Login

Yes sir ? PART 21

Dear all, Theres some twist, see how this twist creates more excitement for the leaders and also for the character in the story.... ~ the story express

माझ्या सर्व प्रिय वाचकांनो,
काही वयक्तिक व्यस्थेतमुळे हा भाग यायलाउशिर झाला, ह्या साठी मी तुमची क्षमा मागते, पुढचा भाग लवकरात लवकर पाठवायचा नक्की प्रयत्न करेन....तुमचं प्रेम माझ्यावर असच असुदे...

मागच्या भागाचा सारांश:
केशका म्हणजे कंपनीचे जुने स्नेही, ते तिघांची नावे काढतात शोधून ज्यांनी घोळ घातला होता, त्यात तन्वीचं पण नाव होतं, तिघांना नोकरीवरून काढायचे असे ठरते. विराट सगळं तन्वीला संपवून सांगतो आणि विश्वास देतो की ती नक्की बाहेर पडेल ह्या मधून....आता पुढे...



तिघंही तन्वी, राजेश आणि सत्या हे विराट आणि केशकांसमोर उभे होते, काही वेळ एकदम शांतता होती. तेवढ्यात विराट उठला आणि बोलला,
" Good morning guys, I know what you will be hearing is very shocking for me as well as all of you. You 3 have to leave the job and stop coming to office, you 3 are fired due to unseen circumstances. "
हे बोलत असतांना विराट कुणाशीच eye contact करत नव्हता, त्याला मनातल्या मनात खूप वाईट वाटत होतं की त्याच्या ऑफिस मधले 3 जणांवर अशे अलीगेशन्स लागली होती. त्याला त्याची कंपनी हेच कुटुंब होतं, आणि तन्वी तर त्याची येवढी लाडकी व्यक्ती, तिला आशा परिस्थिती मध्ये बघून खूप वाईट वाटत होतं.
" But sir, what is the concrete reason for this ...we need to know "
असं वैतागून सत्या म्हणाली, तिला तरी काय उत्तर देणार होता, त्याने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाला,
" We have some allegations against you, which will be cleared soon,till then you guys remain suspended...no further questions.... You may leave..."
तिघांना पण हे वक्तव्य खूप अपमानास्पद वाटलं, सत्या रडायला लागली...रडत म्हणाली,
" सर, मला पैशाची गरज आहे, "
तिचं वाक्य पूर्ण न ऐकता विराट आणि केशका केबिन मधून निघून गेले.

सत्याला रडतांना बघून, तन्वी आणि राजेश ने तिला धीर दिला आणि तिला विश्वास दिला की आपण ह्या प्रकरणातून नक्की बाहेर पडू लावकरात लवकर. ते तिघे आपल्या आपल्या घरी गेले. तन्वी पूर्णपणे विचारात हरवली होती, तिला सत्या चं कथन ऐकून खूप वाईट वाटत होतं. तिला तिची मदत करायची होती, तिचा विचारांचा वेग विराटच्या आलेल्या फोन ने मोडला,
फोन उचलला,
" बोल ना..."
" तन्वी मला तुझ्याशी बोलायचंय..."
" काय बोलणार आहेस...स्वतःची अशी कुठली बाजू मांडायची राहिलंय... त्या सत्याला गरज होती पैशाची ...तिची परिस्थिती माहीत आहे मला...तिचा नवरा आजारी आहे म्हणून तो काम नाही करू शकत, घरातली सगळी जबाबदारी तिची आहे...तिला कशाला काढल्यास...ते ही कुठला ठोस पुरावा नसतांना..."
" तन्वी, ऐक ना....त्या संदर्भातच बोलायचं होतं... तिची मदत करायची आहे...पण केशका ...एकदा तिला क्लीन चिट मिळाली ना की मग मी तिला प्रोमोशन देऊन तिचा पगार वाढवणार आहे..."
" तुझं हे बोलणं मला सगळं हवेतल्या गप्पा वाटत आहेत..."
" विश्वास ठेव ना माझ्यावर..."
" आपण नंतर बोलू, दादा वहिनी येतील अत्ता"
" बरं ठीक आहे..."
काही न बोलता तन्वीने फोन ठेवला, विराटला पुरतेच समजलं होतं की तन्वी त्याच्यावर नाराज आहे....

