Yes sir ? PART 20

Dear readers, Here is another part with another twist, do read and share your responses....Keep reading.... Regards, The story express

मागच्या भागाचा सारांश :
तन्वी आणि विराट आराम करून दुसऱ्या दिवशी ऑफिस ला जातात. आपली आपली कामं सुरू झाली पण एक मध्यमवयाचे गृहस्थ विराटच्या केबिन मध्ये येतात...आता पुढे...



" सर माफ करा, मी तुम्हाला ओळळलं नाही"
असं विराट त्यांना म्हणाला. ह्यावर त्यांनी उत्तर दिले,
" तू मला ओळखणं अवघड आहे, मी ह्याच कंपनी मध्ये खूप वर्षे काम केलं ...पण ते कश्यप साहेबांशीवाय कुणालाच माहीत नव्हतं..."
विराट ला हे ऐकून आश्चर्य वाटलं,
" मला समजलं नाही तुम्ही काय म्हणत आहेत, प्लिज जरा नीट सांगा ना "
त्या गृहस्थाने विराटच्या खांद्यावर हात ठेवला आणि बोलले,
" मी केशव कुमार, काही वर्षांपूर्वी एका मोठ्या प्रकरणात कंपनी अडकली होती... खूप नुकसान झालं होतं, सर खूप चिंतेत होते, तेव्हा मी पण खूप वाईट परिस्थिती मध्ये होतो. मला पैसे पाहिजे होते आणि सरांना मदत. आमची भेट एका चहाच्या टपरीवर झाली होती. त्या घोटाळ्यातून मी सरांना बजेर काढलं आणि त्यांनी क्लीन चिट दिली... तेव्हापासून खूप वर्ष मी बाहेरून लक्ष ठेवायचो आणि जी लोक कच खायची त्यांना त्यांच्याच न कळत वठणीवर आणायचो"
" तुम्ही काय बोलत आहात... मला समजत नाहीये..."
" आता पण मी कश्यप सरांसारख्या देवमांसाच्या कंपनी मध्ये जो घोटाळा झालाय तेच निस्तरायला तुझी मदत करायला आलोय. आता जो घोळ केलाय त्या 3 लोकांनी त्या बद्दल मी सांगायला आलोय, ज्या वेळेस मला समजलं असं झालय मी सरांना खूप फोन करायचा प्रयत्न केला पण काहीच झालं नाही, आज इथे आलो सकाळी तेव्हा हे समजलं, खूप वाईट वाटलं..."
" तुम्ही केशका ना..."
" हो ,केशका हे नाव सरांनीच ठरवलेलं माझं..."
विराटला हे ऐकून खूप आनंद झाला...
" काका , मला तुम्ही माहीत आहात... पापांनी सांगितलं होते तुमच्या बद्दल, प्लिज बसा ना..."
" बसायला नाही आलोय मी...काम करायला आलोय...वेळ घालवू नकोस जास्त"
" हो तुम्ही म्हणाल तसं करू आपण..."
" मला 1 2 तास दे, आपण भवटू परत काही वेळाने...मी जरा आलोच..."
" हो, या...मी वाट बघेन मग पुढे आपण ठरवू कसं काय करायचं ते "
केशका बाहेर गेले आणि विराटला जरा बरं वाटलं. त्याने तन्वीला लगेच फोन करून घडलेला प्रसंग कळवळा. तिला पण हे ऐकून बरं वाटलं.

