Yes sir ? PART 1

HERE IS A NEW STORY OF PURE LOVE...DO READ AND PUT YOUR RESPONSES IN THE COMMENTS BELOW सकाळचे ७.३० वाजले होते तेव्हा माझा मोबाइलला जोरात वाजला, मी द

HERE IS A NEW STORY OF A VERY PURE LOVE...DO READ AND PUT YOUR RESPONSES IN THE COMMENTS BELOW

सकाळचे ७.३० वाजले होते तेव्हा माझा मोबाइलला जोरात वाजला, मी दचकून उठले आणि लक्षात आलं कि ऑफिस ला जायला खूप उशीर झालेला. मागच्याच महिन्यात आमच्या CEO ची हार्ट अटॅक मुळे मृत्यू झाल्यामुळे त्यांचा परदेशात राहणार मुलगा आता आज पासून आमच्या मुंबई च्या ऑफिस  चा CEO होता. त्याला पहिले कुणी पाहिलं नव्हता पण सगळे म्हणायचे फारच workholic  आहे  तो आणि काम नीट झाला नाही तर सगळ्यांचीच वाट लावतो . त्याने शार्प ८ वाजता मीटिंग ठेवली होती. मी तशी  घाबरलेच कारण मीटिंग ला उशीर झाला आणि त्याने अजून काही वेगळा केला तर ...मी जशी आहे त्या अवस्थेत आवरलं आणि अंघोळ केली आणि धावत निघाले.तेवढ्यात माझ्या वाहिनीने हाक मारली "अग्ग तनु, ब्रेकफास्ट काहून जा , तुझी आवडती सँडविचेस केलीयेत"

"वाहिनी  नकोअग्ग आल्यावर खाईन..तो आज नवीन बाबा येणारे आमचा बॉस म्हणून तर ओरडेल ..ऑलरेडी खूप उशीर झालाय..बाय " असं म्हणत मी धावत घर बाहेर पडले. नेहमी ऑफिसलालोकल ट्रेन ने जात असे पंण उशीर झाला म्हणून ट्रेन साठी ना थांबता taxi ने जायचं ठरवलं. मी कशी बशी ८.२० ला पोचले अँड धावत निघाले तर security म्हणले "मॅडम वाचलात अजून ते विराट सर आलेले नाही " हे ऐकून मी जरा दम खायला थांबले तेवढ्यात security काका म्हणाले "मॅडम पळा अली बघा सरांची गाडी " मी पून्हा वर पळत निघाले. मनात थोडीशी भीती होती कारण जे त्या विराट बद्दल ऐकलं होता त्या नुसार तोच फारच खडूस असावा असं आम्ही सगळ्यांनीच गृहीत धरलं होता. मी conference रूम पाशी पोहोचले तर कुणीच नव्हता हे बघून जरा बरा वाटलं मी बसून पाणी प्यायले अँड वाट बघत होते कि तो विराट तरी येईल नाहीतर माझे colleagues तरी...तेवढ्यात मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला "अग्ग तनु कुठे आहेस इथे मीटिंग सुरु झालीये.."

