Login

Yes sir ? PART 23

Hey, See the beautiful new lives of tanvi and virat, and how they develop new hope and relationships .... ~ the story express


विराट आणि तन्वी दोघंही तसे विचारात पडले की एकमेकांशी के येवढं महत्वाचं बोलायचं असेल. तेवढ्यात विराट उठून तन्वी जी खिडकीच्या बाहेर बघत उभी होती तिच्या जवळ गेला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला,
" काय बोलायच आहे तुला, बोल ना "
" नाही पहिले तू बोल, मग नंतर मी "
" का , नाही पहिले तूच, तू अगोदार बोलली ना , तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे ते! मग तू "
तन्वी मग वैतागून बोलली,
" नाही ना यार तूच बोल ना..."
" बरं ठीक आहे, बोलतो मी, फक्त नीट ऐक"
" हो !!"
" तन्वी, आपलं लग्न एकदम घाई मध्ये झालं आणि अशा वेगळ्या परिस्थितीत तू अडकलेली असतांना झालं, मला माहितीये हे खूप अवघड आहे तुझ्यासाठी, पण आपण काहीतरी मार्ग नक्की काढू आणि जर केशकांनी नाही ऐकलं आणि तुला दोषी ठरवलं तर मी त्यांच ऐकणार नाही, तुला परत बोलवेन ऑफिस मध्ये काम करायला..."
" ऐक, असं काहीही करू नकोस, ते वयाने आणि अनुभवाने मोठे आहेत, राग मला त्यांचा पण आलाय पण मी विचार खूप कमी करायचा ठरवलं आहे "
" ते सगळे आहेच, पण मी म्हणत होतो, आज रविवार आहे , तर मी पुढचा एक आठवडा सुट्टी घेतो 2 3 दिवस जवळ जाऊन येऊ फिरायला आणि घरीच आपण एकत्र वेळ घालवू, मला खूप छान वाटेल "
" मला थोडा वेळ दे ना अजून, आपण नक्की जाऊ कुठेतरी , जवळ कशाला लांब जाऊ ना, पण अगोदर थोडा वेळ दे मला, प्लिज! उद्या तू नेहमीसारखा जा ऑफिसला मी माझ्या गोष्टी लावते , नवीन घर आहे ना, थोडी ऍडजस्ट होते , चालेल ? "
" ठीक आहे, तुझ्यावर कुठलीही जबरदस्ती करायची नाहीये मला "
" thank you... आणि अजून एक, प्लिज आपली गोष्ट आत्ताच सांगू नको कुणाला, माझ्या जवळच्या काही मित्रांना माहीत आहे बाकी कुणालाच नाही"
" तुझी इच्छा तर ठीक आहे, तुला काय बोलायचं होतं ?"
" हेच..."
" नक्की ना ?"
" हो, चल झोपायचं का आपण खूप झोप आलीये "
" चालेल, तू इथे आशील ना comfortable ? नाहीतर मी वेगळ्या खोलीत जाऊन झोपतो "
तन्वी विराटला मिठी मारत म्हणाली,
" नाही अरे, तू झोप इथेच "
हे बघून विराट हसला आणि दोघेही झोपून गेले.

सकाळी विराटला जाग आली लवकर त्याने पाहिलं तर त्याचा हात तन्वीच्या पोटावर होता , झोपेत असं झालं असावं म्हणून तो गालातच हसला आणि उठला. तन्वीला झोपलेली बघून तो तिच्याकडेच बघत राहिला, काही वेळाने तो kitchen मध्ये गेला तर प्रीती जागीच होती, कायु ला घेऊन तिथेच कॉफी करत होती.
" काय मग सर, कसं वाटलं आता बायको बरोबर राहायला..."
" मस्स्त वाटलं, असं वाटत आहे हे सगळं कधीच नाही संपलं पाहिजे..."
" बरं चांगलय मग, विराट तिची नीट काळजी घे आणि तिला कधीही एकट पाडू नकोस...मला माहितीये ती आता कुठल्या काळातून जात आहे, तिला लवकरात लवकर बाहेर काढा ह्या सगळ्या मधून ! "
" हो, मी पूर्ण प्रयत्न करत आहे माझ्याबाजूने, आता ऑफिसला जायची तयारी करत आहे...तू आहेस ना इथेच ?"
" मला वाटत आहे आता तुम्हाला दोघांना एकांत मिळणं गरजेचं आहे, मी नेहमीच असेन आता तुम्ही दोघे एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे ... मी आवरून निघेन आपण भेटूच "
" ठीक आहे, मी अवरतो आणि निघतो ! "
विराट आवरायला त्याच्या रूम मध्ये गेला , तन्वी अजून झोपली होती, तो तिच्या शेजारी जाऊन बसला आणि तिच्या कापळवरून अलगद हात फिरवला, तेवढ्यात तिने डोळे उघडले, आणि एकदम दचकून जागी झाली,
" उशीर झाला का खूप ? काळ खूप दामले होते म्हणून गाढ झोप लागली "
" असुदे, तुला आराम करायचा असेल तर कर, मी ऑफिस ला निघालोय, प्रीती पण निघेल थोड्या वेळात तिची पण काही कामं आहेत "
" तुझं ठीक आहे पण प्रीती का चाललीये , मी बोलते तिच्याशी "
असं म्हणत तन्वी उठून प्रीतीला शोधत भावर अली, तिला ती कायु ला घेऊन बसलेली दिसली ,
" तू का चालली आहेस, थांब ना मी एकटी राहून जाईन "
" तन्वी मी असणारच आहे, तू म्हणजे रुळशील नवीन घरात, मला पण घाई आहे, सॉरी "
" पण...."
" पण वगरे काही नाही, तू घे काळजी आपण भेटू "
तन्वी निराश झाली, विराट पण आवरून आला, आणि तो ही ऑफिसला गेला . काही वेळाने प्रीती पण गेली, तन्वी अगदी एकटी राहिली घरात. तिने तेवढ्यात घर वगरे आवरलं थोडं आणि नेट वरून घरात अजून कुठल्या गोष्टी लागतील आशा मागवल्या. विरातचे सारखे फोन येत होते, त्याचं मन कागत नव्हतं ऑफिस मध्ये, केशकांनी नवीन काहीतरी ह्याच घोळतले कागदपत्र आणली होती पण विरातच कुठेच लक्ष लागत नव्हतं. त्याने घरी लवकर जायचा निर्णय घेतला, 3.30 वाजले होते, त्याने 4 वाजता निघायचं ठरवलं.