विराट त्याचं त्याचं काम करत होता, तेवढ्यात त्याला तन्वीच्या बाबांचा फोन आला,
" काका बोला ना...."
" विराट तुझ्या बहिणीला आणि भावजींना भेटायला आम्ही ह्या वीकेंडला येत आहोत...चालेल ना ....तुमच्या लग्नाचं पुढची बोलणी करायला पाहिजे आता..."
हे ऐकून विराट गालातच लाजला,
" काका अगदी, मी त्याच क्षणाची वाट बघत आहे , अगदी आतुरतेने..."
" बरं बरं आपण ठरवू मग कुठे आणि कसं भेटायचं ते"
" काका तुम्ही माझ्याच घरी या ना सगळे...घर पण बघाल , तन्वी ज्या घरात राहणार ते बघाल...."
" बरं, चालेल, आपण रविवारी भेटू मग"
" वाट बघेन तुमची..."
" बघ बघ, भेटू लवकरच..."
विराटचा आनंद आकाशात मावत नव्हता...त्याला काय करू आणि काय नको असं झालं होतं. त्याने प्रीतीला हे सगळं सांगितलं आणि तिथे प्रितीने तयारी पण सुरू केली. आनंदाच्या जोशात त्याने काम आटोपलं, आणि केशकाची वाट बघत होता. काहीच वेळात केशका आले,
" विराट, मी नीट अभ्यास केलाय आणि ह्या 3 लोकांची नावे आहेत, ज्यांनी घोळ घातला असावा, ह्याची दाट शक्यता आहे..."
" अच्छा, कोण आहेत ही लोकं, नक्की हीच आहेत का ? "
" माझा अभ्यास आणि अंदाज कधी चुकत नाही, पण का कुणास ठाऊक मला ह्या वेळेस पूर्ण विश्वास नाही वाटते...ही घ्या त्या 3 लोकांची नावं..."
नावं वाचून विराटच्या पायाखालची जमीन सरकली , तो काहीच बोलला नाही काही क्षण..
" विराट काय झालं? तुमचं काय मत आहे ह्यांच्या विषयी ???"
" पहिल्या 2 नावाचं ठीक आहे, पण हे जे तिसर नाव आहे, तन्वी राव... तुम्हाला खात्री आहे का ? मी ओळखतो तिला , मला नाही वाटत तिने असं काही केलं असावं..."
" तन्वी विषयी तर मला खात्री आहे, ते जे पाहिलं नाव आहे राजेश... त्याच्या विषयी जरा शंका आहे....."
" हे काय बोलत आहात?? मला नाही विश्वास बसते..."
" जे खरं आहे तेच आहे...आता पुढची स्टेप, ह्या तिघांना आपल्याला नोकरीवरून काढावं लागेल...."
" काय, अजिबात नाही...मी असले काहीही करणार नाहीये..."
" अरे समजून घे...घोळ तसच सुरू राहीला तर करोडोंच नुकसान होईल..."
" मला जोपर्यंत खात्री वाटत नाही तोपर्यन्तइ काही कुणाला नोकरीवरून काढणार नाही..."
" ऐक जरा... तुला परिस्थिती चं गांभीर्य समजतंय का?? "
" हो ते सर्व ठीक आहे....पण..."
" पण वगरे काही नाही...तुला उद्यापर्यंतचा वेळ आहे, ठरव के करायचं नाहीतर उगाच खूप नुकसान होईल कंपनीच...आणि ह्यांना क्लीनचिट मिळाली तर परत त्यांना घ्यायचाच आहे... "
" हे चुकीचं वाटत आहे मला..."
" निर्णय तुझा आहे...भेटू उद्या आपण..."
केशका गेल्यावर विराटला आता ही वेगळीच चिंता सतावत होती, तन्वीला नोकरीवरून काढणं हे त्याला पटत नव्हतं आणि तिचं नाव ह्या सगळ्यामध्ये आलं ते ह्याचा विश्वास त्याला बसत नव्हता...मानातुन पूर्णपणे त्याला विश्वास होता तन्वीवर पण केशकांचा अंदाज चुकेल असं ही मानून घेणं अवघड होतं... कंपनीचं नुकसान पण होऊ द्यायचं नव्हतं आणि तन्वीला पण hurt करायचं नव्हतं. गोंधळून गेला होता पूर्णपणे तो. आपल्या खुर्चीवर बसून शून्यात बघत हरवला होता, तेवढ्यात त्याच्या केबिन चं दार वाजलं,
" Come in"
बघतो तर तन्वी होती...त्यांनी निर्णय घेतला की घडलेलं सगळं सांगावं आणि तिला समजावुन ह्या बद्दल सांगावं,
" तन्वी , जरा महत्त्वाचं बोलायचं आहे..."
" बोल ना..."
" तू पहिले आरामात बस...आणि माझं बोलणं अगदी शांतपणे ऐक.."
" बोला सर..."
सर्व जे केशका आणि त्याच्यामध्ये बोलणं झालं होतं, ते विराटने तिला खूप शांतपणे समजावले. तन्वी काहीच बोलली नाही, तिच्या चेहऱ्यावर पण काही राग वगरे दिसला नाही.
" तुला काहीच बोलायचं नाहीये का... राग आला असेल तर तो एक्सप्रेस कर माझ्यावर, भांड माझ्याशी..."
" राग नाही आला, त्यांनी त्यांचं काम केलंय... त्यांना दोष देण्यात अर्थ नाही... "
" म्हणजे...."
" अरे, अंदाज कधीतरी चुकू शकतात, आणि मला काढलं काही दिवस तर फारसा फरक नाही पडणार, कंपनीचं नुकसान न होणं गरजेचं आहे... आणि मला विश्वास आहे माझं नाव कुठेच येणार नाही म्हणून ...काही दिवस अराम करेन घरी, बाकीची काम संपवेन "
" मला आता काय बोलू कळत नाहीये, तुझं किती कौतुक करू, किती समजूतदार आहेस...."
" बरं, कौतुक बास, पण तुला काहीतरी मला ह्याच्या बदल्यात द्यावं लागेल.."
" तू म्हणशील ते देईन.... बोल फक्त... "
" आज रात्रीचं डिनर आपण एकत्र, करायचं, आणि माझ्या आवडत्या ठिकाणी जायचं..."
" एवढंच, नक्की... हे तर रोज पण देईन तुला..."
" बघू ते, मी माझं आवरून ठेवते, काही दिवस पुढचे अराम आहे न मला, त्याची तयारी करते.."
असं म्हणत तन्वी बाहेर गेली, त्याला खूप कौतुक वाटत होतं तन्वीच्या समजूतदारपणावर , पण मनात वाईट वाटत होतं, की तिला एक प्रकारचा अपमान झेलावा लागतोय म्हणून.