दादा वहिनी आले, थोडी एकमेकांची विचारपूस केली आणि तिघंही झोपायला गेले.

दुसऱ्यादिवशी 9 वाजले तरी तन्वी तिच्या रूमच्या बाहेर आली नव्हती... अनुला आश्चर्य वाटलं करण ती कधी येवढ्या उशिरा पर्यंत नाही झोपून राहायची...तन्वीचा दादा नेहमी प्रमाणे ऑफिस ला गेला, त्याचा अचानक अनुला फोन आला,
" अनु अगं ऐक... तन्वी कुठे आहे..."
" अरे अजून ती आली नाही बाहेर...झोपलीये, आज ऑफिस ला पण नाही गेली..."
" आजचा पापेर पहिलास का...मला तरी खूप मोठा धक्का बसलाय...तन्वीशी बोल ते वाचून ,मे काही आता बोलत नाही, घरी आलो की बघु"
" मी बघून सांगते...."
अनुने लगेच पेपर उघडला, आणि पाहिलं तर अशी बातमी होती,
' Satya, Tanvi and Rajesh found guilty for a scam at Kashyap industries...suspeneded forever '
हे वाचून अनुच्या पायाखालची जमीनच सरकली...तिला पण मोठा धक्का बसला, ती धावत तन्वीच्या खोलीचा दरवाजा वाजवू लागली,
" तन्वी दार उघड पटकन..."
2 मिनिटांनी तन्वी डोळे चोळत बाहेर आली, अनुने तिला पेपर दाखवला, तन्वीला पण धक्का बसला आणि ती पटकन बसली.
" मी तुझ्यावर संशय नाही घेते, पण हे काय प्रकरण आहे, खरा काय ते सांग..."
तन्वीने घडलेला प्रकार तिला सांगितला,
"वहिनी पण मला वाटलं नव्हतं की ह्याची बातमी येईल...मी आता विराटला फोन लावते..."
" हो, आणि विचार त्याला हे काय आहे ते...चुकीचे आरोप लाव्हायच्या अगोदर काहीतरी ठोस पुरावा बघावं आणि मग अशा बातम्या द्याव्या..."
विराटला फोन लावला पण बंद येत होता, बऱ्याच वेळ लावला तरी लागत नव्हता, शेवटी तन्वी चिडली आणि म्हणाली,
"मी त्याच्या घरी जाऊन बघते, तिथे नसेल तर ऑफिस ला जाते, हे मला कळणं गरजेचं आहे, असं झाल्यामुळे माझा खूप मोठा अपमान झाला आहे."
" तू एकटी नको जाऊस, मी पण येते तुझ्या बरोबर..."
" ठीक आहे..."
तन्वी आणि अनुने पटकन आवरलं आणि दोघी पण निघाल्या...तन्वीशी सिया अँड प्रेमशी बोलणं झालं तर समजलं की विराट ऑफिस मध्ये नव्हता आणि पूर्ण ऑफिस ला धक्का बसला आणि कुणालाही विश्वास बसत नाहीये की हे तिघे असे ह्याच्यात असतील ते...

त्या दोघी विराटच्या घरी पोचल्या आणि पाहिलं तर दार उघडच होतं, त्या आत मध्ये जाताच पाहिलं तर तिथे सत्या होती, ती रडत विराटशी बोलत होती,
" सर प्लिज माझी परिस्थि समजून घ्या..."
हे तिचं वाक्य मोडत तन्वी म्हणाली,
" अजून काय राहिलंय Mr.Virat kashyap...फक्त संशय आहे म्हणून डायरेक्ट मीडिया मध्ये गेलात तुम्ही , एकदा तरी विचार केलात का की काय वाटेल, आम्हाला तिघांना आणि आमच्या सगळ्या ओळखीच्या लोकांना, नातेवाईकांना, this js not done "
" Tanvi, प्लिज मी हे नाही केलंय, कुणीतरी ही बातमी लीक केली आहे..."
" हे तुमचं डिफेन्स नाही असू शकत, आमच्या आयुष्यभराच्या करिअरचा प्रश्न आहे..."
" तन्वी, तू शांत हो..."
तन्वीच्या डोळ्यातून पाणी आलं,
"नाही होऊ शकत , खूप चुकीचं आहे हे...खूप चुकीचं..."
असं म्हणत तन्वी निघून गेली...विराटने तिला थांबवायचा प्रयत्न केला पण नाही थांबली ती.
" सत्या तुला पैशाची काय मदत हवी आहे ती सांग...मी करतो सगळी, पण शांत हो"
" सर, आता पैसा मला एवढा महत्वाचा नाही, जेवढा सन्मान, आहे,anyway thank you for everything...."
असं म्हणत सत्या पण निघून गेली...विराटच्या पण डोळ्यातून पाणी आले, त्यालाही समजलं होतं की हे झालाय ते खूप चुकीचं आहे, त्याने केशकला फोन लावायचा प्रयत्न केला...पण काही लागला नाही, तेवढ्यात त्याला तन्वीच्या आईचा फोन आला, त्याने तसं घाबरतच फोन उचलला,
" हो काकू, कशा आहात..."
" मी मजेत, अरे आत्ताच तन्वीशी बोलणं झालं, तिने सांगितलं नाही का तुला ? "
" काय, काही बोलली नाही मला ती.."
" अरे, 2 महिन्यांनी चांगला मुहूर्त आहे लग्नाचा, थोडी घाई होईल पण तुला हरकत नसेल तर आपण ठरवून टाकूयात सगळं..."
" तन्वीला काही हरकत नाहीये ना..."
" नाही, ती म्हणाली कसलीतरी सुट्टी आहे तिला, चालेल म्हणली ती...तुझं सांग..."
हे ऐकून त्याला बरं वाटलं आणि मनात जी बारीक शंका होती की तन्वीने लग्न मोडलं तर नाही ना आशा घडलेल्या प्रकारामुळे, तर ती ही शंका निवरली होती,
" माझी काहीच हरकत नाही...आम्ही करायला लागतो तयारी आणि तुम्ही ह्या रविवारी येत आहात ना..."
" हो हो म्हणजे काय....आता घाई केली पाहिजे ना...सगळ्याच गोष्टींची...."
" हो खरय मी सांगतो प्रीती आणि डॅनियलला ..."
" नक्की, भेटू आपण..."
हे ऐकून त्याला खूप आनंद झाला, ह्या सगळ्या मध्ये पण त्याला काहीतरी पोसिटीव्ही दिसत होतं. तन्वीला त्याने फोन केला, तिने उचलला,
" मला महितीयेस तू माझ्यावर चिडली आहेस, पण तुझ्या आईचा फोन आला होता..."
" हो माहितीये मला"
" तू पण हो म्हणालीस ना, पण मी काय म्हणतो, आपलं तर पहिलेच लग्न झालेलं आहे, सांगितलं नाहीस तू ?? "
" मी कामात आहे"
असं म्हणत तिने फोन ठेवला.
पुढचे माही दिवस असेच गेले, तन्वी नाराज होती आणि विराट पण अस्वातंच राहायचा...पण लग्नाची तयारी मात्र जोमात चालू होती, शेकटी रविवारचा दिवस उजाडला विराट, प्रिती आणि डॅनियल तन्वी आणि तिच्या घरातल्यांनी आतुरतेने वाट बघत होते, विराट अगदी तयार होऊन बसला होता. 

🎭 Series Post

View all