Yes sir ? PART 19

Hey readers, Though a small part, do read it and share your response in the comments. ~the story express

Yes sir Part 19

माझ्या सर्व प्रिय वाचकांनो,
काही वयक्तिक व्यस्थेतमुळे हा भाग यायलाउशिर झाला, ह्या साठी मी तुमची क्षमा मागते, पुढचा भाग लवकरात लवकर पाठवायचा नक्की प्रयत्न करेन....तुमचं प्रेम माझ्यावर असच असुदे...


मागच्या भागाचा सारांश:
विराट त्याच्या लाडक्या तन्वीला म्हणवून तिच्या गरून मुंबईला परत आणतो, खूप गोड पण भावुक पद्धतीने तिचा राग घालवतो आणि तिला तो बरोबर असल्याचा विश्वास देतो.
आता पुढे......


विराट आणि तन्वी दोघेही तसे प्रवासाने दमले होते. म्हणून घरी काही न बनवता ते बाहेरूनच जेवण मागवत. जेवण झालं की दोघांनाही खूप झोप यायला लागते, पण आता मोठा प्रश्न हा येतो की हे दिघेच घरात आणि आता कोण कसं झोपणार ?
"तन्वी मी झोपतो बाहेर इथे,तू तुझ्या नेहमीच्या जागेवर जाऊन झोप ..."
तन्वीला खरंतर समजलं नाही की आता काय करावं,
" हो हो ठीक आहे, तुला जिथे सोयीस्कर वाटेल तिथे झोप"
" बरं, गूड नाईट..."
दोघांना पण एकेमकांपासून लांब जायचं नव्हतं पण दोघेहीखुप अवघडले होते. पण झोप आलेली होती आणि पुढचे अजून अवघडलेपण अवोईड करायला ते आपले आपले झोपून गेले. आडवं पडल्या पडल्या दोघांनाही झोप।लागत नव्हती, एकमेकांच्या विचारात दोघंही गुंतले होते, एकटेच गालात हसत होते. एकमेकांबद्दल विचार करता करता शेवटी त्यांना झोप लागली.

सकाळी विराट एकदम उठला, पाहिलं तर 6 वाजले होते. मूलतः त्याचा स्वभाव खट्याळ पण हळू हळू परिस्थिती मुळे खूप कठोर झाला होता तो. तरीही तन्वीला भेटल्यावर खूप कमी कठोर झाला होता तो. त्याच्या मनात होतं तन्वीला काहीतरी सरप्राईज देऊन खुश करावं. असा विचार करत तो उठत होता तेवढ्यात त्याचा फोन वाजला , प्रीती चा फोन होता,
" Good morning, मी आलोय इथे, तन्वी कडे आहे..."
" बरं बरं ठीक आहे...वेळ झाला की कर आरामात फोन, काळ मध्ये आम्ही बरचसं शिफ्टिंग केलंय, आज उरण होईल अंग आम्ही आमच्या घरी राहायला जाऊ..."
" कशाला, राहा ना अजून काही दिवस इथेच..."
" नको अरे, आपल्या भेटी होतच राहतील, पणामही सुद्धा इथे काहीतरी सुरू कायुन सेटल व्हायला पाहिजे ना..."
" तुम्ही पण व्हा ना आपल्या कंपनी मध्ये जॉईन..."
" नको अरे, तू खुप छान सांभाळत आहेस...असाच नीट सांभाळ, चल आपण बोलू नंतर..."
" एक प्रॉमिस करशील..."
" हो, काय..."
" मला परत सोडून नाही ना जाणार???"
" नाही रे... कधीच नाही....प्रॉमिस"
" बरं, बाय..."
तो उठला आणि पाहिले तन्वीच्या खोलीच्या दाराजवळ गेला,दार उघडच होतं, त्याने आत थोडं संकोचानेच डोकावुन पाहिलं, तन्वी लहान मुलांसारखी गाढ झोपली होती...अर्धवट घेतलेलं पांघरूण, तिचा गोड चेहरा आणि अगदी बेडच्या कडेला. संकोचानेच तो तिच्या जवळ गेला, तिला नीट पांघरूण घातलं आणि तिला आत नंत बेडवर सरकवायला गेला तेवढ्यात झोपेत ती बोलली,
" झोपू दे ना यार...परत उद्या त्या खडूस बॉसकडे जायचंय..."
असं म्हणत तीच नीट सावरून झोपली परत. हे बघून आणि ऐकून त्याला गालातच हसू आलं, त्या क्षणी त्याला तिला जवळ कुशीत घेऊन झोपायचं होतं, पण ते काही तो करू शकला नाही. तो किचन मध्ये गेला, कमीत कमी आवाज करत कॉफी केली. कप मध्ये कॉफी ओतत असताना त्याला तन्वीचे हात आपल्या पोटाशी जाणवले, तो हसला आणि हात सोडायला जाणार होता तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की हा भास झाला होता म्हणून. तो परत गालात हसला.

त्याने हातात कप घेतले आणि मागे वळला तेवढ्यात झोपेतून उठलेली आणि अवतारात तन्वी जांभया देत बाहेर आली. त्याने असं कधी तिला पाहिलं नव्हतं, तो परत तिच्या प्रेमात पडला ह्या क्षणी.
" विराट, झोप झाली ना तुझी..."
विराट ने फक्त मान हलवत इशारा केला, झाली म्हणून. विराटला वाटत होतं त्याला good morning kiss वगरे काहीतरी मिळेल, पण तन्वीला कुठे अशा रोमँटिक गिष्टी सुचाव्या...ती आपली जांभया देत डायनिंग टेबल वर येऊन बसली आणि तसच डोकं टेबल वर ठेवून परत डोळे बंद करून पडली. विराटला ती अजूनच गोड वाटायला लागली होती. त्याने तिच्या केसातुन अलगद हात फिरवला आणि म्हणाला,
"Sleeping beauty...आपल्याला जायचं आहे ना कामावर..."
" कंटाळा आलाय" असं तन्वी उठून म्हणाली,
विराट तिच्या कपाळावरची जखम बघत म्हणाला,
" बँडेज का काढलं?? पूर्ण बरं नाही झालंय ना अजून "
" हो, पण मला ..."
"पण वगरे काही नाही, मेडिकल बॉक्स कुठे आहे ते सांग मला.."
" नको ना प्लिज"
" गप्प, कुठे आहे मेडिकल बॉक्स..."
" तिथे असेल बघ...कसला आहेस रे तू..."
विराट ने काही न बोलता तो बॉक्स आणला आणि तिची मलम पट्टी केली...
" विराट, तू असाच आहेस का??"
" म्हणजे कसा..."
" घाबरट..."असं म्हणून तन्वी हसली....
विराट काहीच न बोलता उठून गेला, बॉक्स परत जागेवर ठेवायला.
" तन्वी तुझ्यासारखे लोकं असली आजूबाजूला तर काय करणार ना... मी ह्याला काळजी घेणं म्हणतो... तू घाबरट म्हणत असशील"
" तुला राग आला का "
" नाही ग ...नाही आला... चल आवर..."
" झाला तुझा खडूस मोड सुरू..."
" Thanks for the compliment darling "
तन्वी तिच्या खोलीत आवरायला गेली, विराट पण फ्रेश वगरे झाला आणि दोघंही आवरून निघाले. खाली जाऊन गाडीत बसले आणि तन्वी त्याला म्हणाली,
" आपला प्लॅन जसा आहे तसाच ना ..."
" हो...तसाच... तू फक्त, सगळं नीट हँडल कर आणि परत चकून सुध्दा माझ्यावर अशी चिडू नकोस, नाहितर मी खूप रंगवेन तुझ्यावर"
" बरं बरं समजलं..."
दोघेही ऑफिस ला पोहोचले , आणि आपल्या आपल्या कामांना गेले . तन्वीच्या मित्रांनी तिचं छान स्वागत केलं आणि ती पण लगेचच तिच्या कामाला लागली.

विराट त्याच्या केबिन मध्ये, काम करत असतानाच एका माध्यमवयी गृहस्थाने केबिन चं दार वाजवले, आणि सरळ आत मध्ये शिरला. विराटला एकदम धक्का बसला त्यांना बघून . त्यांनी विराटला मोठ्या आवाजात विचारले ,
" आमचे कश्यप साहेब गेले पण तरीही आम्हाला सांगावं असं वाटलं नाही ?"
विराट खूप गोंधळला होता, करण त्याने त्यांना ओळखलं नव्हतं.
" सर, प्लिज या ना बास..."
हे फक्त समजलं की तो माणूस कुणीतरी, त्याच्या वडिलांच्या जुन्या स्नेहीनपैकीच होतं, पण कोण ते अजून विराट ला कळलं नव्हतं...




पुढचा भाग लवकर प्रदर्शित होईल, हा भाग जरूर वाचा आणि सांगा कसा वाटला ते....