"काय अग्ग मी इथेच बसलीये कुणीच नाहीये " मी बाहेर येऊन बघते तर काय मी तिसऱ्या मजल्यावरच्या  सेमिनार  रूम मध्ये होते आणि मीटिंग दुसऱ्या मजल्यावर होती..आजच्या दिवशी माझी वाट लागणार हे फिक्स होता, म्हणून मी बोलणी खायची मनात तयारी करून घेतली . खाली गेल्यावर लपून आत जायचं प्रयत्न केला ज्या अर्थी मी पटकन कुणाला दिसणार नाही पंण ज्याची भीती होती तेच झालं " Yes Miss?? Are you a part of this?" मी पाहिलं तर ६ फूट उंच, जरा सावळा रंग असलेला आणि काळ्या रंगाचा  सूट घातलेला एक देखणा माणूस पाहिलं...तो माझ्याकडे अतिशय शांत नजरेने  बघत होता अँड बाकी सगळे पण माझ्या कडेच बघत होते , मला कळलं कि माझी वाट आहे आता " Yes sir, actually ..." माझा वाक्य मोडत तो म्हणाला" आपण उशिरा आलात...मीटिंग सुरु झाल्यावर , without परवानगी आत येता, मला चालणार नाही ...I  Hope this never repeats..see me in my cabin after the meeting" " okay sir" असं म्हणून मी माझ्या जागेवर जाऊन बसले. तो विराटच होता. त्याची बडबड चालली होती एकीकडे अँड माझ्या मनात वेगळेच विचार चालले होते, केबिन मध्ये बोलावल्यावर काय बोलेल ह्याचा विचार कारतहोते तोवर मीटिंग कधी संपली ते कळलंच नाही . मला खूप भूक लागली होती जशी मीटिंग संपली तास मी आणि माझे फ्रेंड्स कॅन्टीन मध्ये गेलो "काय ग आज तर तुझी गम्मत आहे तो विराट तुला काय म्हणतो काय माहित...All the best " असं राहुल म्हणून मला चिडवत होता , सगळेच माझ्यावर हसत होते "BY the way...छानआहे कुर्ता, त्या विराट ला इंप्रेस करायला घातलास का " असं म्हणत सिया  माझी मजा घेत होती मग मी पण म्हणले "हो त्याची बोलणी खायला म्हणून नवीन विकत घेतलाय.."आम्ही नूडल्स अँड coffee एन्जॉय करत होतो तोवर राजू आला " तन्वी मॅडम, ते विराट सर बोलवत आहेत तुम्हाला , लवकर जा  " अर्रे यार हा माणूस शांतपणे खाऊ पण देत नाही. सगळे माझ्यावर हसत होते कारण माझी वाट लागणार होती.

मी घाबरतच गेले त्याचा केबिन मध्ये "May I come in sir ?" " Yess" असं तो म्हणाला आणि मी आत गेले...पहिल्यांदा त्याच्या केबिन मध्ये गेले होते तर आमच्या पहिल्या सरांपेक्षा छान होता केबिन जरा फुलं होती, चांगले शोपिसेस होते, तो काही म्हणायच्या अगोदर मी म्हणले " Nice cabin sir " हे ऐकताच त्याने माझ्याकडे त्याच्या चष्म्या मधून पाहिलं अँड म्हणाला "I have not called you hear to compliment on my cabin "  झालं अजून काय व्हायचा राहिला होता . " Sorry sir " "ह्म्म...तन्वी राव न तू " " Yes sir!! " असं कोण विचारत म्हणून मी डोळे बारीक करून त्यांच्या कडे पहिले, तो म्हणाला " मी पापांकडून तुझा खूप ऐकलं होता कि तू खूप चांगले presentations बनवतेस...तर आज पासून I mean from this moment get all my presentations done ..I wont accept any excuses ...This is your new work now "

मला धक्काच बसला "But sir..." माझा बोलणं अडवत तो म्हणाला " An order is an order, I donot want any arguments  . I will email you the details get started, Discuss your work with me directly, not with anyone else;hope I am clear enough”   मला मनातून राग पण येत होता आणि आनंद पण होत होता.कारण आमच्या पहिल्या सरांनी माझं कौतुक केला होता.

" काय तन्वी काय म्हणलं विराट सर In your personal meeting "