रात्री दोघे तन्वीच्या आवडत्या ठिकाणी जेवायला गेले, तन्वीने नेहमीसारखा पास्ता ऑर्डर केला आणि विराट ने कुठलातरी हेल्दी सँडविच. विराट तन्वीला हसत म्हणाला,
" कधीतरी जरा हेल्दी खात जा"
" रोज घरी तेच खातो आपण, म्हणून बाहेर आले कीं असं खाते..."
" हो का..."
" हो..."
" तन्वी , बाबांचा फोन आला होता, आपल्या बद्दल पुढे बोलायला येणार आहेत..."
" हो माहितीये, झालं आमचं पण बोलणं...तू सांगितलं नाहीस आपण केलं सीक्रेट लग्न ते ??"
" असं कसं सांगू , धरून मारतील ना मला घरचे तुझे"
" गप्प, चांगले आहेत ते सगळे..."
" हो माहितीये ते मला, मला अजून एक खरं खरं सांग"
" हो बोल ना..."
" तुला काहीच वाटलं नाही का...म्हणजे तुझ्यावर संशय घेतला गेला ह्याचं"
" नाही येवढं, करण माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि स्वतःवर...म्हणून माहितीये मला , माझं नाव आलाय ते चकून आलं असणार, मला कुठेच काहीच घोळ घालण्यात इंटरेस्ट नाहीये...."
" खूप चांगली आहेस तू..."
" माहितीये मला..."
गप्पा मारत जेवण झालं,
" आज पण ये ना घरी, छान वाटतं मला "
" खरंच येऊ का ? "
" हो , ये...."
हे ऐकून विराट पुन्हा पुन्हा तिच्या प्रेमात पडत होता. त्याला पुन्हा पुन्हा आपण किती लकी आहोत असे वाटत राहत होते. दोघेही तन्वीच्या घरी आले आणि आधल्या दिवशी जसे झोपले होते तसे झोपले.

दुसऱ्या दिवशी सकाळी लावकर दोघे ऑफिस ला पोहोचले आणि विराट ने त्या तिघांना आपल्या केबिन मध्ये बोलावून घेतले... त्याला खरंतर तन्वीला सगळ्यांसमोर अशी वागणूक नव्हती द्यायची पण दुसरा पर्याय नव्हता उरला....

केशका, विराट आणि हे तिघे विराटच्या केबिन मध्ये होते.....

🎭 Series Post

View all