तन्वी जेवण झाल्यावर सहज मोबाइलवर काहीतरी करत होती तेवढ्या दार वाजलं, तिने पटकन दार उघडलं,एक उंच सुंदर आणि बॉब कट असलेली मुलगी होती, तिला बघून तन्वी म्हणाली ,
" तूच सानिया ना ?"
" हो, आणि तू तन्वी, विराटची नवीन बायको..."
" हो, ये ना ...बस..."
" thanks "
" टी, कॉफी काही पाहिजे?"
" आता नको, काही वेळाने ? काय काम होतं तुला माझ्याकडे ?"
" तू मायराची खूप चांगली मैत्रीण आहेस, आणि जेव्हा मला समजलं तू इथे मुंबईला अलीयेस मला तुझ्याशी काहीतरी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे , विराटला माहीत नाहीये की आपण आज इथे भेटलोय, ते ही त्याच्याच घरी "
" असं काय आहे जे तुला तुझ्या नावऱ्यापासून पण लपवाव लागतंय ?"
" मला मायरा बद्दल थोडं सांगशील ? मी प्रॉमिस करते, हे पर्सनल काहीच नसून कंपनीच्या कामासाठी आहे "
" मला थोडा फार अंदाज आहे तुला काय माहिती पाहिजे, मी अँड मायरा खूप दिवस झाले बोललो नाहीये, तिचं वागणं खूप।विचित्र वाटायला लागले होतं मला, विराट तिला तिच्या फक्त स्वार्थासाठी हवा होता . तिला आवडायचा तो, प्रेम पण करायची पण ते ही सगळं अर्धवट, खूप उथळ मुलगी आहे ती. अती लाडात वाढलेली, कशाचीच किंमत नाही पाहू, मी म्हणेन बरं झालं विराट आणि तीचं नातं संपलं. ती वाईट नाहीये पण खूप immatured आहे..."
" अच्छा, हे मी विराट कडून ऐकलं होतं, अजून काय ?"
" विराट च आणि तीच नातं जेव्हा तुटलं तेव्हा ती खूप उपसेट होती, पण विराट तिला काहीच भाव नाही द्यायचा सगळं संपल्यावर, पण जेव्हा ते एकत्र होते तेव्हा तो तिला फुलासारखी जपायचा, असं ऐकलं की ती सध्या इथे आलीये, मला तिला भेटावं असं पण वाटत नाही...सगळ्यांशी तशी खुप चांगली वागते ती, म्हणून सगळ्यांना आवडायची पण, तिचा नगर स्वभाव पण खूप कमी लोकांना माहीत होता "
" तुला काय वाटतं ती कुठला scam करू शकते का ? "
" हो, जर तिला त्या सचं मधून विराट मिळणार असेल तर नक्कीच करेल , तिचे घरचे खूप रागावले होते तिच्यावर विराटला सोडलं म्हणून कारण विराट खुप चांगला आहे, लकी आहेस तू "
तेवढ्यात तन्वीचा फोन वाजतो आणि बघटवतार मेसेज आलेला असतो,
' darling get ready, we need to go out , its urgent '
असा विराट चा मेसेज असतो.
" सानिया, सॉरी आपण उद्या भेटायचं का, आता विराट येत आहे घरी, तुला पाहिलं तर चिडू शकेल तो, प्लिज समजून घे ..."
" हो, हो, समजू शकते, मला सांग पण नक्की काय झालाय ते मी कारेन मदत तुझी "
"मी खूप आभारी आहे तुझी...की तू भेटायला आलीस आणि माझी मदत करत आहेस"
" भेटू उद्या, बाय...."
सानिया गेली, काहीच वेळात विराट आला पण तन्वी अजून तयार नव्हती....

🎭 Series Post

View all