कॅन्टीन मध्ये परत गेल्यावर सगळेच हसत होते.मी घडलेला सांगितल्यावर सगळेच हसायला लाग्लेमाझ्यावर, "We all wish you a good luck ahead..." असं म्हणत आम्ही सगळे आमच्या आमच्या कामाला लागलो.. तो खडूस काय काम देईल ह्याची वाट बघत बसले होते मी तेवढ्यात मला ई-मेल आला ज्यात सविस्तर सांगितलं होतं काय करायचंय. मी दिलेल्या इंस्ट्रुकॅशन्स नुसार काम करत राहिले. २ ३ दिवस गेले मी करून पाठवायचे आणिविराट मला ढीग भर चुका सांगायचं, मी रोज वैतागायचे. कधी ह्याची कटकट संपेल असं झालेला बाकी दुसरा काहीच काम नव्हता मला. माझे मित्र माझी फार मज्जा घ्यायचे. शुक्रवार  होता आणि आज मी, माझा रोहित दादा आणि अनु वाहिनी बाहेर जेवायला जाणार होतो पण मला काम देऊन ठेवला होतं. आमचे आई बाबा आणि बाकी सगळी मंडळी अलिबाग ला राहायचे. दादा नोकरासाठी अँड त्याच्या मागे मी शिकायला अँड आता नोकरी म्हणून मुंबई ला होतो. आमच्या तिचंही खूप चांगली मैत्री होती. माझा दादा माझ्या पेक्षा ५ वर्षांनी मोठा होता. ८ वाजून गेले तरी माझा काम चालूच होतं शेवटी दादा म्हणाला कि आपण नंतर जाऊ. माझा मुद्देच गेलं सगळा. मी माझे गाणी लावून जूस पीत अँड मस्त आरामात खुर्चीवर बसून काम करत होते " Hey Tanvi  तू अजून इथेच ? गेली नाहीस ?  "

मी चमकून मागे पहिले, माझा केसांचा अवतार, माझं डेस्क पसरलेला सगळा नुसता गोंधळच. मी तशीच उठून उभी राहिले अँड माझ्या मांडीवरच श्चार्फ खाली पडला " सॉरी सर " असं म्हणत मी खाली वॉकला श्चार्फ उचलायला "scarf पडला तर why are you apologising ? let the scarf apologise " आणि तो विराट हसायला लागला "You can laugh, atleast smile it’s a joke" मी फक्त smile केला कारण आश्चर्य वाटलेला हा खडूस हसला चक्क. "Okay, enough for today you can leave " " No sir I will just complete it and go, thank you “  तर तो म्हणाला " No no its alright... मीटिंग उद्याची tuesday  ला पोस्टपोन झालीये. As it is no one is here you can leave " असं म्हणत तो गेला. मी पंण यावरून निघाले . लोकल ने बांद्रा पासून नवी मुंबई  मध्ये वाशी ला जायला तास भर तरी लागला. मी कंटाळून गेले तेवढ्यात दादाने दार उघडला " काय मग काय म्हणतोय विराट "  " काय यार दादा, आता त्याचा नाव नको काढूस उद्या परत तेच आहे अँड सॉरी ..आपला प्लॅन कॅन्सल झाला. "  दादा माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला अग्ग ठीके आपण sundayला फिरायला जाऊ. तू जेवून घे आज तुझा आवडता आहे जेवायला ..."  मी आनंदाने ओरडले " फिश करी अँड भात ...आता आले फ्रेश होऊन " मस्स्त जेवण झाला आमचा, दादाने ice-cream  मागवला होतं..खात खात आमच्या गप्पा चालू होत्या. रोज त्या विराट ला उचक्या लागत असणारेत..."तनु तो तुमचा विराट अग्ग खूप मोठा माणूस आहे...शिकलेला आहे खूप...त्याचा खूप नाव असता "  असं वाहिनी म्हणाली, मग मी पंण म्हणलं "हो मग असं असला तर तुम्ही तुमच्या ऑफिस मधल्या लोकांना त्रास द्यायचा lisence नाही ना मिळत...किती कटकट " आणि आम्ही सगळे हसायला लागलो. . मला बेडवर पडताच झोप लागली.

तर मग आता तो द महान मीटिंग चा दिवसउजाडला. मी वेळेवर ऑफिस ला पोहोचले. मीटिंग साठी  म्हणून जरा बेटर ड्रेस पंण घातला होता. आता काय गहजब होता ह्याची मला उत्सुकता  होती तो खडूस काय म्हणतोय अँड आमचा क्लायंट पंण काय म्हणतो हे मला बघायचा होता. तशी मी मनात तयारी केली होतो कि तो ओरडणार मला पंण बघू ...अजून तरी तो ऑफिस मध्ये आला नव्हता.

🎭 Series Post

View all