे "
" म्हणजे आपला अंदाज खरा होता, आपण लगेच पोलीसांना कळवू आणि विराटला पण "
" नको... तिने ते मुद्दाम नाही केलं, ती सध्या खूप वाईट परिस्थिती मध्ये आहे, अर्थात तिनेच ती परिस्थिती ओढवली आहे स्वतःवर पण जेव्हा मला समजलं , खूप वाईट वाटलं "
" म्हणजे, काय म्हणायचं आहे तुला ? मायरा दोशी आहे पण तिच्यावर दया येतेय ? काय आहे नक्की हे सगळं ?"
" माझं बोलणं खूप शांतपणे ऐक, मायरा आणि विरातचे नातं तुटलं ना त्याच्यानंतर , तिने एका खूप श्रीमंत मुलाशी लग्न केले, पैशासाठी ते , तो लंडनला असतो. काही कारणाने त्याच्या फॅक्टरीला आग लागली आणि त्याचा सगळे उद्योग बंद पडले, अक्षरशः रस्त्यावर आले ते ... "
" मग काय पुढे ..."
" ती तिच्या घरच्यांना सोडून तिच्या माहेरी परत आली, तिला तसे राहायचं नव्हतं, तिच्या नवऱ्याने खूप समजवायचा प्रयत्न केला चल परत म्हणून, पण तिने नाही ऐकलं... तिला मग विराटची उणीव भासवू लागली, फक्त भारतात राहायचं नव्हतं म्हणून तिने त्याला सोडलं होतं, पण आता..."
" ह्या सागळ्यामध्ये ती निर्दोष कशी ?"
" निर्दोश नाहीये ती "
" तिने हा घोळ पैशासाठीच केला ना ! मग झालं तर "
" हो, पण तिला ह्या प्रकरणामध्ये खूप अलगद पणे हाताळण गरजेचं आहे! नाहीतर ती अजून विचित्र वागेल, आणि घोळ निस्तरायच्या ऐवजी वाढेल "
" मला तुझं म्हणणं पटत आहे, आपण हे विराट तर्फे करू शकतो "
" विराट काय करणार ? "
" त्याला तिच्याकडून सगळं वदवून घ्यायला सांगायचं , कारण ती त्याचंच ऐकेल बाकी तिला काहीच दिसत नाहीये"
" हो ते आहे,पण विराट करेल का ? "
" हो हो, तुला आज संध्याकळी वेळ आहे का ? तेव्हा तू घरी ये, आपली भेट झालीये असं विराटला सांगायलाच नको, आणि तू विराटला सांग , तुझ्या बोलण्यावर विगवास ठेवावाच लागेल , मग तेव्हाच आपण ठरवू की तिच्याकडून कसं वदवून घ्यायचं "
" थोडा वेळ आहे...मी 7 च्या सुमारास येते ... "
" चालेल... भेटू मग तेव्हा ...बाय...आणि खूप खूप खूप आभारी आहे मी तुझी , मला नाही माहीत मी तुझ्या मदतीची परतफेड काशी करणार आहे ते "
" असं नको बोलुस, मी खुश आहे की माझी मदत तुला झाली... भेटू आपण रात्री ... विराटला पण इतक्या दिवसांनी भेटेन ..."
" वाट बघेन... ये नक्की ... "
दोघीही आपल्या घरी गेल्या, संध्याकाळी विराट घरी आला, फ्रेश झाला आणि दोघे सूर्यास्त बघत गप्पा मारत होते,
" तन्वी ,कशी आहे तुझी मैत्रीण... "
" मस्त, सगळेच जर चिडलेत लग्न केलं म्हणून..."
" का ... मी आवडलो नाही का त्यांना ..."
" नाही रे, तसं नाही... म्हणजे बोलावलं नाही, वगरे..."
" घरी बोलवायचं ना मग, माझी पण भेट झालीं असती तुझ्या मित्रांशी..."
" हो नक्की... आपलं मोठं रेसिपशन होईल तेव्हा भेटुयात..."
" तन्वी, जाऊ ना कुठेतरी, मला फक्त तुझ्याबरोबर काही दिवस घालवायचे आहेत, तुला तू आहेच तशी बघायचंय, आपण elephanta caves ला गेलो होतो ना तसे... "
तेवढ्यात बेल वाजली, विराट गेला दार उगजडायला आणि तन्वी त्याच्या मागे गेली...दार उघडलं आणि विराट मनापासून हसला,
" सानिया, what a pleasant surprise , ये ना ... "
" विराट, मी आले होते, तुला भेटल्या शिवाय जायचं नाही ठरवलं "
" थांब, तन्वी..... सानिया ही तन्वी, माझी बायको..."
" विराट, खूप गोड आहे ही..."
असं म्हणत सानियाने तन्वीला मिठी मारली.
" तन्वी, सानिया माझी खुप चांगली मैत्रीण, खूप वर्षांनी भेटली आज, मी खुश आहे की आपल्याकडे अली आज..."
" हो विराट, बघ तुझी मैत्रीण भेटली आज, आपण एकत्र डिनर करू आज "
" हो सानिया , नक्की, थांब तू , तुझं काहीही ऐकणार नाही"
" विराट, तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे, म्हणून मी घाईने आले, मी नंतर येईन आरामात... "
" काय महत्त्वाचं आहे, तू बस... "
" तन्वी, तू पण बस, तुम्हाला दोघांशी बोलायचं आहे" तन्वी विराटच्या शेजारी बसली, विराट जरा गंभीर झाला,
" बोल ना, मी उत्सुख आहे तुझं बोलणं ऐकायला..."
" विराट, तुझ्या कंपनी मध्ये झालेल्या घोळ झालेला ऐकलं, आणि मायरा पण आलीये ते ओण समजलं, त्या बद्दल बोलायचं होतं."
हे ऐकताच, विराटने तन्वीचा हात पकडला, त्याच्या मनात होतं की परत तन्वीवर काही आरोप लावले तर... पण काहीतरी वेगळंच घडणार होतं...
" त्याच्या विषयी के बोलायचं आहे, जे बाहेर पडलं आहे, तेच खरे नाहीये, ते सगळं निस्तरायच आहे..."
" माहितीये, त्या बद्दल बोलायचं आहे....."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा