Yes sir ? PART 22

Dear readers, Do check this part which has taken a new turns, do convey your response.... ~the story express

विराट वाट बघत होता, त्याला कधी एकदा सगळ्यांना भेटतो असं झालं होतं. तेवढ्यात घराची बेल वाजली, त्याने दार उघडलं आणि त्याच्या वाट बघण्याचा अंत झाला. तन्वीचे आई , बाबा, भाऊ, वहिनी, तिची बहीण रोहिणी, काका आणि काकू आले होते, पण विराटची नजर तन्वीला शोधत होती. डॅनियल म्हणाला,

" Welcome, please make yourself comfortable..."

ते सगळे बसले आणि विरातचे घर बघून अगदी त्यांना आश्चर्य वाटले.

" घर खुपच सुंदर आहे..."

रोहिणी म्हणाली त्यावर विराटने हसत उत्तर दिलं,

" हाहा... आत मधून पण बघ, अँड तन्वीला भेटायला येतच राहशील ना...अर्थातच... यावच लागेल..."

" हो मग, मी येणार नक्की, अगदी हक्काने..."

असं रोहिणी बोलली.

" तन्वी नाही का आली..."

असं प्रितीने विचारलं,

" काहीतरी ऑफिसच काम आहे असं म्हणाली ती, येईलच , विराट तुला माहीतच असेल ..."

असं अनु म्हणाली. सगळ्यांना हे पटलं पण राहून राहून विराटच्या डोक्यात विचार येत होता , ऑफिस च असं कुठलं काम असावा आता, जे त्याला माहित नाही. त्याने त्याच्या चेहऱ्यावर दाखवलं नाही की त्याला ह्या बद्दल माहिती नव्हती ते. दोन्ही कुटुंबियांची बोलणी सुरू होती, 2 महिन्यांनंतरची तारीख ठरवली आणि अलिबागला लग्न करायचं ठरवलं, आणि अगदी मोजक्या माणसांना बोलावून. विरातचे असे म्हणणं पडलं की आता सध्या पद्धतीने कराव करण ऑफिस मध्ये काही प्रोबोएम्स चालू आहेत आणि नंतर मोठं रेसिपश करता येईल. सगळ्यांनाच ते पटलं. तेवढ्यात दार वाजलं आणि तन्वी अली, तिचं अगदी हसत सगळ्यांनी स्वागत केलं. विराटशी पणन अगदी नीट बोलली ती , जसं की काही घडलंच नव्हतं. सगळं अगदी व्यवस्थित ठरवलं,

" चला तर मग आता घाई करायला हवी, 2 महिनेच आहेत..."

असं तन्वीची आई म्हणाली,

" हो अगदीच..."

असं प्रीती म्हणाली. सगले अगदी हसत खेळत बोलणे चालु होतं. विराट खूप संधी शोधायचा प्रयत्न करत होता की तन्वीशी एकांतात बोलावं आणि विचारावं के कसलं काम होत, पण ते काही झालं नाही, तन्वी आणि तिचे घरचे निघाले आणि दुसऱ्या दिवशी शॉपिंग ला जायचे ठरवले सगळ्यांनी एकत्र. घरी गेल्यावर विराटने तन्वीला फोन केला, " तन्वी तू कुठे होतीस, ऑफिस च असं कुठलं काम होतं जे मला माहित नाही आणि सध्या तर तू..."

"हो विराट तू बोलत आहेस ते खरं आहे, मी माझ्या एका मैत्रिणीला भेटायला गेले होते, घरच्यांना असे वेगळा करण सांगितलं नाहीतर त्यांनी जायची परवानगी नसती दिली..."

" बरं, ठीक आहे...मला एक खरं उत्तर देशील ? "

" हो , कुठल्या प्रश्नच खरं उत्तर पाहिजे तुला ?"

" तू बरी आहेस ना ? मला माहितीये तुझ्या मनात आता खुप वेगळ्या प्रकारचे विचार असतील पण, मला खरच काळजी वाटत आहे तुझी...तुला काहीही वाटलं तर माझ्याशी बोल, मी काहीतरी नक्की तुला मदत करायचा प्रयत्न करेन...माझ्यापासून अशी लांब नको जाऊस, मला नाही छान वाटत..."

" खरं सांगायचं तर मला पण लांब नाही जायचंय, पण मला कळत नाहीये काय होतंय हे सगळं... माझ्यावर ह्या पूर्वी असले कुठलेच आरोप लागले नव्हते..."

" मी असं नाही म्हणणार मला समजतंय करण जो जातो तुलाच त्याचं कळतं, पण मी नक्कीच म्हणेन मी तुला नक्की समजून घ्याचा प्रयत्न करेन..."

" Thank you. चल आई बोलवतीये...आपण भेटूच उद्या ..."

" Bye.... काळजी घे आणि ह्या गोष्टीचा जास्त विचार नको करू... आपण करू काहीतरी नक्की..."

असं म्हणत विराटने फोन ठेवला. 2 महिने घाईत अँड तयारीत कसे गेले ते समजलेच नाही, शेवटी लग्नाचा दिवस उजाडला, अलिबागचा तन्वीचा वाडा अगदी सजला होता. अतिशय पारंपरिक पद्धतीने लग्न पार पडलं, विराट अँड तन्वी आणि त्यांचे घरचे खुपच खुश होते. शेवटी पाठवणीची वेळ आली, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले, अगदी प्रीतीच्या पण असे दृश्य पाहून पण तन्वी मात्र हसत निघाली. सगळं अगदी व्यवस्थित झालं अगदी सगळं वातावरण आनंदी झालं. विराट आणि तन्वी एका गाडीत होते परत जायला आणि प्रीती, डॅनियल आणि बाकी त्यांचे जवळचे काही मित्र मंडळी वेगळ्या गाड्यांमध्ये. विराटला शेवटी एकांत मिळाला ज्या वेळेची तो खूप दिवसंपासून वाट बघत होता, लग्नाच्या गडबडीत तास वेळ नाही मिळाला आणि ऑफिस मध्ये झालेल्या घोळामुळे पण सगळंच अडकून राहिलं. विराट आणि तन्वी गाडीत दोघेच होते आणि विराट गाडी चालवत होता, खूप वेळ कुणीच काही बोललं नाही, शेवटी ती शांतता विराटने मोडली,

" एक प्रश्न पडलाय..."

" बोला सर..."

" तू खुश आहेस ना..."

" हो ... का ... आता तर आज पासून मी तुझ्याच घरी राहणारे ना..."

" हो... तुला रडू नाही आलं, निघतांना?"

" का येईल, खूप रडून झालय माझं अगोदर... आणि आतातर ही नवी सुरुवात आहे... आणि दादा वहिनी तिथेच असणारेत ना, काही वाटलं तर आहेतच... सगळंच माझ्या मनासारखं झालय... अजून काय पाहिजे "

" हम्म... आपण honeymoon ला कुठे जायचे...तू म्हणशील तिथे जाऊ.."

" मनापासून सांगू का , आता नको जायला, जेव्हा माझ्यावरचे सगळे आरोप नाष्ट होतील तेव्हा जाऊ, नाहीतर लोकं तुलाच म्हणतील एका फ्रॉड मुलीशी लग्न केलं आणि आता तिला घेऊन फिरायला पण गेला हा ..."

" तू काय बोलत आहेस हे, माझ्या आयुष्यातला खूप सुंदर दिवस आहे आज, असं नको बोलुस, मला सगळ्यांना ओरडून ओरडून सांगायचंय, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्याशी लग्न केलंय ते..."

" हो मला पण तसच वाटत आहे, पण आता मला माझ्यामुळे तुझ्यावर कुठलेच कॉमेंट्स नाको आहेत... मी निर्दोष सिद्ध झाले की सांग सगळ्यांना, तेव्हाच तू दे ग्रँड पार्टी तुझ्या बिझनेस community मध्ये, आता आपलं लग्न असाच राहूदे..."

विराटने गाडी बाजूला घेऊन थांबवली, तन्वीचे गाल पकडले आणि म्हणाला,

" मला नाही माहीत मी आता काय केलं पाहिजे, ही परिस्तिथी खूप चुकीची होऊन बसलीये, पण तू प्लिज धीर नको सोडु, मी आहे ना आता, करू आपण... "

तन्वीच्या डोळ्यातून पाणी आले,

" खूप प्रयत्न केला, पण माझ्या मनातून ते जातच नाहीये... मला हे पण माहितीये की तू प्रयत्न करत आहेस पण त्यालाही यश येत नाहीये...मला खूप लाज वाटते, तुझ्यासारख्या मुलाने माझ्यासारख्या मुलीशी का लग्न केलं, असं वाटलं होतं तू परत मायरा कडे जावं ती तुला साजेशी आहे सगळ्या दृष्टीतून..."

असं बोलून ती ढसा ढसा रडायला लागली,

" तन्वी हे काय वेड्यासारखं बोलत आहेस... तुला समजत आहे का काय बोलत आहेस ते... असं बोलून तू मला त्रास देत आहेस... रडणं बंद कर ...

" तन्वी हुंदके देत बोलली,

" सॉरी.... सगळ्यासाठी"

विराटने त्याचा सीटबेल्ट काढला आणि तिला आपल्या जवळ घेतलं,

" शांत हो राणी , आपलं नवीन आयुष्य असं रडत सुरू करणारेस का, तू म्हणशील तसं करू आपण... "

तन्वी मागे सरकली आणि बोलली,

" ठिके..."

" तन्वी, अंग काय झालंय तुझा चेहरा, सगळा मेकअप गेला, कसली भूत दिसतेस बिना मेकअपची...घाबरलो मी... "

तन्वीच्या ओठांवर हसू फुटले,

" हा घे रुमाल, आपण निघू नाहीतर घरी जायला उशीर होईल... "

" हो "

मग ते पुढे निघाले, काही वेळात विराटच्या घरी पोचले, प्रितीने आणि त्यांच्या मित्राने घर अगदी सुंदर सजवलं होतं, दोघांचं अगदी जोमात स्वागत झालं. सगळेच दमले होते म्हणून जेवण झाल्यावर थोड्या गप्पा मारल्या आणि सगळेच झोपायला गेले, तन्वी पण विराट बरोबर झोपायला गेली. त्या दोघांची खोली पण खूप सुंदर सजवली होती. हे बघून दोघंही लाजले, विराट जाऊन पटकन त्याच्या झोपायचे कपडे घालून आला, पण अजून तन्वी तशीच होती. तिला सगळं मेकअप, केस सगळंच काढायला जड जात होतं , तेवढ्यात विराट येऊन म्हणाला,

" मी करू का मदत "

" हो प्लिज, thanks..."

हे ऐकून तन्वीला खूप बरं वाटत होतं, की आपला नवरा तो सुद्धा एवढा मोठा माणूस, आपली मदत करत आहे ते... ती मध्ये मध्ये अशीच गालात हसत होती आणि विराट तिच्या कडे बघून हसत होता...शेवटी ते सगळं झालं आणि तन्वी पण तिचा नेहमीचा झोपायचा ड्रेस घालून आली. तेवढ्यात रूमच दार वाजलं, प्रीती होती,

" सॉरी तुम्हाला त्रास देतेय, पण तन्वी काही लागलं तर सांग, मी आहे आणि मी तुझं कपाट लावून घेतलंय तू ज्या बॅग्स पर्वा पाठवल्या होत्या त्या लावून घेतल्यात आणि काही मला।आवडले ते पणन ड्रेस आणलेत तुझ्यासाठी... "

" ते कशाला..पण thank you" असं तन्वी म्हणाली

" चल goodnight"

असं म्हणत प्रीती गेली. तन्वीने आपलं कपाट उगडून पाहिलं तर सगळं खूप नीट लावलं होते, आणि तिला बघून आश्चर्य वाटलं एक कापण्यात सगळे सेक्सी अशे ड्रेसेस होते, तिच्या लक्षात आले की हेच ते असणारेत जे प्रितीने आणले असणारेत, हे बघून तन्वी लाजत हसायला लागली, तिच्या मागे विराट आला आणि म्हणाला

" काय मग आहे प्लॅन..."

" काही नाही, झोप आलीये"

असं म्हणत तन्वीने दार बंद केलं कपाटाच ... विराट जाऊन बेड वर बसला आणि म्हणाला,

" काहीतरी महत्वाचं बोलायचं हवं तुझ्याशी..."

" मला पण बोलायचंय..." असं तन्वी म्हणाली...

🎭 Series Post

View all